Login

एकटी 'ती', अनं सावरली ( भाग अकरावा )

This is a created story by writer.

संकेत ऑफिसमध्ये आला. मनोज आणि पल्लवी आधीच ऑफिसमध्ये आले होते. आज संकेत काल सारखा शांत शांत न्हवता. आज त्याने मनोज आणि पल्लवी दोघांनाही स्वतःहून हाक मारली,

" गुड मॉर्निंग पल्लवी.!"

" गुड मॉर्निंग मनोज..!"

पल्लवी आणि मनोज दोघांनीही त्याच्याकडे पाहिलं आणि मग एकमेकांकडे पाहून हसत म्हणाले,

" व्हेरी गुड मॉर्निंग संकेत...!"

आणि दोघेही हसले. त्यांच्या हसण्यामागच कारण संकेतलाही समजलं. तोही गालात हसला.

मनोज त्याच्या टेबल जवळ आला. 

" काय साहेब..! आज सगळं ओके वाटतं..?" मनोजने खोडकर प्रश्न विचारला.

" ओके म्हणजे..?"

" नाही. आज मूड ठीक आहे तुझा. नाहीतर काल काही वेगळाच होतास..?"

" काल ना..! काल डोकं दुःखत होतं ना..! म्हणून रे."

" हो ना..! मी पण तेच बोलतोय. मी कुठे वेगळ काय बोलतोय. " मनोज संकतेला टोमणा मारत म्हणाला.

संकेत ही त्याच्या बोलण्यावर हसला.

पल्लवीही त्यांना येऊन मिळाली.

" संकेत..! मग रात्री डोकेदुखीवर काय उपाय केलास ..?" पल्लवी संकेतला बोलली.

तसे तिघेही हसू लागले.

" जाऊदे ग .! तो नाही सांगणार." मनोज थट्टा करत बोलला.

" अरे काय सांगू..? जा आता..! बॉस येतील आता." संकेत मनोजला बोलला.

" हो हो..!" असं बोलून मनोज पल्लवीला बोलला," चल ग पल्लवी. साहेबांनी ऑर्डर दिली. आता जायला हवं.."

" हो ना..! " पल्लवी बोलली आणि दोघे ही त्यांच्या जागेवर जाऊन बसले.

संकेत मात्र हसत होता. कसे हे आपले सहकारी. ह्या ऑफिसमध्ये जॉईन झालो तेव्हा पासून किती आले आणि किती गेले. हे दोघे ही तसे आपल्यासाठी नवीनच. पण तरी हे दोघे जरा वेगळेच आहेत. माझ्या वागण्यावरून त्यांनी माझ मन कसं ओळखलं असेल..? खूप मन मिळाऊ, खूप मनमोकळे. असं वाटतं आपल्या मनातलं सगळं ह्यांच्यासमोर  बोलावं. पण ते तरी काय करणार ते तरी ह्यात. पण तेवढच मन मोकळं होईल. बघू..! बोलूच नंतर..! असा विचार करून तो कामात बिझी झाला.

दुपारच्या जेवणाचा टाईम झाला. आज संकेतच त्याचा डब्बा घेऊन पाहिले त्याच्या चेअर वरून उठला आणि मनोजजवळ आला,

" मनोज..! किती काम करशील..? चल जेवायला.! टाईम झाला..!" संकेत मनोजला बोलला.

" पल्लवी..! आज सूर्य कुठून उगवला ग..?" संकेतने आश्चर्य व्यक्त करत पल्लवीला विचारलं.

" बहुतेक पश्चिमेकडून..!" तिनेही त्याच्या मस्करीत त्याची साथ दिली.

संकेतने मनोजच्या खांद्यावर एक जोरात फटका मारला आणि बोलला,

" चल..चल..! बस झाली मस्करी आता..!" तस पल्लवी आणि मनोज हसले.  तिघे ही डायनींग रूममध्ये आले. ते तिघे ही इतरांपासून वेगळे असे एक टेबल घेऊन बसले.

तिघे ही जेवत होते. इकडच्या तिकडच्या गप्पा चालू होत्या. त्यांचं जेवण झालं आणि काही वेळासाठी तिघे ही तिथेच बसले होते.त्यात संकेतने स्वतःचा विषय काढला. 

" कालच्या माझ्या वागण्याबद्दल मला तुमच्या पासून काही लपवायच नाही आहे ." 

" खरंच..?" पल्लवी बोलली.

" हो..! घरी जरा प्रॉब्लेम चालू होता..!"

" कसला प्रॉब्लेम..?" मनोजमध्येच बोलला.

" तुमच्यापासून काय लपवू.! आमच्या लग्नाला वर्ष झालं. पण आम्हाला मुलं नाही. म्हणजे आमचं तस काही प्लॅंनिंग वगरे नाही."  

" मग..?" पल्लवी बोलली.

" सुरूचीचा मेडिकल प्रॉब्लेम आहे." 

" ओहह..! पण तुम्ही डॉक्टर चेंग करून पाहिले..?" पल्लवी आपुलकीने बोलली.

" हो .! खूप बदलले. खूप प्रयत्न केले. पण काही होऊ शकत नाही.!" संकेत हताश होऊन बोलला.

" हा प्रॉब्लेम आहे..? मग काल काय झालं त्याबद्दल..?" मनोजने प्रश्न केला.

