Login

शोध.... तिच्या अस्तित्वाचा... भाग -4

ही कथा आहे तिची. 'ती ' तुमच्या माझ्या सारखीच एक सामान्य स्त्री. पण लहानपणापासून तर वार्ध्यक्या पर्यन्त चा तिचा प्रवास खरंच सामान्य होता का.. कळण्या साठी वाचत रहा स्पर्धा कथामालिका शोध... तिच्या अस्तित्वाचा...

".... साविss काय आहे हे..?? "

"काय झालं साहेब...? "

श्रीधर चे रागाने ओरडने एकूण हातातील झाडू मारण्याचे काम तसेच ठेऊन सावि धावतच किचन मध्ये आली. 

"..काय झालं साहेब.? "तिने पुन्हा विचारलं. 

"सावि, हे काय आहे??? " ओट्यावरच्या वाटीकडे बोट दाखवत तो म्हणाला. आवाजात अजूनही राग होता. 

"साहेब.. भात आहे उरलेला रात्रीचा. "

ती खाली मान घालून म्हनाली. 

"तुला किती वेळा सांगितलं सावी जेवण जरा कमी बनवत जा. एवढा सारा भात फेकून द्यावा लागेल आता.. ह्याच्यापुढे लक्षात ठेव अन्नाची अशी नासाडी चालणार नाही मला. "

आवाजात एक जरब होती त्याच्या. 

"किती स्वयंपाक बनवू तुम्हीच सांगा बरं आता. मूठभर तर भात मांडते  तर तोही संपत नाही. तुमी काल आले नाही.. काकूही बरोबर जेवत नाही. मग उरणार नाही का बरं भात. आता न याच्यापुढ नाही याच राहिलं तर फोन करत जा मले मग कमी करत जाईन मी सैपाक."

सावी ठसक्यात बोलली. 

"ह.. ठीक आहे " असं म्हणून तो बाहेर आला.

तीही आपल्या कामाला लागली. 

...सावी,  चित्रा - श्रीधर च्या घरी कामाला होती. सकाळ -सायंकाळ चा स्वयंपाक,  झाडू -पोछा ही काम ती करायची. आपल्या अशा फटकळ बोलण्यामुळेच श्रीधर सारख्या माणसाच्या घरात कामाला टिकून आहे असं तिला वाटायचं. कदाचित खरं ही होतं म्हणा ते... 

श्रीधर रात्री घरी आला नाही म्हणून अन्न शिल्लक राहिलं होतं. पण स्वतः ची चूक मान्य करेल तर तो श्रीधर कसला? 

"का गं जेवण का नाही केलंस काल?? "

त्यानं आपला मोर्चा  आता बेडवर पडलेल्या चित्राकडे वळवला. 

"नाही झाली जेवायची इच्छा.. " निर्विकार चेहऱ्याने चित्रा म्हणाली. 

"का?? " त्याचा पुन्हा प्रश्न. 

"नाही जात जेवण जास्त पोटात आता. " ती उत्तरली. 

"कसं जाणार..? ह.. कसं जाणार न जेवण पोटात?  भूक कशी लागणार?  दिवसभर बेडवर लोळत असतेस. काही काम करायला नको,  कशी लागेल भूक सांग न?? "त्याची बडबड सुरु झाली.

चित्रा ने एक अवाक्षर ही काढला नाही. वाटलं तिला ओरडून म्हणावं माझी अवस्था माहित नाही का तुला? साधं झोपेत कड बदलायला गेले तरी वेद्नेने सतरा देव आठवतात, आणि हा म्हणतो की मी लोळत असते. पण ती काहीच बोलली नाही. उगाच शब्दाला शब्द वाढले असते आणि घरात काम करणाऱ्या परक्या बाई समोर तिला तमाशा नको होता. 

ती काहीच बोलत नाही म्हणून चिडून तो आत गेला. आंघोळ -जेवण करून तसाच तनतनत बाहेर निघूनही गेला. 

"जाऊन -जाऊन शेवटी जाशील तरी कुठे... माहित आहे रे मला सगळं. "  ती मनात म्हणाली. कालपासूनच अंगात तापाची कणकण जाणवत होती तर काय पोटात जेवण जाणार आणि आता भूक लागली तर याच्या अशा वागण्याने जेवणाची वासनाच नाहीशी झालीय. तिने तोंडावर पुन्हा पांघरून ओढलं....

