Mar 02, 2024
स्पर्धा

शोध... तिच्या अस्तित्वाचा... भाग -12 अंतिम...

Read Later
शोध... तिच्या अस्तित्वाचा... भाग -12 अंतिम...

"...काय...??  पप्पा या थराला जातील असं वाटलं नव्हतं...!  "

चिडून लतिका बोलत होती. 

"....या थराला म्हणजे...??  तुला माहित होत..?  "

चित्रा तिच्याकडे रोखून बघत म्हणाली. 

"...हो., म्हणजे आम्हाला  त्यांच्या वागण्यावरून अंदाज आला होता कि कुठेतरी पाणी नक्कीच मुरतेय पण तू म्हणतेस तेवढं डिटेल मध्ये नव्हतं माहित.  "        ..... लतिका. 

"..म्हणजे दीपक तुलाही हे ठाऊक होत..??  "

चित्राने दीपक ला विचारलं. 

"...हो अगं.. "      ... दीपक. 

"...म्हणजे सर्वांना सर्व माहिती होत पण मला सांगायची कुणी तसदीही घेतली नाही.  " 

तिचा स्वर दुखावला होता. 

".. अगं मम्मी...  रिलॅक्स.. ! हे बघ तुला सगळं कळल्यानंतरही आम्हाला सांगायला किती अवघड गेलं न.  तसेच आमचेही झाले. आपल्याच पप्पा बद्दल असं काही बोलणे तेही पूर्णपणे कन्फर्म नसताना...  आम्हालाही थोडं awkward च  वाटेल ना. 

पण आता तू कसलेच टेन्शन घेऊ नकोस.आम्ही आहोत न..  तू फक्त तब्बेतीला जप. हवे तर आपण दुसऱ्या मोठया दवाखान्यात जाऊया का..??  "

तिचा हात हातात घेत दीपक म्हणाला.. 

....श्रीधर च्या वागण्याने तब्बेतीवर चांगलाच परिणाम पडला होता. ती अगदी अंथरूनाला खिळली होती. म्हणून तिने मुलांना फोन करून बोलावून घेतलं होतं.  आणि आता तिच चर्चा सुरु होती.. 

"..मग आता काय करायचं..??  "

ती आशेने बघत   विचारत होती. 

"....काय करायचं काय म्हणतेस गं..?  सरळ पोलीस कंप्लेंट करूया.  "

लतिका रागाने म्हणाली. 

"..काहीही काय बोलतेस लतिका??  आपल्याच पप्पाची कंप्लेंट करणार का..?        .....  दीपक. 

"..का  नाही करायची  रे कंप्लेंट..??  कसे वागले ते आपल्या ममाशी .???  तूच सांग तू जर वहिनीशी असं वागला तर बसेल का गप्प.??  " लतिका रागाने नुसती धुमसत होती. 

"...मी का असा वागेन गं माझ्या बायकोशी..??  कुठला विषय ना तू कुठे नेऊन ठेवतेस. आणि हे बघ.. प्रत्येक गोष्टीचं सोलुशन ना असं रागाने काढायचे नसते. 

मी आहे ना..  मी बोलतो त्यांच्याशी..  होईल सगळं ठीक.. टेक केअर मम्मी.. "

त्यांना आश्वस्त करून तो निघून गेला. चर्चेला तिथेच विराम लागला. 

.

.

.

"  ...पप्पा....  थोडं बोलायचं होतं... आत येऊ का..??  "

श्रीधरच्या रूमचा दरवाजा ठोठावत दीपकने विचारलं.. 

".. अरे ये ना...  माझ्याशी बोलायला तूला परवानगी कधीपासून घ्यावी लागतेय.?? "  हसत हसत श्रीधर ने विचारलं. 

तो आत आला. 

"..  सांग,  काय म्हणतोस..? कसा चाललाय तुझा फर्म..? "

श्रीधरनेच फार्मल बोलायला सुरुवात केली. 

"...माझं सर्व ठीक चाललंय पप्पा.  पण तुमचं काय चाललंय..?  "

दीपक ने डायरेक्ट मुद्द्यात हात घातला. 

".. कशाबद्दल बोलतो आहेस तू...? "  ... श्रीधर. 

".. मी कशाबद्दल बोलतोय तुम्हाला चांगलेच माहित आहे... ! "

      ... दीपक. 

"...ओह.. ! म्हणजे मम्मीने पाठवलं तुला माझ्याशी बोलायला. "

....  श्रीधर .

" एवढा लहान नाहीये पप्पा मी , कि मम्मीचे ऐकून इकडे येईन. मोठा झालोय मी आता. कळतात मला गोष्टी... "  ... दीपक. 

"...एवढा मोठाही नाही  झालास ,  कि  बापाला अक्कल शिकवशील.. "

श्रीधरच्या आवाजात एक जरब होती. 

".. तेच तर दुर्दैव आहे ना पप्पा... मुलं वयात आली कि  त्यांचं पाऊल वाकडं पडू नये म्हणून काय योग्य नी काय अयोग्य ते पेरेंट्स मुलांना शिकवतात.. इथे तर मला तुम्हाला सांगावं लागत आहे.. "  हताश होत दीपक म्हणाला. 

"... This is my personal life... don"t interfere.. " श्रीधर जरा घुश्यातच  बोलला. 

"... your personal life affects our lives too papa...  कळत कसे नाहीये तुम्हाला.. Afterall we are family...  एकाने चूक केली तर घरातील सर्वाना त्याचे परिणाम घरातील प्रत्येकाला भोगावे लागतात... " त्याला समजावत तो बोलला. 

"...Really..??  Are we family..?? "

उपरोधिक स्वरात त्याने विचारलं. 

" ... जर खरंच आपण एक फॅमिली आहोत तर नेहमी तुम्ही मम्मीची का बाजू घेता?  तुमचं तर काहीच प्रेम नाहीये माझ्यावर. Actually तुम्ही मला " आऊट ऑफ द फॅमिली " करून टाकलं आहे. आणि आता लिलीकडून थोडं प्रेम मिळतेय तर तेही तुम्हाला नकोय. She loves me stupid..  "

...श्रीधर. 

"...चुकत आहात तुम्ही पप्पा.. ! तुम्हाला वाटते तशी लिली नाहीये. या आधीच दोन माणसांसोबत संसार मोडलाय तिने. पस्तीस वर्षाची तरुणी.. का म्हणून तुमच्यावर प्रेम करेल ती...??   तिला तुमच्यावर नव्हे तुमच्या संपत्तीवर प्रेम आहे. तुमचा  पैसा  लुबाडून ती निघून जाईल नी तुम्हाला कळणारही नाही.. and its only attraction from your side also..तुम्हाला ही कळेल लवकरच. 

ती फसवत आहे पप्पा तुम्हाला.. कि ऑलरेडी तुम्ही फसला आहात..?? ती काही ब्लॉकमेल वगैरे करतेय का तुम्हाला??  देऊन टाकूया ना तिला जे हवे असेल ते. पण तिथून तुम्ही बाहेर निघा.." 

त्याला समजावत दीपक म्हणाला. 

"..पुरे.. ! आणि पैसा पैसा काय लावलंय रे..??  तिला पैसा हवाय नी तुम्हाला काहीच नको का??  तुम्हाला एवढं शिकवल, लग्न करून दिलीत. सगळं व्यवस्थित चाललंय तुमचं..  आता मला माझं जीवन माझ्या मर्जीने जगू दया. माझ्या वडिलांनी मला एक कवळी सुद्धा ठेवली नव्हती. मी तर तुम्हाला एवढं सर्व दिलंय.. आणखी काय हवंय..?? "

त्याचे डोळे आग ओकत होते. 

".. एक छदामही नको...  किमान मला तरी.. पण जेव्हा तुम्हाला गरज असेल ना,  तेव्हा मी मात्र नेहमीच तुमच्या पाठीशी असेल..  एक मुलगा म्हणून... एक मित्र म्हणून... 

Because we needs u papa..."

त्याच्या खांद्याला थोपाटत भरल्या डोळयांनी दीपक निघून गेला... 

.

.

"...काय म्हणालेत पप्पा..??  बोलला त्यांच्याशी..?? "

आशेने चित्रा दिपकला विचारत होती. दोन दिवसांनी तो तिला भेटायला आला होता. 

