Jan 19, 2022
नारीवादी

एकटी 'ती', अनं सावरली ( भाग तिसरा )

Read Later
एकटी 'ती', अनं सावरली ( भाग तिसरा )

सुरूचीने दुपरचं जेवण बनवून ठेवलं होतं. आता तिला काम न्हवतं. सासूबाईंची सकाळची पोटपूजा झाली होती. त्या मस्त  सोफ्यावर बसून टी. व्ही. बघत होत्या. सुरुची बेडरुममध्ये गेली. तिचा मोबाईल घेऊन तिने तिच्या दादाला कॉल लावला. समोरून कॉल उचलला गेला,

" हॅलो...!"

" हॅलो दादा...! कसा आहेस..?"

" माझं राहूदे..! तू तुझं सांग..!"

" माझं काय..?"

" तू कशी आहेस..?"

" मी ठीक.!"

" खरचं...?"

" हो दादा..! "

" मला नाही वाटतं. रात्री तुझ्या बोलण्यावरून समजलं."

" नाही दादा...तसं.." सुरुची जरा बोलताना अडखळली.

" मला कळतं सगळं. समजलं का ? छोटीने ऐकलं कॉलवर तू रडत होतीस...!"

" नाही रे दादा..! ते जरा सर्दी झाली आहे..!" 

" अच्छा..! म्हणजे खोटं ही बोलायला शिकलीस..?"

" दादा..!"

" संकेत काही बोलला का...?"

" नाही दादा..! ते खूप छान वागतात माझ्याबरोबर..!"

" मग सासूबाई का..?"

" नाही रे..! काही नाही..!"सुरुची जरा राडवेली झाली. पुढे काही अजून बोललं तर ती रडलीच असती.

" बघ ..! तू आता बरंच लपवशील, पण पुढे ह्याचा तुलाच त्रास होईल.."

सुरुची आता खरचं रडायला लागली. तिच्या डोळ्यातून निघालेले दोन-दोन अश्रू ओरंगळत तिच्या गोल गरगरीत गालावरून खाली टपकले. तसं तिने साडीचा पदर हातात घेऊन स्वतःचे डोळे फुसले. 

" कोमल..! तू रडतेयस आणि ह्यात सगळं समजतंय. सासूबाई काय बोलल्या.? मी संकेत बरोबर बोलू का..?"

" नको दादा..! म्हणजे ह्यांना मी सगळं सांगितलं. म्हणजे ह्यांच्या समोरच झालं. पण ह्यांनी मला सावरलं."

" नक्की..?"

" हो दादा..! आज की नाही ते मला फिरायला बाहेर घेऊन जाणार आहेत. ते पण सासूबाईंना फसवुन. त्याचाच प्लॅन आहे तसा..!" सुरुची आनंदात बोलली.

" वाह..! छान..! तरी काही वाटलं तर मला सांग. आई-बाबांनंतर माझाच अधिकार आहे तुझ्यावर. तुला त्रास होत असेल तर मी खपवून घेणार नाही. आईच्या हट्टापायी तुझं लवकर लग्न लावून दिलं. तरी मी काही घाई करून तुझं लग्न नाही लावून दिल. सगळी विचारपूस करून तुझ्यासाठी स्थळं ठरवलं होतं. पण तुला तिथे त्रास होत असेल तर मी आहे."

" दादा...! एवढ काही नाही झालंय. मी आता पुढे काही लपवणार नाही. तुला सगळं सांगेन."

" गुड..! चल. नंतर बोलू.!"

" हो दादा. काळजी घे..!"

" तू पण..!"

दोघांनी कॉल कट केला. सुरुचीच मन भरून आलं. आपला दादा म्हणजे सेम बाबाच. बाबा असताना कधीच जाणवलं नाही. पण बाबा गेले आणि त्यानंतर माझा दादाच माझा बाबा झाला. लग्न ठरवताना त्याने खूपच काळजी घेतली होती. काळजी म्हणजे फुल सिक्रेट एजंटच कामाला लावले होते. त्यात संकेत पास झाला होता. सुरुची हे सगळं आठवून स्वतःशीच हसली.

सुरुचीने स्वतःचे डोळे परत फुसले. संध्याकाळपर्यंतचा वेळ कधी एकदा संपतोय अस तिला झालं होतं. संकेत सरप्राइज म्हणून आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे ह्यापेक्षा तो सासूबाईंना फसवुन आपल्याला बाहेर घेऊन जाणार आहे ह्या विचाराने सुरुची खूष होती.ती बेडवरून उठून बाहेर हॉलमध्ये आली. सासूबाई टीव्ही बघण्यात मग्न होत्या.

काही वेळाने सुरुचीने सासूबाईंना जेवण वाडलं. त्यांचं जेवण झाल्यावर स्वतः जेवून नंतर घरची कामं हुरकली. सासूबाई दुपारची झोप घेऊ लागल्या. सुरुची मात्र संध्याकाळी काय होणार ह्या विचारात होती. 

संध्याकाळ झाली. सासूबाई जाग्या झाल्या. सुरुचीने आधीच चहा बनवून ठेवला होता. सासूबाईंना चहा देऊन तिने देवा समोर दिवा लावला. देवा समोर हात जोडून प्रार्थना केली.
घड्याळात ६ वाजले होते आणि दारावरची बेल वाजली. सुरुचीला अंदाज आला की संकेत आज लवकर आले असणार. सुरुचीने सासूबाईंकडे पाहिलं. सासूबाई सोफ्यावर बसूनच टीव्ही बघत होत्या. दारावरची बेल पुन्हां वाजली. तश्या सासूबाई ओरडल्या,

" बेल ऐकू नाही आली का.? बघ दरवाजावर कोण आलय..!"

" हो आई.!" सुरुची आनंदातच दरवाजा उघडायला धावली.

सुरुचीने दरवाजा उघडला. समोर तिच्या अपेक्षेप्रमाणे संकेतच होता. सुरुची त्याला बघतच राहिली. संकेत ही तिच्या चेहऱ्यावरचा आजचा आनंद हेरत होता. पण मागून सासूबाईंचा आवाज आलाच,

" कोण आहे ग..?"

सुरुची काही बोलणार ह्याच्या आधीच संकेत दरवाजामधून आत आला आणि म्हणाला,

" मी आहे आई." आणि त्याने बॅग सोफ्यावर ठेवली.

" संकेत.! आज लवकर आलास.?"सुरुचीच्या सासूबाई आश्चर्य वाटल्यासारखं बोलल्या.

" हो आई. हिचा कॉल आला आणि कामं लवकर हुरकून आलो..!" 

सासूबाई आणि सुरुची ह्या दोघींनी आवाक होऊन एकदम संकेतकडे पाहिलं. नंतर त्या दोघी एकमेकिंकडे पाहू लागल्या. संकेत लगेच सावरून घेऊन बोलला,

" अगं आई..! हिच्या पोटात दुखत आहे. हिने मला तेच सांगायला कॉल केला होता. बोललो हिला डॉक्टरकडे घेऊन जातो..!"

" पण मी घरात आहे ना. मला का नाही बोलली ही..?" सासूबाई संकेत आणि नंतर सुरुचीकडे बघून बोलल्या.

" आता ते जाऊदे आई. ! आम्ही डॉक्टरकडे जाऊन येतो." संकेत आईला म्हणाला आणि  सुरुची कडे पाहून बोलला,

" चल..! निघुया..!"

सुरुचीच्या सासूबाई परत टीव्ही बघण्यात मग्न झाल्या. पण सुरुचीकडून काहीच प्रतिक्रिया नाही हे पाहून संकेतनेच तिचा हात पकडला आणि चल म्हणून खुणावू लागला. सुरुची भानावर आल्यासारखी त्याच्या बरोबर निघाली. 

