Login

एकटी 'ती', अनं सावरली ( भाग बारावा )

This is a created story. Writer strongly recommend that do not compare it with your personal life or with others life.

संकेत घरी आला. नेहमी आज नेहमीप्रमाणे त्याच्या आईने दार उघडलं. 

" आलास..! ये..!" संकेतची आई संकेतला बोलली.

" हो आई..!" आईच आजच असं वागणं पाहून संकेत चकित झाला आणि आनंदीही. पण पल्लवीने व्यक्त केलेला संशय त्याच्या ध्यानात होता.

संकेतने शूज काढले आणि तो बेडरूममध्ये गेला. सुरुची आज पुढे आलीच नाही. ती किचनमध्ये जेवणाची तयारी करत होती. संकेत फ्रेश झाला आणि किचनमध्ये गेला. सुरुचीने त्याला पाहिलं आणि न पाहिल्या सारखं केलं.

" ए. इतकी बिझी आहेस आज..?" संकेतने प्रश्न केला.

" हो.! जेवणाची तयारी..!" सुरुचीने उत्तर दिलं.

" ते नेहमीच आहे गं..!" 

"हो..! तुम्हाला काही हवाय का..? "

" नाही..!"

" मग इथे कसे काय आलात..?"

" मग आज तुम्ही बाहेर नाही आलात म्हणून बाई साहेब..!"

" हे काय नवीन...?" संकेतने आज तिचा उल्लेख 'बाई साहेब' असा उल्लेख केल्यामुळे तिने प्रश्न केला.

" काय नवीन..?"

" बाई साहेब..!"

" हा मग..! बाई साहेब रुसल्या आहेत."

" मी कशाला रुसू..?"

" तुलाच माहीत.! 

" हं..! तुमच्यासाठी चहा ठेऊ का..?"

" नको.! राहूदे!!"

" मग बसा बाहेर..! इथे कशाला थांबताय..?"

" मला वाटतंय इथे थांबवस. म्हणून थांबतोय..." संकेत असं बोलून एक मिनिटं पण वेळ झाला नसेल आणि संकेतच्या आईने त्याला आवाज दिला.

" संकेत..!"

" हां आई..!" संकेतने पटकन त्याच्या आईला प्रतिसाद दिला.

सूरची ह्या प्रकाराने हसली. संकेतला तिच्या हसण्याचा अर्थ समजला. तो खजील झाला. संकेतने त्याला हसतच बाहेर जायचा इशारा केला. संकेत नाराज होऊन बाहेर गेला आणि सोफ्यावर जाऊन बसला.

" कसा गेला आजचा दिवस..?" संकेतच्या आईने संकेतला प्रश्न केला.

" ठीक." संकेत बोलला.

" बरं..!" असं बोलत संकेतच्या आई सुरुचीला आवाज देत बोलल्या, " चहा झाला का ??" 

सुरुची ह्या प्रश्नाने गडबडली. संकेतने तर तिला सांगितलं की चहा बनवू नकोस.

" नाही आई..!" संकेतने उत्तर दिलं, " म्हणजे मीच तिला बोललो की आज चहा नको..!"

" अच्छा..! पण का रे..? कामावरून आला आहेस. चहा घे..! बरं वाटेल..!" संकेतची आई त्याला समजावत बोलली.

" नको आई..!" संकेत तिला थांबवत बोलला.

" बरं बरं..!" संकेतची आई बोलली.

थोडावेळ दोघेही टीव्ही पाहत बसले होते. संकेतची आई तर मनात सारखा सारखा हाच विचार करत होती की संकेतला विचारावं की काय ठरवलं आहेस. पण ती मन मारून शांत बसत होती. 

जेवण बनवून झालं तशी सुरुची किचनमधून हॉल मध्ये आली आणि बोलली,

" जेवण बनवून झालं आहे. वाढायच असेल तेंव्हा सांगा..!"

" थोडावेळ बस..! काही वेळाने जेऊ..!" संकेत असं बोलतो न बोलतो तोच त्याची आई बोलली,

 " कशाला थोड्यावेळाने.? लगेच जेऊन घे..! जेवण गरम गरम जेवलेलं चांगलं." असं बोलून त्या सुरुचीला बोलल्या,

" वाढ ग जेवण...!"

