Jan 19, 2022
नारीवादी

एकटी 'ती', अनं सावरली ( भाग सोळावा )

Read Later
एकटी 'ती', अनं सावरली ( भाग सोळावा )


" दादा...!" सुरुची एवढ बोलून थोड्यावेळाने परत बोलली, " मी आई नाही होऊ शकतं.!" 

" काय...?" दादा जरा दचकून बोलला आणि लगेच त्याने स्वतःला सावरलं. " हे काय बोलतेयस तू..?"

" हो दादा..! मी आई नाही होऊ शकतं..!" सुरुची रडतच बोलत होती.

दादाला आता ह्यापुढे काय बोलावं हे सुचतं न्हवतं. सुरुची जे बोलली त्यावर त्याचा विश्वास बसत न्हवता. पण सुरुची बोलतेय म्हणजे ते खरंच असणार, त्याला काहीतरी आधार असणार. आता तिला हे कसं समजलं, कधी समजलं हे विचारण्यात काही अर्थ न्हवता. तरी त्याने सुरुचीला विचारलं,

" तुम्ही डॉक्टरकडे गेला होतात का..?"

" हो दादा..! कितीतरी डॉक्टर झाले, साधू झाले, मी उपवास केले. पण जे आहे ते नाही बदलणार. "

" तरीही देवावर विश्वास ठेव.! तो नक्की काहीतरी मदत करेल.." दादाने सुरुचीला धीर यायला असं म्हटलं.

" देव कधी मदत करेल..? त्याने माझ्या नशिबात आई होणं आधीपासूनच नाही लिहिलं आहे, तर आता काय चमत्कार होणार आहे..?" सुरुची वैतागून म्हणाली.

" पण आई होणं सर्वस्व नाही ना..?" दादा तिला समजावत म्हणाला.

" हो..! पण एका स्त्रीसाठी आई होणं फक्त तीच्या स्त्रीत्वास पूर्णत्व प्राप्त करून देत नाहीत, तर तिच्यामुळे एक कुटूंबाला त्यांचा जिवलग, त्यांचा वारसदार प्राप्त करून देते."

सुरुचीच्या ह्या वाक्यांनी तिचा दादा जे समजायचं आहे ते समजून गेला. सुरुचीच्या मनावर खोल जखम झाली होती. तिच्या सासुकडून नेहमी होणारी तिची अवहेलना तिला नेहमी  ह्याची जाणीव करून देत होती की ती आई होणार नसेल तर तिला कोणत्याही पुरुषाच्या आयुष्यात त्याची अर्धांगिनी म्हणून जगणं योग्य नाही. हे विचार एका एकुलत्या एक मुलाच्या आईचे म्हणून योग्य आहे असं आता सुरुचीलाही वाटू लागले म्हणून की काय तिने स्वतःच संकेतच्या आयुष्यातून निघून जाण्याचा निर्णय घेतला. त्याच विचारात ती दादाकडे आली. ती तिच्या दादाकडे आली खरी पण तिथेही असं किती दिवस थांबणार. कधीना कधी त्यालाही आपलं मत सांगावं लागणार आणि त्यापुढे हे ही सांगावं लागणार की मी पुढे माझं आयुष्य कसं जगणार आहे. शेवटी तिच्या भावाचाही संसार आहेच की.

सुरुचीच्या दादाने पुन्हा सुरुचीला जवळ घेतलं आणि म्हणाला,

" तुला काय त्रास होत असेल ह्याची मला जाणीव आहे. ह्यामध्ये मी काय आता देवाशिवाय कुणीही काही करू शकत नाही. पण तुझा भाऊ म्हणून या पुढे तू घेशील त्या निर्णयात मी तुझ्या सोबत असेन."

" थॅंक्यु दादा..!" सुरुची हुंदके देत म्हणाली.

" पण तू एक चूक केलीस असं मला वाटतं..!"

" कोणती दादा..?" सुरुची दादापासून थोडं लांब होत बोलली.

" तू संकेतला न सांगता अस घरातून निघून नाही यायला पाहिजे होत..!"

दादाच्या ह्या वाक्याने सुरुची गंगारली. ह्याला कसं कळलं. अच्छा..! पल्लवीने केलेल्या कॉलमूळे दादाला काही समजलं वाटतं. तसं सुरुचीने सावरून घेत म्हटलं,

" मी इकडे येताना त्यांना कॉल केला होता. त्यांनी कॉल उचलला नाही."

