शिवरुद्रा ! Love files भाग - 10 अंतिम भाग

"प्लिज शिव.. तिच्या आईची शेवटची इच्छा आहे. तिची आई तिला खूप दिवसानंतर भेटली आहे. तिची आई आजरी आहे.मुलीच्या मुलांना पाहायचं आहे. तुझ्यामुळे एका परिवारात सुख आनंदाने भरून येईल. इतकं कर माझ्यासाठी प्लिजऽऽ." "मीच का ? दुसरा पर्याय नाही का?""नाही शिव , तू एकच पर्याय आहे. मी पर्सनली ओळखते तिला. तूच का तर तू सर्व गोष्टींमध्ये परफेक्ट आहे . सुशिक्षित समजूतदार , निडर, निर्भय , शारीरिक मानसिक दृष्ट्या सक्षम आहे आणि शुद्ध विचारांचा आहे. प्लिजऽऽऽ शिव प्लिजऽऽऽ .." शिवानी त्याला विनवणी करते. "ठीक आहे ताई. मी करेल पण हे पहिले आणि शेवटचे ओके ." "ओके ..डॉ. शिवानी खूष झाली. शिवचे सॅम्पल घेऊन गर्भधारणेची प्रक्रिया सुरु केली. त्या पेंशटचे पिरयड मिस झालेत आणि ती प्रेग्नंट राहिली. हे ही ताईने सांगितले होते. पण त्या पेंशटचे नाव वगैरे सांगितल नव्हते."

शिवरुद्रा ! Love files 


 भाग - 10 अंतिम भाग 



 "शिवऽऽऽ ." तिने श्वास घेऊन बोलायला सुरवात केली.


 "मला माझ्या एका पेंशट साठी डोनर हवा आहे जो मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सक्षम असेल."


 "ओके , मग मी काय करू शकतो ऽऽ ."


 "शिव तू माझ्या पेंशटचा डोनर बनशील ? "



 "व्हाँट , नो वे ताई . मी नाही."


"प्लिज शिवऽऽ.. तिच्या आईची शेवटची इच्छा आहे. तिची आई तिला खूप दिवसानंतर भेटली आहे. तिची आई आजरी आहे.

मुलीच्या मुलांना पाहायचं आहे. तुझ्यामुळे एका परिवारात सुख आनंदाने भरून येईल. इतकं कर माझ्यासाठी प्लिजऽऽ."


 "मीच का ? दुसरा पर्याय नाही का?"


"नाही शिव , तू एकच पर्याय आहे. मी पर्सनली ओळखते तिला. तूच का तर तू सर्व गोष्टींमध्ये परफेक्ट आहे . सुशिक्षित समजूतदार , निडर, निर्भय , शारीरिक मानसिक दृष्ट्या सक्षम आहे आणि शुद्ध विचारांचा आहे. प्लिजऽऽऽ शिव प्लिजऽऽऽ .." शिवानी त्याला विनवणी करत होती.


 "ठीक आहे ताई. मी करेल पण हे पहिले आणि शेवटचे ओके ."


 "ओके ..डॉ. शिवानी खूष झाली. शिवचे सॅम्पल घेऊन गर्भधारणेची प्रक्रिया सुरु केली. त्या पेंशटचे पिरयड मिस झालेत आणि ती प्रेग्नंट राहिली. हे ही ताईने सांगितले होते. पण त्या पेंशटचे नाव वगैरे सांगितल नव्हते."

\"म्हणजे ती पेंशट रुद्रा होती .\" तो उठून उभा राहिला. तिथून तो शिवालीच्या रूमकडे येण्यासाठी निघाला.


इकडे डॉक्टर शिवानी ही तिला चेक करायला आल्या.

डॉक्टर शिवानीने आधी शिवालीला चेक केले.

" माझी गोडुली मनी माऊ, कसे वाटतय आता ? "


 "थोलं दुखतयं आन्टी."


 "थोडं दुखणार ना माऊ. गोळ्या औषधी घेतली की लवकर बरी होशील आणि पुन्हा खेळायला लागणार .."

"खलचं ? "

"हो .. रुद्रा आता घाबरायचं काही कारण नाही. माझी गोडुली ठीक आहे."


 "थॅक्स डॉक्टर शिवानी." 
" मी नाश्ता पाठवते तुमच्या रुममध्ये. ओके गोडुली तू काहीही खाऊ शकते. रुद्रांश तुला तुझ्या आवडीचा , गोडुलीला तिच्या आवडीचा नाश्ता मिळणार आहे. सो इंजॉय करा !"

 "थॅक्य यू आंटी . पण तूही बस आपण सोबत ब्रेकफास्ट 
करू ?" एकसाथ म्हणाले .


 "नाही बाळांनो, मी घरूनच करून आले. हेच खाल्ले मी पण . आता तुम्ही करा. मला एक फोन करायचा आहे. मी येते नंतर ओके." शिवानी रुमच्याबाहेर आली आणि थोड समोर जाऊन शिवला येऊन धडकली. ती मोबाइल हातात घेऊन त्यालाच फोन लावत होती.

 "शिव ऽऽ लागलं न रेऽऽ मला इतक्या घाईत कुठे निघालासऽऽ?" डॉक्टर शिवानीने तिचे कपाळ चोळले.

"ताई ऽऽ, मी ज्या पेशंटचा डोनर होतो ती ए सी पी रुद्रा होती." ताईने त्याचा हात पकडला आणि त्याला घेऊन केबिनमध्ये आली.

"शिव इतक्या मोठ्याने का बोलतोय ? रुद्रा बसली आहे बाजूच्या रुममध्ये. हे माहिती गुप्त ठेवायची असते. तिलाही हे माहिती नाही आणि याचा काही फायदा नाही कारण तू कोणावर तरी प्रेम करतो ना ?"


"हो ताई ." शिव एकदम खुष होऊन सांगत होता .

" ताई , फक्त इतकचं सांग की , ती पेंशट रुद्रा होती. आणि ते बाळ रुद्रांश आणि शिवाली आहेत."

 "हो शिव ती रुद्रा होती आणि ती बाळं शिवाली आणि रुद्रांश आहेत. तू त्यांचा बायोजिकल बाबा आहेस म्हणून तर तुझे आणि रुद्रांशच्या आवडीनिवडी सारख्याच आहेत इतकचं नाही 
तर " पुढचे वाक्य शिवच बोलला."त्याचे नि माझे डोळे पण सारखेच हो नं .." 
"हो ... तो आपल्या घराण्याचा वारस हक्क पुढे चालवत आहे." 
"ताईऽऽ ताईऽऽ ताईऽऽ ताईऽऽमी किती खुष आहे. त्याने आनंदाने ताईला गोल गोल फिरवून मिठी मारली . मी ज्या मुलीबद्दल बोललो होतो ती रुद्रा आहे. आम्ही लवकरच लग्न करणार आहोत."



"काय सांगतो माझा विश्वासच बसत नाहीय शिव हे खरं आहे का?"

" हो, ताईऽऽ ."

"म्हणजे मी हक्काने मुलांचे लाड करू शकते. आणि त्यांना काहीही घेऊ शकते. तुला माहिती आहे शिव त्यांचे नाव पण मीच ठेवली आहेत. मी तिला सांगितले होते. यांचे नावे मी ठेवणार म्हणून आणि ती ही हो बोलली . मग काय ठेवले मीच "

" हो .. ताई , म्हणून इतकं मॅच होतेय ते . ताई चल लवकर, मला त्यांना मिठीत घ्यायचं आहे." असे म्हणेपर्यंत तो केबिनच्या बाहेरही पडला आणि त्याच्या पाठोपाठ शिवानीही आली. तो आता रुममध्ये जाऊनच थांबणार होता. तिथे गेल्यावर दोन्ही मुलं सोफ्यावर बसून होती. शिव जाऊन गुडघ्यांवर बसला आणि दोन्ही हात पसरवले तर ते दोघही त्याच्या कुशीत शिरले. 

