Jan 19, 2022
नारीवादी

एकटी 'ती', अनं सावरली ( भाग एकोणिसाव्वा )

Read Later
एकटी 'ती', अनं सावरली ( भाग एकोणिसाव्वा )

सुरुची दादाला मिठी मारून रडत होती. दादा तिला समजावत दारातून आत घेऊन आला.त्याने सुरुचीला सोफ्यावर बसवलं. सुरुचीला रडताना पाहून मुक्ता तिच्या जवळ आली आणि तिचे डोळे पुसत बोलली,

" आतु..! रडू नको..! काका तुला फिरायला घेऊन नाही गेले ना..? आपण जाऊ पप्पांबरोबर फिरायला..!"

मुक्ताच्या भाबड्या जीवाला काय कळणार होत त्यातलं. तरी बिचारी ती सुरुचीला धीर देत होती. सुरुची वहिनी बोलली,

" नका रडू ओ..! लवकरच परिस्थिती बदलेल..!"

सुरुचीने पदराने स्वतःचे डोळे फुसले आणि मुक्ताला जवळ घेऊन बसली. 

संकेत सगळं हरवून बसल्यासारखं घराकडे निघाला होता. आपल्या लग्नाची बायको आपल्याला सोडून गेली. का तर सासूच्या बोलणी ऐकावी लागतात म्हणून..! पण ह्यात आपली काय चूक..? स्वभावाला औषध नसतं. त्याप्रमाणे आपली आई सुरुचीला काही उलट सुलट बोलत असेल, पण माझं काय..? ती आहे तशी मी तिला आपली करायला तयार आहे किंवा असं म्हणा , मी तिला आपलं मानलं आहे. कारण आमचं लग्न झालं आहे. ती आई होणार नसली तरी ती आधी माझी बायको झाली आहे आणि मला ती माझी बायको म्हणू परिपूर्ण वाटते. तरीही मला हे भोग का..? 

संकेत प्रवास करत त्याच्या घरापर्यंत पोहोचला. घरी तरी का जावं असा प्रश्न त्याच्या मनात आला. पण बोलतात ना, 'आशेवर जग टिकून आहे'.  एक आशा सगळ्यांच्या मनात असते, ' कधी तरी सगळं ठीक होईल'. त्याच आशेवर संकेत त्याच्या घरी आला. दाराची बेल वाजवली. बऱ्याच वेळाने आईने आतून दार उघडलं आणि त्या हॉलमधून किचनमध्ये गेल्या. संकेत आत आला. बॅग बाजूला ठेऊन त्याने शूज काढले आणि तिथेच बसून राहिला. दरवाजा बंद करायचं ही तो विसरला. त्याची आई दोन ग्लास पाणी घेऊन हॉलमध्ये आली. हॉलमध्ये पाहते तर फक्त संकेत बसला होता. सुरुची दिसत न्हवती. त्यात दार उघड होत. ही अजून दारात काय करतेय असं वाटल्यामुळे त्या हळूच दाराजवळ गेल्या. त्यांनी दारातून बाहेर पाहिलं. बाहेर कुणी न्हवतं. त्यांनी संकेतला प्रश्न केला,

" ही कुठे गेली..?"

संकेतकडून कोणताच प्रतिसाद न्हवता.

" दुकानात गेली आहे का..?" आईने परत विचारलं.

तरीही संकेत काही बोलला नाही.

" दार लावून घेऊ का..?" असं विचारल्यावर संकेत एवढंच बोलला, " लाव..!"

संकेतची आई दार बंद करून सोफ्यावर येऊन बसली. संकेत ग्लासमधलं थोडं पाणी पियाला आणि बॅग घेऊन बेडरूममध्ये गेला. संकेतची आई विचार करत होती, संकेतने दार बंद करायला सांगितलं म्हणजे सुरुची ह्याच्या सोबत आली नाही का..? अजून माहेरी राहायचं आहे वाटतं..? हं..! 

संकेत फ्रेश होऊन बेडरूममध्ये बेडवरच पडून राहिला. तो बराच वेळ बाहेर आला नाही म्हणून आई आत गेली. संकेतला पाहून बोलली,

" काय झालं बाळा..? थकला असशील ना..? मी चहा बनवते..! चहा पिऊन तुला बरं वाटलं.!"