"...काही नाही अगं..   आकर्षण आहे त्यांच्यात बाकी काही नाही.. एक दीड  वर्षात आपोआपच त्यांना त्यांची चूक कळेल. तू नको ना टेन्शन घेऊस. " तो म्हणाला. 

"..तोपर्यंत मी काय करू..?? "   ..  तिचा प्रश्न. 

"... काही करू नकोस अगं.  जमेल तर फक्त माफ कर. क्षमेसारखं  दुसरं अस्त्र नाही मम्मी. कधी ना कधी त्यांना त्यांची चूक कळेलच. त्यांच्या पापाची फळ ते भोगतीलच.. तू क्षमाशील राहा.. " ...  दीपक. 

"...आणि मी कसल्या पापाची फळ आत्ता भोगतेय रे..??    स्वतःचे  अस्तित्व विसरून आयुष्यभर श्रीधरची  सोबत केली ह्याची..?? "...चित्रा. 

"  मम्मी, अगं.. "

त्याला मध्येच तोडत ती पुढे म्हणाली... 

"..एक मिनिट थांब दीपक. मला बोलू दे. अरे मोहाचे क्षण प्रत्येकाच्याच आयुष्यात येतात. माझ्याही आलेत. पण त्यांना सारून त्यातून बाहेर काढलेच ना मी स्वतःला. जर कधी चुकून माझा पाय घसरला असता...  मी तुमच्या पप्पासारखी वागले असते तर केलं असतंस मला माफ??  तेव्हाही हेच बोलला असतास..?? 

.... तो निशब्द झाला. 

दीपकचे बोलणे चित्राला पटले  नव्हते. पण तिला हे कळले कि पोरांना आताही पप्पानची गरज आहे... दीपक च्या बोलण्याचा ती विचार करू लागली... "करू का श्रीधर ला माफ? " तिने स्वतःलाच विचारलं.....

.

.

.

.


...पाच वर्षांनंतर....

...आज्जीsss ..... क्लासचा वेळ झालाय.. कुठे आहेस गं तू...?? आम्ही आलोय..  "

सहा सात वर्षाची चिमुकली अंगणात ओरडत होती.. तिच्यासोबत तिच्या वयाच्या आणखी तीन चार चिमण्या होत्या.. 

"...आले गं पोरींनो..  जरा धीर धरा.. "असे म्हणत एक स्त्री बाहेर आली.

बारीक फुलांची साडी नेसलेली.. पांढऱ्या शुभ्र केसांचा जुडा घातलेली... उतार वयामुळे गाल जरा आत गेलेले पण चेहऱ्यावर आत्मविश्वासाचे तेज असलेली.. 

हो..... 

 ही आपली चित्राच... !

"..या गं चिमण्यानो.. चित्रमहालात तुमचं स्वागत आहे... "    हसून तिने सगळ्यांना आत घेतले. ( हो सांगायचं विसरलेच.. "चित्रांगण " चे नाव बदलून आता  "चित्रमहाल " ठेवले आहे. आणि आपली चित्रा "बालसंस्कार "  वर्ग चालवतेय. )

सगळयांचा हास्यकल्लोळ चालला होता. थोडया वेळाने चित्राने गाणं शिकवायला सुरुवात केली.. 

"  या जगण्यावर.. या जन्मावर शतदा प्रेम करावे... "

तिच्या मागोमाग मुलीही तालासुरात म्हणू लागल्या... 

टिंगss टॉंग ss  दाराची बेल वाजली. तसे एकीनं दार उघडलं..

"..कोण हवंय. ?? " तिने विचारलं. 

"... चित्रा..  चित्रा आहे..?? "

 "हो, थांबा. " असं म्हणून तिने आवाज दिला.. "..आज्जी गं ss तूला भेटायला आलेत कुणीतरी.. "

कोण आलं म्हणत ती बाहेर आली. समोर बघितलं आणि आपसुकच मुखातून  शब्द बाहेर पडले...  " श्रीधर.. !!"

