एकटी 'ती', अनं सावरली ( भाग सतरावा )

This is a created story by writer.

आज संकेत सुरुचीला भेटायला म्हणजेच तिला घेऊन यायला तिच्या दादा कडे जाणार होता. दिवस सुट्टीचा न्हवता, पण संकेत सुट्टी घेणार होता. सकाळ झाली होती. संकेतची आई नेहमीप्रमाणे लकवर उठून संकेतच्या डब्ब्याच जेवण बनवत होती. नेहमीप्रमाणे संकेतच्या मोबाईलमध्ये अलार्म वाजला. त्या आवाजाने संकेत जागा झाला. त्याने अलार्म बंद केला. संकेत बेडवरच उठून बसला. त्याने डोळे चोळले आणि इकडे तिकडे पाहू लागला. आज लवकर उठायचं न्हवतं, पण अलार्म चालू राहिला. त्यामुळे संकेत स्वतःवरच वैतागला. तो थोडावेळ तसाच बेडवर बसून होता. बराच वेळ झाला तरी संकेत अजून आंघोळीला गेला नाही म्हणून त्याची आई बेडरूममध्ये आली आणि संकेतला बोलली,

" काय झालं..? झोप झाली नाही का..?"

" झाली. "

" मग उठ चल..! नाहीतर तुला ऑफिसला जायला उशीर होईल..!"

" नाही. मी ऑफिसला नाही जाणार आहे..!"

" का बाळा..? तुझी तब्येत ठीक आहे ना..?"

" हो आई.! "

" मग आज सुट्टी का घेतोयस..?" 

संकेतने विचार केला की आई सारखे सारखे प्रश्न विचारत राहणार..! त्या पेक्षा आपण हिला खरं सांगून मोकळं होऊ.

" मी सुरुचीच्या दादाकडे जातोय. सुरुची त्याच्याकडे गेली आहे."

" हं..! त्याने तुला बोलावलं ना..?"

" नाही..! तो का बोलवेल मला..?"

" मग..! त्याची लग्न झलेली बहीण अशी त्याच्याकडे न सांगता राहायला गेली तर तो काय शांत बसेल.!"

" तो असा काही विचार करत नाही आहे. मीच त्यांना कॉल करून सांगितलं की मी तिथे येतोय..!"

" पण कशाला..?"

" कशाला म्हणजे..? सुरुचीला आणायला जातोय..!"

संकेत असं बोलला आणि त्याच्या आईचा चेहरा रागाने फुगला. त्यांना तसा संकेतचा राग आला होता, पण समोर कसा दाखवायचा म्हणून त्या बोलल्या,

" असं कुठे जाणार होतास तर मला रात्री सांगायचं तरी..! मी सकाळी लवकर उठून एवढ जेवण बनवलं..! आता तू बोलतोयस ऑफिसला जाणार नाहीस..!"

" सॉरी आई..! पण रात्री तुला सांगायला विसरलो.! " संकेत एवढ बोलला,पण त्याच्या सॉरी किंवा अजून कोणत्याही शब्दांनी त्याच्या आईला बरं वाटणार न्हवतं. त्याची आई बेडरूममधून निघून गेली. संकेत बेडवरून उठला आणि आंघोळीला गेला. आंघोळ करून आल्यावर हॉलमध्ये येऊन बसला. त्याची आई बहुतेक किचनमध्येच होती. आईला आलेला राग संकेतला जाणवतं होता. म्हणून तो स्वतः किचनमध्ये गेला. त्याची आई किचन ओठ्यावरची आवराआवर करत होती. संकेतने पाहिलं तर गॅसवर चहाचं भांड होत. संकेतने आईला बोलला,

" सॉरी आई..! तू जा बाहेर बसं..! मी इथलं आवरतो आणि चहा घेऊन येतो."

" राहूदे..! बायकांची काम पुरुषांनी केलेली बरं न्हवे..! "

" त्यात काय..! एवढ आवरायचं तर आहे..!" असं बोलून त्याने आईचा हात पकडला आणि तिला किचनच्या बाहेर घेऊन आला. त्याची आई हॉलमध्ये जाऊन बसली.

संकेतने किचनमध्ये थोडी आवराआवर केली आणि लगेच दोन कपमध्ये चहा घेऊन हॉलमध्ये आला.चहाचा एक कप आईकडे दिला. त्याच्या आईने तो हातात घेतला खरा पण तीने परत तो टेबलवर ठेवला. संकेतने मात्र काहीच बोलला नाही. तो चहा पिऊ लागला. बराच वेळ शांतता होती. 

