Jan 19, 2022
नारीवादी

एकटी 'ती', अनं सावरली ( भाग आठवा )

Read Later
एकटी 'ती', अनं सावरली ( भाग आठवा )

संकेत त्याच्या ऑफिसमध्ये पोहोचला. आज त्याची मनस्थिती ठीक न्हवती. ऑफिसमध्ये तो जड पावलांनी आला होता. त्याच्या टेबलंपर्यंत जाताना त्याच्या ऑफिसमधील ३ - ४ सहकाऱ्यांनी त्याला आवाज दिला, पण त्यांना संकेतकडून नेहमी सारखा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ते सगळे आपापसात त्याबद्दल चर्चा करू लागले.संकेत त्याच्या चेअरवर जाऊन बसला. बॅग बाजूला ठेऊन त्याने नेहमीप्रमाणे टेबलवरची आवराआवर केली. काही वेळाने त्याचा एक सहकारी( मनोज )  तिथे आला.

" नमस्कार साहेब..!" मनोज हसतमुखाने संकेतला बोलला.

त्याच्याकडे पाहून संकेत नेहमीपेक्षा हळू आवाजात आणि वेळाच स्वरात बोलला,

" गुड मॉर्निंग..!"

" तू फक्त मॉर्निंग बोल..!"

" काय..?"

" फक्त मॉर्निंग बोल असं बोललो. कारण तुझी मॉर्निंग गुड दिसत नाही."

" असं काही नाही रे..! जरा डोकं दुखतंय. बस..!"

" अरे रे..! रात्री झोप पूर्ण नाही झाली वाटतं..!" असं बोलून मनोज जोरात हसला.

" झोप नीट झाली आहे...!" संकेतचा आवाज रुक्ष होता.

मनोजने ओळखलं की ही मस्करी करण्याची वेळ नाही. नक्की काहीतरी प्रॉब्लेम आहे. पण हा काही बोलणार नाही. सद्या आपण शांत राहावं हे ठरवून तो निघायच्या उद्देशाने बोलला,

" ठीक आहे. टॅब्लेट्स घे.! थोड्यावेळाने बरं वाटेलं. " आणि तो त्याच्या टेबल समोर जाऊन बसला.

संकेत त्याचा एक हात डोक्याला लावून दुसऱ्या हाताने त्याचा कॉम्प्युटर चालू केला. त्यावर लॉगिन करून त्याची नेहमीची कामं करू लागला. 

मनोज मात्र संकेतमध्ये अचानक झालेल्या ह्या बदलामुळे गडबडला होता. तेवढ्या त्याच्या टेबलच्या शेजारी बसणारी त्याची सहकारी ( पल्लवी ) मनोजला बोलली,

" हॅलो.! आज काय बॉस आल्यानंतरच काम चालू करणार का..?"

हे वाक्य ऐकून मनोजने पल्लवी कडे पाहिलं आणि बोलला,

" काम काय आपण दररोज करतो. ते काय न करता चालणार आहे का..?"

" मग फक्त लॉगिन करून चालणार आहे का.? इन्व्हाईस बनवायला घे..!"

" हो..! "

" फक्त हो नाही. लवकर काम चालू कर..! नाहीतर संध्याकाळपर्यंत आपली राहिलेली काम संकेत करत बसेल."

" त्याचीच तर काळजी आहे ग..!"

" म्हणजे..?"

" बघ त्याच्याकडे.! आज तो जरा टेंस आहे."

" काय..? काय झालं त्याला..?" असं बोलत पल्लवी तिच्या चेअर वरून उठली आणि तिच्या मागच्या टेबलावर बसलेल्या संकेतकडे पार्टिशन वरून बघू लागली. तसं मनोजने तिला बोलला,

" ए..! खाली बस..!" 

" अरे पण काय झालं त्याला..! डोक्याला हात लावून बसलाय..!" असं बोलत ती चेअरवर बसली.

" मी विचारलं त्याला तर बोलला की, डोकं दुखतंय. पण मला वाटतं त्याच्या घरी काही प्रॉब्लेम झाला आहे."

" ओह..! काही सिरीयस वाटतंय. नाहीतर संकेतला कधी असं पाहिलं नाही.!"