"डॅडू कुठे होतास तूऽऽ , आय मिस यू ऽऽ सोऽऽ  सोऽऽ मच " शिवालीने त्याच्या गालावर किशी दिली. आज त्याच्या चेहर्यावर सगळ्यात जास्त आनंदी असल्याचा आणि त्याचे पोरं त्याच्या जवळ असल्याचा आनंद होता. तो पटापट एका एकाचे मुके घेत होता.

"काय झालयं शिवऽऽ." रुद्रा .

" रूद्रा मला तुला लवकरात लवकर घरी आणायचे आहे. थँक्यू ताई , थँक्यू रुद्रा. आईबाबा आले की बोलतो त्यांच्याशी."


" शिव तुम्ही यांना ताई कसे काय म्हणताय? तुम्ही ओळखता एकमेकांना ? आणि मला का थॅक्स म्हणताय ?" रुद्राने शिवला
विचारले .

"हे अनमोल गिफ्ट साठी . सांगेल नंतर ."


" हो .. वहिनीसाहेब शिव माझा भाऊ आहे !" शिव ही तिला हो म्हणाला . आता धक्का बसण्याची पाळी रुद्राची होती.

"डॅड मग मी आंटिला आंटी म्हणू की आत्तू ? माझा एक मित्र त्याच्या डॅडच्या बहिणीला आत्या म्हणतो ." रुद्रांश विचार करतच शिवला म्हणाला.

" तुला काय आवडेल मला बोलायला?" डॉक्टर शिवानी .

" हूंऽऽऽ , मी आंटि नाही आत्तू म्हणेल . हे मला एकदम जवळचे वाटते." तशी शिवानी त्याला पटकन बिलगली आणि त्याच्या गालाची पप्पी घेतलीही ."

" मग माझी किशी कोण घेणार आतू ?" शिवाली गाल फुगवून म्हणाली.

"माझी मनी माऊ !" म्हणत तिच्या जवळ जाऊन तिच्याही किशी घेतल्या मग. शिवने त्याच्या आईबाबांना फोन लावून लग्नाला तयार असल्याचे सांगितले ते दोघे ऐकून आनंदले. आणि ते परत येण्यासाठी निघाले. दोन दिवसांनी शिवचे आईबाबा आले. 

शिवने आईबाबांना रुद्राविषयी सांगितले. फक्त मुलं त्याचे आहेत हे सांगणे त्याने टाळले होते .त्यांना चेहर्‍यावरून तरी त्यांना रुद्रा आवडलेली नव्हती. त्यांनी बोलायला सुरवात केली.

"शिव हे मला अजिबात मान्य नाही. ती आधीच दुसऱ्याच्या मुलाची आई झालेली आहे . असं कोण करत? मला माझे वंश पाहिजे होते. माझा या लग्नाला नकार आहे." आई 

" आई , तू कधीपासून असे विचार करायला लागली गं , तू तर अशा स्रियांना नेहमी मदत करत असते जे बलात्कारातून आलेल्या बाळांना जन्म देतात पण त्यांना स्विकारात नाही अशा बालकांना तू सांभाळते. मग तू अशी कशी बोलू शकते? रुद्राने तिच्या आई च्या इच्छेसाठी हे मोठे पाऊल उचलले. जीवनात ती एकटीच लढत आली आहे. प्लिज आई !" शिव .

" हे बघ शिव ! मला काही माहिती नाही, मी या लग्नाला तयार नाही बस्स!"

"बाबा तुम्ही तरी समजवा आईला !"

"मेघा जे बोलते ते मला पटलेले आहे. मी तिच्याशी सहमत आहे." 


" हे बघ शिव , मी तुझ्यासाठी एक मुलगी पसंत केली आहे. माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे ,ती आता येईलच. तुला तिच्यासोबतच लग्न कराव लागणार आहे ."

"आई , मी रुद्रा शिवाय कोणाशीही लग्न करणार नाही." असे बोलून शिव रागरागाने त्याच्या रुम मध्ये निघून गेला. शिवने त्याच्या बहिणीला डॉक्टर शिवानीला फोन लावला पण तिने तो उचलला नाही. त्याने पुन्हा दोन तीन वेळेस ट्राय केला पण तिकडून उचलला गेला नाही. मग त्याने फोन बेडवर फेकून दिला बेडवर डोळे बंद करून पडला. त्याला तिघांचे चेहरे डोळ्यांसमोर दिसू लागले. \"किती खूष होतो मी , आईला कसं समजवू यार, आई आज अशी का वागतेय ती?\" कळतच नव्हते त्याला .. तेवढ्यात त्यांच्या घरातील रामू काका आले.