दोघे ही दरवाजातून बाहेर आले. संकेतने दरवाजा ओडून घेतला आणि सुरुचीला म्हणाला,

" काय झालं ..? मला वाटलं होतं की तू तयार होऊन बसली असशील.."

" पण मला अजून ही खरं वाटतं नाही आहे की आपण अस बाहेर निघालोय. त्यात तुम्ही आईंना खोट कारण सांगितलं आहे.." सुरुची विश्वास न बसण्यासारखी गोष्ट घडल्यासारखी बोलली.

" हळू बोल आणि चल आता ." संकेत हसत तिला दरडावल्यासारखं बोलला. 

दोघे ही बिल्डींगमधून बाहेर पडले. संकेतने रिक्षा बोलावली. दोघे रिक्षात बसून निघाले. सुरुचीने संकेतला विचारलं,

" कुठे चाललोय आपण..?"

" फार लांब नाही. इथे जवळच."

" हो पण रिक्षा केली आहे म्हणजे थोडं लांबच ना. आई रागावतील."

" नाही रागावणार.!" आणि संकेत हळूच सुरुचीच्या कानात बोलला, " आपण डॉक्टर कडे जातोय म्हणून सांगितलं आहे. आठवतय ना..?"

सुरुचीने लाजून मान हलवली. थोड्याच वेळात दोघेही त्यांच्या इथल्या खाऊगल्लीजवळ पोहोचले. रिक्षातून उतरून दोघे ही एका स्टोल पाशी थांबले.

" बोल..! काय खाणार..?" संकेत बोलला.

" तुम्हाला आवडेल ते..!"

" आज वाढदिवस कुणाचा आहे..?"

" माझा..!"

" मग तुझ्या आवडीचं खायचं..!"

" अहो ऐकना..! घरी पण जेवायचं आहे."

" मग काय ? तू खा इथे हवं ते हवं तेवढ. घरचं घरी बघू..!"

" ठीक आहे. मग एक प्लेट पाणीपुरी घ्या..!"

" हे काय..! वाढदिवसाला पण पाणी पुरी..? तुम्हा बायकांना दुसरं काही आवडत नाही का..?"

सुरुची हसली आणि म्हणाली,

" असं काही नाही. मी पाणीपुरी बोलले कारण कमी खायचंय . घरी जेवायचं आहे ना..!"

" ठीक आहे..! " संकेतने दोन प्लेट पाणी पुरी ऑर्डर केल्या. दोघांनीही एक एक प्लेट पाणीपुरी खाल्ली.

" थॅंक्यु..!" सुरुची संकेतला बोलली.

"बस..! फक्त पाणीपुरीने थॅंक्यु..?"

" तसं नाही...!"

" मग कसं..?"

" अहो..! तुम्ही मला बाहेर घेऊन आलात एवढं पुरेस आहे."

" तू पण ना..!" अस बोलत बोलत संकेतने पाणीपुरीचे पैसे  दिले आणि दोघे तिथून निघाले. 

" आता कुठे जायचय..?"

" आता मूव्हीला...!"

" काय..? नको नको...! आई......"

" हो हो.! किती घाबरतेस.? नाही जात आपण मूव्हीला. घरी जाऊया..!" सुरुचीच वाक्य तोडत संकेत बोलला.

" हां...!" सुरुची हसली.

" हे घे..!" असं बोलत संकेत एक रंगीत कागदात व्यवस्थित गुंडाललेला  छोटा बॉक्स तिच्या हातात दिला.

" हे काय..?" सुरुची आश्चर्याने बोलली.

" गिफ्ट.! तुझ्यासाठी..! घरी जाऊन बघ..!"

" ओह..! थॅंक्यु...!"

दोघे ही गप्पा मारत बिल्डींगजवळ आले. आईने काही विचारलं तर काय सांगायचं हे ठरवून दोघे ही त्यांच्या रूम समोर आले आणि दरवाजाची बेल वाजवली.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now