ती वाईट नाही, तिला बनवलं गेलं-2

ती वाईट नाही
तिने सासूबाईंना प्रेमाने समजावलं,

"आई, आपण नेहमी लागणाऱ्या वस्तू बरण्यात नीट भरून अगदी ओळीत समोर ठेऊयात, म्हणजे स्वयंपाकाला सोपं होईल"

ती कितीही खरं बोलत असली तरी "सुनेचं मी का ऐकू??" या स्वभावामुळे त्या प्रत्येक गोष्टीला नकारघंटा वाजवत.

सासूबाईंची मांडणी बघून तिला नको नको झालेलं, शेंगदाणे कुठेतरी एका कोपऱ्यात पिशवीत पडलेले, पोहे अर्धवट दोन कोणत्यातरी डब्यात, जीरं तर कित्येक दिवसांपासून सापडत नव्हतं, डाळी चार वेगवेगळ्या डब्यात आणि ते डबे चार कोपऱ्यात.. काही बनवायचं म्हटलं की अर्धा वेळ वस्तू शोधण्यात जाई.

भांड्यांचं तसंच, एक कढई काढायची म्हटली तर एकूनेक ट्रॉलीज उघडून बघाव्या लागत. हे बघून तिला किचनमध्ये जाऊ वाटत नसे.

एके दिवशी तिने पूर्ण दिवस घालवला आणि किचनमधील सर्व व्यवस्था नीट केली. पण दुसऱ्या दिवशी पाहतो तर काय, सासूबाईंनी पुन्हा सगळं अस्ताव्यस्त करून ठेवलेलं.

कामिनीला काही बोलताही येत नसे. ती पुन्हा सर्व वस्तू जागेवर ठेवत असे. पुन्हा सासूबाई येऊन मुद्दाम सर्व जागा बदलत. हेच रोज सुरू असायचं.

तिने बऱ्याचदा बोलण्याचा प्रयत्न केला, पण "मग वस्तू तरी कुठे ठेऊ??" "असुदेत तिथेच.." अशी उत्तरं मिळायची.

शेवटी तिचा उत्साह मावळला आणि तिने आहे तसच सगळं राहू दिलं.

काही दिवसांनी घराचं रंगकाम सुरू करायचं होतं. तिला रंगसंगतीची चांगली जाण होती. केदारला तिने छान सजेशन दिले. केदारला ते पटले सुद्धा, पण जशी घरात चर्चा झाली तसे तिने निवडलेले सर्व रंग नाही द्यायचे असं पक्कं झालं.

केदारला तिची तळमळ समजत होती, तो तिला म्हणाला,

"नाराज होऊ नकोस , घराला नाही पण आपल्या खोलीला कोणते रंग द्यायचे हे तू ठरव.."

कामिनीला बरं वाटलं, नव्या उत्साहाने तिने खोलीला छान रंग देऊन घेतले. आपल्याला हवी तशी मांडणी केली, इंटेरिअर केलं. सर्वांनी जेव्हा तिची खोली पाहिली तेव्हा तोंडात बोटं घातली. अतिशय सुंदर आणि आधुनिक पद्धतीने सजवली होती.

पण बोलणार कसं? सगळेजण फक्त बघत बसले.

स्वयंपाकघरात तिने चोपिंग बोर्ड वगैरे काही नवीन वस्तू आणलेल्या, सासूबाईंनी ते स्टोर रूम मध्ये ठेवत म्हटलं,

"सूरी आणि विळीनेच जमतं बाई मला, ते काही कामाचं नाही.."

कामिनीला आतल्या आत त्रास होत होता, स्वयंपाक सगळा तिला करायचा होता, तरीही सासूबाईंना असे नवीन बदल आवडत नव्हते.

घरात स्वयंपाक करायच्या वेळी सुद्धा तसंच, तिला वाटायचं ताटात छानपैकी भात, कढी, सुकी, ओली भाजी वाढावी. पण सासूबाई एकच काहीतरी बनवायला सांगत. तिला तिच्या मनाप्रमाणे स्वयंपाकही करता येत नव्हता.

तिचा उत्साह दिवसेंदिवस मावळत चाललेला.

एकदा घरी सासरचे पाहुणे येणार होते. कामिनीने सुचवलं, आपण छानपैकी छोले, पुरी, मसालेभात आणि शिरा बनवूया. सासूबाईनी नेहमीप्रमाणे नाक मुरडलं आणि म्हणाल्या,

"मेथीची भाजी आणि भाकर बनवू"

यावेळी कामिनीला राहवलं नाही,

"अहो आई इतक्या लांबून येताय पाहुणे, सगळं साग्रसंगीत बनवुयात की.."

"नको, तुला नसेल आवडत तर मी बनवेल सगळं...काळजी करू नको.."

कामिनीला खूप राग आला,

🎭 Series Post

View all