Oct 26, 2020
सामाजिक

ती मैत्रीण आहे माझी !

Read Later
ती मैत्रीण आहे माझी !

    

(*लेख संपूर्ण वाचा, आपली विचारसरणी माझ्याशी मिळती जुळती असेलच असे नाही. पण व्यक्त होणं आणि सामाजिक बदल घडवणं या उद्देशानं लिहावंसं वाटलं म्ह्णून...

 

 

         संध्याकाळ चे एक ७ वाजून गेलेले, रंकाळा तलावावर नेहमीप्रमाणे कमी अधिक गर्दी होती. बाजूला अगदी रोजच्या दिवसाप्रमाणे पाणीपुरी, भेळ अश्या सर्वांच्या आवडत्या पदार्थांचे गाडे आपापली जागा पकडून अगदी निवांत रोजचे काम करत हो

 

           खूप दिवसातून मी आणि 'ती' बाहेर पडलेलो. अगदी निवांतपणे, मनमोकळ्या गप्पा मारत इकडून तिकडे फिरत होतो. आयुष्यात काय चाललंय, काय नाही यावर बरीच चर्चा करत होतो. खूप दिवसातून भेटलो असल्याने, बोलण्यासारखं बरंच काही होतं. मग जरा वेळानं एका भेळपुरी च्या गाड्यावर गेलो आणि नेहमीप्रमाणं एक शेवपुरी, एक भेळपुरी आणि एक ओली भेळ घेतली. गाड्या वर जरा गर्दी होतीच. तेंव्हा of course आमची ऑर्डर कधी येते याचा विचार करण्यापेक्षा गप्पा मारणं पसंद केलं आम्ही

 

             आमच्या शेजारीच एक 23-24 वर्षांचा युनिफॉर्म घातलेला एक इसम येऊन थांबला. पहिल्यांदा त्याच्याकडे माझं इतकं लक्ष नव्हतं गेलं. काही वेळाने तो आमच्याकडे बघू लागला, पण त्याचं बघणं जरा विचित्र वाटलं. तिनं 'जाऊदेत ना सोड' म्हणून igonre केलं. मीही त्याच्याकडे बघत बसण्यास काही intrested नव्हतो. पण तो पुन्हा बघू लागला, त्याच्या चेहऱ्यावर आठ्या होत्या, काहीतरी पुटपुटत होता, मधेच आपला मोबाईल काढत काही बघायचा आणि परत ठेवायचा, पुन्हा बघायचा. मी त्याच्याकडे बघितलं की नजर दुसरीकडे करायचा. मला ते इतकं खटकायला लागलं की न राहवून त्याच्याजवळ गेलो मी आणि त्याला विचार

 

                "काही problme आहे का दादा

त्यानं माझ्याकडे एकदा बघितलं आणि म्हणाला, "नाही रे!

मी पुन्हा म्हणालो, "काही असेल तर सांगा ना!

"नाही रे काही." तो विषय टाळत म्हणाला

"मग मागापासून आमच्याकडे काय बघताय असे?" मी थोड्याश्या रागात आणि उत्सुकेतेने विचारलं

तसा त्यानं एक कटाक्ष माझ्याकडे टाकला. आणि मलाच त्यानं विचारलं, "तुमच्या पिढीला हे असले धंदे कसे जमतात रे?

"Excuse Me?

त्यानं पुन्हा तेच शब्द उच्चारले, "या पिढीला असले धंदे कसे करू वाटतात? यातून तुम्हाला काय मिळतं?

"दादा, आपल्या पिढ्यांमध्ये इतकही अंतर नाहीये की तुम्ही मला एका प्रौढ माणसाप्रमाण सगळ्या गोष्टी मला काही समजतच नाहीत अशा प्रकारे सांगाल! In short तुम्हाला जे काही बोलायचं असेल, ते इथे direct बोललेला तरी चालेल!" मी थोड्याश्या धीट आणि ठाम शब्दात म्हणलो

 

               त्यानं जरा माझ्याकडे रागाने बघितलं, आणि एक दीर्घ श्वास घेऊन बोलू लागला, "तुम्ही इथं रोज येता

मी म्हणालो "नाही!

