A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/home/irablogging/public_html/system/cache/irablog_session95e0c9a7221186b77463e80f2dcf0afe931dee86cb8571533ae230446b50038eb633bf7d): failed to open stream: No space left on device

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 176

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_start(): Failed to read session data: user (path: /home/irablogging/public_html/system/cache)

Filename: Session/Session.php

Line Number: 143

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

She is alone and she survive ( Episode Tenth )
Oct 31, 2020
विनोदी

एकटी 'ती', अनं सावरली ( भाग दहावा )

Read Later
एकटी 'ती', अनं सावरली ( भाग दहावा )

संकेतच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. त्याला अस हतबल झालेलं पाहून सुरूचीने त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला. त्याचा एक तळहात तिच्या दोन तळहातात घेऊन ती म्हणाली,

" मला माफ करा..! तुम्हाला असं म्हणाले. पण माझा बोलण्याचा उद्देश तसा न्हवता.!"

संकेत स्वतःचे अश्रू फुसतं स्वतःलाच सावरू लागला.

" अहो..! ऐकताय ना..? "

संकेतने सुरुचीकडे पाहून होकारार्थी मान डोलावली.

" मी तुम्हाला चुकीचं ठरवत नाही आहे. तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता, तो मी जाणून आहे. पण त्याबद्दल तुम्ही आईंना लगेच बोलायला नको हवं होतं. म्हणून मी मगाशी तुम्हाला थांबवायचा प्रयत्न करत होते..."

संकेत जरा शांत झाल्यासारखा दिसतं होता. सुरुची त्याच्या बाजूला बसली.

" तुम्ही असं लगेच आईंना बोलाल अस मला वाटलं न्हवतं. आपण पुढे काय करायचं ह्याचा आपण दोघांनी पहिले विचार करायला हवा होता की नाही..? तो ठरल्यावर मग तुम्ही आईंना समजवायला हवं होतं. त्यात त्या काही म्हणाल्या असत्या तर तुमच्या कडून उत्तर तयार असतं ..!"

संकेतला ही त्याची चूक कळून आली. भावनेच्या भरात तो असा गहन विषय एका संभाषणात पूर्णत्वास न्यायला निघाला होता. पण त्यात तो फसला आणि खचला. सुरुची म्हणते तसं आपण आधी दोघांनी ह्यावर विचार करणं गरजेचं होतं. कारण ह्यात त्या दोघांच्या घेतलेलाच निर्णय अंतिम होणार होता. 

" पण मी तरी काय करू..! आई जे बोलली ते मला पटलं नाही. तेच्या विचाराने मला एवढ टेन्शन आलं की मी ऑफिसमध्येही त्याच विचारात होतो. मी आधीच काही ठरवून आईला बोललो नाही. पण मी आता घरी आल्यावर तिचं वागणं पाहिलं आई न राहून मी तिला समजवायला गेलो.!"

" हो ..! मला कळतंय ते..! मला समजलं होत की तुम्ही कितीही समजवल तरी त्या समजून घेण्याच्या मनस्थिती नाहीत..! म्हणून मी तुम्हाला थांबवत होते." सुरुची त्याला बोलली.

" ते मला समजलंच नाही..! माफ कर..!"

" माझी का माफी मागताय..?"

" मी माझ्या मनातलं आईला बोललो आणि ते सगळं तू मला सांगितल आहे असा तिचा समज झाला. तिने तुलाच दोषी ठरवलं..!"

" हं..! आता मला त्यांच्या बोलण्याबद्दल काही वाटतं नाही. मला मुलं होत नाही तर मला हे सहन करावंच लागणार..! पण आता तुमच्या आईंसमोर मी अजून वाईट झाले.."

" असं नको बोलूस..! मी आईची माफी मागेन आणि तिला  समजावून सांगेन की ह्यात तुझी काही चूक न्हवती." 

" त्या नाही समजून घेणार..! तुम्ही आतापर्यंत तुमच्या आईंना कधी अस प्रतिउत्तर दिलं नाही आणि आता असा अचानक तुमच्यात बदल झालेला पाहून त्या ह्यात मलाच दोषी ठरवणार हे मी गृहीत धरलं आहे..!"

संकेतने एवढा विचार केलाच न्हवता. आपली बायको किती पुढचा विचार करून ठेवते.? आपण तिच्याबरोबर बोलून पुढचं पाऊल टाकायला हवं होतं. खरचं आपण चुकलो.

" सुरुची..?" संकेतने आता सुरूचीचा हात हातात घेतला.

" हं..! बोला..!"

" तू घेशील त्या निर्णयात मी तुझ्याबरोबर असेन. मी तुला न विचारता अस करून चूक केली. आता परत असं नाही होणार..!"

सुरुची शांत होती.

" सुरुची.. बोल ना..!"

" मी काय बोलू..? तुम्ही माझे पती आहात. तुम्ही जो निर्णय घ्याल त्यात मी तुमच्या सोबत असेन. त्या तुमच्या आई आहेत. त्या तुमच्या भल्याचा विचार करणार..!"

" अस नको बोलूस..! ती माझ्या भल्यासाठी काहीही सांगो पण मला ते पटायला हवं ना..! मला नाही पटलं तर मी तिला नाहीच बोलणार..!"

" अशाने तुमच्या दोघात दुरावा निर्माण होईल. मग मी तुमच्या आयुष्यात असून सुद्धा काय फायदा..?"