 "शिवदादा, ताईंनी सांगितलेल्या बाईसाहेब आल्या आहेत . ते तुम्हाला भेटायला येत आहे." रामू .

 "हंऽऽ ." शिव .
 
शिव जरा आवरून चेअरवर बसला. दारावर टकटक झाली आणि त्याने "आत या " म्हणून आवाज दिला. ती मुलगी आत 
आली .पैंजणाची रुणझून करीत, बागड्यांची किनकीन आवाज येत होती. त्याला असं वाटले \"अशी माझी रुद्रा माझ्या रुममध्ये येत असतांना व्हायला हवे होते.\"

 "हे बघा मिस , माझे दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे. मी तिच्याशीच लग्न करणार आहे. सॉरी तुम्हाला आमच्यामुळे त्रास झाला. पण मी तिच्या शिवाय कोणाही व्यक्तीशी लग्न करणार नाही. आणि मुख्य म्हणजे ती माझ्या मुलांची मम्मा आहे." शिव तिच्याकडे न पाहताच बोलत होता.

"मग मी जाऊन नकार कळवते."

हो .. तेच बरे राहिल तुमच्यासाठी !" ती मुलगी जाण्यासाठी वळली .

"त्यांच नाव काय आहे? तुम्ही त्यांच्यावर प्रेम करता की, ते तुमच्या मुलांच्या मम्मा आहे म्हणून प्रेम करता?"

मी आधीपासून प्रेम करतो . . शिव ने समोर पाहिले.

" तूऽऽ " तो आश्चर्य चकीत झाला . त्याला हे अनपेक्षित होते . रुद्रा त्याच्या समोर भरजरी लाल रंगाच्या साडीत , कानात लाल रंगाचे झुमके कोपरापर्यंत असेलेले लांब बाह्यांच ब्लाउज, गळ्यात आईचा हार , हातात लाल रंगाच्या बांगड्या ,पायात पैंजण चेहर्‍यावर हलकासा मेकअप, आधीच लाल असलेल्या ओठांवर थोडी त्याच रंगाची लिपस्टिक लावलेली . तिला आज पहिल्यांदा या अवतारात पाहून याला फक्त चक्कर येऊन बेशुद्ध होणे बाकी होते. त्याच्या काळजाचा ठोका चुकला. तिथेच त्याची पुन्हा एकदा विकेट पडली होती.हृदय जोरात धडधड काय उड्या मारत होते.

" हायऽऽ तूऽऽ ना एक दिवस माझा जीव घेशील !" त्याने त्याच्या हृदयावर हात ठेवत म्हणाला. ती जवळ येऊन म्हणाली," मग नाही सांगायला जाते आईला , मी पसंत नाही म्हणून !" ती जाण्यासाठी वळली तर त्याने तिचा हात खेचून तिला जवळ ओढले. त्याच्या अचानक खेचल्यामुळे ती त्याच्या छातीवर आदळली आणि त्याने दोन्ही हात तिच्याभोवती घट्ट करून मिठीत घेतले .

" ऊहूं ऽऽऽ ऊहूं ऽऽऽ ऊहूं ऽऽऽ ." दारात शिवानी खोकला लागल्याचे नाटक करत होती तसे ते वेगळे झाले .

"दादासाहेब तुम्हाला वहिनीसाहेबांना खाली बोलवलेल आहे? खाली तुमचा साखरपुडा होतोय ."

"काय ऽ ऽ ."

"हो .." 
" पण हे कधी ठरले आई बाबा तर नाही म्हणत होते ना "

"बच्चू हे सर्व नाटकं केले आम्ही , कसं वाटलं मग ?" रुममध्ये आत येत आईबाबा म्हणाले.

" आईबाबा, छान केले नाटक तुम्ही सर्वांनी माझा पोपट बनवला .पण हे नाटकं ठरलं कधी आणि रुद्राला तुम्ही भेटले कधी?" 
झाल असे की तुझ्या ताईने मला आधी सर्वच सांगितलं मग मी आणि तुझे बाबा येतांना आधी रुद्राच्या घरी गेलो तिकडून शिवानीही आली … मुलांना भेटलो अगदी तुझ्यासारखाच दिसतो.मग आम्ही हा प्लॅन ठरवला. चला खाली पुजारी वाट पाहत आहे. शिव तू लवकर तयार होऊन ये." सर्व बाहेर निघून गेल्यावर तो रुद्राला थांबवून घेऊन," शिवरुद्रा लवकर आवरून खाली या.


"हो ऽ आलोच ताई ."

"रुद्रा खूष आहेस ना ?"

 "हो खूप खूष आहे मी."


" तुला एक सांगायचे आहे रुद्रांश आणि शिवाली हे शिवरुद्राचे अंश आहेत." तिने मान हलवून हो म्हणाली .दोघही खाली आलेत रुद्रांश शिवाली त्याच्याजवळ गेले त्याने दोघांना हाताने उचलून घेतले. साखरपुड्याची सर्व तयार झाली होती. आणि एका खूर्चीवर माई बसली होती. रुद्रा त्यांना पाहून भावूक झाली . माईंच्या पाया पडून नमस्कार केला माईनी तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. शिवनेही माईंना नमस्कार केला . घरातील पूर्ण परिवारा समोर , माईच्या समोर त्यांच्या रुद्राचा साखरपुडा पार पडला. शिवाली रुद्रांश आनंदात इकडे तिकडे बागडत होते . नवीन ही आनंदात होता . माईच्या आणि राधाच्या डोळ्यांत हलकेच पाणी आले होते. लग्न न करण्यासाठी तिने आई होणे पसंत केले होते पण परमेश्वराने आधीच तिच्या लग्नाची डोर शिव सोबत बांधली होती ..दोन दिवसांनी मोजक्याच लोकांसमोर शिवरुद्राचा लग्न सोहळा आनंदाने उत्साहानाने पार पडत होता. मंडप सजला होता . रुद्रा हिरव्या नऊवारी साडी , हिरवा चुडा , गळ्यात कोल्हपुरी साज , नाकात कोल्हापुरी नथ, हिरव्या डोळ्यांत काजळ छान मेकअप केलेला. कपाळावर मुंडावळ्या बांधलेल्या ,आज तर दृष्ट काढावी अशी सुंदर दिसत होती. नवीन तिला घेऊन आला. शिवने ही तिला मॅचिंग अशी त्याच कलरची शेरवानी आणि खाली धोतर नेसून होता. सर्व पद्धत विधीवत होत होती.गुरुजींनी मंत्र म्हणायला सुरवात केली.

तदेव लग्नं सुदिनं तदेव
ताराबलं चन्द्रबलं तदेव ।
विद्याबलं दैवबलं तदेव
लक्ष्मीपते तेंऽघ्रियुगं स्मरामि ॥

शुभ मंगल सावधान म्हणाले तसे दोघांना एकमेकांना वरमाला घातली . नंतर एक एक विधी होऊन सप्तपदी घेतली. थोर मोठ्यांचे आशीर्वाद घेतला. 


 लग्नात शिवाली तिच्या डॅडू कडून तर रुद्रांश त्याच्या मम्माकडून होता.आज माई आणि राधाईच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. आणि हे सर्वांना दिसून येत होते. शिवचे आईबाबा मेघा आणि अमोलराज नातवंडासोबत राहून तेही लहान झाले होते . डॉक्टर शिवानी तिची पूर्ण फॅमिली आली होती. तिचा नवरा अमेय मुलगा ऋषि , सासूबाई , सासरे , नवीन, आणि आशयचे मुलं आले होते.सर्वांनी मिळून नवीन जोडप्यांना आशीर्वाद दिला आणि शिवरुद्रा कायमचे एकत्र आले. इथून शिवरुद्रा यांचा सहजीवनाचा प्रवास सुरु झाला.


   ***समाप्त ***



©® धनदिपा 


🎭 Series Post

View all