एकटी 'ती', अनं सावरली ( भाग तेरावा )

This is a created story. Writer strongly recommend that do not compare this story with anyone.

संकेतच काम चालू होतं. जवळपास ११ वाजता त्याच्या मोबाईलवर एक मिस कॉल आला. संकेतने मोबाईल पाहिला तर सुरूचीच्या नंबर वरून मिस कॉल आला होता. सुरुचीने मिस कॉल का दिला.? चुकून लागला असेल..? की चुकून कट झाला..? जाऊदे..! ती करेल परत. असा मनात विचार करून संकेत परत काम करायला लागला. काही वेळ गेला तरी सुरूचीचा कॉल आला नाही, म्हणून संकेतला वाटलं की चुकुनचं मिस कॉल आला असेल.

ऑफिसचा लंच टाईम झाला आणि संकेत जेवणाचा डब्बा घेऊन त्याच्या चेअर वरून उठला. मनोज आणि पल्लवीने ही त्यांचे डब्बे घेतले. तिघे ही डायनिंग हॉलमध्ये गेले. कालच्याच टेबलवर तिघे ही जेवायला बसले.

" संकेत. सुरुची आणि तुझी आई दोघीच घरी असतात तेंव्हा तुझी आई काही बोलत नाही ना सुरुचीला..?" पल्लवीने संकेतला प्रश्न केला.

" नाही ग..! म्हणजे सुरुची तस काही कधी बोलली नाही..!" संकेतने उत्तर दिलं.

संकेतच हे उत्तर ऐकून पल्लवी आणि मनोजने एकमेकांकडे पाहिलं. मग मनोज संकेतला समजावत म्हणाला,

" पल्लवीला असं म्हणायचं आहे की तुझी आई सुरुचीला त्रास देत असेलच.! तू त्याबद्दल सुरुचीकडे नीट चौकशी केलीस का..?" 

" नीट म्हणजे..? मी तिला विचारलं नाही .पण तसं काही असेल तर सुरुचीच्या वागण्यातून जाणवलं असत." 

" असं तिला गृहीत धरून वागू नकोस.! तुझ्या आईबद्दल तू जे सांगितलं आहेस , त्यावरून तर हेच समजतंय की सुरुचीला त्रास होत असेल." मनोज म्हणाला.

 संकेत आता शांत बसला. तिघांचं ही जेवण हुरकल. आता आपण अजून काही बोलायचं नाही असा मनात विचार करत पल्लवी आणि मनोज शांत राहिले. तिघेही आपआपल्या कामाच्या जागेवर जाऊन बसले. संकेत परत विचारात पडला.

" मनोज..!" ,पल्लवीने मनोजला हळूच आवाज दिला.

" काय ग..?" 

" मगाशी तू माझ्या मनातलं कसं ओळखलंस..?"

" कधी ग..?"

" अस काय करतोस..! आताच जेवताना नाही का मी संकेतला  प्रश्न केला आणि त्याचा मूळ उद्देश तुला समजला.!"

" ते होय..! "

" हां.. सांग..!"

" तुझ्याबरोबर राहून मी तुला तेवढ ओळखू लागलोय..!" मनोज हसत बोलला.

" खरचं..?"

" हो..!"

" थॅंक्यु..! संकेतला असं कसं डायरेक्ट सांगावं म्हणून मी कचरत होते. पण तू लगेच त्याला बोललास ते बरं झालं."

" थॅंक्यु काय त्यात..!"

" थँक्यू कारण तू मला समजून घेतलंस.."

" मी नेहमीच तुला समजून घेईन..!" मनोज सहज बोलला.

" नेहमी म्हणजे..?" पल्लवीने आश्चर्याने प्रश्न केला.

" नेहमी म्हणजे इथे ग.! कामात..!" मनोजने सावरत उत्तर दिलं.

