Jan 19, 2022
नारीवादी

एकटी 'ती', अनं सावरली ( भाग २३वा )

Read Later
एकटी 'ती', अनं सावरली ( भाग २३वा )


मनोजने सांगितलेली कल्पना भन्नाट होती. पण ती आमलात आणताना आधी त्या मुलीला विश्वासात घेणं गरजेचं होतं. परत एवढ करून ही आई काय विचार करील ह्याचा नेम न्हवता. एक मुलगी अशी निघाली तर काय झालं, दुसरी बघू..! अस काही घडायला नको. म्हणजे ह्यात असा काही भडका उडायला हवा की आईने माझ्या दुसऱ्या लग्नाचा परत विचार करायला नाही पाहिजे. असा विचार करत संकेत आनंदाने घरी गेला.

घरी जाऊन काही वेळाने त्याने सुरुचीला कॉल करण्याचा प्रयत्न केला. पण तिचा नंबर बंद तो बंदच. पण आज संकेतला दरवेळेसारखं दुःख झालं नाही. थोडंफार वाईट वाटलं. कारण त्याला ही मनोजची कल्पना सुरुचीला सांगायची होती. 

रात्रीच जेवण झाल्यावर संकेतची आई आणि संकेत हॉलमध्ये बसले होते. संकेत आणि सुरूचीच बोलणं होत नाही असा अंदाज त्याच्या आईने बांधला होता. बरंच झालं..! त्यामुळे संकेत हळूहळू तरी सुरुचीला विसरेल असं तिला वाटू लागलं. सुरुचीला तिच्या दादाकडे जाऊन महिना उलटला होता, त्यामुळे त्यांचा विश्वास अजून ठोस झाला होता. 

संकेत न राहून सारखा सारखा त्या गोष्टीचा विचार करत स्वतःशी काही पुटपुटत होता. त्याच्या आईला ही गोष्ट ध्यानात आली. ती संकेतला विचारलं,

" बाळा..! ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम आहे का..?"

" नाही ग आई..!" संकेतने मोबाईलमध्येच लक्ष देऊन उत्तर दिलं.

त्याची आई शांत बसली. पण आईने असं का विचारलं म्हणून संकेतने तिला प्रश्न केला,

" का ग आई..? असं का विचारतेयस..?"

" काही नाही..! हल्ली काही विचारात अडकलेला असतोस.. तिचाच विचार येत असेल ना मनात.."

" हं.." आता उगाच इमोशनल होऊन चालणार नाही. नाहीतर आपला प्लॅन करायच्या वेळेस अचानक हा कसा बदलला म्हणून आईला संशय यायचा.! हीच ती योग्य वेळ असं बोलून तो बोलला,

" आई..!"

" हंन..! बोल..!"

" तुला काय वाटतं.! माझं असं लग्न होऊन मोडलं असताना मला दुसरं कुणी मुलगी देईल का..?"

संकेत असं बोलला आणि त्याच्या आईचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसू लागला. त्यात ती म्हणाली,

" का नाही..? तू एवढा देखणा आहे..! चांगला कामाला आहेस.! आपलं घर आहे. अजून काय हवं."

" हो..! पण माझं लग्न झालं होतं....."

" मग काय झालं..? आता तुझी बायको अशी तुला सोडून गेली म्हणून काय तू असा एकटा आयुष्य जगणार आहेस का..? त्यात तुझ्यात काही दोष नसताना..!"

" तरीही ..! अशी कोणती मुलगी माझ्यासोबत लग्नाला तयार होईल..?"

" कोण होईल असं काय विचारतोयस..! त्या दिवशी तुला त्या मुलीचा फोटो दाखवत होते ना..!"

" हं..! कोणता.?" संकेतने काही आठवतं नसल्यासारख उत्तर दिलं.

" अरे..! त्या दिवशी मी तुला एका मुलीचा फोटो दाखवायला आणला होता. तू रागात होतास. तू तो पहिला नाहीस. त्यामुळे तुझ्या लक्षात नाही." 

