शोध नात्यांचा भाग ७

Mission of searching relatives

     मागील भागाचा सारांश: अमोलची काकू राघवच्या आत्त्याची वर्गमैत्रीण निघते. अमोलच्या काकूकडून राघवला त्याच्या परिवाराबद्दल बरीच माहिती मिळते. 

     राघव अमोलच्या काकू बद्दल व तिने दिलेल्या माहितीबद्दल त्याच्या आई बाबांना सर्व सांगतो.

राघव--- बाबा तुम्ही संगीता मंजुळेला ओळखता ना?

बाबा--- हो, ती सुशिलाची वर्गमैत्रीण होती, दोघी नेहमी एकत्रच खेळायच्या, संगीताने ताई आणि अण्णांबद्दल जे काही तुला सांगितलंय ते सर्व खरं आहे. माझ्या घरातून जाण्याने ताईला एवढा त्रास झाला असेल याची मला कल्पनाही नव्हती. अण्णांवरच्या रागाने मी परत माघारी फिरलो नाही ही माझी खूप मोठी चुक झाली आहे. मी ताईला भेटायच्या निमित्ताने एकदा तरी घरी जायला पाहिजे होते. मी अण्णांवर एवढा राग धरायला नको होता. राघव आपल्याला आपला वाडा वाचवायला हवा, माझ्या ताई आणि अण्णांची शेवटची निशाणी आहे ती, आमच्या वाड्यासोबत खूप आठवणी आहेत, आमचं बालपण तिथेच गेलं आहे. राघव संजयचा फोन नंबर मिळव, मी स्वतः त्याच्याशी बोलतो.

( राघवच्या बाबांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं)

राघव--- बाबा झालं ते झालं, तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका, आपला वाडा आपण वाचवूयात. बाबा अमोलची काकू म्हणत होती की राजेंद्र काका गव्हर्नमेंट जॉब करतात, ते सोशल मीडियावर नक्कीच सापडतील, आपण त्यांच्याशी संपर्क साधूच शकतो ना.

बाबा--- अरे हो, प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे.

आई--- एक मिनिटं, आमचा एक महिला मंडळाचा व्हाट्सअप्प ग्रुप आहे त्यात एक बाई आहे, मी तिला वैयक्तिक ओळखत नाही पण मागे ग्रुप मध्ये कोरोना योद्धा ह्या विषयावर चर्चा झाली होती तेव्हा आम्हाला सर्वांना कळलं की त्या बाईचा नवरा मंत्रालयात मोठ्या पदावर कार्यरत आहे.

राघव--- (चिडून) आई त्या सगळ्याचा आता इथे काय संबंध, आम्ही कसल्या टेन्शन मध्ये आहे आणि तुझं काय चाललंय?

आई--- माझं बोलणं पूर्ण तर होऊदेत, त्या बाईच्या नवऱ्याचं नाव राजेंद्र देशमुख आहे. आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकतो.

बाबा--- अगं राजेंद्र देशमुख नाव असणारे भरपूर जण असतील, आपण याची गॅरंटी काय म्हणून द्यायची की तोच आपला राजेंद्र असेल?

राघव--- बाबा पण प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे.

बाबा--- अरे हो मला तुझं म्हणणं पटतंय, पण अशा मंत्रालयात मोठ्या पदावरच्या माणसाला आपण डायरेक्ट फोन करून कस विचारायच की तुम्ही कुठले आहात? तुमच मूळ गाव कोणतं? जर समजा तो माझा भाऊ नाही निघाला तर काहीही संशय घेऊन आपल्यावर पोलिस केस करू शकतो.

राघव--- आई तु त्या बाईंना फोन करून त्यांना तुझ्या ग्रुपचा संदर्भ देऊन त्यांना सांग की आपल्याला त्यांच्या नवऱ्याची काहीतरी खासगी कामासाठी मदत हवी आहे, त्यांनी जर त्यांच्या नवऱ्याचा म्हणजेच राजेंद्र देशमुख चा फोन नंबर दिला तर मीच त्यांच्याशी काय बोलयच ते बोलतो.

आई--- अरे पण मी त्यांना कारण काय सांगू?

राघव--- त्यांना सांग की माझा मुलगा कोरोनामुळे गावी अडकला आहे आणि तो तिकडे आजारी पडला आहे व त्याला मेडिकल हेल्प काहीच मिळत नाहीये.

आई--- काही काय बोलायला लावतोस.

राघव--- आई तुला सांगितलं आहे, तेवढं कर ना. 

     राघवने सांगितल्याप्रमाणे आईने त्या बाईला फोन करून राजेंद्र देशमुखचा फोन नंबर मिळवला. राजेंद्र देशमुख सोबत काय बोलायचे हा विचार करून राघवने त्यांना फोन लावला.

राघव--- हॅलो, हा राजेंद्र देशमुखांचा फोन नंबर आहे का?

राजेंद्र--- हो, आपण कोण बोलत आहात?

राघव--- मी राघव देशमुख बोलतोय.

राजेंद्र--- माझ्या मिसेसने मला सांगितलं होतं की तुमचा फोन येईल म्हणून, बोला मी आपली काय मदत करू शकतो?

राघव--- काका मी तुमच्यापेक्षा खूप लहान आहे, तुम्ही मला एकेरी नावाने हाक मारुच शकता. काका मी लॉकडाउन जाहीर होण्याच्या एक दिवस आधी गावाला काही कामा निमित्ताने आलो होतो, लॉकडाउन झाले आणि मी इकडेच अडकलो, माझे आई बाबा मुंबईत असतात. लॉकडाउन उघडेल या आशेने मी जवळजवळ दीड महिन्यापासून वाट बघत आहे. मला इकडून मुंबईला जाण्यासाठी तुमची काही मदत मिळेल का?

राजेंद्र--- बरं मला सांग तु कोणत्या गावी अडकला आहेस?

राघव--- मी नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव या गावी अडकलो आहे.

राजेंद्र--- कोणतं गाव म्हणालास?

राघव--- रांजणगाव

राजेंद्र--- ( रांजणगाव नाव ऐकून राजेंद्र विचारात पडला की हा आपला कोणी नातेवाईक असू शकेल का?) रांजणगावात कोरोनाचे पेशंट आहेत का?

राघव--- ( राघव मनातून खुश झाला होता कारण राजेंद्र गावातील कोरोना बद्दल चौकशी करत होते म्हणजे नक्कीच त्याचा आणि त्या गावाचा नक्कीच काहीतरी संबंध असेल) हो काका, दोन तीन होते.

राजेंद्र--- तुला त्या पेशंटची नावे सांगता येतील का?

राघव--- नाही काका, मी या गावात नवीन आहे सो मला माहीत नाही.

राजेंद्र--- मी तुला तिथून काढण्याचा प्रयत्न करतो पण त्यासाठी तुला माझं एक काम करावं लागेल.

राघव--- कुठलं काम?

राजेंद्र--- रांजणगाव मध्ये एक देशमुखांचा वाडा आहे तिथे संजय देशमुख नावाचा माणूस राहतो, तो आणि त्याची फॅमिली सुरक्षित आहे का? किंवा त्यांना काही अडचण आहे का? याची माहिती काढून मला द्यायची आणि हो कुणालाही कळू द्यायच नाही की मी तुला ही सर्व माहिती काढायला लावली आहे.

राघव--- काका संजय देशमुख तुमचे नातेवाईक लागतात का?

राजेंद्र--- हो आम्ही दूरचे नातेवाईक आहोत.

राघव--- काका तुम्ही आनंद देशमुखला ओळखतात का?

राजेंद्र--- हो संजय देशमुखचा मोठा भाऊ आहे, तुला आनंद देशमुख बद्दल काय माहीत? तु आनंदला ओळखतो का?

राघव--- काका माझं पूर्ण नाव राघव आनंद देशमुख अस आहे.

राजेंद्र--- काय? तु आनंद देशमुखचा मुलगा आहेस?

