Login

शिल्पकार

मीच माझा शिल्पकार
कवितेचे शिर्षक: शिल्पकार
कवितेचा विषय: मीच माझा शिल्पकार
राज्यस्तरीय कविता स्पर्धा फेरी २

मी एक छोटंसं शिल्प
माझं मीच घडवणार
गरुडापरी आकाशात
उंच उंच विहारणार

 एक छोटासा काजवाही
अंधारात वाटाड्या बनणार
तसं मी स्वतःला घडवून
दुसऱ्यांना मार्ग दाखवणार,

पुन्हा एकदा सगळ्यांना
 ठणकावून सांगणार
छोट्या छोट्या आपत्तींनी
ना कधी मी ढळणार

कोळ्याच्या जाळ्यापरी
स्वप्न चंदेरी विणनार
आणि स्वतःला नेहमी
सिद्ध करुनचं दाखवणार

डगमगले जरी कधी
आयुष्याच्या उमेदीवर 
तरी नव्या भरारीची 
शिल्पकार मीच ठरणार