Jan 19, 2022
नारीवादी

एकटी 'ती', अनं सावरली ( भाग चौदावा )

Read Later
एकटी 'ती', अनं सावरली ( भाग चौदावा )

पल्लवीला सुरुचीच्या दादांचा नंबर मिळताच तिने त्यांना कॉल केला. समोरून कॉल उचलला,

" हॅलो. !"

" हॅलो..!"

" बोला..! कोण बोलताय..?"

" मी पल्लवी..! सुरुची आहे का..?"

" सुरुची..?"

" हो..! सुरुचीचा.! तुम्ही सुरुचीचे दादा ना..?"

" आपण कोण बोलताय..?" सुरुचीच्या दादाने पल्लवीला प्रश्न केला.

" मी तिची कॉलेजमधील मैत्रीण.तीने मला तेंव्हा हा नंबर  मला दिला होता. आता तिची आठवण आली, म्हणून कॉल करून तिचा नंबर मिळतो म्हणून कॉल केला."

" अच्छा..! तुम्ही तिच्या कॉलेजच्या मैत्रीण का..!"

" हो..! सुरुची कुठे आहे..?"

" पण इथे कुणी सुरुची राहत नाही. तुझ्या मैत्रिणीने तुला चुकीचा नंबर दिला असावा." 

" नाही..! हाच नंबर दिला होता..!" पल्लवी ठामपणे बोलली.

" पण माझी सुरुची नावाची बहीणच नाही..!"

समोरून असं उत्तर अपेक्षित नसल्याने पल्लवीला काय करावं सुचेना. संकेतने तर हाच नंबर दिला आहे. पण हे सुरुची ह्यांची बहिणचं नाही असं बोलतायत. म्हणजे नक्की काय झालं आहे हे तिला कळतं न्हवतं.

" हॅलो..!" बराच वेळ समोरून आवाज येत नाही म्हणून  सुरूचीचा दादा बोलला.

" हां..! माफ करा..! तिने नंबर देताना काही चूक झाली असेल .!"

" तुमच्या मैत्रिनीने तुम्हाला माझा नंबर दिला होता की दुसरं कुणी..?"

सुरुचीच्या दादाच्या ह्या प्रश्नाने पल्लवीची गोची झाली. बहुतेक हा सुरूचीचा दादाच आहे, पण हा अस का बोलतोय की सुरुची नावाची त्याची बहीण नाही..

" खरं सांगते..! हा नंबर मला सुरुचीने नाही माझ्या दुसऱ्या मैत्रिणीने दिला होता. पण तुम्ही सुरुचीचे दादाच बोलताय ना..?"

" नाही. तुमच्या त्या मैत्रिणींचे नाव काय आहे जिने तुम्हाला माझा नंबर दिला..?"

सुरुचीच्या दादाकडून होणाऱ्या ह्या अशा प्रति प्रश्नांनी पल्लवीला आपण कुठे फसलो असं झालं होतं.

" हॅलो !" परत सुरूचीचा दादा बोलला, "तुम्हाला जी सुरुची हवी आहे ती इथेच आहे. "

"काय..?" पल्लवी आश्चर्याने बोलली. मग इतकावेळ हे असं का बोलत होते हेच तिला समजलं नाही.

" हो..! सुरुची इथे आहे. पण माझ्या बहिणीच नाव कोमल आहे आणि तीच सासरचं नाव सुरुची आहे. "

ह्या उत्तराने पल्लवीला समजलं की तिच्याकडून काय चूक झाली आहे. जर पल्लवी तिची कॉलेजमधील मैत्रीण होती तर तिला सुरूचीच कॉलेजमधील नाव माहीत असायला हवं होतं. पण ती नेहमी सुरुची सुरुची बोलत होती त्यामुळे सुरुचीच्या दादाला संशय आला. 

" माफ करा..! मला तिच्या बरोबर बोलायचं आहे. मी कोण बोलतेय हे ती नंतर तुम्हाला सांगेल. पण सद्या तुम्ही तिला कॉलवर बोलावता का?? प्लिज..!" पल्लवीने सुरुचीच्या दादाला रिक्वेस्ट केली.

" हो.! " असं बोलून त्याने सुरुचीला आवाज दिला, " कोमल..!"

" आले दादा..!" असं म्हणत सुरुचीने त्याला प्रतिसाद दिला आणि ती दादाजवळ आली.

" तुझ्या मैत्रिणीचा कॉल आहे..!" सुरुचीच्या दादाने त्याचा मोबाईल सुरुचीकडे दिला.

"माझ्या मैत्रिणीचा कॉल..? कोणती मैत्रीण ..? आणि तुझ्या नंबरवर कॉल कसा..?" सुरुचीने तिच्या दादाला प्रश्न केले.

" मला काय माहीत..! तू तिला विचारून बघ..!" असं बोलून तो त्या रूम मधून बाहेर गेला.

सुरुचीने तिच्या दादाचा मोबाईल कानाला लावला, 

" हॅलो..! कोण बोलताय...?"

" हॅलो सुरुची..! मी पल्लवी बोलतेय..! संकेत आणि मी एकाच ऑफिस मध्ये काम करतो..!"