" मग तू त्याला परत कॉल केला नाहीस..?"

" हं..! नाही."

" का..?"

आता दादाच्या ह्या 'का?'ला सुरुची खोटं उत्तर देऊ शकली असती. पण तिने तसं केलं नाही. खोटं उत्तर देऊन तात्पुरती वेळ मारून गेली असती, पण पुढे काय..? म्हणून तिने शांत राहणं पसंत केलं.

" तुला संकेत काही बोलला की....."

 दादाचं वाक्य पूर्ण होऊन न देताच सुरुची बोलली,

" नाही दादा.! ते काही नाही बोलले. ते मला खूप समजून घेतात. ते माझी काळजी घेतात. माझ्या वाढदिवसाला ते मला बाहेर खायला घेऊन गेले, ते ही त्यांच्या आईंबरोबर खोटं बोलून.." सुरुची संकेत बद्दल बोलतच होती. पण तिचा दादामध्येच बोलला,

" म्हणजे तुझी सासू...!"

सुरुची हे ऐकून शांत झाली. सुरुचीच्या शांत बसण्याने तिचा दादा जे समजायचंय ते समजून गेला आणि बोलला,

" तरी तू संकेतबरोबर एकदा समोरासमोर बोलून घ्यावं अस मला वाटतं..!"

सुरुची काही बोलली नाही. सुरुचीच्या दादाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तो त्या रूम मधून बाहेर निघून गेला. सुरुची विचार करू लागली. आपण आपल्या मनाशी काही ठरवून, काही ठाम निर्णय घेऊन त्या घरातून बाहेर पडलो आहे. आता दादा बोलतोय तस खरंच ह्यांच्याबरोबर बोलून बघावं का..? पण त्याने काय होणार आहे..? ते काय माझ्यासाठी त्यांच्या आईंबरोबर भांडायला हवेत का..? ह्याने काय सिद्ध होणार आहे..? पण एक होईल.! आपण ह्यांच्याबरोबर बोललो तर किमान आपण त्यांच्यावर रागावून इथे आलो नाही हे तरी त्यांना सांगता येईल. त्यांना हे ही सांगता येईल की आता परत मला तुमच्या आयुष्यात यायचं नाही आहे...! असं बोलणं अवघड जाणार होत, पण मनावर दगड ठेऊन हे बोलणं गरजेचं होतं. फक्त संकेतच्या सुखासाठी न्हवे तर स्वतःला होणाऱ्या मानसिक त्रासापासून तरी सुटका होईल. आपल्यात दोष आहे आणि तो कधीही निघून जाणारा नाही आहे. पण एखादी व्यक्ती जर त्या दोषावरून आपल्याला वारंवार हिणवत असेल तर ते आपण किती सहन करायचं..! सुरुची अजून तिथेच बसून होती. 

संकेत ऑफिसमधून घरी आला. त्याची आई त्याची वाट पहातच होती. संकेत फ्रेश व्हायला गेला तस त्याच्या आईने त्याच्यासाठी चहा ठेवला. संकेत फ्रेश होऊन बाहेर आला आणि हॉल मध्ये येऊन सोफ्यावर बसला..

" हा घे चहा..!" त्याच्या आईने त्याच्याकडे चहाचा कप देत म्हटलं.

संकेतने चहाचा कप हातात घेतला. तो चहा पिऊ लागला. त्याची आई त्याच्याकडे असा आशेने बघत होती की तो स्वतःहून काही बोलेल, पण संकेतचा चहा पिऊन झाला तरी मध्ये तो काहीच बोलला नाही. शेवटी त्याची आई बोलली,

" कसा गेला दिवस ऑफिसमध्ये...?"

" ठीक ..!" संकेत अजून ही त्याच्या आईबरोबर नेमकच बोलत होता.

" सुरुचीचा कॉल आला होता का..?" 

" नाही..!"

" मग तू करून बघ..! तू केला होतास का..?"

" हो..! मी केला होता कॉल. ती तिच्या दादाकडे गेली आहे."

" हं..! मग सांगून जायला काय झालं होतं तिला..!" संकेतची आई रागावून बोलली.

