एकटी 'ती', अनं सावरली ( भाग २२ )

This is a created story by writer.

संकेत मनोजला जवळच्या कॉफी शॉपमध्ये घेऊन गेला.

" आज तुला एवढ काय महत्वाचं बोलायचं आहे माझ्याबरोबर..?" कॉफीशॉपची पायरी चढता चढता मनोजने संकेतला प्रश्न विचारला.

" तू आत तरी चल..! आता बसून बोलू ना..!"

" हो रे..! पण..." 

" पुढे काही बोलू नकोस..!" संकेतने मनोजला बोलता बोलता  मध्येच थांबवलं. 

दोघे ही कॉफीशॉप मध्ये आले. आत येताच संकेत एका कोपऱ्यातील टेबलजवळ गेला. मनोजही त्याच्या मागून तिथे गेला. दोघे ही चेअरवर बसले. 

" बोल आता..!" मनोज बोलला.

"थांब जरा..! ऑर्डर तरी देऊन येऊदे..! फिल्टर कॉफी..?"

" चालेल..!"

" बस..! मी ऑर्डर देऊन आलोच..!" असं बोलून संकेत ऑर्डर द्यायला काउंटरवर गेला.

मनोज मात्र बसून ह्याच विचारात होता की आपल्याला असं इथे बोलावून संकेत काय आणि कशा बद्दल विचारणार आहे..? एवढ काय विचारायचं आहे जे ऑफिसमध्ये विचारू शकत न्हवता..? तिथे पल्लवी होती म्हणून..? पण पल्लवीने न ऐकावं असं काय आहे..? मनोज विचारात होता इतक्यात संकेत ऑर्डर देऊन आला.

" बोल आता.!" संकेत चेअरवर बसतं बोलला.

" मी काय बोलू..? तू बोल..!" मनोज संकेतला बोलला.

" आता काय लगेच मूळ विषयावर येऊ का..? तुला एवढी घाई आहे..?"

" तसं नाही रे..! घाई वैगरे काही नाही. पण मला तरी समजू दे की काय विषय आहे..!"

" तूझं वागणं सद्या बदललेलं दिसतंय मला..!"

" असं काय वेगळं वागलो मी..?" मनोज नवल वाटल्यासारखं बोलला.

" मग..! हल्ली खूप कमी बोलतोस..! पहिल्यासारखा मोकळेपणाने नाही बोलत."

" बोलतो रे..! पण सद्या तू प्रोब्लेममध्ये आहेस, तर .."

" तर काय..? मित्र प्रॉब्लेम मध्ये असताना त्याच्याबरोबर बोलणार नाहीस..?"

" असं नाही रे..! पण आपल्याला ह्यातल काही कळतं नाही. उगाच कुणाला चुकीचा सल्ला कशाला द्यायचा..!"

" सल्ला नको..! पण मत तरी मांडशील ना..?"

" हो..! पण आपलं मत ही पटलं पाहिजे पुढच्याला..!"

" बरं..! मला एक सांग..! पल्लवी आणि तुझं काय चाललंय..?" 

संकेतने विचारलेल्या ह्या प्रश्नांने मनोज रागावला ही आणि संभ्रमात पडला. संकेत नक्की काय विचारतोय,

" काय चाललंय म्हणजे..?" 

" म्हणजे हल्ली तुम्ही बोलत नाहीत..!"

" बोलतो..! "

" समोर बोलताना तर दिसतं नाहीत. कॉलवर बोलता..?" संकेतने मनोजला छेडणार प्रश्न केला.

" हे विचारण्यासाठी तू मला इथे बोलावलंयस..?" मनोज रागावून बोलला.

" नाही रे..! मी सहज विचारलं..! रागावू नकोस..!" संकेत त्याला समजावत बोलला.

एवढ्यात त्यांची कॉफी आली. संकेतने कॉफीचा एक घोट घेतला आणि मनोजला बोलला,

" तू असं का म्हणतोय की माझ्या दुसऱ्या लग्नासाठी बघितलेल्या मुलीला मी भेटावं.?" संकेतने महत्वाचा विषय काढला.

" हं..! मला वाटतं तसं तू करावं..!"

" हो..! पण माझ्या आयुष्यात सुरूचीच आहे. मला दुसरं लग्न करायचंच नाही. मग तिला का भेटू..!"

" मग ह्या मुलीला नाही भेटलास आणि तिला नकार दिलास, तर तुझी आई दुसरी मुलगी शोधेल. अजून काय वेगळं होणार आहे..?"