" काल आईने नको तो विषय काढला..!" 

" काय..?" 

" माझ्या दुसऱ्या लग्नाचा ..!" संकेत खजील होऊन बोलला.

" काय..? दुसरं लग्न..? आणि सुरूचीच काय..?" पल्लवी जरा रागातच बोलली.

" ए पल्लवी.! हे त्याची आई बोलली. तो नाही. तू त्याच्यावर कशाला रागावतेस..? त्याच पुढचं ऐकून तरी घे.!" मनोज पल्लवीला समजावत बोलला. 

" मी आईला समजावलं. पण तिने ऐकून नाही घेतलं. मग मला टेन्शन आलं..!" संकेत बोलला.

" मग आज कसं सगळं व्यवस्थित झालं..? आईने विचार बदलला का..?" मनोजने संकेतला प्रश्न केला. 

" मी केतकी बरोबर बोललो. तर ती बोलली तुम्ही आई बोलतात तसं करा..! पण रात्री आईच मला बोलली की तू निर्णय घेताना केतकीला विचार..! ती म्हणेल तसं ..!" संकेत आनंदात बोलला.

" अरे वाह..! मग तू आता आईला असं सांगणार की केतकी तुला सोडायला तयार नाही किंवा केतकीला सोडून मी राहणार नाही..! बरोबर ना..?" मनोज आनंदित होऊन बोलला.

" हो ..! " संकेतने लगेच प्रतिउत्तर दिल.

" थांबा..!" पल्लवी मध्येच बोलली, " म्हणजे तुझ्या आईने एका रात्रीत असा निर्णय घेतला.?"

" हो..! " संकेत बोलला.

" मला काही वेगळीच शंका येतेय..!" 

" कसली शंका..?" मनोज पल्लवीला बोलला.

" बहुतेक संकेतच्या आईने संकेत आणि सुरूचीच बोलणं ऐकलं असणार. सुरुची संकेतला बोलली ना की 'तुम्ही दुसरं लग्न करा.!' त्यामुळे हे ऐकून त्यांना अस वाटलं असेल की सुरूचीच स्वतःहून संकेतला सोडतेय तर चांगलाच आहे. म्हणून त्या बोलल्या असतील की सुरुचीला विचार..!" पल्लवीने तिचा संशय व्यक्त केला.

" पॉईंट आहे.! पण त्याने काय होणार..? संकेत तर सुरुचीला सोडणार नाही आहे..!" मनोज बोलला.

" हो .! पण त्याच्या आईला अपेक्षित आहे तसं नाही. मग ती हे ऐकून संकेतला काही बोलणार नाही, पण संकेतच्या मागून सुरुचीला दोष देणार. की तिने तिचं वाक्य बदललं..!" 

" बापरे..! तुम्ही बायका किती विचार करता..?" मनोज आश्चर्याने पल्लवीला बोलला. 

"हे माझे असे विचार नाही पण काही मैत्रिणींचे अनुभव मी ऐकले आहेत." पल्लवी बोलली.

" एवढा विचार मी केलाच नाही..?" संकेत पल्लवीच सगळं ऐकून घेऊन बोलला.

" संकेत..! जो निर्णय घेशील तो विचारपूर्वक घे..!" पल्लवी त्याला सावध करत बोलली.

" आपल्याला ह्यातल काही समजत नाही बाबा.! तुम्ही बोला..! मला तर हे खूप भयानक वाटतंय." असं म्हणत मनोज चेअर वरून उठला.

" मी पल्लवीच्या बोलण्याचा नक्की विचार करेन..! त्याच प्रमाणे आईला उत्तर देईन..! " संकेत बोलला.

" टेन्शन नको घेऊस..! पण सुरुची आणि आई ह्या दोघींना समोर बसवून तू तुझा निर्णय सांग किंवा तुझ्या घरच्या कुणी वडीलधाऱ्यांना तुझ्या आईला समजवायला सांग.!" पल्लवीने सल्ला दिला.

संकेतने होकारार्थी मान हलवली. आता तिघेही डायनिंग रूम मधून बाहेर पडले आणि आपल्या जागेवर गेले.

" पल्लवी..! तू ग्रेट आहेस ग..! " मनोज पल्लवीला बोलला.

" तुला डाउट होता तर..!" पल्लवी जरा मुद्दाम रुसल्यासारखं बोलली.

" तसं नाही.! तसं नाही. पण.." एवढ बोलतच पल्लवी हसली. मनोजला ही समजलं की पल्लवी आपली मस्करी करतेय. पुढे काय बोलावं हे मनोजला सुचलंच नाही. मनोज तिच्याकडे पाहत राहिला.

" आता काम कर..!" पल्लवी मनोजला ओरडली. तसा मनोज त्याच्या चेअरवर बसला. पल्लवी त्याला पाहून हसली.

संकेत परत विचारात पडला. पल्लवी बोलते तस आपल्या आईने आपलं बोलणं ऐकून असं सुचवलं नसेल ना..! पण शक्यता आहे. 

संध्याकाळ झाली. तिघे ही ऑफिसमधून बाहेर पडले. 

" चल संकेत..! काळजी घे..!" पल्लवी संकेतला बाय करत बोलली.

" हो..! बाय..! बाय मनोज..!" संकेत बोलला.

" बाय..! सी यु..!" मनोज संकेतला बाय करत बोलला.

🎭 Series Post

View all