" मी दुपारी जेऊन निघेन..!" संकेत मध्येच अचानक आईला उद्देशून बोलला.

" दुपारी..?" त्याची आई शांतपणे बोलली.

" हो..!"

" तिकडे राहायला जाणार आहेस..?"

" नाही ग आई..! मी संध्याकाळी लगेच निघणार आहे..!"

" मग आताच थोड्यावेळाने निघ..! दुपारी निघालास तर यायला उशीर होईल..!"

" हो ,पण तू जेवण बनवलं आहेस. ते तसच राहील..!"

" राहूदे..! आता एक दिवसानी काय होतंय..!"

" ठीक आहे..!" संकेतला बरं वाटलं. कारण त्याने सकाळी निघायचं ठरवल होतं. पण आईने तर जेवण बनवून ठेवलं होतं, ते ही त्याच्या चुकीमुळे. ह्याच कारणाने तो दुपारी निघणार होता. 

संकेत सोफ्यावरून उठला. आज कधी न्हवतं ते चहाचा कप घेऊन तो किचनमध्ये गेला. त्याची आई आता थंड चहा पीत होती. संकेत बेडरूममध्ये गेला आणि निघायची तयारी करू लागला. तयारी करून तो हॉलमध्ये आला. संकेतची आई अजून हिरमुसला चेहरा करून हॉलमध्येच बसून होती. संकेत आईला पाहून बोलला,

" आई..! येतो मी..!"

" हं.." संकेतच्या आईने हळूच हुंकार भरला.

संकेतने शूज घातले आणि दरवाजा उघडून घराबाहेर पडला.  सुरुचीला भेटायचं आणि तिला घेऊन यायचं फक्त ह्या विचारात संकेत बुडाला होता.त्याचा सुरुचीच्या दादाकडे जातानाचा ३ तसाचा प्रवास ही त्याला आता खूप लांब वाटत होता. 

शेवटी संकेत सुरुचीच्या दादाच्या घरी पोहोचला. त्यांचं घर शहरातील मध्यवर्ती भागात न्हवतं. शहराच्या एक बाजूस काही भाग असा होता जो शहरासारखा गजबजलेला न्हवता. तिथे लोकवस्ती बरीच होती. पण तेथील राहणाऱ्या रहिवाशांना त्यांचं वेगळपण जपलं होत. शहरीकरणात त्यांनी बांधकाम व्यावसायिकांना टोलेजंग इमारती उभारायला जमिनी न देता त्यांची जुनी मांडणीची घर जशीच्यातशी पुनःबांधणी करून घेतली होती. त्यामुळे प्रत्येक घराला स्वतःच वेगळेपण होतं. काहींच्या घरासमोर आंगणं होती, काहींच्या घरांना परसावनं होती. सुरुचीच्या दादाचं ही घर त्यातलं एक. घरासमोर बऱ्यापैकी आंगण होतं. संकेत त्यातून आत आला. दरवाजा उघडाच होता,परंतु दरवाजाला पडदा असल्याने आतील काही दिसतं न्हवतं. संकेतने पडदा थोडा बाजूला करून दरवाजावर टकटक केलं. आत मधून चालल्यामुळे होणाऱ्या पैंजनांचा आवाज दरवाजाजवळ येऊ लागला. संकेत दरवाजापासून थोडा मागे झाला. आतून पडदा थोडा बाजूला झाला. संकेतने समोर पाहिलं तर एक छोटी गोंडस मुलगी पडद्यामागून त्याला डोकावून पाहत होती. संकेतला पाहताच तिने आतं धूम ठोकली. संकेतला काय बोलावं सुचलं नाही. त्यात त्याला आठवलं की ही सुरूचीची भाची म्हणजे तिच्या दादाची मुलगी असणार. पण तिचं नाव आठवतं नसल्याने त्याने तिला काही साद दिली नाही. मुक्ता मात्र धावत आत मध्ये गेली आणि ती तिच्या पप्पांना जाऊन बोलली,

" पप्पा..! बाहेर काका आले आहेत..!"

" कोण काका..?" सुरुचीच्या दादाने उलट प्रश्न केला. तरीही तो दरवाजाकडे जायला जागेवरून उठला होता.

" आतूचे काका आलेत...?" 

" आतूचे काका होय..!" मुक्ताने संकेतचा परिचय असा करून दिल्याने सुरूचीचा दादा स्वतःशीच हसला.

" हो..! तेच आहेत."

" मग तू त्यांना आत नाही बोलावलं..?"

मुक्ता आता मात्र काहीच बोलली नाही. सुरुचीच्या दादाने दरवाजावरचा पडदा बाजूला केला. समोर संकेतला होता. 