" हो..! मला माहित आहे..! तुम्ही आमच्या लग्नात आला होतात. पण मला का कॉल केला..? आणि तो ही माझ्या दादाच्या नंबर वर..?"

" संकेतने मला कॉल करून सांगितलं की तू घरी नाही आहेस. तू कुणाला ही न सांगता घरातून गेली आहेस. त्याने तुला कॉल करण्याचा प्रयत्न केला, पण तुझा नंबर बंद आहे.
मग त्याला आठवलं की तुझ्या दादाला कॉल करून पहावं. पण त्यांना टेन्शन येईल म्हणून त्याने कॉल केला नाही. मग त्याने मला कॉल करून तुझ्या दादाला कॉल करायला सांगितलं..!"

" हं. " सुरुची काही बोलली नाही.

" सुरुची..! मला माहित नाही तू असं का केलंस. पण संकेत खूप टेन्शनमध्ये आहे. तू त्याला कॉल कर.! त्याला तुझी काळजी वाटतेय..!"

" हं.! मी करेन त्यांना कॉल..!" 

" थॅंक्यु..! तू कशी आहेस..?" पल्लवीने आपुलकीने सुरुचीला प्रश्न केला.

" ठीक आहे..!"

" ओके..! मी कॉल ठेवते..! तू त्याला लवकर कॉल कर ..!"

" हो.!" 

दोघींमध्ये एवढं संभाषण झालं आणि पल्लवीने समोरून कॉल कट केला. सुरुचीच्या डोळ्यात अश्रू तरळले. सुरुचीने ते लगेच फुसले आणि तिच्या दादाचा मोबाईल द्यायला त्या रूम मधून बाहेर निघाली. रूमच्या बाहेर तिचा दादा उभा होता. सुरुचीने त्याच्याकडे पाहिलं आणि मोबाईल त्याच्याकडे देत म्हणाली,

"दादा.! हा घे मोबाईल.!"

" सगळं ठीक आहे ना..?" सुरुचीच्या दादाने तिला प्रश्न केला.

" हो दादा..!" एवढ बोलून तीने मोबाईल तिच्या दादाकडे दिला आणि तिथून निघून गेली.

सुरुचीच्या दादाने तिचं मोबाईलवरच बोलणं ऐकलं न्हवतं,पण तिचे डोळे सांगत होते की काही तरी बिनसलं आहे. आपली बहीण अशी अचानक आपल्याकडे आली आहे म्हणजे सासरी तिला काही त्रास झाला आहे. तो सुरुचीला ह्याबद्दल लगेच विचारू शकला असता. पण त्याने थोडा वेळ घेणं बरोबर समजलं. नवरा बायकोमध्ये काही क्षणभराचे मतभेद असतील तर ते त्या दिघांना मिटवता आले पाहिजेत. ह्यात तिसऱ्याने हस्तक्षेप करण त्याला बरोबर वाटतं न्हवत.


इकडे पल्लवीने संकेतला कॉल करून सगळा घडला प्रकार सांगितला.

" ती तशी सुखरूप आहे. पण ती खूप काही भोगते आहे, जे तुला समजतं नाही. तुझ्या आईच्या वागण्याचा तिला खूप मानसिक त्रास होत असणार." पल्लवी संकेतला समजावत होती.

" हो ग..! पण मी तिच्या सोबतच आहे. मी तिला आईच्या दृष्टीने कधीच नाही पाहिलं आणि पुढे ही पाहणार नाही."

" हो..! पण तुझ्या आईचं मन तिला आपलंसं मनात नाही तोपर्यंत ती त्या घरात कशी राहील..! "

" थॅंक्यु अगेन.! तू माझी मदत केलीस. मी तीच्या कॉलची वाट पाहतो. तिचा कॉल आला की मला बरं वाटलं." संकेत भाहुक होऊन बोलला.

" तू तिला कॉल वर समजावचं पण लवकरात लवकर कोणतं फायनल डिसीजन घेऊन तिला भेटायला जा..! "

" हो..! चाल .! ठेऊ फोन..?"

" हो..! काळजी घे..!" असं बोलून पल्लवीने कॉल कट केला.

संकेतला काही सुचत न्हवतं. पल्लवीने केलेल्या मदतीमुळे त्याला जरा आधार मिळाला होता. एवढ्यात त्याला त्याच्या आईचा आवाज ऐकू आला.

" काय झालं..? कुठे गेली आहे ती.?"

संकेतने फक्त त्याच्या आईकडे पाहिलं आणि तो काहीच बोलला नाही. पल्लवी सहज म्हणून तिच्या दादाकडे गेली न्हवती, तर ती तिच्या मनाशी काही ठरवूनच तिकडे गेली होती. त्याने ठरवलं होतं की आपण आधी फक्त सुरुची बरोबर बोलायचं. काहीही करायचं पण तिला घरी घेऊन यायचं. ती लगेच तयार होणार नाही ह्याची त्याला खात्री होती पण आपण काहीही करायचं अस त्याने ठरवलं. पण सद्या तरी त्याला सुरुचीच्या कॉलची वाट पाहण्याशिवाय पर्याय न्हवता. तरीही त्याने स्वतः सुरुचीच्या नंबर वर कॉल लावून पहिला. पण तिचा नंबर ऑफ येत होता.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now