शिवकाव्य कौस्तुभ -भाग २३

Shivkavya Kaustubh Part 23
जय जय तुळजाभवानी जगदंबे।
जय जय तुळजाभवानी जगदंबे।।

अफजलखानाने, माता भवानीच्या मंदिराला पहिले सावज केले. देवीची मूर्ती, त्यानंतर इतर तोडफोड करून चांगलाच धुमाकूळ घातला. तिथेच काही दिवस राहून मग तो पंढरपुराकडे वळला. पंढरपुरातही त्याने तेच केले. नुसताच उच्छाद, धुडगुस, नाश, विध्वंस, करतच तो तेथे राहिला. पुंडलिकाची मूर्ती पाण्यात टाकली. नंतर मंदिराची ही तोडफोड केली. मराठ्यांचे दैवत असलेली ही दोन स्थळे, याच स्थळांना त्रास दिला. 'तर तो शिवा लगेच नाक धरून मला शरण येईल.' अशी त्याची समजूत. आणि आपले फौज हल्ली मोठे आपण मग कैदच करून घेऊ. आणि लगेच विजापुरी प्रस्थान करू. अश्याच समाजात तो होता.
पुढील काव्यात गुंफलेले काय ??वाचु..

*तयारी मनाची*
आलेल्या संकटावर मात करण्याची।।
केली तयारी शिवाजीने खानाशी लढण्याची।।धृ।।
खानाने तळ दिला वाईत
रोज लष्कर होते फुगत
धिंगाना त्यांचा सर्व गावात
भीतीची हवा वाईसह मावळात
तोंडचे पळाले पाणी पाहून ताकत खानाची।। केली तयारी शिवाजीने खानाशी लढण्याची।।१।।

सर्व चित्र समोर ठेवून
काम घेतलं सारं हुशारीन
लेढीन मी प्रतापगडाहून
योग्य जागा लढण्यास काव्यानं
या थोर धाडसाला साक्ष ही महाबळेश्वरची।। केली तयारी शिवाजीने खानाशी लढण्याची।।२।।
निघण्यास प्रतापगडावर
शिवबा झाला असे तयार
परी सई अंथरुणावर
होती मरणाच्या शय्येवर
करून कठोर काळीज साथ दिली कर्तव्याची।।
केली तयारी शिवाजीने खानाशी लढण्याची।।३।।

मासाहेबांचा घेण्या आशिष
झुकले चरणावरी त्या शीश
'मिळो सदाचा तुम्हाला यश
आहे एकच आमचा ध्यास
खात्रीने तुमच्या गळ्यात माळ पडेल यशाची'।। केली तयारी शिवाजीने खानाशी लढण्याची।।४।।

शुभांगी सुहास जुजगर
(संदर्भ -बाबासाहेब पुरंदरे)

🎭 Series Post

View all