शोध नात्यांचा भाग ४

Mission of searching relatives

       मागील भागाचा सारांश: राघवने सोशल मीडियावर टाकलेल्या गणपतीच्या मूर्तीचा फोटो मंजिरी बघते, मंजिरीच्या घरीही तशीच गणपतीची मूर्ती असते. मंजिरीची आई कोमामध्ये गेलेली असते, डॉक्टर सांगतात की, मंजिरीच्या आईचे भाऊ बहीण येऊन तिच्याशी बोलले, तिला लहानपणीच्या आठवणी सांगितल्या तर ती शुद्दीवर येऊ शकते. मंजिरी तिच्या बाबांकडे आईच्या बहीण भावांबद्दल चौकशी करते पण तिच्या बाबांना त्यांच्याबद्दल काहीच माहिती नसते. मंजिरीच्या बाबांना तिच्या आईच्या आई वडिलांची नावे माहीत असतात, त्यावरून मंजिरी अंदाज लावते की गणपतीच्या मूर्तीचा फोटो पोस्ट करणारा राघव देशमुख व आपले काहीतरी नाते असू शकते.

        मंजिरीच्या डोक्यात जी टिकटिक चालू होती ती तिने प्राचीकडे बोलून दाखवली. प्राचीने मंजिरीला सल्ला दिला की राघव देशमुख ला मॅसेज करून गणपती बद्दल विचार आणि मग पुढे जाऊन त्याच्या आजी आजोबा बद्दल विचार मगच आपल्याला खर काय आहे ते कळेल. मंजिरी राघवला मॅसेज करते, " हाय मी मंजिरी देशपांडे, मला पुरातन कालीन वस्तुंचे फोटोज आणि त्यांची माहिती गोळा करण्याचा छंद आहे. मी तुम्ही केलेली पोस्ट बघितली त्यावरून मला अस जाणवलं की फोटोतील गणपतीची मूर्ती खूप जुनी आहे, मला त्याबद्दल अधिक माहिती मिळू शकेल का? आणि सोबतच तुम्ही जे कॅपशन टाकले आहे त्याचा अर्थ कळू शकेल का?"

        राघव दिवसभर सोशल मीडियावर मॅसेज चेक करून वैतागला होता पण एकही कमेंट किंवा मॅसेज त्याच्या कामाचा नव्हता.सर्वांच्या कमेंट्स सारख्याच होत्या, नाईस मूर्ती, गणपती बाप्पा मोरया, अँटिक मूर्ती, कुठून घेतली?. रात्री राघव वैतागून झोपी गेला.

         मंजिरीने रात्री बारा वाजता मॅसेज केला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या राघवने मोबाईल चेक केला, त्याच्या मॅसेज बॉक्स मध्ये मंजिरीचा मॅसेज दिसला. राघवला मंजिरीचा मॅसेज बघून जरा बरं वाटलं कारण कालपासून येणाऱ्या मॅसेज मध्ये मंजिरीचा मॅसेज तसा वेगळा होता. राघवला वाटत पण नाही की मंजिरीचा व त्याचा काही नातेसंबंध निघू शकतो. राघव इन जनरल मंजिरीच्या मॅसेजला रिप्लाय देतो, " हाय मी राघव देशमुख, तुमचा छंद छान आहे, असे छंद शक्यतो आजकाल कोणामध्ये दिसून येत नाही, फोटोत जी गणपतीची मूर्ती आहे ती माझ्या आजोबांनी माझ्या बाबांना दिली होती आणि राहिला प्रश्न कॅपशनचा तर माझ्या आजोबांनी माझ्या बाबांना गणपतीची मूर्ती देताना सांगितलं होतं की ही गणपतीची मूर्ती म्हणजे तुझं अस्तित्व, तुझा उगम. याखेरीज त्या मूर्तीबद्दल मला काहीच कल्पना नाहीये"

       दिवसभर मंजिरी कामात असल्याने राघवचा मॅसेज आल्याचे तिला कळत नाही. संध्याकाळी काम संपल्यानंतर मंजिरी राघवचा मॅसेज बघते. मंजिरीला राघव बोलण्यावरून साधा सरळ वाटल्याने याच्याशी पुढे बोलायला काही हरकत नाही असा विचार करते.

मंजिरी--- मला आपली संस्कृती जपायला आवडते, आपल्या भारताला खूप छान इतिहास लाभलेला आहे, त्याची माहिती आपण करूनच घेतली पाहिजे, जर आपला इतिहास, संस्कृती आपल्यालाच माहीत नसेल तर आपण येणाऱ्या पिढीला काय सांगणार.

राघव ऑनलाईन असल्याने तो लगेच रिप्लाय करतो.

राघव--- तुमचे विचार खरच खूप छान आहेत, मी कधी ह्या अँगलने आपल्या इतिहासाकडे, संस्कृती कडे बघितलेच नव्हते. कालपासून मी पोस्ट टाकल्यापासून बघतोय, तुम्ही सोडून कुणालाच कळलं नाही की ही गणपतीची मूर्ती जुनी असेल. तुम्ही इतिहासात किंवा साहित्यासंबंधी शिक्षण घेत आहात किंवा घेतले आहे का?

मंजिरी--- नाही मी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. माझ्या छंदाचा आणि माझ्या कामाचा काहीच संबंध नाहीये.

राघव--- ओके

मंजिरी--- तुमच्या आजी आजोबांबद्दल मला काही माहिती मिळू शकेल का?

राघव--- मी त्यांना कधी बघितलेलंही नाही, मला त्यांच्या नावखेरीज काहीच माहिती नाही.

मंजिरी--- मला माफ करा जर मी तुम्हाला पर्सनल माहिती विचारत असेल तर कारण आपली काहीच ओळख नाहीये आणि मी तुम्हाला डायरेक्ट तुमच्या फॅमिली बद्दल विचारत आहे. तुमच्या आजी आजोबांच नाव कळू शकेल का? तुम्हाला त्यांच्या बद्दल काहीच माहिती का नाही?

राघव--- तुमच्या दुसऱ्या प्रश्नाच उत्तर मी लगेच तुम्हाला देऊ शकणार नाही पण तुमच्या पहिल्या प्रश्नाच उत्तर मी देऊच शकतो, माझे आजोबा विनायक देशमुख आणि माझी आजी मंदा देशमुख

मंजिरी--- तुमचे आजी आजोबा कुठल्या गावी रहायचे?

राघव--- नगर जिल्ह्यात एक छोटंसं गाव आहे तिथे ते रहायचे.

मंजिरी--- तुम्हाला आत्या आहेत का?

राघव--- हो आहेत ना पण तुम्हाला ही सगळी माहिती का हवी आहे?

मंजिरी--- तुमच्या आत्त्याचे नाव सुजाता आहे का?

(राघव सुजाता नाव बघितल्यावर त्याने देशमुख फॅमिलीची ट्री डायग्राम काढलेली त्यात आत्त्याच नाव चेक करतो)

राघव--- हो माझ्या लहान आत्त्याच नाव सुजाता आहे, पण तुम्हाला कस माहीत?

मंजिरी--- मी सुजाता ची मुलगी आहे.

( राघवला खूप जास्त आनंद होतो, त्याने केलेल्या प्रयत्नांना यश आलेले असते)

राघव--- तुम्हाला कस कळालं की तुमची आई माझी आत्त्या असेल?

मंजिरी--- तुम्ही ज्या गणपतीच्या मूर्तीचा फोटो टाकलेला तशीच सेम मूर्ती आमच्याही देव्हाऱ्यात आहे.

राघव--- तुमच्या आईने ते कॅपशन तुम्हाला सांगितलं नाही का?

मंजिरी--- गेल्या दोन महिन्यांपासून माझी आई कोमात आहे, माझ्या बाबांना फक्त आजी आजोबांची नावे माहीत होती बाकी काहीच नाही, आणि डॉक्टरांनी सांगितलं की आईला आईच्या बालपणाच्या आठवणी जर कोणी सांगितल्या तर ती शुद्दीत येण्याचे चांसेस जास्त आहेत म्हणून मी माझ्या आईच्या भावा बहिणींचा शोध घेत होते.

राघव--- तुमच्या आईचा आणि तिच्या दुसऱ्या भावा बहिणींचा काहीच संबंध नाहीये.

मंजिरी--- नाही, माझ्या आई बाबांच लव्ह मॅरेज झालेलं असल्याने तिचा कोणाशी काहीच संबंध नाहीये. तुमचाही कोणाशीच कॉन्टॅक्ट नाहीये का?

राघव--- नाही ना, माझ्या नातेवाईकांचा शोध लागावा म्हणूनच तो गणपतीच्या मूर्तीचा फोटो पोस्ट केला होता. तुम्ही राहता कुठे?

मंजिरी--- मी बंगलोरला असते आणि आई बाबा पुण्यात राहतात. तुम्ही कुठे राहता?

राघव--- आम्ही मुंबईला असतो. तुम्ही मला अरे कारे केलं तरी चालेल.

मंजिरी--- हा नियम तुलाही लागू होतो, तशीही मी तुझ्या पेक्षा लहान आहे.

राघव--- हो, सुजाता आत्या कोमात कश्या गेल्या?

मंजिरी--- दोन महिन्यांपूर्वी तिचा अपघात झाला होता त्यावेळी अतिरक्तस्राव झाल्याने ती कोमात गेली आहे.

राघव--- ओके, तुझ्या बाबांचा फोन नंबर मला देऊन ठेव, मी माझ्या बाबांना फोन करायला सांगतो.

मंजिरी--- हो चालेल, बाकीचे नातेवाईक सापडले का? मला तर अजून कोण आणि किती जण आहेत याची कल्पनाही नाहीये.

राघव--- नाही ना, तु पहिलीच आहेस, तुला एकूण तीन मामा व एक मावशी आहे, अजून तिघांच्या फॅमिलींना मला शोधायचे आहे.

मंजिरी--- मला नाही आपल्याला म्हण, माझी काही मदत लागली तर सांग.

राघव--- हो नक्कीच, चल आई बाबांना सुजाता आत्त्याचा शोध लागला हे सांगावं लागेल.

मंजिरी--- हो मलाही माझ्या बाबांना सांगावं लागेल, तुझ्या बाबांच नाव काय आहे?

राघव--- आनंद देशमुख, तुला मी आपल्या देशमुख फॅमिलीची ट्री डायग्राम पाठवतो म्हणजे तुला सर्व समजेल.

मंजिरी--- हो चालेल, बाय.

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all