आज रविवार होता. संकेतच्या ऑफिसला सुट्टी असल्यामुळे त्याच्या आईने संकेतसाठी जी मुलगी पहिली होती, तिला बघण्याचा कार्यक्रम आज ठरवला होता. संकेतची आई तिकडे निघण्याच्या तयारीला लागली होती. संकेत मात्र मनोजला कॉल करण्यात बिझी होता. काल संध्याकाळपासून मनोजचा नंबर बंद येत होता. त्यामुळे संकेतच त्याच्याशी बोलणं झालं न्हवतं. अशा वेळी मनोजबरोबर बोलणं संकेतला गरजेचं झालं होतं. पण त्याचा नाईलाज होता. पण मनोजचा नंबर बंद का येतोय.? असं कधी झालं नाही..? पल्लवीला विचारून पाहूया का.? कदाचित तिला काही माहीत असेल..! म्हणून संकेतने पल्लवीला कॉल केला,
" हॅलो..!" पल्लवीने कॉल उचलला.
" हॅलो पल्लवी..! "
" बोल संकेत. आज कसा कॉल केलास..? आज पण ऑफिसचं काम आहे का..?"
" नाही ग.! मला माहित आहे आज सुट्टी आहे."
" मग साहेबांचा आज कॉल कसा..?"
" मनोजबद्दल विचारायचं होतं. त्याचा नंबर बंद येतोय..! तुला काही माहीत आहे का.?"
"नाही रे..!" मनोजचा नंबर बंद येतोय म्हणून संकेतने आपल्याला कॉल का करावा.? आपल्याला कसं माहीत असेल..? पण मनोज माझ्याबरोबर काल संध्याकाळी बोलला तेंव्हापासून त्याचा नंबर बंद येतोय. म्हणजे त्यांने माझ्यावर रागावून नंबर बंद ठेवला आहे वाटतं..! पण संकेत आपल्याकडे त्याची माहिती कशी मागू शकतो. असा विचारकरून तिने संकेतला प्रश्न केला.
" पण मला कसं माहीत असेल...? त्याचा नंबर बंद का आहे ते..?"
" तसं नाही ग..! पण तुमचं नेहमी बोलणं होत ना ..! म्हणून तुला विचारलं..!"
" नेहमी कुठे बोलणं होतं..? फक्त ऑफिस मध्ये..!"
" हो..! पण तुझ्याबरोबर मनोज जास्त बोलतो म्हणून तुला विचारलं..! तुला राग आला का..?"
" नाही..! राग कशाला येईल..!"
" ओके. चल मग. ठेवतो कॉल."
" ओके. बाय." असं बोलून पल्लवीने कॉल कट केला.
पल्लवी विचार करू लागली. संकेत असा विचार करतोय की मनोज आणि माझं नेहमी बोलणं होत असेल. म्हणजे त्याला असं वाटतंय का की मनोज आणि आपण खरचं एवढ क्लोज आहोत.? पण त्याला असं दिसून येतंय म्हणजे खरचं मनोजशी मी एवढी बोलून चालून असते..? मग मनोजने मला एवढ त्याच्या जवळची व्यक्ती मानलं तर ते खरचं असणार..! आपण ही नकळत त्याच्याजवळ जात आहोत, त्याच्याशी जुळलो गेलो आहोत. असं की दुसऱ्यांच्या ते ध्यानात आलं आहे, पण आपल्याला अजून कळलं नाही. पण हे काय आहे..? प्रेम..! नाही..! तसं काही असेल तर ते लवकरच टाळायला हवं. पण मनोज आता आपल्यापासून दूर जात आहे हे चांगलंच आहे ना..! त्यामुळे आपल्यात तसं काही निर्माण होणार नाही. तसं काही निर्माण झालं होतं असेल तरी आता ते पुढे जाणार नाही. पण मनोज आपल्यामुळे असा अबोल आणि शांत झाला आहे हे मनोजला कळलं तर.? कळेल कशाला, त्याला सगळं दिसून येतच आहे.! आपल्याला काही करून मनोजची समजूत काढावी लागेल. तो एकदा नॉर्मल झाला की आपण त्याच्यापासून लांब जाऊ. असा विचार पल्लवी करत होती.
मनोजबरोबर बोलता येत नसल्याने संकेत मात्र पुरता घामाघूम झाला होता. त्या मुलीला भेटल्यावर तिला हे सगळं बोलायची हिम्मत आपल्यात येईल का ह्या विचाराने तो बेचैन झाला होता. दुपारचं जेवण झाल्यावर संकेतची आई आणि संकेत त्या मुलीला भेटायला जाण्यासाठी घरा बाहेर पडले. प्रवास करून त्यांच्या घरी पोहोचल्यावर त्या मुलीच्या आईवडिलांकडून त्यांचं स्वागत झालं. संकतची आई हॉलमध्ये बसून त्या मुलीच्या वडिलांबरोबर बोलत होत्या. संकेत मात्र अजून ही मनोजला कॉल करण्याचा प्रयत्न करत होता.. शेवटी संकेतच्या आईचं त्या मुलीच्या आई वडिलांनाशी बोलणं झाल्यावर त्या मुलीची आई त्या मुलीला हॉलमध्ये घेऊन आली.
