शिवकाव्य कौस्तुभ भाग २

Shivkavya Kaustubh Part 2
श्री क्षेत्र पैठण येथील, सुप्रसिद्ध असे संत एकनाथ जी महाराज..
यांनी, आजुबाजुच्या
परिस्थितीत (म्हणजे सुलतानांनी जुलूम नाही)जर बदल घडवायचा असेल, तर लोक जागृती करणे खुपच गरजेचे आहे.हे त्यांनी ओळखले.त्यामुळे कीर्तनासारख्या प्रभावी माध्यमातून लोकजागृती करण्याचे कार्य त्यांनी हाती घेतले. पैठण येथील कर्म भूमीत या कामाचा श्रीगणेशा केला.

सतराव्या शतकाच्या सुरुवातीचा हा काळ, संत एकनाथ महाराजांच्या अखेरच्या काळात, महाराष्ट्राची पूर्व उजळली…

वेरूळ येथील भोसले यांच्या घरातील, दोन सुपुत्रांनी निजामशाहीत सरदारकी करता करता देवधर्माची आणि लोककल्याणाची कामे करण्याचे व्रत घेतले.
मालोजीराजे आणि विठोजी राजे असे या दोन सुपुत्रांची नावे..
भगवान श्री शंकराचे आणि माता भवानीचे ते निस्सीम भक्त होते.
ते पराक्रम आणि वीरतेमुळे संपन्न आणि बलाढ्यही झाले.त्यांनी केलेल्या कार्यामुळे मराठी जनतेत त्यांचा वात्सल्यरुपी धबधबा निर्माण झाला. मालोजीने आपल्या कर्तृत्वाने आसपासच्या, वेरूळच्या परिसरात देखील दबदबा निर्माण केला.
यांनी मग वेरूळ येथील श्री घृष्णेश्वराचे मंदिर बांधले. शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाच्या परिसरात एक विशाल तलाव खोदला. जेणेकरून पाण्यावाचून होणारे लोकांचे हाल, यामुळे कमी झाले. तेथेच एक अन्नछत्रही चालू केले. देव, धर्म, जनता यांच्या सेवेची अनेक कामे या राजांनी केली. त्यामुळे जनतेत आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले. याच काळात, मालोजीराजे यांना पुत्र प्राप्ती झाली. त्या मुलाचे नाव 'शहाजी' असे ठेवण्यात आले. त्यांनंतर आणखी एक पुत्र झाला.त्याचे नाव 'शरीफजी' असे ठेवण्यात आले.
मालोजीराज्यांची संसार वेल बहरली. तशीच पराक्रमाच्या तोफाही सर्व दूर वाजू लागल्या. कीर्ती पसरू लागली.

असेच एक दिवस इंदापूर येथे ते लढाईसाठी गेले असता. लढता लढता विठोजी राजे रणांगणावर कोसळले.आणि तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली.
शहाजी आणि शरीफजी हे दोघेही बाल वयातच पोरके झाले. त्यानंतर मालोजीराजे यांच्या पत्नी सती जाण्यास निघाल्या..
पण विठोजी राजांनी त्यांना अडवले."मुलांना आईची गरज आहे.ती अजुन लहान आहे."
त्यानंतर विठोजी राजांनी दोन्ही मुलांना आपलेपणाने सांभाळुन त्यांना उत्तम असे युद्ध कलेचे शिक्षण दिले. शस्त्रास्त्रांचे योग्य प्रशिक्षण देऊन, त्यामध्ये पारंगत बनवले.

दरम्यान राजे शहाजी यांचे लग्न सिंदखेड चे राजे लखुजी जाधव यांची तेजस्वी कन्या जिजाऊ हिच्याशी ठरले.
अतिशय तेजस्वी, गुणी, रूपाने देखणी असणारी अशी ही जिजा.
'राजबिंडे रूप, हुशार आणि पराक्रमी असा जावई आपल्याला मिळाला' असा विचार करून 'केवढे!! आपले लेकीचे भाग्य! यामुळे लखुजी जाधव यांनाही खूप आनंद झाला.

आणि म्हणूनच खूप थाटामाटा हा विवाह पार पडला. जाधव घराण्यातील लेकीने भोसलेंच्या घरातील शहाजीराजांना वरमाला घालून पति म्हणून स्वीकारले.
आणि दोन बलवंत घराणे या नात्याने जवळ आली. चंद्र सूर्याचे नाते जुळावे, तसे जाधव आणि भोसले यांचे हे नाते जुळले. दोन पराक्रमी, मराठी शक्ती एकत्र झाल्या होत्या.

हसरी लाजरी जिजाऊ लक्ष्मी सारखी दिसत होती. वाजत गाजत, सोन्याच्या पावलाने या लक्ष्मीने भोसल्यांच्या घरात प्रवेश केला. सोन्याच्या पावलाने आलेल्या या गोड गोजिर्या आणि चुणचुणीत जिजाऊ ला पाहून, शहाजीराजांच्या आईचे काळीज सुपा एवढे झाले. त्यांनी तिला आनंदाने घट्ट मिठी मारली. डोळ्यात गंगा यमुना दाटल्या होत्या. त्या म्हणाल्या, "तुझ्या रूपानं भाग्य उजळू दे या भोसले कुळाचे.."

पाहुया पुढील भागात ..

🎭 Series Post

View all