शिवा: किंग ऑफ आर्मी

ही कथा आहे दोन जवानांची...देशावर संकट येऊन ठेपलं होतं. तेव्हा शिवा कसा सामोरे गेला आणि तिने त्याची साथ कशी दिली? या दोघांना या मिशन मध्ये यश मिळाले का?

विषय:-......आणि ती हसली.
फेरी:- राज्यस्तरीय लघुकथा स्पर्धा


शिवाने शत्रू सैनिकांवर सावधपणे लक्ष ठेवण्यास आपल्या सैनिकांना सांगितले होते. प्रचंड नुकसान झालं होतं. कित्येक सैनिक या चकमकीत  शहीद झाले होते. आता वेळ होती, सावधगिरीने पाऊल उचलण्याची, संकट पाहून शिवा आणि त्याचे सैनिक सतर्क झाले होते.

काहीवेळा पूर्वी.....

आपल्या देशावर हल्ला केला जाणार आहे, अशी गुप्त बातमी मिळताच प्रत्येक निवडक सैनिकांना मिटींग रूम मध्ये अर्जंट बोलावण्यात आलं होतं. त्यात शिवा आणि शिवाची टीम आज तिथे आली होती. सगळ्यांना संपूर्ण प्लॅन समजवण्यात येतं होता. काही देशद्रोहींमुळे सिक्रेट प्लॅन आधीच बाहेर लिक झाला होता आणि आता देशावर शत्रू सैनिक हल्ल्याचं संकट तोंडाशी येऊन ठेपलं होतं त्यामुळे तात्कालीन मिटींग बोलवण्यात आली होती. सगळेच सैनिक गंभीर चेहरा करून उभे होते.

"मेजर शिवा तुम्हाला आणि तुमच्या टिमला खूप सावधगिरीने शत्रू सैनिकांवर हल्ला करायचा आहे. सूत्रांकडून समजलं आहे की आपल्याच देशात काही देशद्रोही भरले आहेत ज्यामुळे हा हल्ला आज होणार आहे त्यामुळे आपल्याला सतर्क राहून काम करावं लागणार आहे." कर्नल मेहरा शिवाला बोलले.

"येस सर....." शिवा आणि त्याची टीम म्हणाली.

"अजून एक गोष्ट सूत्रांकडून समजलं की ही जी व्यक्ती आहे ती आपल्यातच वावरत आहे आणि आपलं नियंत्रण विस्कळीत करण्याचं पुरेपुर फायदा करून घेईल. त्यामुळे आपल्याला त्या व्यक्तीला सुद्धा रंगेहाथ पकडायचं आहे." कर्नल मेहरा टीमला सांगतं होते.

तिथे अजून एक टीम होती जी बोर्डवर नजर ठेवणार होती त्यात ती सुद्धा आली होती. त्यांना ही कर्नल मेहरा काही सुचना देत होते. आक्रमण होण्याअगोदर कोणती दक्षता घ्यावी आणि काय आखणी करावी जेणे करून शिवाकडे एक- एक बातमी कशी पोहचता येईल आणि शत्रूला किती काळ घुसखोरी करण्यात थांबवू शकेल याची योजना करतं होते.

"सर मला असे वाटते की आधी टीमला तिथे आता ताबडतोब पाठवून द्यावे. आम्ही इथून लक्ष ठेवणार आहोत पण काही टेक्निकल इश्यू झाला तर आम्ही तात्काळ तिथे जाऊ. कारण या हल्ल्यात किती नुकसान होणार आहे प्रचिती येतेय." काही महत्त्वाचे मुद्दे ती सराईतपणे सगळ्यांसमोर ती मांडत होती.

कर्नल मेहरा सोबत काही डिस्कशन करून प्रत्येक टीमला त्यांनी मार्गस्थ केलं.


सुरक्षेच्या नियोजनाप्रमाणे शत्रूची हालचाल अजूनही जाणवली नव्हती. तसेच शिवा आणि त्याची टीमही डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून होती. परंतू अचानक चार-पाच ठिकाणांहून हल्ला झाला आणि काही सैनिक शहीद झाले. दोन्ही कडून लढाईची चकमक चालूच होती. शत्रू सैनिकही त्यात मारले जातं होते आणि आपले सुद्धा..... अचानक समोरून गोळीबार बंद झाला तेव्हा शिवाने सगळ्यांना सुचना दिल्या.

"शत्रू सैनिकांवर सावधगिरी लक्ष ठेवा कुठूनही हल्ला होऊ शकतो." असे शिवा आपल्या टीमला सांगतं होता.

टीमने ही इशारा करून सहमती दर्शवली......