" अरे..! तू आहेस..! ये..! आत ये..!" सुरूचीचा दादा संकेतला उद्देशून बोलला. 

" नमस्कार..! " संकेत बोलला.

" कसा आहेस..?"

" मी ठीक. तुम्ही कसे आहात..?"

" आमचं चाललंय मस्त..!"

" काय ग .! मला ओळखलं नाहीस..?" संकेत मुक्ताच्या गालाला हात लावून बोलला. 

मुक्ता लाजून तिच्या पप्पांच्या मागे लपली.

सुरुचीच्या दादाने संकेतला बसायला सांगितले आणि स्वतः त्याच्या बाजूच्या खुर्चीवर बसला. मुक्ता संकेतकडे बघत तिथेच उभी होती. सुरुचीच्या दादा मुक्ताला बोलला,

" बाळा..! आतुला सांग, काका आले आहेत. त्यांना पियायला पाणी घेऊन ये..!"

मुक्ता लगेच धावत आतमध्ये गेली. तिने सुरूचीला जाऊन निरोप दिला. सुरुचीने ओळखलं की बाहेर संकेत आला आहे. संकेतसमोर जायला तिला संकोच वाटत होता. तिने ग्लासात पाणी भरलं, पण बाहेर कसं जावं ह्याचा विचार ती करत होती. हे गोष्ट तिच्या वहिनीने हेरली. मग ती सुरुचीला बोलली,

" तुम्हाला बाहेर जायला संकोच वाटतोय का..?"

"हं..! तसं नाही. मी जातच आहे." अस बोलून सुरुचीने ग्लास प्लेट मध्ये ठेवलं. पण परत ती थोडी थांबली. आता मात्र वहिनीने तिचं मन ओळखून तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि बोलली,

" राहूदे..! दे इकडे..!", असं बोलून तिने सुरुचीच्या हातातून प्लेट स्वतःकडे घेतली. " तुम्ही दोघे नंतर निवांतपणे बोला..!"

सुरूचीची वहिनी पाण्याचा ग्लास घेऊन बाहेर गेली.तिने संकेतला पाणी दिल. संकेत आणि सुरुचीच्या दादाने ओळखलं की सुरुची बाहेर का आली नाही. तरी सुरुचीच्या वहिनी सुरूचीची बाजू सांभाळत बोलली,

" त्या चपाती करतायत ना..! त्यांचे हात खराब आहेत..! म्हणून त्या आल्या नाहीत."

संकेत पाणी पियाला. सुरूचीची वहिनी पाण्याचं ग्लास घेऊन आतमध्ये गेली. काही वेळाने सुरूचीचा दादा संकेतला बोलला,

" बाकी काही विशेष..?"

" काही नाही.!"

संकेत तसा बोलका न्हवता. पण सुरुचीचा दादा त्याला बोलकं करत होता. ते गप्पा मारत बसले होते. तेवड्यावेळात जेवण बनवून झालं होतं. सुरुचीच्या वहिनीने येऊन तसं सांगितलं. मग संकेत हातपाय धुऊन आला. सुरुची हॉलमध्ये जेवणाची ताटं वाढत होती. संकेत खाली बसला आणि त्यांची नजरानजर झाली. सुरुचीला समोर पाहून संकेत सुखावला होता, तर सुरुचीच्या डोळे दाटून आल्यासारखे झाले होते. संकेत खूष होता कारण त्याला माहित होतं आता सुरुची आपल्यासोबत येणार आहे. पण सुरुची ह्या विचारात होती की आज आपण संकेतबरोबर जाण्यास त्याला नकार दिला तर ही आपली शेवटची भेट असेल. संकेतला असं नाकारणं योग्य होईल का..? हे असं घडतंय ह्यात त्याची कितपत चूक आहे, किंवा चूक आहे की नाही ह्याचा सुद्धा निकाल सुरुचीने लावला न्हवता. 

सगळेजण एकत्र जेवायला बसले. जेवण करत असताना संकेतला काही वाढताना होणारा संवाद हाच त्या दोघात झालेला संवाद होता. जेवण झाल्यावर दोघींनी सगळी आवराआवर केली. मग मुद्दामहून सुरूचीच्या वहिनीने मुक्ताला बरोबर आत घेऊन जाऊन सुरुचीच्या दादाला ही किचनमध्ये बोलावलं. त्यामुळे हॉलमध्ये सुरुची आणि संकेत दोघेच होते. तरी सुरुची किचनमध्ये आली. तसं सुरूचीची वहिनी सुरुचीला बोलली,

" जरा बाहेर थांबता का..? मला जरा ह्याच्यासोबत बोलायचं आहे..!"