"...मम्माss, जेवली का ग?? "बाहेरून आत येत लतिकाने.. चित्रा च्या मुलीने विचारलं. 

आत येऊन बघते तर चित्रा झोपली होती. तिने पांघरून बाजूला केले. हात लावून बघितलं, ताप नव्हता आता. 

"ये ss य, मम्मा.. उठ ग. चल जेवण कर बघू. " लतिका म्हणाली. 

" नाही ग लतिका, जेवायची इच्छा नाही आहे बघ. " चित्रा म्हणाली. 

नको जेऊ.. पण उठ तर. हे बघ... काय आणलंय मी तूझ्यासाठी... गरमागरम जिलेबी.. ती तरी खा.. "

लतिका तिला प्रेमाने समजावत होती. 

"जिलेबी खाल्ली की पोटात दुखते ग माझ्या. नको मला. "-चित्रा. 

"अगं.. पण तुला आवडते म्हणून आणली  न.. खा बरं. "लतिका म्हणाली. 

"नको ग बाई...,  आवडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा त्रास च होतो आता मला.. " एक लांब श्वास घेत ती म्हणाली. तिच्या बोलण्याचा रोख लतिका ला कळत होता. 

"मम्मी.. अग, तू आई कडे आहेस का?? हे बघ काय आलय.. "

हातामध्ये मोबाईल घेऊन पार्थ आनंदात आत आला.  

"काय आलं..?? " दोघींनी एकत्रच विचारलं. 

"आई.. मम्मी.. माझा रिजल्ट आलाय. 86%मिळालेत मला. "

तो नाचतच म्हणाला. 

"रिजल्ट... मोबाईल मध्ये...?? " चित्राने आश्चर्याने विचारलं. 

"हो ग आई,..  आता covid मुळे एक्साम ऑनलाईन होती न तर result पण ऑनलाईन च लागलाय मोबाईल वर. "

तो तिला समजावत सांगू लागला. 

तिने त्याचे अभिनंदन करून जिलेबी चा तुकडा त्याला भरवला. पण तिला वाटलं ही कसली परीक्षा.. आणि  हा कसला निकाल..?? 

असं कधी असते का?? .. परीक्षेच्या काळात होणारी धडपड आणि निकालाच्या वेळेस होणारी धडधड... अशी ऑनलाईन कधी अनुभवता  तरी येईल  का??. 

लतिका च्या हातात जिलेबी होती.. आणि पार्थ च्या हातात त्याचा रिजल्ट.. आणि तिला तिचा मॅट्रिक् च्या परीक्षेचा निकाल आठवला. आणि तिचं हृदय जोरात धडधडायला लागलं.. निकालाच्या त्या दिवसासारखंच... 

दहावी ची परीक्षा आटोपली आणि चित्रा -रघु गावाला परतले. घरकामात माय ला ती मदत करत होती. माय ही खुश होती. बा मात्र पोरीचा निकाल केव्हा लागतो याची वाट पाहत होता. पण चित्रा ला वाटायचं की निकालाचा दिवस कधी येऊच नये. मी तर नापासच होणार आहे. बापाला तोंड कसं दाखवनार?  त्यापेक्षा निकाल लागूच नये. 

...पण शेवटी तो दिवस उजाडलाच. आज निकाल होता.. सकाळपासूनच तिच्या मनाची घालमेल सुरु होती. कामात लक्ष लागत नव्हतं. मनात एकच विचार... नापास होईल तर बा ला कसं वाटेल... 

दुपारी  चुलीवर तिने चहाचे आधन ठेवले होते.. तेवढ्यात तालुक्यावरून बा आला. बाहेरूनच "बायजे ss.."म्हणत त्याने हाक मारली. 

"काय हो काय झालं... " बायजा बाईने विचारलं. 

"बायजे... चित्रा चा निकाल घेऊन आलोय.... "

निकालाच नाव ऐकून चित्रा पटकन बाहेर आली. 

"माझा निकाल... "ती बा कडे बघत म्हणाली. 

" बा.. मी पास झाले..?? " तिने प्रश्न केला. 