" हं..!" पल्लवीने मात्र मनोजच्या मनातलं ओळखलं. ती स्वतःशीच लाजली. मात्र मनोजला तिने जाणवू दिल नाही.

पल्लवी आणि मनोज परत त्यांच्या कामात व्यस्त झाले.


संध्याकाळ झाली. ऑफिसमधून निघायची वेळ झाली. तिघे ही ऑफिस मधून बाहेर आले. नेहमी सारखं एकमेकांना निरोप देऊन तिघे ही आपआपल्या मार्गाला निघाले.

संकेत मात्र आज पल्लवीने उपस्थित केलेल्या शंकेने बेचैन झाला होता. कधी एकदा घरी जातोय आणि सुरुचीला ह्याबद्दल विचारतोय अस त्याला झालं होतं. संकेत नेहमीच्या वेळेवर घरी पोहोचला.

त्याने दरवाजाची बेल वाजवली. आज ही त्याच्या आईने दरवाजा उघडला. 

" आलास बाळा..! " संकेतची आई बोलली.

संकेत काही न बोलता आत आला. त्याने शूज काढले आणि तो बेडरूममध्ये गेला. कपडे बदलून तो बाथरूममधून फ्रेश होऊन बाहेर आला. त्याला पाहताच त्याची आई बोलली,

" चहा घेणार ना तू..?"

" हो..!"

" बस .! मी येतेच घेऊन..!" असं बोलून संकेतची आई किचनमध्ये गेली.

हा काय प्रकार आहे. आज आई चहा घेऊन येतेय. वाह..! पण सुरुची असताना.? असं कसं होईल. संकेत हॉलमध्ये येऊन सोफ्यावर बसला. त्याची आई लगेच चहा घेऊन आली.

" हा घे..! " चहाचा कप संकेतच्या समोर करत त्याची आई बोलली, " आज मी आधीच चहा बनवून ठेवला होता.! मला माहित आहे तुला विचारलं की तू कधी हां बोलशील कधी नाही. पण तुला चहा घ्यायचाच म्हणून आधीच बनवला..!"

" आई ..! तू चहा बनवलास..?" संकेतने प्रश्न केला.

" हो..! का रे..?" 

" नाही. सुरुचीने बनवला असता..!"

" ती कशी बनवेल..? ती इथं असायला तर हवी..!"

संकेत त्याच्या आईच्या ह्या उत्तराने गोंधळला.

" म्हणजे..? सुरुची कुठे आहे..?"

" हे काय..! तुला माहीत नाही.? मला वाटलं तुला बोलली असेल..!" 

" काय बोलली असेल..? कुठे आहे ती..?" असं बोलत संकेतने चहाचा कप तसाच टेबलवर ठेवला.

" अरे..! सकाळी ११ वाजताच ती बॅग घेऊन घरातून गेली. मला फक्त 'बाहेर जाते.' बोलली. तुला कॉल नाही केला..?"

" कुठे बाहेर जाते बोलली..? आणि तू तिला अस कसं जाऊन दिलंस..? आणि इथे बाहेर जाताना ती बॅग का घेऊन जाईल..?" संकेत त्याच्या आईवर प्रश्नांचा भडिमार करत बोलला.

" अरे..! मी कशाला तिला एवढं विचारू..! मला वाटलं तुला बोलली असेल..!"

" आई .! तू पण ना..!" असं बोलत संकेतने त्याच्या मोबाईलवरून लगेच सुरूचीचा नंबर डायल केला. नंबर स्विच ऑफ येत होता. अरे देवा..! सकाळी सुरुचीचा मिस कॉल आला होता. त्यानंतर आपण तिचा नंबर लावून पहायला हवा होता. कदाचित ती आपल्या कॅलची वाटत पाहत होती असेल..! संकेत पुरता घाबरला. तो लगेच बेडरूममध्ये गेला. त्याने सगळा बेडरूम तपासला. सुरुच्या काही वस्तू आणि काही कपडे  दिसत न्हवते. संकेतने परत सुरूचीचा नंबर डायल केला. पण नंबर बंद येत होता. सुरुची कुठे गेली असेल ह्या प्रश्नांने संकेत घाबरला. पल्लवी बोलली तसं आई सुरूचीला काही बोललं तर नसेल ना..? मग त्या गोष्टीच वाईट वाटून सुरुची घरा बाहेर गेली असेल का..? त्याच्या मनात असा ही प्रश्न आला की, सुरुची तिच्या जीवाचं बरं वाईट तर करून बसली नसेल ना ? 

संकेतने किंचित पाणावलेल्या डोळ्यांनी त्याच्या आईवर ओरडत प्रश्न केला,

" तू तिला काही उलट सुलट बोललीस का..?"

" मी कशाला तिला काही बोलेन..!"

" मग कुठे गेली ती..? " संकेत पुरता हतबल होऊन सोफ्यावर बसला.

" आता मला काय माहित..! " असं बोलत संकेतची आई सोफ्यावर बसली.

संकेत विचारात पडला. सुरुची असं कसं करू शकते. माझ्याबरोबर काही बोलली नाही. फक्त मिस कॉल दिला. कॉल पण नाही केला. मला का बोलली नाही ती की कुठे जातेय..? कुठे गेली आहे ती..? तीच अस कोण आहे जिथे ती असं मला न सांगता जाईल..? संकेत विचार करत होता. मग त्याला आठवलं की तिच्या भावाला कॉल करून पहावं. ती त्याच्या कडे तर गेली नसेल..? पण त्यांना कॉल करून काय विचारायचं..? जर सुरुची तिथे नसेल तर..? ते काय बोलतील, तुम्हाला माहीत नाही का..? मग त्यांनीच आपल्याला उलट प्रश्न केले तर..? संकेत विचार करून करून थकला.

मग त्याला आठवलं की आपण ह्यात पल्लवीची मदत घ्यावी. त्याने लगेच पल्लवीला कॉल केला. पल्लवीने कॉल उचलला,

" हॅलो..!" 

" हॅलो..! पल्लवी..!"

" बोल संकेत..! आज ह्या वेळी कॉल..?"

" एक प्रॉब्लेम झाला आहे..!" असं म्हणत त्याने घडलेला सगळा प्रकार पल्लवीला सांगितला. त्यावर एक उपाय म्हणून पल्लवीने त्याला उपाय सुचवला,

" एक काम करूया..! मला सुरुचीच्या दादांचा नंबर दे..! मी त्यांना कॉल करते आणि सुरुची बद्दल विचारते. जर ती तिथे असेल तर ती कॉल घ्यायला येईल. ती तिथे नसेल तर ते तसं सांगतील."

" हां . ठीक आहे. पण त्यांना काही संशय आला तर.?" संकेतने प्रश्न केला.

" मी सांगेन, मी तिची जुनी मैत्रीण आहे. तिचा नंबर नाही माझ्याकडे..! मला तिने हा नंबर दिला होता."

" ठीक आहे..! मी त्यांच्या नंबर तुला पाठवतो..!"

" ओके. मी त्यांना कॉल करते आणि तुला कळवते..! बाय..!"

" ओके..! बाय..!" अस बोलत संकेतने कॉल कट केला आणि लगेच सुरुचीच्या दादांचा नंबर पल्लवीला पाठवला.

पल्लवीला सुरुचीच्या दादांचा नंबर मिळताच तिने त्यांना कॉल केला. समोरून कॉल उचलला,

" हॅलो. !"

" हॅलो..!"

" बोला..! कोण बोलताय..?"

" मी पल्लवी..! सुरुची आहे का..?"


( उर्वरित पुढील भागात..! पण तुम्हाला काय वाटतं..! सुरुची तिथे असेल..? की नसेल..? नक्की विचार करा आणि कळवा..!)

🎭 Series Post

View all