एकटी 'ती', अनं सावरली ( भाग पाचवा )

This is a created story by writer.

आज सकाळी सुरुचीला उठायला जरा उशीरच झाला. त्यामुळे तिने लगेच घाईघाईने संकेतला उठवलं. 

" अहो...! उठा..!"

संकेत झोपेतच होता. त्याने फक्त थोडी हालचाल केली आणि परत झोपला. हे पाहून सुरुचीने परत संकेतला उठवायचा प्रयत्न केला. संकेतने डोळे उघडले. समोर सुरूची होती. तिचा चेहरा त्याला काही नवीन न्हवता. पण आज त्याला तिच्या चेहऱ्यावर वेगळंच तेज दिसत होतं. सुरुचीच्या चेहऱ्यावर तिचे मोकळे केस झुलत होते. तिने उजव्या बाजूचे थोडे केस तिच्या उजव्या कानामागे खेचून अडकवून घेतले होते. सुरुची काय बोलतेय ह्या कडे त्याच लक्ष न्हवतं. त्याचे लक्ष आता फक्त सुरीचीच्या उघडझाप होणाऱ्या होटांवर खिळले होते. त्याने सुरुचीच्या डाव्या गालावर त्याचा उजवा हात हळुवार फिरवला आणि सुरुचीच्या ह्या मोहक रुपाकडे पाहत संकेत जणू स्वतःशीच पुटपुटला,

" आय लव्ह यु...!"

सुरुचीने संकेतच हे वाक्य ऐकलं, पण न ऐकल्यासारखं करून की संकेत काय बोलला ह्यावर विश्वास न बसल्यासारखं करून सुरुची बोलली,

" काय..? काय म्हणालात..?"

" हं...! तुम्हा बायकांना सगळं बरोबर ऐकायला जात. फक्त असं काही बोललं की बरं ऐकू जात नाही..!"

" खरंच मी नाही ऐकलं.." सुरुची न ऐकल्यासारखं म्हणाली.

" ठीक आहे. परत बोलतो... आय...!"

"हं..."

" लव्ह...."

"हं..." सुरुच्या गालावर आता लाली पसरली.

" यु..."

" अच्छा..! थँक्यू...!"

" फक्त थॅंक्यु...?" संकेत मिश्किलपणे म्हणाला.

" हं...! चला..! उठा..! आज उशीर झाला आहे मला उठायला. सगळं आवरायचं आहे. "

" आज काय आवरायचं आहे..?"

" काय म्हणजे..? किती काम असतात सकाळची..? केर काढायचा आहे. आंघोळ करून देवपूजा. मग तुमच्या डब्ब्याची तयारी. मग...."

" डब्बा....?" संकेत सुरुचीला मधेच थांबवत म्हणाला.

" हो मग..! आज काय उपाशी राहणार आहात का..?"

" आज उपाशी तर राहणार नाही..!"

" मग...? ऑफिसमध्ये पार्टी आहे का..?"

" नाही..!"

" मग...?"

" आज रविवार आहे आणि रविवारी मला सुट्टी असते. विसरलीस की काय..?"

" अरे देवा.! मला माहीतच नाही आज रविवार आहे...!" सुरुचीने कपाळावर हात लावला आणि म्हणाली, " सॉरी हं..! तुम्हाला उगाच उठवलं..! तुम्ही झोपा थोडा वेळ..!"

" त्यात काय सॉरी. ! होत असं कधी कधी...!"

" हो का..?"

" हं..." संकेत अस म्हणताच दोघेही हसले. तस संकेतने सुरुचीला जवळ ओढलं. सुरुचीने तिचा डावा हात संकेतच्या छातीवर आडवा ठेऊन  पुढे झुकल्यासारखी झाली. दोघेही एकमेकांच्या नजरेला नजर देत बघत बसले. पण सुरुची मात्र काही क्षणातच पटकन मागे झाली आणि बेडवरून उतरू लागली. तसा संकेतने तिचा हात पकडला आणि म्हणाला,

" बस ना जरा वेळ...!"

" नाही. हात सोडा तुम्ही.! मला कामं आहेत. आई पण उठतील आता...!" 

सुरुची असं बोलतच संकेतने तिचा हात सोडला. तशी सुरुची हसली आणि बेडवरून खाली उतरून उभी राहिली.

तिने परत संकेतकडे पाहिलं आणि हळूच म्हणाली,

" मगाशी जे बोललात ना. ते मी आधीच ऐकलं होतं." सुरुची मिश्किलपणे म्हणाली.

" म्हणजे..?"

" तेच..! आय लव्ह यू..!" आणि सुरुची गालात हसली.

संकेत ही तिच्या ह्या खोडकर स्वभावाने स्वतःशीच हसला.

तस सुरुचीही म्हणाली,

" सेम टू यू हं...!"