राघव--- हो काका, तुम्ही बाबांना ओळखतात का?

राजेंद्र--- हा प्रश्न तुझ्या बाबांना विचारशील का?

राघव--- काका मला बाबांनीच तुमच्या बद्दल सांगितलं आहे.

राजेंद्र--- तुला माझ्याबद्दल कस कळलं? कारण माझ्या कोणत्याच बहीण भावाशी माझा खूप वर्षांपासून संबंध नाहीये.

राघव--- काका ती खूप मोठी स्टोरी आहे त्याबद्दल आपण नंतर बोलूया, आत्ता एवढंच सांगतो की आपल्या वाड्याला आणि सुजाता आत्याला तुमची गरज आहे.

राजेंद्र--- सुजाताला काय झालंय? आणि वाड्याला माझी गरज, म्हणजे मला कळालं नाही.

राघव--- सुजाता आत्या कोमात गेलेली आहे डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार तिला तिच्या लहानपणीच्या आठवणी तिच्या बहीण भावांनी सांगितल्या तर ती कोमातून लवकर बाहेर पडू शकते, बाबा तिच्याशी व्हिडिओ कॉल द्वारे बोलले तरी तिच्या तब्येतीत थोडीफार तरी सुधारणा झाली आहे. 

राजेंद्र--- आणि वाड्याच काय?

राघव--- संजय काकाने दारूच्या व्यसनापायी वाडा सावकाराकडे गहाण ठेवला आहे, सावकाराला कोणीतरी सांगितलंय की वाड्यात खजिना दडलेला आहे, खजिन्याच्या हव्यासापोटी सावकार वाडा पाडणार आहे.

राजेंद्र--- अरे पण तो वाडा कसा काय पडू शकेल? कायद्याने हा गुन्हा आहे. तु आता गावातच आहे ना.

राघव--- नाही काका, मी मुंबईतच आहे, तुमची खरी ओळख पटण्यासाठी मला खोटे बोलावे लागले.

राजेंद्र--- तुझ्याकडे संजयचा फोन नंबर आहे का? 

राघव--- आत्ता सध्या नाहीये पण मी मिळवण्याचा प्रयत्न करतोय.

राजेंद्र--- लॉकडाउन नसत तर आत्ता लगेच गावी जाऊन सोक्षमोक्ष लावला असता. तुला संजयचा फोन नंबर मिळाला की मला इंफॉर्म कर. सुजाताच्या नवऱ्याचा फोन नंबर मला दे, मी सुजाताची चौकशी करतो.

राघव--- काका तुम्हाला सुशीला आत्या बद्दल काही माहिती आहे का?

राजेंद्र--- नाही रे, एके दिवशी तुझ्या काकुचं आणि सुशिलाच जोराचे भांडण झाले होते त्या दिवसापासून माझा तिच्याशीच काय पण कोणाशीच काहीच संपर्क नाहीये.

राघव--- तुम्हाला सुशीला आत्त्याचे लग्नानंतरचे नाव माहीत आहे का?

राजेंद्र--- हो, सुशीला अनिरुद्ध मोहिते.

राघव--- थँक्स काका

राजेंद्र--- अरे थँक्स कशासाठी, तु जर आम्हा बहीण भावांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत असशील तर चांगलंच आहे, दादाला सांग राजुने तुझी आठवण काढली म्हणून

राघव--- हो काका, मी संजय काकांशी बोलून उर्वरित माहिती तुम्हाला देतो.

          राजेंद्र काकाशी बोलून झाल्यावर राघवने सर्व बोलण आई व बाबांना सांगितलं.

राघव--- आई सुशीला आत्त्याच लग्नानंतरचे पूर्ण नाव ऐकून मी शॉकच झालोय.

आई--- का रे बाळा, त्यांच नाव काय आहे?

राघव--- सुशीला अनिरुद्ध मोहिते.

आई--- काय??

         सुशीला आत्त्याचे लग्नानंतरचे नाव ऐकून राघव व त्याची आई एवढे शॉक का झाले हे बघुयात पुढील भागात. 

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all