आजपासुन ती माझीच मुलगी आहे भाग ३

नंदिता आणि, मामींना आलेल्या अहंकारा पायी ते काय गमवत होते त्याना आत्ता समजत होते. पण त्याला उशीर झाला होता. ममालीने तर त्यांना ओळखल देखील नव्हते

मागील भागात

निनाद ने त्यांच्या गावाच्या पोलीस स्टेशन ला कॉल लावला आणि त्या पुलाकडे जायला सांगितले. आय पी एस असल्याने निनादला ते सोप होत.

अश्विनी आणि निनाद लागलीच गावाला जायला निघाले. त्याची आई तिच्या मुलीकडे गेली होती, त्यामुळे सध्या तिला काहीच सांगीतल नव्हत.

आता पुढे. 

मनालीला जिल्हाच्या शासकीय हॉस्पिटलला अॅडमिट केलेल होत. दोघ तिथे पोहोचतात. मनालीला असा अवस्थेत बघुन अश्विनीला बांधलेला संयम सुटला. ति निनादच्या मिठीत घुसुन रडायला लागली. निनाद ने तिला संभाळल होत.

मामां, मामी, प्रशांत आणि नंदिता ही हॉस्पिटलला येउन पोहोचले. त्यांना पाहुन निनाद राग आला. शब्दाला शब्द वाढत चालले होते. अश्विनीने त्याला अडवल होत.

सगळ शांत होत.

पोलीस चौकशीसाठी मनाली च्या शुध्दी वर यायची वाट बघत होते. शेवटी केस आत्महत्येची होती.

“तिच्या मैत्रीणीच स्टेटमेंट पुरेस आहे यांना आत टाकायला” एक हवालदार येउन निनाद ला बोलला.

तसे मामा मामी घाबरले.

निनाद ने त्यांच्याकडे पाहिले, “सध्या थांबा, तिला शुध्दी वर येऊ द्या”

हवालदार बाहेर गेला.

“तिला फक्त काही होऊ द्या, माझ्या इतका वाईट माणूस नसेल कोणी” निनाद रागात बोलत बाहेर निघून गेला.

तेवढ्यात डॉक्टर येतात तपासायला. संध्याकाळची वेळ झालेली असते.

सगळे त्यांच्या उत्तराची वाट पहातात, “ती शुध्दी वर आल्याशिवाय काहीच सांगु शकत नाही, आणि रात्री इथे फक्त एकालाच थांबता येईल”

मामी “मी थांबते”

“काही गरज नाही, मी थांबणार आहे, पोलीस चौकशी बाकी आहे, पेशंट शुद्धीवर आल्यावर पहिले पोलीस भेटतील तिला” निनाद कडक आवाजात गरजला.

“आशु ह्यांना इथुन घेउन जा” निनाद ने अश्विनी कडे बघत बोलला.

निनाद ची आई पण तिकडून निघाली होती. निनाद ने तिला डायरेक्ट गावाला जायला सांगितलं. असही हॉस्पीटलमध्ये येउन काही फायदा नव्हता.

“तुझा राग माझ्यावर होता न, त्या पोरीची काय चुक होती?? “ निनाद ची आई त्या भावंडांमध्ये मोठी होती. तिच सगळे ऐकायचे हेच नंदिताच्या आईला आवडत नव्हत.

“काय चुक म्हणजे??” तिच बाहेर लफड चालु होत, मग ते ही तिला बोलायच नाही का??” नंदिता ची आई

“तिकडे होती तेव्हा तिला गरज नाही पडली, तुमच्याकडे आली तेव्हाच का अस??” अश्विनी “आमचा राग तुम्ही तिच्यावर काढला, बाकी काही नाही. तिला जीव लावला असता न तर तीने बाहेर अस काही केले नसत”. अश्विनी चिडली होती.

“पण आमच्यात अस काहीच नव्हत” हेंमत घरात येत बोलला.

“तु?? तु कस काय घरात आलास??” ऩंदिताचे वडील चिडून बोलले.

“मी बोलवल त्याला” अश्विनी “सांग रे काय बोलायच होत”

“मनाली कॉलेजला येऊन गपचुप रडायची, ऐके दिवशी मला दिसली, तिची प्रेमाने विचारपुस केली, तिच मन हलक केल. अस ३ ते ४ वेळा भेटलो, तर ह्यांनी त्याचा वेगळा अर्थ काढुन तिला खुप मारल” हेमंत

“कळल का कुठ चुक झाली ते??” निनाद ची आई “आजवर मी आपल म्हणून तुम्हाला बोलत होती, मदत करत होती, माझी माणस म्हणूनच जीव लावत होती, पण तुम्ही तर साध नात आहे म्हणून देखील त्याची लाज ठेवली नाही?? तुमच्या अशाच वागण्याने तुम्ही तुमची माणस लांब करत आहात, आपल कोणी ऐकाव अस वाटत असेल तर आपणही त्यांच ऐकाव तरच नात टिकत. गैरसमज तुम्ही करून घेतले आणि शिक्षा ति भोगतेय.”

मामा, मामी आणि नंदिता आता मान खाली घालुन ऐकत होते. त्यांच्या अहंकारा पायी ते काय चुक करत होते याची जाणीव त्यांना आत्ता होत होती. पण आता उशीर झाला होता.

जवळपास तीन दिवसांनी मनालीला शुध्द आली. तिची आई तिच्या उशाशी बसली होती. तिच्या समोरच मामा, प्रशांत आणि नंदिता होती. अश्विनी आणि निनाद ची आई देखील बाजुलाच होत्या. निनाद ला त्यांचा चेहरा पण बघायचा नसल्याने तो बाहेर उभा होता.

मामींनी मनाली च्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. मनाली ने एकवार तिच्याकडे पाहीले आणि किंचाळली, “कोण आहेत हे, हे पण मला मारतील, लांब करा यांना” मनाली हायपर होउ लागली.

तिची आई जेवढी जवळ जायला बघत होती तेवढी ती जास्त घाबरत होती. तिचा आवाज ऐकून निनाद पटकन आत आला

अश्विनी न निनाद पटकन तिच्या जवळ गेले. अश्विनीने तिचा हात पकडला.

मनाली ने अश्विनीला पाहील, ति पटकन तिच्या कुशीत शिरली. “ते परत मारतील मला, कशाला वाचवल मला, माझी काही चुक नाही, हे कोण आहेत यांना बाहेर जायला सांग” मनाली असंबंध बडबडत होती.

तिच वागण बघुन सगळ्यांना धक्का बसला. निनाद चा पारा परत चढला. त्याने रागात त्यांच्याकडे पाहीले. निनाद च्या आईने त्या सर्वांना बाहेर जायला सांगितले. मनाली शांत झाली.

डॉक्टरही तिथे आले. “डॉक्टर ही का अशी वागतेय?” अश्विनी


क्रमश:


🎭 Series Post

View all