" अच्छा ..!" असं बोलून संकेत पटकन उठला आणि सुरुचीला पकडायला म्हणून पुढे झाला. पण सुरुची बेडरूमच्या दरवाजाकडे पळाली. तसा संकेत तिथेच बसून राहिला. सुरुची किचनमध्ये जाऊन आवराआवर करायला लागली. नंतर तिने सगळ्या घराचा केर काढला आणि आंघोळीला गेली. संकेत अजून बेडवरच पडून होता. सुरुची आंघोळ करून बाहेर आली आणि तिने देवपूजा केली. किचनमध्ये जाऊन चहा ठेवला. एवढ्यात सुरुचीच्या सासूबाई ही उठल्या. हे पाहताच सुरुची त्यांना बोलली, 

" आई..! चहा आणू का तुम्हाला..?"

"हान...! संकेत उठला का..?" 

" हो..! "

सुरुचीने दोन कपामध्ये चहा ओतला आणि हॉलमध्ये घेऊन आली. आता बेडरूममध्ये जाऊन संकेतला म्हणाली,

" आई उठल्यात. तुम्हाला विचारात होत्या. मी तुमचा चहा ही तिथेच ठेवला आहे..!"

हे ऐकताच संकेत उठून हॉलमध्ये गेला. संकेतला पाहताच सुरुचीच्या सासूबाई बोलल्या,

" ये बाळा..! बस..!" 

 संकेत सोफ्यावर बसला. त्याने चहाचा एक कप उचलून होटांना लावला. दोघे ही चहा घेत होते आणि संकेतच्या आईने रात्रीचा विषय परत काढला,

" डॉक्टरांनी तिला आता परत बोलावलं आहे का..?"

संकेत ह्या प्रश्नाने रात्री सारखाच गोंधळला आणि बोलला,

" नाही ग आई..!"

सुरुचीच्या सासूबाई शांत बसल्या. पण त्यांच्या मनात खूप काही चाललं आहे असं जाणवत होतं. दोघांचा चहा पिऊन झाला. सुरुचीने दोघांचे ही कप उचलले आणि किचनमध्ये घेऊन गेली. सासूबाई उठल्या आणि म्हणाल्या,

" माझ्यासाठी गरम पाणी काढ ग ..! मी आंघोळीला जातेय. "

" हो आई..!" एवढं बोलून सुरुची बाथरूममध्ये गिझर चालू करायला गेली. काही वेळाने ती बाहेर आली आणि सासूबाई आंघोळीला गेल्या. तसा संकेत सुरुचीला म्हणाला,

" आईचं काय चाललंय...! मला तर काय उत्तर द्यायचं सुचतच नाही."

" काय विचार करायचाय आता उत्तर द्यायला.? खरं आहे ते सांगा तुम्ही त्यांना. "

" हो ग. पण ती..."

" आता तुम्हाला रात्री मी काय समजावलं..? आता तोच विषय धरून त्या असं विचारणारच." एवढं बोलू दोघेही शांत झाले. संकेत ह्या विचारात होता की आई अजून किती वेळा असे प्रश्न मला विचारणार आहे. पण सुरुची मात्र ह्या विचारात होती की सासूबाईंनी आपल्याच काही प्रश्न विचारला असता तर.? आधीच त्यांचा आपल्यावर राग आहे.! बरं झालं आज हे घरी आहेत. आजचा दिवस तरी बरा जाईल. दोघे ही आपापल्या विचारात असताना सासूबाई बाथरूममधून बाहेर आल्या आणि सुरुचीकडे पाहून म्हणाल्या,

" आज नाष्टा बनवणार आहे की नाही...?"

" हो आई...! " सुरुची लगेच उठली आणि किचनमध्ये गेली.

आता संकेत ही उठला आणि आंघोळीला गेला. नंतर सगळ्यांचा नाष्टा झाला. सुरुचीच्या घरी दुपार आणि संध्याकाळ छानच गेली. रात्रीचं जेवण झाल्यावर सुरुची आणि संकेत बेरूमध्ये झोपायला आले. संकेत सुरुचीला म्हणाला,

" आज मला वाटलं होतं, आई आता अजून काय काय विचारेल. पण बरं झालं..! आईने तो विषय परत काढला नाही."

"हं..! " सुरुची मात्र तिच्या सासूबाईंना ओळखून होती. ह्या विषयावरून तिला दररोजचे टोमणे खावे लागत होते. त्यात आता ह्या प्रसंगामुळे परत भर पडणार होती ह्याची पक्की जाणीव सुरुचीला होती. पण जास्त विचार न करता सुरुची संकेतच्या जवळ जाऊन झोपली. संकतेने ही तिला जवळ घेतलं आणि तिच्या कपाळावर एक दीर्घ चुंबन घेतल. नंतर दोघे ही झोपी गेले.

🎭 Series Post

View all