"नाही... फक्त पासच नाही.. चित्रा तू तर खूप चांगल्या गुणांनी पास झालीस.. ! तूच बघ.. "त्यांनी तिच्यासमोर हात केला.

बा च्या एका हातात वर्तमानपत्र होते आणि दुसऱ्या हातात तिचा आवडता खाऊ... चिवडा आणि जिलेबी... 

पूर्वी रिजल्ट पेपर मध्ये यायचा. तिने पेपर हातात घेऊन बघितलं.... खरंच ती पास झाली होती. पण बा नी म्हटलं तसं खूप सारे गुण नव्हते मिळाले. फर्स्ट क्लास दोन टक्कयांनी हुकला होता... 

बा मात्र खूप खुश होता... चित्रा पास झाली होती... त्याच्या गावातील मॅट्रिक् शिकणारी चित्रा पहिली मुलगी होती. तिचे एवढेसे मार्क्स पण त्याला खुप जास्त वाटत होते... 

त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला.. जिलेबी चा तुकडा तिला चारून दिला. 

"आज मी खुप आनंदी आहे चित्रा.. खूपच आनंदी आहे... माझं नाव सार्थकी लावलंस...

चित्रा... खरंच माझा अभिमान आहेस बाळा तू.... "

त्यांचा उर दाटून आला. बायजाबाई च्या ही डोळ्यात पाणी आलं . 

दोन्ही हातानी आपला चेहरा झाकून घेत चित्रा हुंदके देत रडत होती. चौतीस मार्कांचा विचार सोडून इतर विषयावर लक्ष दिले असते तर आणखी चांगले मार्क्स मिळाले असते असं तिला वाटलं.

"...पण तरीही मी पास झाली ना  मग तरीही काय रडतेय.. " तिला कळत नव्हतं. तो पास झाल्याचा आनंद होता की बा ला झालेल्या आनंदामुळे तिच्याही डोळ्यातून आनंदाश्रु वाहत होते.....?? 

"काय ग मम्मा.. पोटात दुखत आहे का?? "

तिच्या डोळ्यातील आसू बघून लतिकाने विचारलं.

 "नाही ग.. हे तर पार्थ चा  रिजल्ट ऐकून आलेले आनंदाश्रु आहेत. "

ती हसून म्हणाली.

आता तिघांनीही  मिळून जिलेबी चा फडशा पाडायला सुरुवात केली...

..रात्री खरंच पोटात दुखायला लागलं. हल्ली जिलेबी खाल्ली की पोटात त्रास व्हायला लागायचा. निकालाच्या आठवणीने जिलेबी खाल्ली होती आता त्रास तर सहन करावाचं लागणार होता तिला. तिने अंगावर शाल घेतली ,  तशी मायेची ऊबदार गोधडी आठवली  तिला.... 

"...माय... " चित्रा माय च्या कुशीत शिरत म्हणाली, "माय.. मी पुढ आणखी शिकू का ग..? तिने विचारलं. 

"शिक न व बाय माझे.. " माय म्हणाली. 

"किती शिकू ग.. "चित्रा न पुन्हा विचारलं. 

"मले का समजते बाई... पण तुले पाहिजे तेवढं शिक तू.. "

बायजाबाई न नेहमीचच उत्तर दिले तशी चित्रा खुदकन हसली. माय च उत्तर तिला पाठच झालं होतं. मनात ती म्हणाली., 

"हो ग माय खुप शिकेन मी... "

खरंच चित्रा ला आता खुप -खुप शिकायचं होतं. गणित -विज्ञान तिचे आवडते विषय होते. सायन्स घेऊन तिला अकरावी ला ऍडमिशन घ्यायची होती. खूप -खूप -खूप शिकून कुणीतरी मोठ्ठ व्हायचं होतं. बा च नाव पुन्हा मोठं करायचं होतं... 

...होईल का चित्रा चे हे स्वप्न पूर्ण... कळन्यासाठी वाचा कथेचा पुढील भाग.. 

आणि आजचा भाग कसा वाटला कंमेंट करून नक्की सांगा. 

(कथा मोबाईल वर लिहीत असल्यामुळे व्याकरणाच्या चुका होत आहेत तर pls consider करा. )

🎭 Series Post

View all