संकेत ह्यावर काहीच बोलला नाही. संकेतची आई त्याच्या कडे बघत होती. शेवटी ती किचनमध्ये गेली. संकेत मात्र सुरुचीने घेतलेल्या निर्णयावर विचार करून आतल्या आत रडत होता. संकेतची आई त्याच्यासाठी चहा बनवून घेऊन आली. चहाचा कप बेडच्या बाजूच्या टेबलवर ठेऊन ती बोलली,

" चहा घे..! बरं वाटेल..!"

" काय बरं वाटेल..? तुला माहीत आहे का काय झालंय..?" संकेत अचानक बोलला. त्या प्रश्नात राग होता, पण तसा त्याने चेहऱ्यावर दाखवला नाही.

" मला कसं माहीत असणार ..? तू काही बोलतच नाही आहेस.."

" आता काय बोलून ..!" 

संकेतची आई त्याच्या बाजूला बसली आणि बोलली,

" काय झालंय..? तिला आणायला गेला होतास ना..?"

" ती आता परत माझ्या आयुष्यात येणार नाही आहे."

" म्हणजे..?" 

" म्हणजे तिला आता माझ्यासोबत संसार नाही करायचा आहे..!" असं बोलून संकेत बेडवरून उठला आणि चहाचा कप घेऊन हॉलमध्ये जाऊन बसला.

संकेतची आईचं तर ' सुंठी शिवाय खोकला गेला' अस झालं होतं. पण ती परत येणार नाही ह्याचं आपला मुलगा दुःख करून बसला आहे, ह्यातून त्याला लवकर बाहेर काढलं पाहिजे. त्याला तिच्यापासून रीतसर फारकत घ्यायला सांगितलं पाहिजे. ती नुसती ह्या घरातून निघून जाऊन काही होणार नाही. असा विचार करत संकेतच्या आईने चहा घेतला आणि किचनमध्ये जाऊन जेवण बनवायला लागली. 

आजची संध्याकाळ शांत शांत गेली. संकेत त्याच्या विचारात होता. त्याची आई जेवण बनवण्यात व्यस्त होती. रात्री दोघांचीही जेवणं झाली. संकेत बेडरूममध्ये झोपायला आला. राहून राहून त्याला सुरूचीची आठवण येत होती.

सुरुचीची ही तीच अवस्था होती. संकेतच्या आईकडून तिला मिळणारी वागणूक ती सहन करू शकत न्हवती. म्हणून तिने हा निर्णय घेतला होता. पण संकेतपासूनचा विरह तिला ही सहन होत न्हवता. पुढे काय होणार ह्याची तिला कल्पना न्हवती. तिने विभक्त व्हायचं ठरवलं खरं पण पुढचं आयुष्य असं एकटीने जगणं तिला ही जड जाणार होत. आयुष्यात दुसरा साथीदार मिळवावा असा विचार ही तिला शिवला ही नसता. कारण संकेतवर तिचं प्रेम जडलं होतं आणि तिला मुलं होणार नाही हे पुढच्याला सांगितलं तर ह्या सुशिक्षित असून ही बुरसटलेल्या विचारांनी ग्रासलेल्या समाज तिला स्वीकारणारा न्हवता. त्यामुळे सुरूचीच पुढे काय हा विचार तिच्या दादाला ही पडला होता. पण सद्या आपली बहीण जो मानसिक त्रास सहन करतेय, त्याला आळा बसावा म्हणून सुरुचीच्या ह्या निर्णयावर त्याने ही सहमती दर्शवली होती.


