आजपासून ती माझीच मुलगी आहे भाग २

घरात प्रेम भेटत नव्हत. कॉलेजच्या एका मित्राजवळ ति तिच मन मोकळे करत होती. ह्याचाच फायदा देउन नंदिता ने मनालीला गरात एकट पाडल होत

मागील भागात

सहा महीन्यानंतर अश्विनीला मनाली ने कॉल केला. दुपारची वेळ होती.

“ताई हरली ग मी, आता नाही सहन होत. खुप वेळा माफी मागीतली पण कोणीच ऐकत नाहीये. टोमणे आणि मार खाउनच पोट भरत आहे” मनाली रडत होती.

आता पुढे

“अशी का बोलतेयस तु, काय झाल नक्की बोल न” अश्विनी घाबरली होती.

“तुझी खुप आठवण येतेय ग ताई, एकदा त्याच्या कडे गेली न की एकच विचारेल, मला तुझ्या पोटी का जन्माला नाही घातल” मनाली.

“मनु बेटा, मी तुझ्याच सोबत आहे, आणि कुठे जायच्या गोष्टी करतेस?” अश्विनीला खुप टेन्शन आल होत.

“मुक्त करतेय मी सगळ्यांना माझ्या त्रासातून, शेवटच तुझ्याशी बोलायच होत म्हणून फोन केला.” मनाली

“गप ग, अस वेड्यासारख का बोलतेयस” अश्विनीला आता रडायला येत होत.

“वेडेपणाच समज, आता नाही त्रास होणार कोणाला माझा” मनाली

“ऐक न मनु, मी येतेय अस काही वेड्यासारख करणार नाहीये तु” अश्विनी

“अजुन नाही ताकत माझ्यात, ठेवते फोन तुझ्याशीच बोलायच होत” मनाली

“मनु अग ऐक न बेटा… मनु.. मनु.. हॅलो… . “ अश्विनी

मनाली ने फोन कट केला होता.

अश्विनी स्तब्ध झाली. काय झाल तिला काहीच कळत नव्हत.

तिने परत मनालीला फोन लावला. पण लागलाच नाही. तिने तिच्या काकांना फोन लावला.

“काका मनु कुठे आहे??” अश्विनी

“नाही माहीती, गेली असेल कुठेतरी तोंड काळ करायला” काका चिडून बोलले.

“झालय काय पण, असे का बोलत आहात?” अश्विनी

“तु नको पडु यात, तुझा काही संबंध नाही” काका बेफिकीर पण बोलले.

मग अश्विनीने मनाली च्या मैत्रीणीला कॉल लावला.

तिने जे सांगीतल ते ऐकून अश्विनीला धक्काच बसला.

मनाली आनंदात तर घरी आली होती. पण तिचा आनंद जास्त दिवस टिकला नाही. मनाली तिच्या घरात राहूनच तिला परक असल्याची फिलिंग यायला लागली होती. ऩंदिता आणि तिची आई एका बाजूने झाले होते. मनालीला आत्या कडे जायला भेटल, तिला चांगल शिक्षण भेटले याची असूया नंदिताच्या मनात आलेली होती. ति मनालीचा राग राग करत असे.

नंदिताच्या आईला ही वाटत होत की मनाली चे निर्णय तिची आत्याच घेत आहे त्यांना विचारुन पण बघत नाही. असही नंदिताच्या आईने आजवर फक्त औपचारिकता म्हणुन त्यांच्या सासरकडच्यांचा पाहुणचार करत असत. त्यांच्या माहेरची माणस आली की त्यांच मात्र आनंदाने करत होत्या. त्यांनी नंदिताच्या वडीलांना आणि भावाला ही तिच्याबद्दल भरवत तिच्या विरुद्ध करून तिच्या घरात मनालीलाच एकट पाडल होत.

 घरातुन प्रेम मिळत नव्हत. मनाली सैरभैर झाली. तिच्या मनात आल, ताई नव्हती पाठवत तर नको यायला पाहिजे होत. पण तिच भांडुन आलेली होती. आणि सारख सारख ताईला त्रास देण तिला आवडत नव्हत. त्यामुळे तिने कधीच काही सांगीतल नाही अश्विनीला. मध्यंतरी मनाली ची मैत्री एका मुलाशी झाली होती. तो तिची खुप काळजी घ्यायचा. तिच मन जपायचा. घरातुन जे प्रेम मिळत नव्हते ते तिला त्याच्यात भेटु लागले. मग मनाली त्याच्या कडे ओढली गेली.

एके दिवशी घरात ते प्रकरण कळल. त्या दिवशी खुप मारल होत तिला. तिच्यासोबत बोलण बंद केल. घरात तिला जेवणासाठी पण कोणी विचारत नव्हत. फक्त टोमणे भेटत होते. तिने खुप वेळा माफी पण मागीतली पण कोणीच तिच ऐकुन घेतल नाही. जवळपास महिनाभर मनाली ने प्रयत्न केले पण सगळे निष्फळ ठरले. थकली ती.

“तुला ती दिसली का आत्ता कुठे?” अश्विनी

“हो आत्ताच मला भेटुन गेली, मिठी पण मारली मला तिने, म्हटल अस अचानक काय झाल तर काही नाही म्हणे, आणि त्या पुलाच्या साईडला गेली” कोमल

अश्विनीच अवसान गळाल.

“पटकन तिकडे जा, काहीतरी वेडेवाकडे पाउल उचलायच बोलत होती ती” अश्विनी.

कोमल ही घाबरली, ती धावतच पुलाकडे गेली. तिने पाहील मनाली पुलाच्या कठड्यावर उभी होती.

“मनु… …” कोमल किंचाळली. पण उशीर जाला होता. मनाली ने स्वतः ला खाली झोकुन दिले होते.

कोमल ला पोहता येत होत. तिने पटकन पाण्यात उडी मारली. मनाली ला बाहेर काढले होते.

इकडे अश्विनीने निनाद ला कॉल लावला. त्याला सगळ सांगीतल.

निनाद ने त्यांच्या गावाच्या पोलीस स्टेशन ला कॉल लावला आणि त्या पुलाकडे जायला सांगितले. आय पी एस असल्याने निनादला ते सोप होत.

अश्विनी आणि निनाद लागलीच गावाला जायला निघाले. त्याची आई तिच्या मुलीकडे गेली होती, त्यामुळे सध्या तिला काहीच सांगीतल नव्हत.


क्रमश:

🎭 Series Post

View all