शिवार

शिवार
चित्रकाव्य

*शिवार*

बैलजोडीच्या साथीने
कसतो शिवार बळीराजा,
उंच भरारी घेत आकाशी
पाखरे लुटत आहेत मजा.

वसले घर बांधवर ऐटीत
लाल कौले, सफेद भिंतीचे,
वाकून खाली स्त्रिया दोघी
सोबत करती काम शेतीचे.

न्याहाळतो मुलगा आईला
राहून शांत उभा शेजारी,
मागून वाहे झुळूझुळू पाणी
रम्य वाटतो निसर्ग भारी.

पिवळसर केशरी छटेतून
पाहतो सूर्यदेव डोकावून,
झाडे घेतात गगन झेप
हिरवळ पसरली मातीतून.
-----------------------
©®सौ वनिता गणेश शिंदे

🎭 Series Post

View all