सुरुची लगेच किचनमध्ये गेली. तिने दोघांसाठी जेवणाची ताटं वाढली. ती ताटं घेऊन हॉलमध्ये आली आणि ताटं ठेऊन आत गेली. संकेत आणि त्याची आई जेवायला बसले. त्यांचं जेवण झालं आणि मग सुरुची जेवायला बसली. 

संकेत आणि त्याची आई हॉलमध्ये बसले होते. दररोजपेक्षा आज जरा लवकरच जेवण झालं होतं,त्यामुळे त्यांना  झोपायला बराच वेळ होता. खरं तर आज संकेतबरोबर  बोलायला जास्त वेळ भेटावा म्हणून संकेतच्या आईने ठरवून लवकर जेवायला घेतलं होतं. सुरुची आत जेवत होती म्हणून त्या वेळात संकेतबरोबर बोलून घ्यावं म्हणून त्यांनी संकेतला प्रश्न केला,

" मग ! काही ठरवलंस की नाही.? "

" कशाचं..?" संकेतने जाणीवपूर्वक उलट प्रश्न केला.

" म्हणजे तू सुरुची बरोबर बोललास का..? तीच काय म्हणणं आहे..?" 

" नाही ग आई..! मी अजून नाही बोललो तिच्याबरोबर..!"

" बोलला नाहीस ...?" संकेतच्या आईने प्रश्न केला. 

" नाही ग..!" संकेतने उडवाउडवीच उत्तर दिलं.

" मग ती काही बोलली का..??" आज काय तो विषय संपवायचा जणु ह्या उद्देशाने संकेतच्या आईने प्रश्न केला.

" नाही.! ती स्वतःहून असं कसं बोलेल ग..! " संकेत आता वैतागून बोलला,

 " कोणती बाई अस स्वतःहून बोलेल का की मला मुलं होत नाही, तर मला सोडचिठ्ठी द्या आणि दुसरं लग्न करा..!"

" का नाही..? एखादी समजदार असेल तर बोलेल स्वतःहून. तिला आवडेल का बिनमुलाचा संसार करायला..?" 

" संसार लग्न झाल्यापासून चालू होतो ना..? मग मुलं नाही झालं तर संसार अर्धवट सोडायचा का..? काही पण बोलतेस आई..!" संकेत रागात बोलला.

" हं..! समोर एक बोलायचं आणि मागून एक बोलायचं..!" संकेतची आई संकेतकडे न पाहता बोलली.

" मी काय बोललो मागून..?" संकेतने आश्चर्याने प्रश्न केला. 

" काही नाही..!" असं बोलून संकेतच्या आईने टीव्ही चालू केला आणि टीव्ही पाहू लागली.

संकेतने ओळखलं की काल आपण म्हणजे सुरुची आणि मी जे बोलत होतो ते नक्कीच आईने ऐकलं आहे. नाहीतर आई इतक्या ठामपणे कसं म्हणत होती की तिला विचारून निर्णय घे..! म्हणजे पल्लवीचा अंदाज खरा ठरला..! आईने आपलं बोलणं ऐकलं आहे. 

संकेत हॉलमधून बेडरूममध्ये गेला. सुरुची तीच जेवण हुरकून आणि बाकीची सगळी कामे करून आधीच बेडरूममध्ये आली होती. तिला आत पाहून संकेतला जरा बरं वाटलं. सुरुची आत बसली होती हे बर झालं. कदाचित हिला आता बाहेर काय झालं ते ऐकायला गेलं नसेल. पण हिने काही ऐकलं आहे की नाही ह्याची खात्री करून घ्यावी म्हणून संकेत सुरुचीला बोलला,

" अगं. कधीपासून आत येऊन बसलीस..?"

" माझं काम झालं आणि इथे आले..! आई मुलाचं बोलणं चालू होतं.! त्यामुळे बाहेर नाही आले.! " सुरुची शांतपणे बोलली.

" अच्छा..! " संकेत तिच्या बाजूला बसला.

