शेती माती आणि पाणी

शेती माती आणि पाणी


शेती माती आणि पाणी*

करुनी संघर्ष जोमाने
उनाड निसर्गाच्या खेळाशी
गाळून घाम कसतो शेती
झुंजतो बळी दर दिवशी..

अवकाळी बरसून मेघराजा
कधी देतो पाणीच पाणी
कधी कोरड्या दुष्काळाने
होते बळीची थट्टा जीवघेणी..

भेगाळलेल्या शिवाराचेही
पाहतो करु सुंदर नंदनवन
काळ्या मातीला तो जपतो
आईसारखे हृदयी बसवून..

विसरुनी भुक तहान
फुलवितो मळा जिकीरीने
पिकाच्या बाजारभावात
काळीज तुटते फिकीरीने..

शेती माती आणि पाणी
परस्परांना आहेत पुरक
बळीच्या जीवन मरणाला
तेच ठरतात खरे प्रेरक

-------------------- 

सौ.वनिता गणेश शिंदे©®

🎭 Series Post

View all