... पांढऱ्या केसांचा.. सुरकुतल्या चेहऱ्याचा.. दीनवाणा... तो उभा होता. त्याला आत ये म्हणायचंही तिला सुचलं नाही.. डोळ्यासमोर  पुन्हा उभा राहिला तिचा भूतकाळ.... पाच वर्षापूर्वीचा... 

.

.

...दीपकच्या बोलण्याचा विचार करून तिने ठरवलं करूया श्रीधर ला माफ...  तारुण्यात जर त्याने एखादीशी लग्न केले असते तर आज माझ्या मुलांची वाताहत झाली असती.. कसाही असला तरी त्यानं मुलांना चांगले शिक्षण दिले.. त्यांच्या भल्याचाच विचार केला. मुलं नोकरीला लागली. दीपक  ला तर फर्म दिले टाकून. एक बाप म्हणून त्याचे कर्तव्य बरोबर पार पाडले.. याही वयात मुलांना गरज वाटते वडिलांची तर करून टाकूया त्याला माफ. तसेही क्षमेसारखं अस्त्र नाही.... 

... तिचा काही प्रतिकार नाही हे बघून त्याचा बाहेरख्यालीपणा जास्तच वाढला. दोन वर्ष अशीच गेली.. त्याचा बेशरमपणा.. त्याची गुर्मी वाढतच गेली.. आणि त्याचा परिणाम.. तिची तब्येत आणखी खालावत गेली. आता तो फक्त वाट बघत होता... तिच्या मृत्यूची... 

मुलं ही आपआपल्या संसारात रमली.. ती मनाने आणि शरीरानेही खंगली.. त्याच वागणं सहन होईना.. डोक्यावरून पाणी वहायला लागलं होतं... 

तिने ठरवलं आता बस्स.. ! पुरे झाला हा सोशीकपणा.. आता मला माझा स्टॅन्ड घ्यावाच लागेल... 

"... चित्रा..  काय आहे हे..??  तू मला घटस्फ़ोटाची नोटीस पाठवली..?? "     ... श्रीधर. 

"  हो.. " ती शांतपणे म्हणाली. 

"..ह्या वयात तूला घटस्फ़ोट हवा..? " कुत्सितपणे त्यानं विचारलं. 

" खरं तर हे पाऊल मला आधीच उचलायला हवे होते.. पण असो.. "

       ...... चित्रा.

 "मी ह्यावर सही करणार नाही.. " तो म्हणाला. 

" तूला करावीच लागेल.. " तिच्या नजरेत जरब होती आणि हातात काही कागदपत्रे... 

लिली त्याची बायको आणि तिचा मुलगा हा त्याचाच मुलगा आहे हे सांगणारी ती कागदपत्र होती. 

" हे जर मी पोलिसात दिले तर तुलाही माहितीये काय होईल. आणि बदनामी ती वेगळीच. "   ... चित्रा. 

"..पण ह्या वयात डिवोर्स... लोक काय म्हणतील..??  समाज काय म्हणेल..?  " ... श्रीधर. 

".. लोकांचा विचार करणे आता मी सोडून दिलंय श्रीधर.. आता मला कुणाची पर्वा नाहीये... "    ..... चित्रा. 

जेलची हवा आणि बदनामीच्या भीतीने त्यानं पेपरवर  सही केली. त्यापूर्वी  " चित्रांगण" आपल्या नावाने करून घ्यायला ती विसरली नाही. आयुष्याची इतकी वर्ष त्याच्यासोबत राहून वाया घालवल्याची भरपाई म्हणून महिन्याची घसघशीत पोटगीही घेतली. तोही नाही म्हणू शकला नाही. घर नावाने झाल्यावर सर्वात प्रथम तिने घराचे नाव बदलले.. "चित्रांगण " चे  "चित्रमहाल " केले... 

.

.

.

......आणि आज त्याच चित्रमहालाच्या दारात तो उभा होता... 

" कशी आहेस..?? " क्षीण स्वरात त्याने विचारलं. 

".. मी मजेत..  तुझा विचार करणं सोडलं आणि बघ माझं आजारपण कुठल्या कुठे पळून गेलं.. आता अगदी मस्त.. मजेत आहे मी.  काम करायला सावी आहेच. बाजूला लतिका - पार्थ ही आहेत. नीट चाललंय माझं . पण तूझी  कुठे वाट चुकली? "     ... चित्रा. 

