शिवरुद्रा ! Love files

संध्याकाळची वेळ होती एक गरोदर महिला रस्त्याच्या बाजूला उभी राहून ऑटोरिक्षाची वाट पाहत होती. एक ऑटो आला त्यात ती बसून निघाली. पण जात असतांना मध्येच ऑटो बंद पडला ."काय झालं भैय्या ?" ती ऑटोत बसलेली गरोदर महिला म्हणाली."ताई ऑटो बंद पडला,बहुतेक गॅस संपला असावा." ऑटोवाला म्हणाला."अरे देवा, आता काय करणार, मी घरी कशी जाऊ ?आधीच खूप उशीर झालाय." ती गरोदर महिला म्हणाली."ताई घाबरू नका ,मी दुसरा ऑटो पाहतो." ऑटोवाला तो ऑटोवाला दुसरा ऑटोसाठी वाट पाहत होता.तेवढ्यात
शिवरुद्रा ! Love files


भाग - 1


                संध्याकाळची वेळ होती एक गरोदर महिला रस्त्याच्या बाजूला उभी राहून ऑटोरिक्षाची वाट पाहत होती. एक ऑटो आला त्यात ती बसून निघाली. पण जात असतांना मध्येच ऑटो बंद पडला .

"काय झालं भैय्या ?" ती ऑटोत बसलेली गरोदर महिला म्हणाली.

"ताई ऑटो बंद पडला,बहुतेक गॅस संपला असावा." ऑटोवाला म्हणाला.
"अरे देवा, आता काय करणार, मी घरी कशी जाऊ ?आधीच खूप उशीर झालाय." ती गरोदर महिला म्हणाली.
"ताई घाबरू नका ,मी दुसरा ऑटो पाहतो." ऑटोवाला 

तो ऑटोवाला दुसरा ऑटोसाठी वाट पाहत होता.तेवढ्यात दोनचार टपोरी माणसे त्याच्या ऑटोजवळ आली. आणि त्या ऑटोवाल्याला पैसे मागू लागली. तेवढ्यात मग त्यांचं लक्ष ऑटोत बसलेल्या बाईकडे गेले. त्याची घाणेरडी वासनेने बरबटलेली नजर तिच्या सर्वांगावरून फिरली. तिला त्याच्या त्या नजरेने धडकी भरली. सर्वांगावर घाम फुटला. त्यांच्यातील एकाने तिच्या जवळ येऊन तिचा हात पकडून तिला खाली ओढले.

"अरे ये तो पेट से है। " त्यातील एक म्हणाला.

"पेट से है तो क्या हुवा, है तो वो औरत ही ना?" असं म्हणत सर्व हसायला लागले. त्यांची असुरी प्रवृत्ती त्यांच्या हसण्यातून दिसत होती. रस्त्यावर रहदारी नव्हती, त्यामुळे त्यांच्या हसण्याचा आवाज तिच्या काळजात धस्स करून गेला.

"सोडा मला जाऊ द्या." ती महिला रडत रडत गयावया करत होती.


"हे घ्या माझ्याजवळचे सर्व पैसे घ्या पण प्लिज त्यांना सोडा तुमच्या पाया पडतो."तो ऑटोवाला त्या माणसांच्या पाय पकडून त्यांची विनवणी करीत होता. पण ती माणसं अजून जोरात हसत होती.

 "उचला हिला आणि घेऊन चला आणि तू रेऽऽ इथून गुपचुप निघायचं."दोन माणसांनी तिच्याकडे येऊन तिला पकडले. तो ऑटोवाला त्यांना गयावया करू लागला. त्यातील एकाने रामपुरी चाकू दाखवून त्याला तोंड बंद करायला सांगितले. तरीही तो त्या लोकांच्या तावडीतून सोडवण्यासाठी त्या महिलेला वाचवण्यासाठी प्रयत्न करत होता. तोच एकाने ऑटोवाल्याच्या डोक्यात जड वस्तूने वार केला आणि तो रक्तबंबाळ होऊन बेशुद्ध पडला. त्याला तिथेच सोडून ते लोक त्या गरोदर महिलेला घेऊन जात होते. ती सुटण्याचा प्रयत्न करत होती.

"सोडा मला, कोणी वाचवा." जीवाच्या आकांताने ती ओरडत होती. तिला एका सुमसान जागेवर आणले.



            त्याचवेळी दोन व्यक्ती एका बुलेटवर भरधाव वेगाने त्या रस्त्यावरून जात होत्या. बुलेटस्वार व्यक्तीला मध्येच ऑटो बघून काहीतरी संशयास्पद वाटले. थोडं जवळ गेल्यावर त्या ऑटो जवळ खाली पडलेल्या भाजीपाल्याच्या पिशव्या दिसल्या. बुलेट वरून उतरून ती इकडे तिकडे बघत होती. तोच तिला रस्त्याच्याकडेला खाली एक माणूस जखमी पडलेला दिसला. तो बेशुद्ध होता. तिने त्त्वरित ॲम्बुलन्सला फोन लावून बोलावून घेतले.


" दी, इकडे बांगडीचे तुकडे पडलेले आहेत. " त्याने म्हणजे नवीनने रस्त्यावरचा बांगडीचा तुकडा उचलून तिच्या समोर धरला.


"नवीन लवकर शोधलं पाहिजे." ती इकडे तिकडे पाहत म्हणाली.

नवीनने त्यांच्या टीमला त्या लोकेशनवर बोलवले. ती मात्र 
इकडे तिकडे शोधत होती. शोधता शोधता ती रस्त्यांच्या खाली उतरून ती पुढे गेली तोच तिला ती गरोदर महिला आणि ते चार माणसं दिसली. ती वाऱ्याच्या वेगाने धावतच गेली. त्या एका गुंडाने त्या गरोदर महिलेचा पदर ओढला. त्या महिलेने तो घट्ट पकडला पण त्या गुंडाने तिचा पदर जोरात खेचला,त्यामुळे ती महिला खाली पोटावर पडणार,तेवढ्यात ती धावत आली आणि तिने त्या महिलेला कमरेतून पकडून सांभाळले. तिने त्या महिलेला व्यवस्थित उभं केलं, साडीचा पदर तिच्या अंगावर टाकला आणि तिला सुरक्षित ठिकाणी बसवले. हे सगळं ती चारही माणसं बघत होती आणि जोरजोरात असूरी हसत होती .


"अरे ही पण आली आता तर आणखी मजा येणार." त्यातील एक गुंड म्हणाला.


 "तुला मजा करवून देण्यासाठीच तर आलीय ना मी ,कोण येतयं पुढे चला लवकर या." ती हसत हसत म्हणाली. त्यातील एक तिच्या समोर उभा राहिला आणि तिने एक त्याच्या मुस्काटात मारली. मारलेल्या माणसाच्या गुंडाच्या नाकातून रक्त आलं. दुसरा गुंड लगेच तिच्यावर धावून आला. त्याने तो हात उचलून तिला पंच मारणार तर तिने त्याचा हात पकडून त्याच्या पोटात दोन पंच आणि एक पंच गालावर मारत त्याला दूर फेकले. तोच तिसरा ही आला त्याने तो पाय उचलून लाथ मारणार तर हिने तोच पाय पकडून त्याला गोल फिरवले, तशी त्याच्या तोंडून किंकाळी बाहेर पडली. त्याला समोर उभा ठेवून तिने गुडघ्याने एक जोरदार धक्का त्याच्या प्रायव्हेट पार्टवर मारला. तो खाली पडून ओरडत होता. हे सगळं बघून चौथ्याचा राग अनावर झाला आणि तो चाकू घेऊन तिच्या अंगावर वार करायला गेला. तिने त्याचा तो हात असा पकडला की तो चाकू आपोआप खाली पडला.

" अरेऽऽ,या चाकू सोबत रोज खेळत असते मी,हाच हात होताना जो तू त्या बाईच्या अंगावर टाकलास."असं म्हणत तिने त्याचा हात तिच्या हातात पकडून असा पिरगळला की त्याचा तो हात कायमचा निकामी झाला. आता मात्र तिघेही एकत्र तिच्यावर धावून आले. पण काठी फिरवावी तसे तिने त्यांना उडवून लावले. हातांनी पायांनी त्यांना ती मारत होती. रागाने तिचा चेहरा लाल झाला होता. अंग गरम झाले होते. तिने रुद्रावतार धारण केला होता. ती बेभानपणे त्यांना मारत होती. ती तिच्या कमरेचा बेल्ट काढून त्यांच्यावर सपासप बेल्टचे वार करत होती. ते चारही गुंड खाली जमीनीवर पडून ओरडत होते. त्यांना त्यांचे आज मरण दिसत होते. तिच्या रुपात आज त्यांना साक्षात यमदेव दिसत होता. ते जीवाच्या आकांताने ओरडत होते.


"माफ करा !सोडा ! माफ करा ! सोडा ! आम्ही पुन्हा असे नाही करणार." ते ओरडत होते पण ही आता थांबत नव्हती. नवीन पळतच आला आणि त्याने तिचा हात पकडला.

