Feb 24, 2024
ऐतिहासिक

शिवकाव्य कौस्तुभ भाग ६

Read Later
शिवकाव्य कौस्तुभ भाग ६
जिजाऊला मुलगा झाला.
या आनंदात पूर्ण गडवरील जनतेत उल्हास भरलेला होता. आनंदवेणुचे स्वर संपूर्ण वातावरण हर्षित करत होते. जिजाऊ देखील खूपच आनंदी, आणि समाधानीही झाली होती.

शहाजी राजांनाही ही खबर कळाली. त्यांना देखील खूपच आनंद झाला.त्यानी वर पाहिले आणि मनोमन काहीतरी ठरवुन हात जोडले.

व्रत वैकल्ये,धार्मिक विधी आणि संस्कार, हे सर्व जिजाऊ आस्थेने करत.या साठीचे भोसलें यांचे कुलोपाध्याय हे गडावरच होते.

यामुळे पहिल्या बारा दिवसातले संस्कार, बाळावर मोठ्या साक्षेपाने करण्यात आले.
तसेच 'बारसे' ही मोठ्या थाटामाटात साजरे झाले.
शिवनेरी गडाने राजांच्या बारश्याचा थाट बघितला,अनुभवला.

शिवनेरी या किल्ल्यावर शिवबाचा पाळणा झुलत होता.अगदी सह्याद्रीच्या कुशीत.येथिल हवेतील कणखर पणा, बाळाच्या शरीराभोवती फिरून त्याला मजबुती देत होता.अन् सांगत होता,"राकट आणि कणखर बनायचे आहे तुला.संकटांना पायदळी तुडवण्या साठीच, तुझा जन्म झाला आहे."

पाळण्याला झोके देताना जिजाऊ
अंगाई म्हणत असे.या अंगाईतुन, पाळण्याच्या खेळण्यातुन, सुसंस्काराचे बीज,मुलांमध्ये रूजवण्यचे मोठे काम होत असते.
अशीच सुसंस्कारांची अंगाई त्या म्हणत होत्या. याबरोबरच बाळराजांच्या भविष्याची स्वप्ने ही त्या रंगवीत होत्या.
ही अंगाई मी या पुढील शब्दात गुंफलेली आहे.
४) अंगाई

जोजवीत होती जिजाऊ,
संस्काराची गात अंगाई.
शिवनेरीच्या मांडीवरती,
वाढू लागले बाळ शिवाजी।।धृ।।

हाती तिने धरली पाळण्याची दोरी,
हेतू मनी, जावी ही गगन भरारी.
श्री शिवाई देवी तुझी ही
असावी कार्यास या मर्जी।
शिवनेरीच्या मांडीवरती,
वाढू लागले बाळ शिवाजी।।१।।


चंद्राच्या कले कलेप्रमाणे वाढू लागले बाळ, जैसा गोकुळात वाढला, राजा कंसाचा काळ.
तीट गाली लावीत असे जिजाऊ,
दृष्ट लागू नये कधीच दुष्टांची।
शिवनेरीच्या मांडी वरती
वाढू लागले बाळ शिवाजी।।२।।


दुडूदुडू धावता, वाजू लागले पैंजण पायी,
खुदु खुदु हसू लागला गड, गुदगुल्या होई. दिगंत होऊ दे कीर्ती भवानी
या चिमुकल्या जीवाची।
शिवनेरीच्या मांडीवरती,
वाढू लागले बाळ शिवाजी।।३।।

हळू वारा येई, सह्यागिरीच्या शिखरावरूनी, पाळण्यात हा नाचे, बाळाभोवती फेर धरूनी. कानात सांगतो..
'उडव आता धुळधाण तु परकीयांची।
शिवनेरीच्या मांडीवरती,
वाढू लागले बाळ शिवाजी।।४।।

(संदर्भ - राजा शिवछत्रपती ले.बाबासाहेब पुरंदरे.)

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//