Mar 02, 2024
स्पर्धा

शोध... तिच्या अस्तित्वाचा... भाग -2

Read Later
शोध... तिच्या अस्तित्वाचा... भाग -2

....पोरं सुखरूप घरी परतली होती. त्यांना काहीही झालं नव्हतं. तरी सदाभाऊ च्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. ते एकटक छताकडे नजर लावून बसले होते. घडून गेलेला प्रसंग मनात घर करून बसला होता. पोरांना काही झालं असतं तर.... ह्या विचारानेच छातीत कळ आल्यासारखी वाटलं. त्यांनी उठून तांब्याभर पाणी घटाघटा प्यायले. झोप येईना म्हणून ओसरीत  आले. विचार करता -करता च त्यांनी एक निर्णय घेतला... 

कोंबड्याने बांग दिली. कु ss कु ss ड्युss च कु ss..तशी बायजाबाई ला जाग आली. आपलं आवरून ती बाहेर झाडू मारायला आली तर ओसरी त सदाभाऊ बसून दिसले. "काय वो, काय झालंय??  काय करताय हित?? " ती जवळ येत काळजी ने म्हणाली. "बायजे... काल चा प्रसंग डोळ्यासमोरून हालत नाहीये बघ. आपल्या पोरांना काही झालं असत तर... "-सदाभाऊ. "आवो., काही काय बोलता.. आपली पोर बरी हाईत. आणि प्रसंगाच म्हणाल तर आडवळणा च आपलं गाव... अजून पक्क्या रस्त्याने जोडलं पन नाहीये दुसऱ्या गावाशी. असे प्रसंग तर येतीलच. "बायजाबाई म्हणाली. "हो न, पण आपल्या पोरांच्या वाटेवर नकोत हे खाच खळगे. "थोडं थांबून ते पुढे म्हणाले,  "...बायजे.. मी एक निर्णय घेतलाय. " "काय हो?  कसला निर्णय...  लेकरांची शाळा -बिळा सोडणार आहात की काय आता...?? "ती जराशी गोंधळली. "पोर उठली की सांगीन सर्वाना. " असं म्हणत ते उठले. डोळ्यातले अश्रू खाली पडू न देता त्यांनी नजर दुसरी कडे वळवली... 

...मुलं उठली.आपल्या कामाला लागली. मस्ती.. मजा.. अभ्यास.. दंगा...कालची घटना विसरूनही गेली. "पोरांनो ss या रे सगळी जेवायला.. चित्रा ss ये ग बाय मदतीला जरा. "माय चा आवाज ऐकून सगळे आत आले. माय ने ताट वाढली, हसत -खेळत सर्वांची जेवण आटोपली. बा चा चेहरा जरा गंभीर वाटला म्हणून चित्रा जवळ जात म्हणाली,  "काय रे बा, काय झालंय? असा का दिसतोय काळजीत असल्यावाणी.?? "

"रघु -चित्रा जवळ या. मला बोलायचंय  तुमच्याशी "सदाभाऊ म्हणाले तसे दोघे जवळ आले. "बा काय झालं सांग की "काळजी न रघु बोलला. "पोरांनो कालच्या घटने न  मी पुरता खचून गेलोय म्हणून मी एक निर्णय घेतलाय."त्यांचं बोलणं ऐकून रघु ने विचारलं,  "कसला निर्णय?? "त्याचा आवाज कातर झाला होता. "उद्यापासून तुम्ही दोघांनी ह्या गावातून शाळेत जायचं नाही. "-सदाभाऊ.  "म्हणजे बा.. तू  माझी शाळा सोडायला लावणार. मी शिकायचं नाही आता... "चित्रा रडवेली झाली. शिकायला मिळणार नाही ह्या विचारानेच तिला रडायला आलं. "न्हाय ग माझी बाय..तुझी शाळा कुठे सोडायची म्हटली मी. ह्या गावातून जायचं नाही असं बोललो बघ. "तिचे अश्रू पुसत ते म्हणाले. "म्हणजे... " तिच्या चेहऱ्यावर गोंधळ स्पष्ट दिसत होता. "म्हणजे... उद्या पासून तुम्ही काकाच्या गावाला जायचं. तिथला रस्ता सरळ मार्गाचा आहे तालुक्यापर्यंत. म्हणजे काही टेन्शन च नाही राहणार बगा. "एका दमात सदाभाऊ बोलले. "म्हणजे .. "  ती माय कडे जात बोलली, "माss य.. बा आम्हाला तुमच्या पासून दूर करणार आहे?? " तिला पुन्हा रडू आलं. तिला बघून रघु आणि सुरेश दोघांनीही सुर आवळला. बायजाबाई ला पण हा निर्णय अनपेक्षित होता. तिच्या डोळ्यातील थेंब आपसुकच गालावर आले.  "अरे, रडायला काय झाले. मी हा निर्णय चांगल्या साठीच घेतलाय. आणि काका कुणी परका आहे का? आणि गावच्या घरावर आपलाही हक्क आहेच की. एक खोली तुम्हाला देतीलच. इतर नातेवाईक देखील आहेत गावात. आणि पुन्हा मी येईलच की वरचेवर तुम्हाला भेटायला. " आता सदाभाऊ चा ही गळा दाटून आला. "अहो, पण... "बायजाबाई काही बोलणार तोच "बायजे माझा निर्णय पक्का आहे. "असं म्हणून त्यांनी विषय संपवला. 