" काय सांगायचं होतं..? आणि ती तुला सांगून जाणार होती..? तूला तिने सांगितलं असतं तर तू काय केलं असतं..? " संकेतने इतकावेळ दाखवलेला सय्यम सोडला. 

" असं का बोलतोयस..? तिला जाऊदे तिला जायचं आहे तिकडे.! मी कशाला तिला अडवेन. "

" हो..! तू कशाला तिला अडवशील. तुला तर वाटतं तिने घर सोडून जावं..!" संकेत वैतागून बोलला. " मला आता ह्या विषयावर तुझ्याबरोबर नाही बोलायचं आहे..!"

" नाही बोलून काय करणार आहेस..?"

" काय करणार आहे म्हणजे..?"

" तुला जे समजलं नाही, ते तिला समजलं. तिला समजलं की तिच्यात खोटं आहे. म्हणून ती शहाण्यासारखी इथून निघून गेली. आता तरी तिचा विचार सोड..!"

" काही पण बोलू नकोस आई..!" संकेत एवढ बोलत बेडरूममध्ये गेला. त्याने दार बंद केलं. 

आई काय म्हणाली..? ती शहाण्यासारखी इथून निघून गेली.! म्हणजे सुरुचीने आपल्या आयुष्यातून निघून जायचा निर्णय घेतला. नाही नाही..! कसं शक्य आहे. ती माझ्याबरोबर बोलली असती. मी असं कसं तिला जाऊन देईन. पण आई बोलते तसा सुरुचीने खरंच विचार केला नाही ना..? आपल्याला लवकरात लवकर सुरुचीला भेटायला जायला हवं. तिच्याबरोबर बोलल्याशिवाय आपल्याला खरं काय आहे ते समजणार नाही. तिच्या तोंडून ऐकल्याशिवाय आपल्याला काहीच खरं वाटणार नाही.

संकेतने सुरूचीचा नंबर डायल केला. सुरुचीच्या नंबर वर कॉल जात होता. पण सुरुची कॉल उचलत नव्हती. संकेतने पुन्हा कॉल लावून पहिला. पण पर तेच. त्याला राहवलं गेलं नाही. त्याने तिच्या दादाला कॉल लावला. दादाच्या मोबाईलवर कॉल आला. दादाने पाहिलं की संकेतचा कॉल आला आहे. त्याने कॉल उचलला आणि घराच्या बाहेर आला,

" हॅलो..!"

" हॅलो..! कसे आहात..?" संकेतने प्रश्न केला.

" आम्ही सगळे मस्त. तुम्ही कसे आहात..? "

" ठीक ..! "

" आज कशी काय आठवण झाली..?" सुरुचीच्या दादाला समजलं होत की सुरुची संकेतचे कॉल घेत नसेल. म्हणून त्याने आपल्या नंबर वर कॉल केला आहे.

" सहज..! सुरुची आहे का तिथे..?"

" सुरुची आत किचन मध्ये आहे. तिच्या वहिनीची मदत करतेय..!"

" अच्छा..! तिला मी कॉल करत होतो. तिने कॉल उचलला नाही, म्हणून विचारलं."

" मग तिला कॉल देऊ का.?"

" प्लिज ..!! बोलवा तिला..!"

" ठीक आहे..!" असं बोलून संकेतच्या दादाने सुरुचीला आवाज दिला,

" कोमल..!"

सुरुची बाहेर आली. 

" काय दादा..!"

तुच्या दादाने तिला खुणाऊन सांगितलं की आवाज कमी कर. तिला जवळ बोलावलं आणि तिच्या कानात बोलला,

" संकेतचा कॉल आहे. त्याच्याबरोबर सांभाळून बोल.! काही महत्त्वाचं बोलायचं असेल तर त्याला बोल, आपण भेटून बोलू.! त्याला इथे बोलावून घे..!"

दादाच्या ह्या सल्ल्याने सुरुची नाराज झाली. संकेतला इथे बोलावून आपण वेगळं काय सांगणार आहोत. जे आहे ते कॉलवर सांगू त्याला. सुरुचीने मोबाईल कानाला लावला.

" बोला..!"

" सुरू..! तुझ्या नंबर वर मी कॉल करत होतो."

" हं .! मोबाईल सायलेंटवर आहे. मी पण काम करत होती."

" बरं..! ती घरी कधी येणार आहेस..?"