" माझ्या फायद्यासाठी तू माझ्या आयुष्यात आहेस का..?"

" असं नाही. पण मी तुम्हाला मुलं देऊ शकत नाही. मग मी तुमच्या आयुष्यात राहून तुमची आई तुमच्यापासून दूर होणार असेल तर मी कशाला राहू इथे..!" 

" मग तू मला सोडलंस तर काय होणार आहे..?"

" मग तुमची आई आणेल की तुमच्यासाठी नवीन बायको..!"

" आणि हे सगळं तू सहन करणार..?"

" हो..! तुमच्यासाठी..!"

" अस बोलतेस! मग मी काय दुसरं लग्न करायला तयार होणार आहे का..?"

" मला नाही माहीत. पण मला वाटतं तुम्ही दुसरं लग्न करावं.!" असं बोलून सुरुची बेडवरून उठली आणि किचनकडे जाऊ लागली.

" ठीक आहे. बघ .! विचार कर..!" संकेत जरा मस्करीत बोलला.

" मी विचार करूनच बोलते. तुम्ही तुमचं बघा..!" 


सुरुची किचनमध्ये जाऊन जेवण करायला लागली. संकेत फ्रेश होऊन हॉलमध्ये आला. त्याची आई टीव्ही बघत बसली होती. पण दररोजपेक्षा टीव्हीचा आवाज आज जरा कमी होता. संकेतला हॉलमध्ये आलेलं पाहताच त्यांनी टीव्हीचा आवाज वाढवला. संकेत त्याच्या आईकडे पाहत होता. संकेतच्या आईने संकेतकडे पाहिलं आणि जरा हसली. संकेत आश्चर्यचकित झाला. आता एवढ होऊन सुद्धा आई आपल्याकडे बघून का हसली.? तो कोड्यात पडला.!

रात्रीची जेवणं झाली. सुरुची सगळा पसारा आवरत होती. संकेत आणि त्याची आई हॉलमध्ये बसले होते. संकेतच्या आईने न राहवल्यासारखं होऊन संकेतला प्रश्न केला,

" काही विचार केलास का..?"

" नाही अजून.!" आईने अनपेक्षित वेळी विचारलेल्या प्रश्नाला त्याने असच उत्तर दिलं.

" मग तुझ्या बायकोबरोबर बोल.! तीला विचार काय करू.!" 

आपल्या आईच्या तोंडचं हे वाक्य ऐकून संकेतला त्याच्या कानांवर विश्वास बसत न्हवता. आई असं बोलली की तुझ्या बायकोला विचार. अशक्य..! आईला माहीत आहे की माझी बायको काय कोणतीही स्त्री तिच्या नवऱ्याला कायमची सोडायला कशी तयार होईल. ती असच बोलणार की मला अस नका सोडू. आईच्या मनात नक्की काय आहे...? संकेत विचारात पडला.


सुरुचीने तिचं काम आवरलं होत आणि ती बेडरूममध्ये गेली होती. संकेतची आई अजून टीव्ही बघत बसली होती. संकेतही कधी मोबाईल तर कधी टीव्ही बघत हॉलमध्येच बसून होता. रात्रीचे ११ वाजले आणि संकेतच्या आईने टीव्ही बंद केला आणि संकेतकडे पाहून बोलली,

" आज झोप नाही आली का..?"

" हं..! हो. आली आहे..!"

" मग जा झोप..! ११ वाजले."

संकेतने मोबाईलमध्येच पाहिलं. खरचं की..! ११ वाजून गेले होते. तो सोफ्यावरून उठला आणि बेडरूममध्ये गेला. बेडरूममध्ये पाहतो तर काय..? सुरुची बेडवर झोपुन गेली होती. संकेत तिच्याजवळ गेला. सुरुची कुशीवर झोपली होती. तिच्या गालावर आलेल्या केसांवर त्याने हळूच फुंकर मारली. तिच्या गालावरचे केस अलगत उडाले. काही तिच्या मानेवर गेले आणि काही तिथेच राहिले. संकेतने मारलेल्या त्या फुंकरमुळे सुरुचीला जरा गुदगुल्या झाल्या असाव्यात की काय तिने मान जरा आखडली आणि परत आधी होती तशी केली. संकेतला जाणवलं की सुरुची खरचं झोपली आहे. मग त्याने बेडरूमची लाईट बंद केली आणि तो ही झोपी गेला.


सकाळी नेहमी प्रमाणे सुरुचीने लवकर उठून सगळी आवराआवर केली. केर काढला, आंघोळ करून देवपूजा केली. नंतर संकेतचा डब्बा बनवून नाष्टा ही बनवला. ह्यामध्ये संकेत उठून आंघोळ करून ऑफिसला जायची तयारी करून किचन मध्ये आला.

" आज इथे..?"

" हां..! नाष्टा दे.! माझा आणि आईचा पण."

सुरुची हसली. आज काय हे अपरित. तिने दोन प्लेटमध्ये नाष्टा भरला आणि संकेतकडे प्लेट दिल्या. संकेत प्लेट घेऊन बाहेर गेला. त्याने एक प्लेट आईला दिली आणि स्वतः नाष्टा करू लागला. काय माहीत पण आईच्या बोलण्यामुळे वाटतं संकेत मध्ये हा बदल दिसत होता. संकेतने नाष्टा संपवला आणि ऑफिसला जायला घराबाहेर पडला.