शेवटची इच्छा(भाग ४) अंतिम भाग

आपल्या आयुष्यात जे घडतं ते विधिलिखित असतं,नाही का?


"आईला मरण हवे आहे?"

सगळे ताडकन उभे राहिले.

" आई!!! अगं काय झालं तुला?"

" ताईसाहेब, त्या खूप खचून गेल्या आहेत आतून. का नाही खचनार तुम्ही सांगा ना?"

" एकट राहण्याचा निर्णय आईचा होता आमचा नाही." अनुराग परत बोलला.


अनुराग अजून काही बोलण्याच्या तयारीत होता पण आई मध्येच बोलली,...

"हो पण  तुम्ही भाग पाडले ना मला. तुम्ही सगळे विसरलात,आई सुद्धा माणूस आहे,तिला मन आहे त्यावर आघात होतात, तिलाही दुःख होत, तिलाही यातना होतात.तिच्याच घरी परक्या सारखी वागणूक दिली तर तिला आनंद होईल का? जी आई घासातला घास लेकराला देते तेच लेकरू जेव्हा घरात खायला आणून बायकोजवल गुपचूप देत हे न कळण्या एवढी लहान नव्हते मी. काही दिवस झाले की जा मोठ्या मुलाकडे, काही दिवस लहान मुलाकडे. अरे मुलांना माझी अडचण झाली मी सुंनाना कोणत्या तोंडाने म्हणू. खरं तर सुंनाकडून मला  नाही अपेक्षा,  मी माझे कर्तव्य योग्य रित्या पार पडले पण तुमचं काय?"

सून आईजवळ आली, "आई ....मला आई नाही, मला तर आईचे प्रेम तुम्हीच दिलं पण तुम्ही माझी काहीही चुकी नसतांना सोडून आलात."

" अगं पोरी...तुझ्या नवऱ्याचा पगार कमी... तुम्हाला पुरत नव्हतं तर मला कुठून खाऊ घालणार होता...आठवते ना अनीलचं बोलणं मला अजूनही की, इथे आपल्या  खायचे वांदे आणि आईचा दवाखाना कुठून करायचा?"


"जाऊ दे , ते न बोललेच बरे !अंजली बाळा आण गं ती मलाई...खाऊ दे जरा."


आईने रसमलाई घेतली आणि खाल्ली...

" हे बघा मुलांनो मला तुमच्याबद्दल काहीही  खरचं काहीच तक्रार नाही. शेवटी नशिबाचा खेळ आहे सारा. काय घडलं, काय घडणार, काय घडेल ते आपण कुणीही बदलू शकणार नाही कारण विधिलिखित असतं सगळं ते. आपल्याला इच्छा असूनही बदलता येत नाही. पण माझी एकच इच्छा होती तुम्हा सगळ्यांना भेटण्याची मरायच्या आधी. माझ्या मनात तुमच्याबद्दल काहीही रुसवे फुगवे नाही आणि असूच शकत नाही. शेवटी मी तुमची आई ना!"


परत दरवाजा बेल वाजली आणि अनिल असेल ही खात्री विमल काकूंना होती.मावशींनी दरवाजा उघडला, अनिल होता तो रूममधे गेला.

" आई कशी आहे?"

" मस्त आता माझी शेवटाची इच्छा पूर्ण झाली."

आणि आई हसली आणि तिचा जीव गेला...

"आई!!!आई!!! "
सगळे जण ओरडले पण आई एकदम शांत, चेहऱ्यावर हास्य डोळ्यात मुलाबद्दलचे प्रेम अजूनही दिसत होते, सगळ्यांना भेटण्याची इच्छा पूर्ण झाल्याचे समाधान देखील चेहऱ्यावर झळकत होते.


मावशी म्हणाली,
"ताईची शेवटची इच्छा होती की तुम्ही सगळ्यांनी एकत्र यावं तेव्हाच तिचा जीव जाईल...आणि बघा तिची  शेवटची इच्छा पूर्ण झाली."


सगळ्यांनी मावशीकडे बघितलं आणि त्यांच्या डोळ्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

माझी ही कथा पूर्णतः काल्पनिक आहे, कुणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील तर क्षमस्व. माझी ही कथा कशी वाटली ते नक्की कळवा.
समाप्त...
धन्यवाद!
©®कल्पना सावळे.

🎭 Series Post

View all