" असेल.."

" असेल नाही आहे. मी ठेवलाय तो फोटो. त्या मुलीचे आईवडील मला दोन वेळा विचारून झाले. पण तू काही मनावर घेत न्हवतास म्हणून मी त्यांना काही उत्तर दिलं नाही. तुला पाहायचा आहे का फोटो..?"

संकेत चेहऱ्यावर थोडं गोड हसू आणून चूप बसला. त्याच्या आईला ही संकेतने दिलेली संमती वाटली. ती लगेच सोफ्यावरून उठत बोलली,

" थांब हं! मी लगेच घेऊन येते."

संकेतची आई लगेच कपाटाकडे गेली. कपाटातून त्या मुलीचा फोटो शोधून काडून ती संकेतजवळ आली. संकेतला फोटो दाखवत म्हणाली,

" ही बघ..! आहे की नाही रूपवान..! सुंदर ..!"

संकेत काहीवेळ फोटो पाहत राहिला. हे पाहून त्याची आई बोलली,

" बाळाला आवडली वाटतं..!" आणि ती हसली.

संकेतने फोटो आईकडे दिला. 

" मग..! उद्याच तिच्या आईवडिलांना कळवते. लवकरच तुमची भेट घडवावी लागेल." संकेतची आई असं बोलली आणि फोटो ठेवायला गेली.

" आई..! मी झोपायला जातो..!" संकेत अस बोलला आणि बेडरूममध्ये गेला.

त्याची आई आज खूष झाली. आपल्या मुलाला सुबुद्धी आली आणि तो लग्नाला तयार झाला अस तिला वाटू लागल. आता लवकरात लवकर संकेतची आणि तिची भेट घडवून आणायला हवी. दोघेही एकदा भेटले म्हणजे त्यांचं जरा खुलून बोलणं चालणं होईल. मग लग्नाची बोलणी पुढे वाढवायला बरं. तसं ही मुलगीच वय जरा जास्त झालं आहे. तिचे आईवडील ही तीच लवकरात लवकर लग्न लावायला उत्सुक आहेत. असा विचार करत संकेतची आई झोपली.

सकाळी लवकर उठून संकेतच्या आईने संकेतच्या डब्ब्याची तयारी केली. संकेतला डब्बा लवकर मिळाल्याने तो ही थोडा लवकरच ऑफिसला निघाला. आज त्याला तशी कोणती घाई न्हवती. पण मनोजबरोबर बोलायला जरा जास्त वेळ भेटला तर बरं होईल, हाच विचार संकेतच्या मनात होता. 

संकेत ऑफिसजवळ पोहोचला. त्याने मनोजला कॉल केला,

" हॅलो..!"

" गुड मॉर्निंग..! आज सकाळीच कॉल .?"

" गुड मॉर्निंग. कुठपर्यंत पोहोचलास..?"

" कुठपर्यंत म्हणजे..?"

" म्हणजे ऑफिसला येतोयस ना..? तर ऑफिसच्या जवळपास कुठे..?"

" जवळच आहे. ३-४ मिनिटे लागतील..!"

" ओके..!"

" का रे..?"

" काही नाही. आज मी ही लवकर आलो आहे. ऑफिसच्या खालीच उभा आहे.!"

" अच्छा..! मी पोहोचतोच आहे."

" हां.! ये..!"

संकेतने कॉल ठेवला. मनोज ३ मिनिटांमध्ये ऑफिसजवळ पोहोचला. संकेत अजून खालीच उभा होता. मनोज आला तसा संकेत त्याच्याबरोबर गप्पा मारत ऑफिसमध्ये गेला. खुपवेळ त्यांच्या गप्पा चालू होत्या. ऑफिसची बहुतेक मंडळी आली होती. काही वेळाने पल्लवीही आली. नेहमी वेळ साधून मनोज तिच्या बरोबर यायचा. पण सद्या त्यांच्यात अबोला असल्यामुळे मनोज आधीच ऑफिसला यायचा. पल्लवीने मात्र स्वतःची वेळ बदलली न्हवती. 