" आता हे काय अचानक..? तुम्हीच बोलला होतात ना,की गेली आहेस तर चार-पाच दिवस रहा म्हणून..?"

" हो ग..! पण तू मला सांग, तू कधी येणार आहे..? चार दिवसांनी की पाच दिवसांनी..?" संकेतने असा प्रश्न मुद्दाम विचारला, कारण त्याला हे जाणून घायचं होत की सुरुची जर खरचं कायमच निघून जायच ठरवून गेली असेल तर ती निच्चीत दिवस सांगणार नाही.

" आताच कसं सांगू..!"

" का..? अजून ठरवलं नाहीस..?"

" हं..!"

" मग मी तिकडे येतो तुला न्यायला..!"

" या..! "

" खरचं..!"

" हो..! या तुम्ही..!"

" बरं..! मी उद्याच येतो...! चालेल ना..?"

" हो..!"

" ओके..! चल मग..! ठेवतो फोन. उद्या भेटू..!"

" हो.."

" बाय.."

" हं." समोरून संकेतने कॉल कट केला. सुरुचीने संकेतला यायला तर सांगितलं होतं. पण ती त्यालाबरोबर घरी परत येणार नाही आहे, हे मात्र त्याला बोलली न्हवती. आपण   त्याच्याबरोबर गेलो नाही तर त्याची मानसिकता कशी होईल ह्याची तिला जाणीव होती. पण ती तिची शक्यता होती. आपण केलेल्या विचारावर आपण ठाम राहिलो तर तो त्याचं काय ते ठरवेल. पण आपण त्याच्याशिवाय राहू शकतो..? विचार करणं वेगळं आणि ती प्रत्यक्षात अनुभवणं वेगळं ..! आपण वेगळं होऊ पण पुढे काय.? असे अनेक विचार सुरुचीच्या मनात डोकावू लागले.

सुरुची तिच्या विचारात मग्न असताना तिच्या दादाची मुलगी तिथे आली. सुरुची तिच्याच विचारात असताना तीने आवाज दिला,

" आत्तु..!"

तिच्या आवाजाने सुरुची भानावर आली. मुक्ताला समोर पाहताच तिने तिला जवळ घेतलं. 

" काय ग..? झाले खेळ खेळून..?"

" हो..! पण मला अजून खेळायचं आहे..!"

" मग खेळ ना..!"

" मी एकटी नाही खेळणार..! तू पण चल माझ्याबरोबर..!"

" मी ..? मी कुठे येऊ..?"

" आपण बाहेर जाऊया खेळायला..!"

" नाही ग..! बाहेर नको..! आणि मला आता कामं आहेत की नाही...?"

" अनं..! अस काय करतेस.! चल ना..!"

" नाही ग..! आता नाही..!" असं बोलत सुरुचीने मुक्ताला उचलून घेतलं.

" मग आपण ना मला सुट्टी असेल ना तेंव्हा गार्डनला जाऊया..!" मुक्ता सुरुचीला बोलली.

" गार्डनला..? पण तुझ्या शाळेला सुट्टी भेटायला अजून चार दिवस आहेत..!"

" हो..! आपण तेंव्हा जाऊ..! किंव्हा त्या नंतरच्या सुट्टीला जाऊ..!"

सुरुची तिच्या निरागसतेकडे बघत राहिली होती.

" मला माहित आहे. तू आता आमच्याकडे राहणार आहेस..! आता आपण मज्जा करू..!" 

" तुला कोण बोललं, मी तुमच्याकडे राहणार आहे..?"

" सिक्रेट आहे..! पण तू मला कॅडबरी देणार असशील तर मी तुला सांगेन...!"

" हो ..! दोन कॅडबरी देईन..! आता सांग बघू..!"

मुक्ताने सुरुचीच्या कानाजवळ तिचे होट नेले आणि बोलली,

" पप्पा ना मम्मीला सांगत होते..! ते मी ऐकलं..! पण हे आपलं सिक्रेट आहे हां..! "

" हो..! सिक्रेट हां..! जा आता खेळायला..!" 

सुरुचीने मुक्ताला खाली उतरवलं तसं मुक्ता पळत बाहेर खेळायला गेली. आपल्या दादाला आपल्या मनातलं कसं कळतं, त्याने कोणतीही लपवाछपवी न करता वहिनीला आधीच कसं सांगून ठेवलं.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now