तिची धडपड

Poem On Lady


लहानपणीच घरटं सोडून
नवीन घरट्यात ती कशी रमते...?
पहाटेच्या प्रहरी सडा-रांगोळी
ती कशी ऊठून करते...?
साऱ्यांचे जेवण ती
एकट कसं बनवते...?
ह्या संसाराचा डोलारा
ती सहज कसा उभा करते...?
पिल्लांच्या भुकेसाठी स्वतःच्या पोटाशी
कशी तडजोड करते...?
इतरांच्या सुखासाठी
कशी ती धडपडते...?
घरच्या अंगणात आनंदाची बाग
ती कशी फुलवते...?
समजतच नाही ती
हे सार कसं करते...?
डोळ्यांसमोर मग साऱ्या प्रश्नांचे
पुस्तक उभे रहाते...,
डोळ्यांनी बघितल की
अक्षरशः अश्रू खाली ओघळतात..,
आणि मग तिच्या मायेचे
अर्थ हळुहळू कळू लागतात...,
खरचं बघून तिची ही सारी धडपड...
वाढू लागते या ह्रदयाची धडधड....!!!


कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे