ती वाईट नाही, तिला बनवलं गेलं-1

ती वाईट नाही
"मी नवीन आणलेली भांडी स्टोर रूम मध्ये कुणी ठेवली?"

तिने घरात सर्वांना प्रश्न विचारला, पण सगळे मौन होते..

सासूबाई किचनमध्ये काहीतरी काम करत होत्या, त्यांनी हळूच म्हटलं,

"नुसता पसारा वाढवून ठेवण्याचं काम सुरू आहे, घरात वस्तू ठेवायला जागा नाही"

त्या असं म्हटल्या आणि कामिनीचा सगळा उत्साहच मावळला..

नवीन नवीन लग्न झालेलं कामिनी आणि केदारचं. कामिनी अतिशय उत्साही आणि कष्टाळू मुलगी. तिला शांत असं बसताच येत नसे, सतत काही ना काही काम ती करत असायची. एक झालं की दुसरं..

तिला शिवणकाम आवडायचं, त्यात तिचे नवनवीन प्रयोग सुरू असायचे. तिला घर मांडायला, सजवायला आवडे. आईकडे असतांना कमी वयातच तिने किचनचा सगळा भार सांभाळला होता. किचममधली मांडणी, व्यवस्था तीच बघत असे.

एखादा पदार्थ बनवायचा झाला तर वस्तू चटकन हाती लागली पाहिजे असा तिचा कयास.

म्हणूनच सतत लागणाऱ्या वस्तू, जसे की शेंगदाणे, तूर डाळ, मूग डाळ, तांदूळ, जिरे, मोहरी, मसाले, हळद हे सगळं तिने काचेच्या भरण्यात एका ओळीत ठेवले होते. सगळ्या भांड्यांना सुद्धा जागा ठरवून दिलेल्या. काढाया एका ट्रॉलीत, पातेले, डिश, चमचे, कुकर या सर्वांना एकेक ट्रॉली फिक्स केलेली. त्यामुळे काही स्वयंपाक बनवायचा झालाच तर अगदी कमी वेळात तो बने.

हे बघून तिची आई खूप सुखावली होती, आपली मुलगी घर इतकं छान सांभाळते म्हटल्यावर सासरी नाव काढेल हा तिचा समज.

पण कामिनी जशी सासरी आली तसे तिला एकेक धक्के बसू लागले. किचनमधला आपला हेका सासूबाई सोडायला तयार नसत.

*****

🎭 Series Post

View all