" दी,थांब आधीच खूप मारलं आहे तू, दी प्लिज शांत हो !" नवीन त्याच्या म्हणण्याचा तिच्यावर काहीच फरक पडत नव्हता ती काही केल्या थांबत नव्हती. आता त्याच्याकडे एकच उपाय होता तिला शांत करण्याचा त्याने त्या गरोदर महिलेला तिच्यासमोर उभे केले.


"तुला राधाआईची शपथ !" नवीन म्हणाला.

तिने त्या महिलेला पाहिले आणि कानावर \"राधाआईच \" नाव कानावर पडले. तेव्हा तिने हातातील बेल्ट फेकून दिला. तिचा श्वास फुलला होता. ती जोरजोरात श्वास घेत होती. डोळ्यांतून आग बाहेर पडून अश्रूंच्या स्वरूपात गरम पाणी वाहत होते. नवीनने त्याच्या टीमला बोलावलेच होते. टीम आली आणि त्यांनी त्या सर्व गुंडाना पकडले त्यातील एक गुंड गयावया करत शेवाळे यांना म्हणाला.

"लवकर न्या हो आम्हाला, पोलिस कोठडीत जन्मभर राहू पण या बाईपासून वाचवा हो, तुमच्या पाया पडतो हो." त्यातील एक गुंड म्हणाला.


"काय यम दिसले वाटतं ?" शेवाळे.

"हो ..पण तुम्हाला कसं कळलं." चारही गुंड एकसाथ म्हणाले.


"यमच काय तर सगळे पूर्वज आठवले असतील." शेवाळे.

"हो .. खरयं .. मी तर आधी पडलो तर उठलोच नाही." एक तर रडत रडत म्हणाला.चांगलीच अद्दल घडली. 

"पुन्हा कोणत्याच बाईकडे पाहणार नाही." त्यांच्यातील एक गुंड म्हणाला.

"मी तर माझ्या बायकोकडेही नाही पाहणार." त्यांच्यातील दुसरा कळवत म्हणाला.

शेवाळेनी त्या चारही आरोपीला अटक करून गाडीत बसवून पोलिस स्टेशनला निघून गेले.ती त्या गरोदर महिलेजवळ जाऊन उभी राहिली. तिला पाणी दिलं. तिची चौकशी केली. 

 "तुम्ही ठीक आहेत ना काही त्रास वगैरे होतोय का?"

"नाही मी ठीक आहे. थोडं पोटात दुखतंय. थँक यू सो मच 
मॅडम."ती गरोदर महिला म्हणाली.

 "नाही हो हे माझं कर्तव्यच आहे." ती म्हणाली.

" तुम्ही नसता तर आज मी आणि माझं बाळ जिवंत राहिलो नसतो."ती गरोदर महिला हात जोडून म्हणाली.

तिला लगेच हॉस्पिटलला घेऊन तिचं पूर्ण चेकअप सोनोग्राफी करण्यात आले. डॉक्टरांनी तिला सक्तीचा आराम करायला सांगितले. दरम्यान फोनकरून तिच्या नवऱ्याला बोलवून घेतले. 

"या अवस्थेत तुम्ही त्यांना बाहेर कसं पाठवलं मिस्टर? कळत नाही तुम्हाला ?" ती त्या गरोदर महिलेच्या नवऱ्यावर चांगलीच बरसली.

"मॅडम त्यांनी नाही पाठवलं मला, मीच गेले होते मार्केटला.ऑटो बंद पडल्यामुळे असं झाले पण ते ऑटोवाले भाऊ कसे आहेत? ती गरोदर महिला डोळ्यांत पाणी आणत म्हणाली.

" ते बरे आहेत त्यांना तत्काळ हॉस्पिटलला पाठवले. डोक्याला मार लागला आहे त्यामुळे बेशुद्ध आहेत अजून,होतील लवकरच बरे आणि त्याचं ही स्टेटमेंट घ्यायचं आहे." ती म्हणाली.
हॉस्पिटल मध्येच तिची तक्रार नोंदवून, तिची स्वाक्षरी घेऊन , तिला आराम करायला सांगून ते दोघे पोलिस स्टेशनला निघून गेले.


कोण होती ती? त्या गरोदर महिलेला समोर पाहून आणि राधाआईच नाव ऐकून शांत का बसली ? कोण आहे ही 
राधाआई ? जाणून घेण्यासाठी वाचत रहा 
शिवरुदा ! Love files 


क्रमश :


🎭 Series Post

View all