" हो हो..! मी जाते बाहेर..!" असं बोलत सुरुची किचनमधून बाहेर आली.

सुरुचीच्या वहिनीने सुरुची आणि संकेतच बोलणं सुरू व्हावं म्हणून अस केलं होतं. पण सुरुचीच्या मनावर त्याचा वेगळाच परिणाम झाला. वहिनी असं मला बाहेर थांबायला का बोलली..? ते ही आजच, जेंव्हा संकेत घरी आला आहे..? वहिनीला असं काय बोलायचं आहे दादा बरोबर..? कदाचित ती दादाला हे संजवत नसेल ना की सुरुचीला संकेतबरोबर जायला सांगा म्हणून..? पण वहिनी असा विचार करत असेल..? असेल ही..! तिला कुठे माहीत आहे की मी काय भोगतेत..? तिचीही म्हणा काय चूक त्यात.! ती एका अर्थाने माझा संसार वाचवा म्हणून तर प्रयत्न करतेय..! सुरुची विचार करत हॉलमध्ये उभीच होती. संकेतने तिला हळूच आवाज दिला,

" सुरुची..!"

तेंव्हा सुरुची भानावर आल्यासारखी बोलली,

" हं...?"

संकेतने तिला इशारा करत त्याच्या बाजूला सोफ्यावर बसण्यास सांगितले. सुरुची त्याच्या बाजूला बसली. 

" कशी आहेस..?"

" हं..? ठीक..!"

" मी इथे आलेलं तुला आवडलं नाही वाटतं..?"

" नाही..! तसं काही नाही..!"

" बरं..! पण मला तसं वाटलं..!"

सुरुची काहीच बोलली नाही.

" तू निघायची तयारी केली आहेस ना..?" संकतने प्रश्न केला.

" हो..! म्हणजे नाही अजून..!" संकेतच्या ह्या प्रश्नाला काय उत्तर द्यावं ह्याचा निर्णय अजून तिने घेतलाच न्हवता. त्यामुळे तूच हो-नाही झालं.

" ठीक आहे ग..! थोड्यावेळाने तयारी करायला घे..! आपण अजून दोन तासानंतर निघू..! " 

सुरुची पुढे काही बोलली नाही. थोडावेळ इकडे तिकडे पाहत ती अचानक उठून तडक किचनमध्ये गेली. आत पाहते तर सुरूचीची वहिनी जेवणाची सर्व भांडी घासून किचन ओटा आवरत होती. दादा आणि मुक्ता एका बाजूला उभं राहून गप्पा मारत होते. किचन तसा प्रशस्त असल्याने सुरुची आत आल्याचं कुणालाच समजलं नाही. सुरुची दादाजवळ गेली आणि बोलली,

" दादा..! मी चुकतेय का..?"

हे ऐकून सुरूच्या वहिनीने तिच्याकडे पाहिलं. सुरूचीच्या दादाने सुरुचीला समजावत म्हटलं,

" तू स्वतःला चुकीचं समजलंस तर तू स्वतःला चुकीचं समजणार.! तसंच तू स्वतःला तू बरोबर आहेस हे समजावलंस तर तू बरोबर असशील. तू पूर्ण विचार करून इथे यायचा निर्णय घेतलंस ना..?"

" हो दादा..! पण ह्यांना अस तोंडावर बोलणं मला अवघड जातंय..!"

" बरोबर आहे तुझं..! पण तु तुझं ठाम मत त्याच्यासमोर मांडायला हवंच..!"

सुरुची थोडावेळ शांत झाली आणि बोलली,

" दादा..! मी इथे असं आलेलं तुला आवडलं नाही ना..?"

" मी तुला बोललो आहे. तू जो निर्णय घेशील त्यात मी तुझ्या सोबत आहे. तेच माझं वचन समज..!"

" आणि तुम्ही त्यांना त्यांच्या बरोबर येण्यास नकार दिला तरी ह्याचा अर्थ संकेतरावांनी समजून घ्यायला हवा..! त्यांनी स्वतःहून परिस्थिती बदलायचा प्रयत्न केला तर नक्की परिस्थिती सुधारेल. तुम्ही ह्यात काही करू शकत नाही.!" वहिनी सुरुचीला समजावत बोलली.

" वहिनी..! मग मी आता काय करू..?"

" सद्या तुम्ही ठाम रहा..! तुम्ही त्यांच्या बरोबर जाऊ नका..!"

🎭 Series Post

View all