मुलगी दिसायला सुंदर होतीच. त्याचं बरोबर तिने नेसलेल्या साडीमध्ये तीच सौंदर्य अजूनही खुलून दिसतं होत. तिच्या अंगावर मोजकेच दागिने होते. त्यामुळे उगाच दाखवून आणलेलं सौंदर्य न्हवत. त्यामुलीची नजर खाली होती. तिने सरबताचा ग्लास संकेतला दिला. संकेतने तो ग्लास घेताना त्या मुलीकडे पाहिलं ही नाही. थोडं सरबत पिऊन त्याने ग्लास खाली ठेवला. काही वेळ बोलणं झाल्यावर त्या मुलीचे वडील बोलले,
" आमच्या होणाऱ्या जावई बापूंना आमच्या मुलीला काही खाजगीत विचारायचं असेल तर विचारू शकतात."
तशी संकेतची आई बोलली.
" नाही. नाही. त्याची काही गरज नाही. आमच्या मुलाला तस काही विचारायचं नाही आहे."
संकेतला समजलंच नाही की आता ह्यावर काय बोलावं. संकेतच त्या मुलीशी बोलणं झालं नाही तर त्याच त्या मुलीशी लग्न जुळल्यातच जमा होत. तो असा विचार करत असतानाच त्या मुलीचे वडील बोलले,
" तुम्ही असं बोलताय पण हल्लीच्या शिकल्या सवरल्या मुलांना त्याची मतं मांडण्याचा हक्क आपण द्यायला हवा. उद्या त्यांच्यात काही बिनसलं तर ते आपल्याला दोष देतील.!" त्यांच्या ह्या बोलण्याने संकेतला बरं वाटलं.
" तुम्ही दोघे आत जाऊन काय बोलायचं असेल तर बोलून घ्या..!" आता मुलीची आईही संकेतला आणि त्यांच्या मुलीला उद्देशून बोलली. तसा संकेत त्याच्या आईकडे पहायच्या वेळेस ती मुलगी उठून आत जाऊ लागली. संकेतला तर बरंच झालं. ती मुलगी आत गेली म्हणून संकेतने सगळ्याकडे पाहिलं आणि तो ही आत गेला.
ती मुलगी आत जाऊन त्या खोलीच्या दरवाज्यापाशी उभी राहिली. संकेत आत आला. ती मुलगी त्याला बोलली,
" इथे बसा..!"
"हो.!" अस बोलून संकेत एका चेअरवर बसला आणि बोलला, " तुम्ही ही बसा..!"
" नाही! असुदे..!" ती मुलगी तिथेच उभं राहून बोलली.
थोडावेळ दोघेही शांत होते. संकेतला सुचतं न्हवत की कशी सुरवात करावी किंवा त्याचा धीर ही होत न्हवता. मग काही वेळाने तो बोलला,
" काही विचारायचं असेल तर विचारा तुम्ही..?"
" मी.? मी कसं काय विचारू..?"
" अहो..! तुम्ही नीसंकोचपणे विचारा..!" संकेतला जमणार न्हवतं म्हणून त्याने तात्पुरत त्या मुलीवर ढकललं.
" तुम्हाला मी आवडली आहे..?" त्या मुलीने धाडसाने प्रश्न केला आणि संकेतची गोची झाली. हो बोलावं तरी प्रॉब्लेम आणि नाही बोलावं तरी प्रॉब्लेम. हो बोललो तर आपलं लग्न फिक्स आणि नाही बोललो तर लग्न मोडल्याच आपल्या खांद्यावर येणार. मग आई आपल्यावर रागावून तिला आपला काहीतरी प्लॅन होता अस वाटणार..! काय करावं.. ? संकेत विचारात असताना त्या मुलीने पुन्हा प्रश्न केला.
" इतका वेळ घेताय म्हणजे मी तुम्हाला नाही आवडले असं समजू का..?"
संकेतला काय बोलाव हे सुचत न्हवतं. पण तो लगेच बोलला,
" तसं नाही. तुम्ही खूप सुंदर आहात. मला आवडलात..!" अस बोलल्याबरोबर त्या मुलीने खाली मान घातली. संकेतला समजलं की आपण हे बोलून चूक केली. आता लवकरात लवकर ती सावरायला हवी.! म्हणून तो पुढे बोलला,
"पण..!" त्या पण मुळे त्या मुलीची मान झटकन वर आली.
" पण काय..?" ती बोलली.
