शिवकाव्य कौस्तुभ भाग -२७

Shivkavya Kaustubh Part 27
आई अंबे जगदंबे मला अभय दे मला विजय दे लढाया बळ दे आई अंबे जगदंबे
(गीत -मंदार चोळकर)
अगदी या गीताप्रमाणेच, महाराजांनी माता भवानीची प्रार्थना करून, प्रतापगडावरून पायथ्याकडे निघाले.
निघण्यापूर्वी सगळ्यांनाच त्यांनी सूचना देऊन ठेवल्या होत्या. माझे बरे वाईट झाले तर… स्वराज्याची सर्व सूत्र नीट राहण्यासाठी. शंभू बाळास राजे समजून, प्रत्येकाने आपापले काम चोखपणे करत राहावे. असे सांगताना त्यांना असंख्य वेदना होत होत्या. आणि ऐकणारालाही.

महाराज शामियान्यासमोर आले. भव्य असा हा शामियाना.
महाराजांनी खास व्यक्तींना सांगून, सर्व सूचना देऊन, बनवला होता. अतिशय सुंदर खांब बनवले होते. ज्यावर शामियाना उभा होता. चिटाचे पडदे आणि आड पडदे लावले होते. अशाच मौल्यवान कापडाच्या अशांती होत्या मोत्यांचे घोस आणि मोती झालंरींना लावलेले होते. मौल्यवान अशी झुंबर वरती लटकवलेली होती. गाद्या लोड यांना उत्तम भरजरी कापडाच्या बिछायती आणि खोळी घातलेल्या होत्या. कोपऱ्यात मोठे मोठे दीप, म्हणजे मोराच्या समया ठेवलेल्या होत्या. वाळ्याचे पडदेही लावलेले होते. सदरेवर कस्तुरीचे शिंपण केलेले असल्याने सुगंधी सुवास दरवळत होता.उच्च प्रतिचे जाजमही तेथे अंथरलेले होते.
खानाच्या इतर सरदारांच्या छावणीतही, सगळीकडे आनंदी आनंदाचे वातावरण होते. सगळ्यांनी मनात ठरवून घेतले होते की, 'आज शिवाजी खानाच्या हाती लागणारच आहे. त्यामुळे कदाचित उद्या सर्वच जण विजापूरच्या वाटेवर परत जाण्याससाठी निघणार आहोत.'
म्हणून सगळेच एका वेगळ्याच धुंदीत होते.

या भव्य आणि सुंदर शामियानासमोर महाराज येऊन थांबले. पण मध्ये काहीतरी गडबड आहे हे त्यांच्या लक्षात आले. तेव्हा ते तिथेच थांबले. मध्ये निरोप पाठवला की, "तुमच्याजवळ हत्यार बंद असलेल्या सरदाराला बाजूला करावा."
हे ऐकून, 'किती रे तू भीत्रा आहे." असे नकळत खानाच्या मुखातून निघाले.
इकडे आल्यापासून त्यांच्या कानावर सतत हे च येत होते,'की शिवाजी भित्रा आहे, शिवाजी घाबरत आहे.'
त्यामुळे लगेच अफजलखानाने सय्यद बंडाला बाहेर र जाण्यास सांगितले. यावरून असे दिसते की महाराज प्रत्येक पाऊल हे सावधगिरीनेच टाकत होते.
मध्ये गेल्यावर म्हणजे तंबूत गेल्यावर, दोन्ही हात पसरून खान उभा होता. जणू स्वराज्यालाच हा विळखा, तो घालु पाहात होता.

सगळ्या स्वराज्याचे डोळे आणि कान आज स्तब्ध झाले होते. की उगवणारा उद्याचा दिवस, काय दाखवणार आहे? त्याच्या पोटात नेमके काय दडलेले आहे? हे कोणीही सांगू शकत नव्हते. येणाऱ्या घडीचीच प्रतिक्षा करणे. हेच हातात होते.
बघु या, या पुढील काव्यात..


*एक विजय*

डोळ्यात शोध मनात अंगार दंड लागलेस स्पुरायला।।
उचलले पाऊल शिवबाने दैत्य संहायला ।।धृ।।

सोबतीला विश्वासू मावळे
जीवा महाला कांताजी इंगळे
मिळून होती दहा जण सगळे
एकमेका देत हात चालले शत्रूच्या घोटाला।।
उचलले पाऊल शिवबाने दैत्य संहायला ।।१।।

गडाच्या पायथ्याशी माळावर
घातला शामियाना सुंदर
वाऱ्याने डौलात हले झालर
झालं गाद्या गिरद्या उषा, लोड मखमली टेकायला।।
उचलले पाऊल शिवबाने दैत्य संहायला ।।२।।

ठेवले पाऊल मंडपात
सय्यद बंडा हा होता आत
होता अतिशय पटाईत
त्याला आधी करा बाजूला, असा निरोप धाडिला।।
उचलले पाऊल शिवबाने दैत्य संहायला ।।३।।

राहिले येऊन उभे समोर
खानाच्या शिवबा बरोबर
दोघांची झाली नजरा नजर
खानाने पसरले हात ऊरभेट घेण्याला।।
उचलले पाऊल शिवबाने दैत्य संहायला ।।४।।

शिवबाची धरली मान
काखेत खानाने दाबून
कट्यारीचा वार करून
फसला अफजल खान या त्याच्याच डावाला।।
उचलले पाऊल शिवबाने दैत्य संहायला ।।५।।

शिवबाने चपलाईन
त्याचा कावा ओळखून
पोटी त्याच्या खूपसुन,
वाघनखं, शांत केले मनातल्या आगीला।।
उचलले पाऊल शिवबाने दैत्य संहायला ।।६।।


रामाने वंधिले रावणाला
कृष्णाने मथुरेच्या कंसाला
हिरण्यकश्यपू हि फाडिला
तसेच शिवबाने संपवले दुष्ट खानाला।।
उचलले पाऊल शिवबाने दैत्य संहायला ।।७।।

@ शुभांगी सुहास जुजगर.
(संदर्भ -बाबासाहेब पुरंदरे)

🎭 Series Post

View all