...रात्र झाली... आज चित्रा माय च्या कुशीत निजली होती. दोघींचा ही डोळा लागत नव्हता.  "माय ss". "हू ss". "मी शिकू न ग?? " तिने विचारलं. "हो.. शिक न ग माझी बाय.. " माय उत्तरली. "किती शिकू...?? "तिचा पुन्हा प्रश्न. "आभाळा एवढं शिक. मले का समजते मा त्यातलं. पण तुले शिकायच आहे न तुले वाटते  तेवढ शिक. "तिला थोपटत माय बोलली. उद्या पोरांची पाठवनी  करायची होती... आज माय च्या डोळ्यात पूर आला होता.... 
"...पार्थ.. अरे अडीच वाजलेत,  जरा टीव्ही वर देवमाणूस मालिका लावतोस काय? "चित्रा बोलली तस हसत पार्थ ने टीव्ही ऑन केला. "काय ग आई. कालपासून दोन रिपीट एपिसोड बघून झालेत तुझे तरी पुन्हा काय बघतेस ग.? "तो हसून म्हणाला. "पार्थ, मालिका बघण्यासाठी नाही रे. तर त्याच्या शीर्षक गीतात जे गावातील वातावरण दाखवतात न ते बघायचे असते मला. बघ... तू पण बघ... किती मस्त वाटत आहे तो  हिरवागार परिसर... बैलांची जोडी.... मन परत गावात गेल्या सारखं वाटतंय बघ. "पहिल्यांदाच बघितल्या सारखं मन भरून ती बघत 
राहिली. पार्थ ला हे नवीन नव्हतं. कारण हे रोजच घडत असे. तोही तिच्या सोबत एन्जॉय करू लागला... चॅनल बदलता बदलता एके ठिकाणी शेतशिवारे दिसू लागली तस तिनी थांबायला लावलं. शेत शिवारा तील हिरवी डोलनारी पिके बघून तीच मनही भूतकाळात डोलू लागलं.... 

....काकाच गाव... तेथील ती खोली.... दोघा बहिणी भावाचा स्वयंपाक करता करता धुराने भरून जायची. डोळ्यात पाणी जमा व्हायचे. कधी कधी आपल्या कपड्या बरोब्बर काकू चेही कपडे असायचे. कधी धान्य लवकर संपायची. मग बा कडे पैसे मागायला बरे नाही वाटायचे. रघु सर्व अन्न संपवत असेल असं सुरवातीला तिला वाटलं पण नंतर कळलं काकांची मुलं ह्यांचे जेवण संपवून ठेवायची. मग तिने मार्ग काढला. शेतीची काम कधी केली नव्हती पण आता इतर मुलीबरोबर रोवनी करायला जाऊ लागली...सकाळी काम करून मग शाळा.... मिळालेल्या पैशाचा तेवढाच हातभार... एकदा असेच सदाभाऊ भेटायला आले. बगतात तर परकर पोलकं घातलेली.... चिखलाने बरबटलेली त्यांची पोर शेतात उभी होती. "चित्रा.. " त्यांनी आवाज दिला. तशी ती धावत आली. "बा "..ती काही बोलायच्या आत ते म्हणाले, "काय अवतार करून घेतला आहेस.. शाळा नाही काय... आणि शेतात काय करतेस?? "शेवटी तिने सांगितलेच की तुला त्रास नको आणि पैसे ही हवेत म्हणून ती हे काम करते. तिची नजर खाली होती. त्यांचा उर दाटून आला. तिचा चेहरा वर करून ते म्हणाले., "चित्रा... तू काही चुकीचं काम करीत नाही आहेस. मग खाली मान कशाला घालायची. अग कोणताही काम छोटे नसते. ह्यातून च तर आपण स्वाभिमानाणे जगू शकतो. माझी चित्रा स्वाभिमानी आहे आणि ह्याचा मला गर्व आहे. चित्रा... तू माझा अभिमान आहेस बाळा... "त्यांनी तिला प्रेमाने जवळ घेतले... 

मी माझ्या बा चा अभिमान होते... आणि माझा अभिमान होता माझा बा.... ती मनात म्हणाली. बापाच्या घरी श्रीमंती नव्हती खूप.. पण कसली कमतरता ही तिला जाणवली नाही कधी.. एक एक वर्ग ही शिकला नव्हता बा.. पण जगाच्या दुनियादारी ची सम्पूर्ण शाळाच होता तो. छोटे मोठे काम करत घरगाडा चालवत होता तो. पण एकाएकी चार लेकरं गेली.. आणि त्यानं सगळे काम सोडून दिले. एक अंकलीपी घेऊन शेतात अक्षर गीरवू लागला... नंतर आरोग्य वेदाची पुस्तकं वाचून काढली. होमिओपॅथी शिकला . Allopathy ही शिकला थोडंफार... आणि जवळ पासच्या गावात वैदकी करू लागला... त्यानंतर त्याचे एकही पोर दगावली नाही.... आजूबाजूच्या गावातल्या लोकांना गुण येऊ लागला.... असा हा माझा बा... मी त्याचा अभिमान असले तरी माझा अभिमान.... माझा आदर्श... तोच तर होता. बापाच्या आठवनिने डोळ्यात पाणी आले चित्रा च्या. मी एवढी म्हातारी.. तरी वडिलांच्या आठवणी न डोळे भरतात. माझ्या मुलांच्या ही डोळ्यात येईल  का पाणी... त्यांच्या वडिलांच्या आठवनी ने... अचानक आलेल्या विचाराने ती जरा चमकलीच... 

....का आला असेल हा विचार चित्रा च्या मनात.. जाणून घेऊया पुढील भागात... 

..हा भाग शिक्षणा साठी आई वडिलांना सोडून मनावर दगड ठेवून बाहेर पडणारे मुलं आणि त्यांच्या पालकांना समर्पित... 

तुम्हीही कधी सोडल होतं का घर शिक्षणासाठी.?? अनुभवा ती घालमेल आजच्या भागात. 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//