शिवकाव्य कौस्तुभ -भाग १५

Shivkavya Kaustubh Part 15
शहाजी राजे आणि जिजाऊ ही दोघेही जणु तपाला बसल्या प्रमाणेच 'हिंदवी स्वराज्य व्हावे''यासाठी अहोरात्र मेहनत घेत होते. झटत होते.शहाजी राजे सुलतानी चाकरीत राहुनच 'हे राष्ट्र कसे वाढीस लागेल?'याच चिंतेत असायचे.
शहाजी राजे हे मुळातच धाडसी वृत्तीचे, पराक्रमी, कर्तृत्ववान, आणि लढाऊ बाण्याचे होते.पित्याकडुनच हा सगळा वसा त्यांना मिळाला होता.ते निजामशाही,आदिलशाही यांच्या कडे चाकरीत राहुन मैदान गाजवित होते.मोठे पराक्रम करीत होते.पण हे सर्व करून यांचा लाभ मात्र त्यांनाच मिळत होता.हेच कार्य करून आपण आपले मुलखी राज्य निर्माण करू शकतो. असा मनोदय त्यांच्या मनी प्रगटला.त्यांनी असा प्रयत्न ही केला पण ..! तो यशस्वीही झाला होता.पण दुर्दैव आडवं आलं, आणि ती नगरी पार उध्वस्त करून तिथे गाढवाचा नांगर फिरवला गेला.तरीही त्यांनी निर्धार सोडला नाही.उलट आता दुरदृष्टी ठेवुन कार्यास प्रारंभ केला.या कार्यात त्यांना मोलाची साथ होती ती जिजाऊंची.जे राज्य धर्माचे असेल..न्यायाचे असेल.. स्त्रिया या सुरक्षित राहुन संसार सुखाचे होतील..जुलमाला जेथे अजिबात थारा नसेल.. असे हे मराठ्यांचे राज्य व्हावे, नव्हे..हिंदवी स्वराज्य येथे व्हावे. हेच ध्येय समोर ठेवुन शिवबाला घडविले.
वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी शिवबाने तोरणा किल्ला जिंकुन या कार्याचा श्रीगणेशा केला.आणि किल्ल्याचे काम करत असताना किल्ल्यावर धनलाभ झाला. या धनलाभामुळे असा संकेत मिळाला,की 'हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे.'म्हणुन त्यांनी हा आशिर्वाद दिला आहे.
या सर्व यशाच्या, विजयाच्या खबरी शहाजीराजांच्या कानावर पडत होत्या. हे ऐकून त्यांचे काम तृप्त होत होते. आजपर्यंतच्या मेहनतीला, तपाला जणू हे फळच मिळत होते.
पाहूया पुढील कवितेत..


*शहाजी राजे*

शहाजीराजा.. शुर सरदार, या मावळ प्रांताचा।।
घडवून आणला इतिहास या महाराष्ट्र देशाचा।।धृ।।

यांनी वाढवली शान वेरूळच्या भोसल्यांची, गाजवून तलवार कीर्ती वाढवली रणांगणाची, पाहुनी शौर्य मिळाला मान सुभेदार, सरदाराचा।।
घडवून आणला इतिहास, या महाराष्ट्र देशाचा।।१।।

परी खंत मनामध्ये एक सह्याद्रीसह या मावळात,
हिंदूंचा असावा अंमल या मराठी मुलखात,
शूर मावळे एक झाले अंत होईल जुलूमशाहीचा।।
घडवून आणला इतिहास, या महाराष्ट्र देशाचा।।२।।

स्वप्न हे शहाजीचे, विश्वासी घेऊन कथिले जिजाऊला,
ठरवून असे हे मनी आकारले
शिवबाच्या जीवनाला,
स्वातंत्र्याची पेटवून ज्योत मावळ प्रांत प्रकाशनाचा।।
घडवून आणला इतिहास, या महाराष्ट्र देशाचा।।३।।

पाणावले नेत्र, दाटला उर, शिवाजीच्या विजयी वार्ता ऐकून,
नकळत भासले आभाळ ही झालं जणु ठेंगणं, 'अखंड राहो हा पराक्रम' स्वर निघाला आशीर्वादाचा।।
घडवून आणला इतिहास, या महाराष्ट्र देशाचा।।४।।

एका भयाने त्यांच्या मनास ग्रासिले, डोळ्यासमोर शत्रूच्या भीतीचे काजवे चमकले, मन घट्ट करून निश्चय केला,
'आता हाच सूर्य स्वराज्याचा'।।
घडूवुन आणला इतिहास, या महाराष्ट्र देशाचा।।५।।


🎭 Series Post

View all