सकाळी संकेत नेहमी प्रमाणे ऑफिसला निघाला. त्याच्या मनात सुरुचीचे विचार घोळत होते. नकळत आपल्याकडुन झालेल्या चुका आठवत तो स्वतःला ही दोषी मानू लागला होता. एक अनोळखी मुलगी इकडच्या तिकडच्या परिचयातून आपल्या आयुष्यात आपली बायको म्हणून येते. ती त्या नवीन घरात स्वतःला सामावून घेते. अशा परिस्थितीत   तिला आपण सांभाळून घेणं गरजेचं असतं. काही महिने तिला तिथे रुळण्यात जातात. त्याचं कालावधीत तीच वागणं घरातल्या कुणाला खटकतं किंवा चुकीचं वाटतं. तीला आपण उघड बोलतो ही, पण कदाचित तिला होणारा त्रास ती कोणाकडे मांडणार..? तिला आपण स्वतःहून समजून घेणं गरजेचं असतं. किमान तिच्या नवऱ्याने तरी..! संकेतने तिला वेळीच असं काही विचारायला हवं होतं का..?

संकेत ऑफिसला पोहोचला. मनोज आणि पल्लवीला त्याने घडला प्रकार सांगितला. मनोज हे ऐकून दुखावला. पल्लवीने मात्र हे अपेक्षित समजलं होत आणि तस होऊ शकतं ह्याबद्दल संकेतला सूचित ही केलं होतं. पण आता घडून गेलेल्या गोष्टींवर जर-तरचा विचार करून काही उपयोग नसतो. 

" मनोज..!" पल्लवीने मनोजला आवाज दिला.

" बोल ग..!" मनोज बोलला.

" एक विचारू..!"

" विचार ना..!"

" तू संकेतच्या जागी असतास तर काय डिसीजन घेतलं असतस..?"

पल्लवी असा प्रश्न विचारेल हे मनोजला अपेक्षित न्हवतं. पण काय माहीत मनोजकडे ह्या प्रश्नावरच उत्तर आधीपासूनच तयार असल्यासारखं तो बोलला,

" माझं तर ठरलेलं आहे..!"

"काय..?" पल्लवीने उत्सुकतेने विचारलं.

" मी तर लव्ह म्यारेज करणार आहे..!त्यामुळे असं काही झालं तर आमच्यात ह्या गोष्टीमुळे वाद होणार नाहीत. "

मनोजच्या ह्या उत्तराने पल्लवी हसायला लागली. 

" काय झालं..?" मनोजने विचारलं.

" काही नाही..!" पल्लवी हसत हसत म्हणाली.

" सांग ना..!"

" तू ? आणि लव्ह म्यारेज..?" पल्लवी परत हसत बोलली.

" मग काय झालं..? मला प्रेम होऊ शकत नाही..?"

" होईल रे..! पण तू बोलायच धाडस करशील का..?"

" करेन करेन..!" मनोज विश्वासाने बोलला.

" बरं..!" असं म्हणत पल्लवी पुन्हा हसली. पल्लवीने विचारलेल्या प्रश्नाला मनोजने भलतंच उत्तर दिलं. पण त्यातून मनोजच्या मनातलं तिला कळलं.

मनोज म्हणजे एक मनमिळाऊ, निस्वार्थी आणि कष्टाळू मुलगा. कोणाचीही मदत करायला पुढे धावणारा. त्याचं बोलणं नेहमी सगळ्यांना हसवणारं असायचं. तो जितका शांत होता तितका हळवा ही होता. लाजाळू ही.! ऑफिसमध्ये संकेत आणि पल्लवीशिवाय इतर कोणासोबतही तो गप्पा मारायला पुढे जायचा नाही. आपलं काम भलं आणि आपण. त्यामुळे तो कुणाला प्रपोज करेल असं कुणाही वाटणं शक्य न्हवतं. पण तो स्वतः बोलला आहे की मी लव्ह म्यारेज करणार, तर त्याच्या मनात नक्की कोणी तरी असणार. पल्लवीला ही ह्या गोष्टीचं नवल वाटलं. त्याच्या मनातील मुलगी कोण हे तिला जाणून घ्यावं असं वाटू लागलं. पण सद्या संकेतचं जे चालू होतं त्यामुळे हे दोघेही त्याच्याकडे लक्ष ठेऊन होते.

संकेत राहून राहून सुरूचीचा विचार करत होता. कामातून मध्येच मोबाईल हातात घेऊन सुरूचीचा नंबर डायल करायला जायचा आणि परत मागे यायचा. ती आता आपल्याशी परत बोलली नाही तर, तिने कॉल उचलला नाही तर, ह्या विचारात तो तिला कॉल लावत न्हवता.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now