अचानक टेक्निकल रूम मध्ये हालचाल जाणवली कि काही तरी चुकीचं घडतंय म्हणून तिथून टीम ताबडतोब निघाली आणि शिवा आणि त्याची टीम जिथे होती तिथे आली.

तिथे गेल्यावर समोरचं दृष्य बघून कोणाचाही थरकाप उडेल अशी अवस्था सैनिकांची झाली होती. संपूर्ण बर्फावर लाल चादर पांघरावी अशी अवस्था झाली होती. चारी बाजूंनी गोळीबार झाला होता. शिवा आणि काही आर्मी ऑफिसर लपत छपत गोळीबार करतं होते.

तिची टीम तिथे दाखल होताच त्यांनीही लढाई चालू ठेवली. समोरच्या शत्रू सैनिकांना एक एक करून संपवून टाकलं होतं. तिचं संपूर्ण लक्ष शिवा जिथे होता तिथे लागून होतं आणि अचानक त्याच्यावर गोळीबार केला गेला. काही क्षणासाठी सगळे सुन्न होऊन बघू लागले अन् शिवा सुद्धा बघू लागला. अचानक गोळी चालवण्याच्या आवाजामुळे काही वेळ तोही दचकला आणि जेव्हा त्याला समजलं की गोळी आपल्याला लागली नसून पाठी चालवली गेली आहे, तेव्हा त्याने वळून मागे बघितलं तर एका वेशात कोणी अज्ञात व्यक्ती आर्मी ऑफिसरच्या वेषात होता. पण त्याला गोळी पायाला आणि खांद्याला लागली होती म्हणून तो अजूनही जिवंत होता अन् तिथून पळ काढण्याच्या मार्गावर होता.

दोन सैनिकांनी त्याला तसंच पकडून त्याची खातिरदारी करायला सेल मध्ये आणलं होतं. हा तोच होता जो आतली खबर बाहेर पोहचवण्याचं काम करत होता आणि आता तोच त्या देशद्रोहीचं नाव सांगून या हल्ल्यामागच्या सुत्रधाराचं नाव रहस्य उघड करणार होता.

"बोल लवकर कोण आहे तो देशद्रोही?" शिवाने त्याला मारून मारून त्याचं रक्त बाहेर काढलं होतं मग त्याला विचारत होता.

"जीव गेला तरी नाही सांगणार नाऽऽऽव...." तो कळवळून बोलत होता.

खूप मारून मारून त्याच्याकडून ते नाव काढून घेतलं आणि त्या देशद्रोहीला अटक करण्याची प्रोसिजर सुरू केली.

"अशा लोकांना जिवंत राहण्याचा काही अधिकार नाही यांची तर जेल मध्ये पण राहण्याची लायकी नाही यांना तर असाच उडवला पाहिजे." शिवा रागात मनात बोलत होता, तेवढ्यात त्याच्या खांद्यावर एका टिम मेंबरचा हात येऊन पडला.

"सर याला जिवंत नका सोडून असं काम करू कि, साप भी मर जाए और लाठी भी ना टूंटे"......तो शिवाच्या कानापाशी जाऊन म्हणाला.

शिवा एक स्मित केलं आणि आश्वासक नजरेने हो बोलला. नेमक तेच ती येऊन ऐकलं आणि एक गुढ हसू चेहर्‍यावर ठेवलं.

कारवाई नुसार त्या देशद्रोहीला अटक करायला नेमके ऑफिसर पाठवले होते. रस्त्यात अचानक गाडी बंद पडली आणि सगळे खाली उतरले. अचानक ब्लास्ट झाला आणि त्या गाडीसह त्या देशद्रोहीचा नामोनिशाण मिटला गेला.

काही वेळाने न्यूज चॅनल वर एकच न्यूज झळकत असते. "आरोपीला अटक करून जेल मध्ये नेण्यात येतं होते. अचानक गाडी बंद पडली आणि ऑफिसर बिघाड चेक करायला उतरले असताच गाडी अचानक ब्लास्ट झाली. अजून कोण असेल का या हल्ल्या मागे ह्याबाबत अजूनही काही समजलं नाही. यावर तपास चालू आहे आणि लवकरच निर्णय घेतला जाईल." सगळीकडे एकच बातमी चालू होती.

इथे शिवा आणि तिची टीम हिचं बातमी बघतं होते आणि सगळ्यांच्या चेहर्‍यावर समाधानकारक हसू होतं. देशावर अचानक आलेल्या संकटावर त्यांनी मात केली होती आणि  त्यांचा विजय झाला होता.

शिवा अन् तिची नजरानजर होताच. शिवाने तिच्याकडे पाहून स्मित केले आणि ती समाधानाने हसली...


समाप्त.

लेखिका- प्रणाली कृष्णा शिंदे(PanuSid?)

जिल्हा: मुंबई