Mar 02, 2024
विनोदी

सीट

Read Later
सीट
आज ती रेल्वे स्टेशन वर जरा उशिराच पोचली.
ट्रेन सुटू नये म्हणुन मिळेल त्या डब्यात चढली.

धापा टाकत टाकत तिने सीट विचारले.
चुकून जेन्टस डब्यात चढलो, तिला उशिरा लक्षात आले.

मी पण तिच्यासारखा माझ्यासाठी सीट विचारत होतो.
जड बॅग वह्या पुस्तकांची खांद्यावर घेऊन गाडीसवे हलत डुलत होतो.

दुसरे स्टेशन येताच मी सांगितलेली सीट रिकामी झाली.
"स्त्री दाक्षिण्याचा" प्रश्न म्हणून मी माझी सीट तिला दिली.

ती हसून बसली माझ्या सीटवर, मी हलत डुलत होतो.
ती पुस्तक चाळत होती, मी तिला बघत होतो.

पुस्तकातले पात्र मध्येच हसत रडत होते, तसेच तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते.
माझ्या देहासवे मनाला होती कसली शुद्ध, तिच्या केसांच्या बटांसारखे हेलकावे घेत होते.

तिचं स्टेशन आलं होतं वाटतं, ती उठून उभी राहिली.
जाताना मात्र माझी सीट मला सुपूर्द केली.

इतक्यावरच थांबली नाही शहाणी, माझं मन हेलावून गेली.
पुढचा, मागचा विचार न करता चक्क मला "thank you दादा" म्हणून गेली..

©®ऋचा निलिमा 


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//