पल्लवी तिच्या टेबलजवळ पोहोचली आणि पाहते तर काय..? संकेत तिची चेअर घेऊन मनोजच्या जवळ बसून गप्पा मारत होता. पल्लवीला पाहताच तो बोलला,

" अरे..! गुड मॉर्निंग..! "

" गुड मॉर्निंग..! तू आज इथे..?"

" सहज ग..! जरा लवकर आलो होतो. मनोज ही आला होता. म्हणून त्याच्याबरोबर बोलत बसलो."

" ओके.!"

" तू बस..! " संकेत तिच्या चेअरवरून उठत बोलला.

पल्लवी तिच्या जागी आली आणि तिची चेअर बाजूला करून टेबलवर आवराआवर करू लागली.संकेत उभा राहून परत मनोजच्या कानात कुजबुजत होताच. पल्लवीने तिकडे दुर्लक्ष केलं. पण नंतर दिवसभर मिळेल त्या वेळेस संकेत मनोजबरोबर काही ना काही काम काडून बोलत होताच. न राहून पल्लवीने संकेतला विचारलंच,

" आज काय खूप गुजगोष्टी चालू आहेत सख्या मित्रांच्या..?"

" काय.?"

" आज काय चाललंय काय तुमचं दोघांचं..?"

" काही नाही ग..!" संकेत उडवाउडवी करत बोलला.

" काही नाही असं होणारच नाही. तुला असा कधी पहिला नाही."

संकेत गालातल्या गालात हसला.

" अरे वाह..! म्हणजे सिक्रेट आहे.!" पल्लवीने परत काहीतरी हाती लागतंय का म्हणून शेवटचा प्रयत्न केला.

" तसं काही नाही." मग संकेतने पल्लवीची फिरकी घ्यायचं ठरवलं." एक काम कर ना..! तू मनोजला विचार..!"

" ठीक आहे. नाही सांगायचं तर नको सांगूस..!" 

" इकडे ये..!" संकेतने हात दाखवत पल्लवीला बाजूला बोलावलं.

पल्लवी तिथे गेली आणि बोलली,

" सांगायचं असेल तरच सांग..!"

" हो ग.! पण तुझा विश्वास बसेल की नाही माहीत नाही."

" अस काय झालं आहे..?"

" कमाल..!"

" काय कमाल..?"

" मनोज मला बोलला होताना की त्या मुलीला भेट. त्याबद्दलची.."

" मग राहूदे तुझ्याकडेच.! मला नाही ऐकायची..!" असं बोलून पल्लवी मुद्दामहून तिथून निघायचं नाटक करू लागली.

" थांब.! काल मी मनोजला कॉफी पियायला घेऊन गेलो."

" कमालच आहे..!" पल्लवी फुगून बोलली.

" त्यात कमाल नाही. कमाल पुढे घडली. " असं बोलून संकेतने काल कॉफीशॉप मध्ये घडलेलं सगळं पल्लवीला सांगितलं. त्या मुलीला भेटून काय सांगायचं, त्यानंतर तिच्या आईवडिलांना भेटल्यावर आईंसमोर कसं रिऍक्ट व्हायचं, मग तिने कसा नकार द्यायचा हे सगळं परफेक्ट प्लॅन करून आतापर्यंत मनोजने संकेतला समजावलं होत.

" काय...? हे असं मनोज बोलला.? आणि म्हणून तो तुला त्या मुलीला भेटायला सांगत होता..?" 

" हो.! हे सगळं मनोज बोलला."

हे ऐकून पल्लवी खूप खजील झाली. आपण मनोजबद्दल काय विचार करत होतो आणि मनोज काय विचार करत होता. आपण मनोजवर उगाच रागावून बसलो. असा विचार करत ती चेअरवरून उठली आणि मनोजकडे पाहू लागली.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now