" हं..! झोपा आता..! सकाळी कामावर जायचं आहे." असं बोलून सुरुचीने बेडवर अंग टाकलं.

सुरुची शांतपणे आपल्याशी बोलली म्हणजे तिने काही ऐकलं नाही असं संकेतला वाटलं. 'बरं झालं..!' असं मनात बोलून संकेत ही बेडवर झोपला.

सकाळी सुरुचीची नेहमीची धावपळ आणि संकेतची नेहमीची ऑफिसला जायची तयारी चालू होती. सगळं आवरून संकेत ऑफिसला निघाला. मूळ विषयावर अजून कोणताच निर्णय झाला नव्हता. त्यामुळे संकेत चिंतेत होता. काल ऑफिसला निघताना सगळं कसं सुरळीत झाल, असा समाधानी चेहरा घेऊन बाहेर पडलेला संकेत आज मात्र चिंताग्रस्त चेहऱ्याने ऑफिसला पोहोचला. आज मात्र मनोज आणि पल्लवीच्या आधीच संकेत ऑफिसला आला होता. मनोज आणि पल्लवी अजून ऑफिसला आले नाहीत हे ध्यानात आल्यावर त्याने मनगटावरच घड्याळ पाहिलं. तेंव्हा त्याला समजलं की  आज आपणचं ऑफिसमध्ये लवकर आलो आहोत. तो त्याच्या चेअरवर बसला. थोड्या वेळाने मनोज आणि पल्लवी ऑफिसला आले. संकेतला आधीच आलेलं पाहून पल्लवी त्याला म्हणाली,

" काय संकेत..! आज आमच्या आधी..?"

त्यावर संकेत म्हणाला,

" हो ग..! आज लवकर तयारी झाली. सो लवकर आलो.! " 

" गुड..! "

" ए पल्लवी! थँक्स..!"

" थँक्स कशा बद्दल..?"

" काल तू दिलेल्या सल्याबद्दल..!" 

" सल्ला..? नाही रे..! मी फक्त एक शंका उपस्थित केली होती. सगळं ठीक आहे ना..?"

" रात्री आईच आणि माझं बोलणं झालं. त्यावरून तरी मला अस वाटलं की आईने माझं आणि सुरूचीच बोलणं ऐकलं होतं..!"

" अरे बापरे..!" मनोज मध्येच बोलला, " मग काय..?"

" काही नाही. परत जैसेथे..! मला वाटलं होतं की आई वेगळं वागायला लागली. पण नाही..!"

" तू तुझी काळजी घे..! आणि सुरुचीला नेहमी समजावं की तू तिच्याबरोबर आहेस." पल्लवीने संकेतला सल्ला दिला.

" हो." 

एवढ बोलून पल्लवी आणि मनोज दोघेही आपआपल्या टेबलसमोरील चेअरवर बसले. संकेतच्या आयुष्यात जे काही घडतं होतं ते ऐकून मनोज संकेतच्याबद्दल खूप काळजी करू लागला. पण पल्लवीला पाहून तो विचार करू लागायचा की पल्लवी किती समजूतदार आहे. आता ही तो तिच्याकडे पाहत होता. पल्लवीने तिचा कॉम्प्युटर ऑन केला आणि तीच लक्ष मनोजकडे गेलं. मनोज तिच्याकडे मग्न होऊन पाहत आहे हे बघून तिला हसू आलं. तिने पेन हातात घेतला आणि पेन मनोजच्या पायावर खुपसला. तसा मनोज ओरडला,

" आई ग..!" 

तो आवाज ऐकून संकेत त्याच्या चेअर वरून उठून मनोजकडे पाहून बोलला,

" काय रे..! काय झालं..?" 

" हं..! " मनोज भानावर आला होता.

" काय झालं सांग..!" पल्लवी मनोजला बोलली.

" काही नाही. जरा टेबल लागला पायाला." मनोज संकेतला बोलला.

"ओके..! " असं बोलून संकेत जागेवर बसला.

तसं पल्लवी मनोजकडे पाहून हसली. मनोजने एकवार तिच्याकडे पाहिलं आणि त्याच काम करू लागला.

🎭 Series Post

View all