Login

शोध नात्यांचा भाग ३

Mission of searching relatives

       मागील भागाचा सारांश: राघव त्याच्या नातेवाईकांना सोशल मीडियावर शोधतो, पण ते त्याला तिथे काही सापडत नाही. राघवचा मित्र अमोल त्याला सांगतो की त्यांच्याकडे जी गणपतीची मूर्ती आहे तिचा फोटो सोशल मीडियावर टाक आणि त्यासोबत तुझ्या आजोबांनी जो काही मॅसेज दिलेला आहे तो कॅपशन म्हणून टाक. राघव अमोलच्या सांगण्यावरून गणपतीच्या मूर्तीचा फोटो सोशल मीडियावर टाकतो व त्यासोबत गणपतीची मूर्ती म्हणजे तुझं अस्तित्व, तुझा उगम अस कॅपशन टाकतो. आता बघूया राघवच्या या प्रयत्नांना यश मिळेल की नाही.

         राघव सारखा सारखा येऊन त्याने टाकलेली पोस्ट चेक करायचा, लाईक्स आले होते, कंमेंट्स ही होत्या पण त्याला हवी ती कंमेंट आलेली नव्हती. राघवला खात्री होती की ही मूर्ती कोणाच्या ना कोणाच्या ओळखीची असेलच. आज ना उद्या काका किंवा आत्या यांपैकी एक तरी ही पोस्ट बघून मला संपर्क करण्याचा प्रयत्न करेन.

         मंजिरी ही सॉफ्टवेअर इंजिनिअर होती, तिला पुरातन कालीन वस्तूंचे फोटोज, माहिती गोळा करण्याचा छंद होता. मंजिरीच्या मित्र मैत्रिणींना तिच्या या छंदाची कल्पना होती म्हणूनच ते तिला नेहमी अशा पोस्ट्स शेअर करायचे ज्यातून मंजिरीला पुरातन कालीन वस्तूंची माहिती मिळेल. मंजिरी ही नोकरीच्या निमित्ताने बंगलोरला रहायची, तिचे आई बाबा पुण्यात रहायचे. लॉकडाऊन असल्याने मंजिरीचे वर्क फ्रॉम होम चालू होते. सकाळी नऊ वाजल्यापासून जे कॉम्प्युटर समोर बसावे लागायचे ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत, जेवणासाठी एक तासाची सुट्टी भेटायची. मंजिरी वर्क फ्रॉम होम ने जाम वैतागलेली होती. लॉकडाऊन असल्याने तिला आई बाबांना भेटायलाही जाता आले नाही.

         मंजिरी आणि प्राची एकाच कंपनीत जॉब करायच्या, प्राची ही मंजिरीची रुममेट होती. लंच ब्रेकमध्ये प्राची जेवण करता करता सोशल मीडियावर पोस्ट चेक करत होती, तेवढ्यात तिला राघवने पोस्ट केलेला गणपतीचा फोटो दिसतो.

प्राची--- मंजू मला तुझ्या कामाची एक पोस्ट भेटलीय.

मंजिरी--- काय आहे त्या पोस्टमध्ये?

प्राची--- अगं एक लाकडी गणपतीच्या मूर्तीचा फोटो आहे, मूर्ती खूप जुनी दिसतेय.

मंजिरी--- मला शेअर करून ठेव, मी माझं काम आटोपल्यावर संध्याकाळी बघेल.

       प्राची ती पोस्ट मंजिरीला शेअर करून ठेवते. मंजिरी संध्याकाळी काम संपल्यावर मोबाईल घेऊन प्राचीने काय पोस्ट शेअर केली आहे ते बघते, मंजिरीला त्या मूर्तीचा फोटो बघून आश्चर्य वाटते.

मंजिरी--- प्राची तु जी पोस्ट मला शेअर केली ना, तशी सेम गणपतीची मूर्ती आमच्याही देव्हाऱ्यात आहे.

प्राची--- मंजू सारख्या मुर्त्या असूच शकता ना, त्यात काय एवढं? त्यासोबतच कॅपशन वाच ते काहीतरी वेगळं आहे.

मंजिरी--- हो ना, ह्या कॅपशनचा अर्थच कळत नाही, गणपतीची मूर्ती म्हणजे तुझं अस्तित्व, तुझा उगम यातून पोस्ट करणाऱ्याला काय सांगायच असेल.

प्राची--- मलाही तेच कळल नाही म्हणून तर तुला पोस्ट शेअर केली.

मंजिरी--- प्राची यात नक्कीच काही तरी दडलं असेल. पोस्ट करणाऱ्याची प्रोफाईल चेक केली पाहिजे.

प्राची--- मी करून झाली, ही त्याची पहिलीच अस कोड घालणारी पोस्ट आहे, बाकीच्या पोस्ट्स सर्व नॉर्मल आहेत.

मंजिरी--- नाव काय ग त्याच?

प्राची--- राघव देशमुख, मेकॅनिकल इंजिनिअर आहे, दिसायलाही मस्त आहे.

मंजिरी--- प्राची मी तुझ्याकडे त्याचा बायोडाटा नव्हता मागितला.

प्राची--- मंजू तुझ्यासोबत राहून राहून मलाही डिटेक्टिव्ह गिरीची सवय लागली आहे.

मंजिरी--- प्राची त्या राघव देशमुखलाच मॅसेज करून या कॅपशनचा अर्थ विचारायचा का?

प्राची--- उगाच त्याला लाईन दिल्यासारखं वाटेल.

मंजिरी--- हो ना तु म्हणते ते पण खरं आहे, जाऊदेत सोड आपल्या डोक्याला थोडी काम आहेत का? 

प्राची--- हे तु म्हणत आहेस मंजू? तु एवढ्या सहजासहजी हा विषय सोडशील.

मंजिरी--- सध्या साठी तरी सोडते, नंतर बघू.

      मंजिरीने रोजच्या सवयीप्रमाणे जेवण झाल्यावर तिच्या बाबांना फोन लावला,

मंजिरी--- हॅलो बाबा, जेवण झाले का?

बाबा--- बोल मंजू बाळा, आत्ताच झालं, तु कशी आहेस?

मंजिरी--- मी मस्त, बाबा लॉकडाउनचा जाम कंटाळा आला आहे.

बाबा--- थोड्या दिवसात लॉकडाउन संपेल अशी आशा व्यक्त करूयात.

मंजिरी--- बाबा आईची तब्येत कशी आहे?

बाबा--- तिच्या तब्येतीत काहीच सुधारणा नाहीये, जशी आहे तशीच आहे, आता तर कोरोनामुळे डॉक्टर मला तिला भेटुही देत नाहीयेत.

मंजिरी--- बाबा जवळजवळ दोन महिने होऊन गेले आई कोमामध्ये आहे, आई शुद्धीत कधी येणार?

बाबा--- काय माहीत बाळा, देव आपली इतकी परीक्षा का बघत आहे कुणास ठाऊक?

मंजिरी--- डॉक्टर काय म्हणत आहेत?

बाबा--- डॉक्टरांचे म्हणणे आहे की तिच्या लहानपणीच्या आठवणी तिला सांगितल्या पाहिजेत, लग्नानंतरच मी सांगू शकतो पण त्याआधीच तीच काय आयुष्य होत हे तिच्या भावा बहिणींनाच माहिती असेल, हे त्यांनी येऊन तिच्याशी बोललं पाहिजे, तिला सर्व आठवणी करून द्याव्या लागतील.

मंजिरी--- बाबा आईचे भाऊ बहीण कुठे असतात? मी त्यांच्याशी बोलू का?

बाबा--- ते कुठे राहतात हे तुझ्या आईला सुद्धा माहीत नाही. तुझी आई पुण्यात कॉलेजला असताना माझी आणि तिची ओळख झाली व आम्ही दोघांनी लग्न केले, तिच्या वडिलांना आमचे लग्न मान्य नसल्याने त्यांनी आमच्याशी संबंध तोडून टाकले, मी कोणालाच बघितलेले नाही, तेव्हा आपण त्यांना कस शोधायच आणि कुठे?

मंजिरी--- बाबा त्यांची नावे तुम्हाला ठाऊक आहेत का? आपण त्यांना सोशल मीडियावर शोधुयात.

बाबा--- मला फक्त एवढंच माहीत आहे की त्यांच आडनाव देशमुख आहे आणि त्यांच मूळ गाव नगर जिल्ह्यात आहे बाकी मला काहीच माहीत नाही.

मंजिरी--- बाबा मला एक सांग, आपल्या देव्हाऱ्यात जी गणपतीची मूर्ती आहे, ती तुम्ही कुठून आणली होती?

बाबा--- आज तुला अचानक त्या मूर्ती बद्दल का विचारावं वाटलं?

मंजिरी--- तशीच सेम मूर्ती मला सोशल मीडियावर दिसली.

बाबा--- अगं दोन मूर्तींमध्ये साम्य असूच शकतं ना?

मंजिरी--- असू शकते, पण मला सांगा ना ती कुठून आणली होती.

बाबा--- ती गणपतीची मूर्ती तुझ्या आईला तिच्या वडिलांनी दिली होती बाकी मला काहीच माहीत नाही.

मंजिरी--- बाबा तुम्हाला आईच्या वडिलांच नाव माहीत आहे का?

बाबा--- हो, विनायक देशमुख

मंजिरी--- विनायक देशमुख हे माझे आजोबा आणि आजी ?

बाबा--- मंदा देशमुख, पण तू हे सगळं आत्ता का विचारत आहेस?

मंजिरी--- बाबा मी आईच्या बहीण भावांना शोधून काढायच ठरवलं आहे.

बाबा--- ते तुला सहजासहजी सापडतील का?

मंजिरी--- ते सापडतील की माहीत नाही पण जर ते सापडले तर कदाचित माझी आई मला परत भेटू शकते.

बाबा--- तुला जे करायच ते कर, पण मला खात्री आहे की एक ना एक दिवस तुझी आई शुद्दीत येईल.

मंजिरी--- हो बाबा, आपली फॅमिली पुन्हा एकदा हॅपी फॅमिली होणार.

बाबा--- आता खूप उशीर झाला आहे,मी झोपण्याचा प्रयत्न करतो आणि तुही झोप.

मंजिरी--- बाबा मला माहित आहे, तुम्हाला आईच्या काळजीने झोप लागत नसेल, पण तुम्ही काहीच काळजी करू नका आपली आई लवकरच शुद्दीत येईल.

बाबा--- हो बाळा, गुड नाईट

मंजिरी--- गुड नाईट बाबा.

©®Dr Supriya Dighe