शिवकाव्य कौस्तुभ भाग १६

Shivkavya Kaustubh Part 16
आपण मागील भागात शहाजी राजांना शिवबाच्या विजयी घोडदौडीच्या बातम्या ऐकुन झालेला आनंद बघीतला.

इवलेसे रोप लावियेले द्वारी,
त्याचा वेलु गेला गगनावरी।।

या रचने प्रमाणे जिजाऊ आणि शहाजीराजे यांनी, हे हिंदवी स्वराज्याचे रोप लावियले.
हळुहळु या रोपांची वाढ होऊ लागली.

म्हणजेच शिवबांनी तोरणा किल्ला जिंकला.
त्यानंतर मुरूंबदेव या डोंगरावर 'राजगड' या किल्ल्याचा पाया घातला.आणि या गडाचे बांधकाम चालु झाले.या उद्देशाने की स्वराज्याची हीच राजधानी असेल.सुंदर आणि सुबक असे बांधकाम येथे होऊ लागले.

त्यानंतर राजे स्वस्थ बसले नाहीत. त्यांचे लक्ष कोंढाणा या किल्ल्याकडे गेले. बापूजी मुदगल देशपांडे यांच्यावर ही कामगिरी सोपवली. त्यांनी ती चोख पार पाडली. आणि या किल्ल्यावर हिंदी स्वराज्याचे निशाण डौलाने फडकू लागले. त्यानंतर शिरवळ चा किल्ला 'सुभानमंगळ' हाही जिंकला.
असाच हा वेलु गगनाकडे झेपावू लागला.

या शिवविजयाच्या वार्ता विजापूर दरबारी पोहोचल्या, नव्हे पोहोचविल्या गेल्या. 'शिवबा नावाचा पोरगा हे करतोय' यावर विश्वास बसेना. पण त्यानंतर जावळीचे मोरे प्रकरण, शिवबानेने निकालात काढले. असेच एका नंतर एक धक्के विजापुरी दरबाराला बसत होते.'एवढे सर्व घडत आहे? काय उच्छाद मांडला या पोराने..! आता याला थांबवलेच पाहिजे.नाहीतर पुन्हा जड जायचे.' असे बादशहानला वाटू लागले. म्हणून त्याने एक कट रचला. आपल्या काही विश्वासू सरदारांना त्यात सामील केले.
पाहूया पुढील काव्यात तो कट..

* शहाजीराजांना कैद..*
आज हा गड गेला, आज तो गड गेला, आपल्या सेनेचा पराभव झाला,
ऐकून शिवाजीचे उपद्व्याप।।
आदिलशाही हादुरून गेली।।ध्।।

भोसले पिता पुत्रा च्या विरोधात,
कागाळी झाली विजापुरी दरबारात,
बादशहा भडकला एका क्षणात,
तळपायाची आग गेली मस्तकात,
एवढ्याशा मुंगीची, हत्तीच्या वाटे
जाण्याची हिंमत कशी झाली?
ऐकून शिवाजीचे उपद्व्याप।।
आदिलशाही हादुरून गेली।।१।।

या शिवाजीस घालण्या वेसन,
शिजले एक गुप्त कारस्थान,
मुस्तफा खानास सारं समजावून,
बादशहाने एकांती त्यास घेऊन,
'नाक दाबले की तोंड उघडण्याची'
नामी युक्ती योजली।।
ऐकून शिवाजीचे उपद्व्याप।।
आदिलशाही हादुरून गेली।।२।।

शहाजी भोसले सैन्यात चाकरीला,
दग्याने कैद करून ठेवावे त्याला,
बसेल वचक मग शिवाजीला,
देईल सोडून हाती धरलेल्या आगीला,
येईल मग पुत्र शरण, करीत पित्याची वकिली।।
ऐकून शिवाजीचे उपद्व्याप आदिलशाही हादरून गेली।।३।।

सौ. शुभांगी सुहास जुजगर.

🎭 Series Post

View all