तो म्हणाला, "कधीपासून एकत्र आहात तुम्ही दोघे?

"3वर्ष होम गेली!

"तुमच्या घरी माहिती आहे का हे?" त्यानं कुत्सिक नजरेनं विचारलं

"Of Cours!

"वा! मग पुढे काही लग्न करून एकत्र राहणार आहात का की आपलं असंच so called relation मध्ये आहात?"

मी फार वेळ अगदी शांतपणे त्याच्या प्रश्नांची उत्तरं देत होतो, मात्र आता माझा धीर सुटला

 

                "माफ करा दादा, पण तुमचे विचार फारच संकुचित आणि मूर्खपणाचे आहेत असं नाही वाटतं?" मी जरा रागानेच विचारलं

"Excuse me

"जर एखाद्यकडे बघून, 30 सेकंदाच्या आत एखाद्याला judge करण्याची घाणेरडी सवय असेल तर ना, असे प्रश्न विचारावे लागतात." मी जरा रागातच म्हणालो. माझा आवाज चढलेला आणि त्याचमुळे आजूबाजूची काही 20-25 माणसं सुद्धा बघत होती

 

                 मी पुढे सुसाट बोलत सुटलो, "तुम्हाला काय वाटतं? एक मुलगा आणि एक मुलगी रस्त्याने जात असतील, एका ठिकाणी थांबून बोलत असतील तर ते एकमेकांचे girlfriend-boyfriend च असणार? अगदी वाया गेलेली निर्लज मुलं मुली असणार? फार तर तुमचे विचार चांगले असतील तर, तो मुलगा आणि ती मुलगी बहीण-भावंड तरी असणार?" मी जरा तावात म्हणत होतो

त्याचा चेहरा थोडा पडलेला, आणि बाजूची माणसं अपलीकडे बघत आहेत म्हणून, आपलं लक्ष नाही असं दाखवण्याचा प्रयत्न करत होता

 

                 मी म्हणालो, "अरे दादा, या दोन्ही नात्यांच्या पलीकडेही एक नातं असतं, ज्याला आम्ही 'मैत्री' असं म्हणतो. जशी दोन मुलं एकमेकांचे मित्र असतात अगदी तसच एक मुलगा आणि एक मुलगी सुद्धा एकमेकांचे मित्र मैत्रिणी का असू शकत नाहीत? नात्यातल्या प्रत्येक प्रेमाचं मोजमाप करणं शक्य नसतं, तरीही आपण त्याला एखाद नाव देऊन मोकळं होतो. ज्याप्रमाणे दोन मुली किंवा दोन मुलं एकमेकांची अगदी जिगरी मैत्रीत असतात, त्याप्रमाणं एक मुलगा आणि एक मुलगी सुद्धा असू शकत नाहीत का? की ती एक तर बहीण नाहीतर त्या मुलाची girlfreind च असेल.?

तो आता काही बोलायला तयार नव्हता,

पण माझं बोलणं संपलं नव्हतं अजून. "तू मघाशी म्हणालास की लग्न करणार का वगैरे, तर आयुष्यभर एकत्र राहायला त्या व्यक्तीशी लग्न करावंच लागतं अस कोण रे म्हणलं तुला? काही नात्यांना जबाबदारीची जाणीव करून दयायला लग्नाच्या बेडीत अडकाव लागतंच अस नसतं रे. मैत्रीत सूख असतं खूप आणि मोकळेपणा सुद्धा, खूप comfort zone मध्ये असतो आम्ही. मला खूप सारे मित्र आहेत, पण काही गोष्टी फक्त याच मुलीला माहिती आहेत, घरचे problmes असतील, किंवा personal life मधले काही issues असतील. ते इतर मुलांना माझ्या मित्रांना माहिती नाहीत पण हिला सर्व काही आहे माहिती. कारण या एकाच व्यक्ती जवळ मला मोकळं होता येतं, मग तूच सांग मित्रा काय रे चुकीचं वाटलं यात तुला?