" मग तिला भेटून काय होणार आहे..?"

" हं..!" मनोज दोन घोट कॉफी पियाला आणि बोलला, "मी संगतोय तसं करशील...!"

" काय..?" संकेतने उत्सुकतेने प्रश्न केला.

" करशील का..?"

" अरे पण काय करायचं आहे..? आणि कशासाठी..?"

" सुरुचीसाठी..? सुरुची तुझ्याकडे परत येण्यासाठी..?"

" ती स्वतःहून नाही येणार ....!"

" ती स्वतःहून नाही आली तरी ह्याने तुझ्या आईचे डोळे नक्की उघडतील. मग तुझी आईच बोलेल की सुरुचीला घेऊन ये...!"

" मग तर काहीही करेन..! " संकेतने उत्साहात येऊन बोलला, " तू सांग..!"

" तू नाही करू शकतं..! "

" तू सांग तरी...!" 

" त्या मुलीला भेट आणि..."

" आणि काय..?"

" आणि तिच्याबद्दल सगळं विचार पण तुझ्याबद्दल सांगू नकोस...!"

" वाह..! हे करून काय होणार आहे..?"

" पुढे तरी ऐक...!""

" बोल..!"

" तिला विचार की, ' लग्नानंतर आपल्याला मुलं नाही झालं तर..? म्हणजे दोष तुझ्यात असेल तर...?' "

" पागल झालास का...? त्या मुलीला मी असं विचारू ..!"

" बोललो होतो ना..! तुला नाही जमणार..!" मनोज शांतपणे बोलला आणि कॉफी पिऊ लागला.

संकेतने विचार केला. मनोज बोलतोय ते विचारायला अवघड असलं तरी गरजेचं आहे. कारण आपल्या आयुष्यात आधी जे घडलं आहे ते पुन्हा घडलं तर. नाही..! नेहमी असं कसं होईल..! ती मुलगी तरी ह्याला काय उत्तर देईल..? एखादी तिथेच आपल्या कानाखाली मारायची.! 

" तू विचार करतोयस तसंच होईल..?" मनोज कॉफी पीत पीत बोलला. त्यामुळे संकेत भानावर आला.

" काय..?" संकेतने मनोजला विचारलं.

" ती मुलगी तुझ्यावर भडकले आणि सरळ तिथून निघून जाईल. पण समंजस असेल तर..?"

" तर काय..? पुढचं पुढे बघू असं म्हणून लग्नाला तयार होईल आणि काय करणार आहे...!"

" पण तिला तू आधीच सांगितलंस तर की तुझं लग्न तुझी आई फक्त ह्या कारणामुळे मोडायला सांगतेय...! तर.."

" हं..! तर ती घाबरून मला नाही बोलेल..!"

" येस..! किंबहुना तिला हेच पटवून द्यायचं..!"

" तू कमाल आहेस..!" संकेत मनोजवर खूष होऊन बोलला.

मग ते दोघे त्या विषयावर अजून खूप बोलत राहिले. निघताना संकेत मनोजला बोलला,

" सॉरी मनोज..!"

" आता सॉरी का..?"

" तू जेंव्हा मला बोललास ना की ' तू त्या मुलीला भेट.' तेंव्हा?"

" हां..! तेंव्हा काय..?"

" तेंव्हा मला पण तुझा राग आला होता. की हा काय बोलतोय..!"

" थांब..! " संकेतच बोलणं मध्ये थांबवत मनोज बोलला, "तुला पण म्हणजे..? अजून कुणाला..?"

" पल्लवीला..! ती ही आपल्या सोबत होती ना तिथे .!"

" हं..!" मनोजने कोणतीही आश्चर्यकारक प्रतिक्रिया दिली नाही.

" ती रागावली आहे तुझ्यावर..! पण मी तिला समजावतो की तुझ्या बोलण्याचा अर्थ वेगळा होता. "

" नाही..! राहूदे..! जी व्यक्ती आपल्याला गृहीत धरते, तिला समजवण्यात काही अर्थ नसतो..!"

" अरे..! पण तिला हे सगळं माहीत नाही जे तू आता मला सांगितलंस. तुझ्या त्या बोलण्यामागचं उद्देश हा होता, हे ऐकून तिला बरं वाटलं.!"

" तिचा संबंध काय ह्यात.? तुला समजलं ना..? बस..! निघुया आता..?"

" हो..!चल..!" 

🎭 Series Post

View all