".. लिली ने पुरतं अडकवलय मला..  माझी पेन्शन.. माझे कार्ड सर्व तीच्या ताब्यात आहेत. तिथे मला काडीचीही किंमत नाहीये. तिचा मुलगा जो माझा नव्हताच कधी.. सारखा पाणउतारा करतो.. शीण आलाय गं आता सगळयांचा...  चित्रा मी येऊ इथे राहायला..??  माफ करशील मला..??? "

डोळ्यात पाणी घेऊन तिच्यापुढे हात जोडून तो उभा होता... 

क्षणभर काय बोलावे तिला कळेचना. ती तिथेच स्तब्ध उभी होती...

"...खरं तर आता माझा तुझ्याशी कसलाच संबंध उरला नाही श्रीधर..,  त्यामुळे माफ करण्याचा प्रश्नच येत नाही...  तरीही माफ करायचं म्हणत असशील तर तू मला माफ कर पण मी तूला इथे राहायची परवानगी देऊ शकत नाही. सत्तर वर्षाच्या आयुष्यात आत्ता कुठे मी माझ्या इच्छेने जगायला सुरवात केली.. माझं अस्तित्व शोधलं... ते पुन्हा नाही गमवायचय..  आता कोणत्याच नात्यात नाही बांधायचय  मला स्वतःला .. आता माझं आयुष्य माझ्यापरीने जगायचंय.... सॉरी... ! "

...भरल्या डोळ्याने तो निघून गेला..  तिनेही डोळे पुसले... 

"..ए  आज्जी ये न गंss..  आपलं गाणं राहीलय ना.. "

मुलींच्या आवाजाने भानावर येत ति आत गेली. 

" या जन्मावर.. या जगण्यावर शतदा प्रेम करावे.... "

" आज्जी नाही जमतंय गं.. टीव्ही लावूया... "

एकजण म्हणाली. दुसरीने होकार भरला.. तिसरीने सुरुही केला.. 

टीव्ही वर गाणं सुरु होतं... 

" जो दिल से लगे 

उसे कह दो , हाय, हाय,  हाय, हाय 

जो दिल ना लगे 

उसे कह दो,  बाय,  बाय, बाय, बाय 

आणे दो आणे दो दिल मे ख़ुशीया आने दो 

कह दो मुस्कराहट को हाय, हाय, हाय, हाय 

जाणे दो, जाणे दो दिल से चले जाणे दो. 

कह दो घबराहट को बाय, बाय, बाय, बाय बाय बाय 

लव्ह यू जिंदगी... लव्ह यू जिंदगी.. लव्ह यू जिंदगी.. 

लव्ह मी जिंदगी.... 

मुली गाण्यावर थिरकायला लागल्या....... आणि त्यांच्यासोबत चित्रानेही फेर धरला.......... 


                                   समाप्त..... 

            **************************************

कथा किंवा एखादया प्लॅटफॉर्मवर लिहिण्याचा हा माझा पहिलाच अनुभव..  पण वाचकांच्या उत्तम प्रतिसादामुले कथामालिका पूर्ण झाली.. ह्या कथेचा शेवटही माझ्या वाचकांनीच सुचवला. जवळपास सर्वांनाच वाटलं श्रीधरला चांगली अद्दल घडावी.. मग मीही तेच लिहिलं. मुळात श्रीधर सारखी माणसं आपल्या आजूबाजूला असतातच त्यांना योग्य धडा शिकवणे आवश्यक असते. ह्या कथेतून मला एवढंच सांगायचं होतं कि आपण नेहमीच माझं घर,  माझा नवरा, माझा संसार.. ह्यातच अडकून असतो. पण कधीतरी स्वतःचाही विचार करायला, स्वतःवर प्रेम करायला शिका.. आपलं अस्तिव गमवून नव्हे आपलं अस्तित्व सोबत घेऊन जगा... 

...आणि आपल्या चित्राचा निर्णय कसा वाटला नक्की सांगा. 

भेटू लवकरच एका नव्या कथेमालिकेसह.. तो पर्यन्त "प्रीती.. " कथेचा आस्वाद घ्या... 


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//