 

                    तो आता शांत झालेला, आणि त्याच्या चेहऱयावर मी जे काही बोलतोय ते समजू लागल्याचं कळतं होतं, "I am sorry यार. मी असा विचार नको होता करायला." तो शांतपणे माझ्या नजरेत बघून म्हणत होता

मी म्हणालो, "its ok रे! यात तुझीच चूक आहे असं नाही. समाजाची मानसिकता कधी कधी एवढी खाली घसरते की मिनिटाभराच्या आत, 'ह्या व्यक्ती कशा आहेत' हे ठरवून मोकळे होतात. एका गोष्टीचं मला नेहमीच आश्चर्य वाटत राहायलय, 'द्रौपतीचं जेंव्हा वस्त्रहरण होत होतं तेंव्हा श्रीकृष्ण तिच्या मदतीला धावून गेला. आपण त्यावेळी श्रीकृष्णाला तिचा भाऊ म्हणालो. तिचा मित्र नाही !' असं का? जे काम भाऊ करू शकतो ते काम एखादा जवळचा मित्र नाही करू शकत ? आणि म्हणूनच वाटतं की आपण एखाद्या नात्याला नाव देऊन सहज मोकळे होतो! त्यामुळे आपले विचार संकुचित राहतात. सगळेच जणं असे वागतात असं तर नक्कीच नाही, even आमच्या घरचेही खूप छान प्रकारे समजून घेतात या नात्याला, बरेच जणं आमच्या group मध्ये असा छान विचार करतात. पण तुला सांगू असे लोक फारच कमी आहेत आणि जे आहेत त्यांचं विश्वच काहींनी छोटं करून टाकलंय,हा बदल होणं अवघड तर नक्कीच आहे रे. पण सुरुवात आपल्या पासून करणं महत्वाचं आहे! लोकांचे विचार बदलायला वेळ लागतो, बदल जर चांगला असेल तर आणखी जास्त...

 

                   तुम्ही जर लेख इथपर्यंत वाचत आला असाल, तर स्वतः ला सुद्धा एकदा प्रश्न विचारा, आपणही कधीतरी असं केलेलं आहे, त्यावेळी आपण चुकीचं केलं की बरोबर केलं हा विचार करत वेळ नका घालवू, तर तुम्ही इथून पुढं कसं वागणार आहात, याचा विचार करा. बदल व्हायला वेळ लागतो, पण सुरुवात तुमच्यापासून करा. कारण देश तुमच्यामुळे बनतो आणि आपले विचार हे देशाचे विचार बनतात. समाजात बदल घडवायचा असेल तर त्याची सुरुवात आत्तापासून करा. वर मांडलेले मुद्दे पटले असतील किंवा आपलेही विचार अशा प्रकारचे असतील तर नक्की कळवा आणि समाजातील प्रत्येक घटकाकडे पोहचवण्यासाठी नक्की share करा.

 

धन्यवाद !

 

 

©® आदित्य सदाशिव माळी.

 

___________________________________________________

 

* Ps : या लेखात मी काही घटकांना प्रमाण वापरलं आहे.

 

1. मी : एक साधारण मुलगा ज्याला एक female best friend आहे

 

2. ती : माझ्या सर्व जवळच्या मैत्रिणी.

 

3. तो तरुण : समाजातील असा घटक जो एक मुलगा आणि एक मुलगी यांना फक्त त्याच एका नजरेतून बघतो.

 

4. भेळपुरीचे गाडे : आजपर्यंत खूप ठिकाणी माझ्या मैत्रणींबरोबर अभ्यासाच्या कारणास्तव किंवा अगदी सहज फिरण्यासाठी म्हणून गेलेलो आणि बऱ्याचदा मला असे अनुभव आले, so, या सगळ्या गोष्टींचे प्रतिनिधित्व म्हणून हे गाडे ठेवले.

 

 

 

Circle Image

Aditya Sadashiv Mali

Student

लिहायला कधी सुरू केलं माहिती नाही. फार लिहावंसं वाटतं, लिहिताना शाई ही संपते, संपत नाहीत ते मात्र शब्द... साध्या शब्दात, मनातलं कागदावर उतरवत राहतोय, आवडतं म्हणून, मोकळं वाटतं म्हणून.