" पण माझं आधी लग्न झालं आहे आणि.."
" ते मला माहित आहे. त्यात तुमचा काही दोष न्हवता." ती मुलगी पुढे बोलून गेली.
आता परत संकेत अडकला. आता हिच्याकडून नकार कसा मिळवायचा..? एका मुलीला मनोजने सांगितलं तसं तोंडावर कसं बोलायचं..! सगळा प्लॅन खड्यात गेल्यात जमा होता.
" पण मला हे लग्न मान्य नसेल तर..?" न राहून ती मुलगी बोलली. संकेतला तर ते वाक्य ऐकून इतका आनंद झाला की तो लगेच बोलला,
" बरचं होईल..!"
" काय..?" ती मुलगी आश्चर्याने बोलली.
" म्हणजे मला असं बोलायचं होत की माझं आधी लग्न झालं आहे. पण तुमचं तसं नाही. तुम्हाला चांगलं स्थळ भेटू शकतं..!" संकेत असं बोलल्याने त्यामुलीची चेहऱ्यावर एक हास्य आलं. तिने दरवाजातून बाहेर वाकून पाहिलं. परत आता वळून संकेतच्या जरा जवळ आली आणि त्याला बोलली,
" सॉरी हां..! पण मला तुमचं स्थळ मान्य नव्हतं. तुम्ही छान आहात. पण तुमचं आधी लग्न ...."
ती पुढे काही बोलायच्या आत संकेत मध्येच बोलला,
" समजलं मला..!"
" तुम्ही रागावू नका..! मी माझं मत मांडलं..! पण तुम्ही हो बोललात तर मी काहीच बोलू शकतं नाही..!"
" नाही नाही. तुमचं म्हणणं मला पटलं आहे. खर तर माझं ही माझ्या बायकोवर खूप प्रेम आहे. पण आईमुळे खूप प्रॉब्लेम झाले आहेत.!" दोघे ही असं बोलत होते जस की दोघे एकमेकांना पसंद करायला नाही तर एकमेकांचे मित्र आहेत. दोघांनाही आपआपला उद्देश सद्य होताना दिसत होता. संकेतला जे हवं होतं तेच त्या मुलीला हवं होतं. मग संकेतने ही तिला तो जे ठरवून आला होता ते सगळं थोडक्यात सांगितलं. तस ती बोलली,
" ओहह..! किती प्रेम आहे तुमचं तुमच्या बायकोवर..! तुम्ही सांगाल तसं मी करते..!"
" हो..! पण मी सांगितलं तसं आईला हे समजायला हवं..!"
" हं..! ते जरा माझ्यासाठी अवघड आहे. कारण मी तशी वागले तर माझे आईवडील ओळखतील की मी नाटक करतेय. "
" तुम्ही बोलला..! प्लिज..! तुमच्या आईवडिलांना मी नंतर समजावतो...!"
" मग ठीक आहे..! मी तुमच्या ह्या नाटकात सहभागी आहे."
संकेत खूष झाला. त्या मुलीलाही बरं झालं होतं. बिचारी..! संकेत हो बोलला असता तर तीच त्याच्याशी लग्न फिक्स होत. तिच्या मनातलं बोलायची हिम्मत तिने दाखवली आणि सगळं कसं सुरळीत होईल असं वाटू लागलं. आता ठरल्या प्रमाणे ती मुलगी हॉलमध्ये ओरडत निघाली,
" काय समजता काय तुम्ही स्वतःला..? मुलगी म्हटलं की काहीही बोलणार का..?"
तिचा हा अवतार पाहून तिचे आईवडिल बुचकळ्यात पडले. ते दोघेही उठून उभे राहिले. आपली मुलगी असं काय बोलतेय..? आणि ती कधी एवढ आवाज करून बोलायला लागली..? काहीतरी नक्की झालं आहे..?
तिच्या वडिलांनी तिला विचारलं,
" काय झालं ग ..? काय बोलले हे एवढ..?"
" बघा ना बाबा..! कसे बोलतात हे..!"
" काय बोलले..?" त्या मुलीची आई बोलली.
" मला विचारतात की 'तू आई होऊ शकतेस का..?'"
ती असं बोलताच त्या मुलीच्या आई वडिलांबरोबर संकेतची आई ही अवाक झाली. सगळा रोष संकेतवर नको जायला म्हणून ठरल्याप्रमाणे त्यामुलीने लगेच संकेतच्या आईला प्रश्न केला,
" काय ओ.? मी आई होणार आहे की नाही हे तपासून घेऊन नंतर तुमच्या मुलाचं माझ्याशी लग्न लावणार आहात का..? आणि मी आई होऊ शकत नसेल तर काय करणार तुम्ही...?"
संकेतची आई लालबुंद होऊन तिच्याकडे आणि संकेतकडे बघत राहिली.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा