शोध अस्तित्वाचा

Inspire To Start Again

आज काव्याला पुन्हा एकदा प्रश्न पडला तिच्या तिच्या अस्तित्वाबद्दल .पंचवीस वर्षांपूर्वीची काव्या तिच्या समोर उभी राहिली होती नव आयुष्य, नवी सुरुवात ,नवीन अपेक्षा, मनात कुठेतरी थोडीशी शंका आपण हे करू शकू का. करिअरची सुरुवात होती नवे चॅलेंज होतं धीराने पुढे सरसावली होती सगळ्यांच्या मदतीने एक छान सुरुवात झाली होती .आज 45 व्या वर्षी पुन्हा तीच घालमेल सुरू होती. करू का नव्याने सुरुवात ?घेऊ का नवीन जबाबदारी? यश मिळेल का ?असे अनेक प्रश्न मनात काहूर माजवत होते. ठरवले ....ठामपणे ठरवले पुन्हा नवीन सुरुवात करायची. नवे चॅलेंज घ्यायचे आणि यशस्वी व्हायच .मेहनत करायला सुरुवात केली. एक रिस्पॉन्सिबिलिटी हाती घेतली. जोमाने सुरुवात झाली कनेक्ट वाढवले .पूर्वी जे झाले नव्हते ते होऊ लागले . कंपनीशी कनेक्ट वाढले ड्राईव्ह होऊ लागले मुले चांगल्या कंपन्यांमध्ये प्लेस होऊ लागली .मुलांची प्रगती होऊ लागली .कोर कंपनी चे ड्राईव्ह होऊ लागले. बघता बघता शंभर-दोनशे 500 पर्यंत मजल गेली .कुठे तरी मनामध्ये समाधान मिळत होते. मेहनत घेतलेली वाया जात नव्हती. मुले खुश होती रिस्पेक्ट वाढला होता. अजून पुढे मेहनत घ्यायची ,जणू मनाने ठरवले होते पण बाईची प्रगती डोळ्यात खुपते हे पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवले .असो.

There will be no looking back.