" हो ना..! लंचपर्यंत टाईम जाऊदे! मग परत त्याला विचारतो..!"

" नको..! नको..! हवं तर तू त्याला ऑफिसमधून निघताना विचार..!"

" हं..! हे बरोबर आहे." असं बोलून दोघेही आपापली कामं करू लागले. 

संकेतने त्याच्या कामात स्वतःला गुंतवून घेतलं होतं. संकेतच्या ऑफिसचे बॉस ऑफिसमध्ये आले. सगळा ऑफिस स्टाफ त्यांच्यासाठी उभा राहिला. बॉस त्यांच्या केबिनमध्ये गेले. संकेत उभा राहिला नाही, ह्याकडे त्यांचं दुर्लक्ष झालं असेल. पण मनोज आणि पल्लवी मात्र संकेतकडे पाहत होते. संकेत उभा राहिला नाही हे पाहून ते दोघेही ओळखून चुकले की संकेत नक्कीच कोणत्यातरी मोठ्या प्रॉब्लेममध्ये आहे. 

दुपारचा लंच टाईम झाला. तसा मनोज संकेतकडे गेला. 

" संकेत.! जेवायला चल..!"

" हं..!" एवढ बोलून संकेत कीबोर्डवरची बटणं दाबताच होता.

" अरे..! काम होईल नंतर. जेवायच्या वेळेला जेऊन घेऊ ."

"हो रे..! तू चल पुढे..! मी आलो."

हे ऐकताच मनोज पल्लवी कडे पाहू लागला. पल्लवी त्यांचं बोलणं ऐकत होती. मनोजने पल्लवीला काही खुनवल आणि स्वतः संकेतच्या टेबलपासून लांब झाला. पल्लवी संकेतच्या टेबल जवळ आली. 

" संकेत."

" बोल ग..!"

" जेवायला चल..!"

" येतो ग..! तुम्ही व्हा पुढे..!"

" पण मला तुझ्या बायकोच्या हातचं जेवण जेवायचं आहे. किती छान बनवते ती जेवण.."

" सगळं समजतंय मला. चला! मी आल्याशिवाय तुम्ही इथून हलणार नाहीत.",संकेत आता जरा हसून बोलला.

हे ऐकून पल्लवी आणि मनोज दोघेही हसले. आता तिघेही जेवायला गेले. जेवताना पल्लवी आणि मनोजचे जोक्स ऐकून ऐकून संकेत थोडा नॉर्मल होत होता. लंच नंतर संकेत जरा रिलॅक्स वाटत होता. लंच टाईम नंतरचा त्याचा वेळ जरा मनोज बरोबर हसत हसत गेला. संकेत ऑफिसमधून निघाला तसं मनोज आणि पल्लवी त्याच्या मागून निघाले. त्यांनी संकेतला ऑफिसच्या बिल्डिंगच्या खाली गाठलं.

" संकेत...!" पल्लवीने संकेतला हाक मारली.

संकेतने मागे वळून पाहिलं. पल्लवी आणि मनोज त्याच्या मागेच होते.

" संकेत. चल कॉफी घेऊ..!" मनोज संकेतला म्हणाला.

" आता..? नको रे..! घरी जायला उशीर होईल.!"

" अरे लगेच कॉफी घेऊ आणि निघू..!"

"आज नको..! पुन्हा कधी.." असं बोलून संकेत निघतच होता.

" संकेत. थांब..!" पल्लवी पुढे येऊन म्हणाली.

संकेत थांबला. पल्लवी त्याच्या समोर आली.

" घरी काही प्रॉब्लेम आहे का ? म्हणजे ऑफिसमध्ये ती आज खूप टेंस दिसत होतास..."

" नाही ग..! " संकेत विषय टाळत म्हणाला.

" ओके. ठीक आहे. काही सांगण्यासारखं नसेल तर नको सांगूस. पण काळजी घे..!" एवढ बोलून पल्लवीने मनोजकडे पाहिलं.

" हां..! काळजी घे संकेत.! आम्ही निघतो.!" असं बोलून मनोज आणि पल्लवी तिथून निघाले.

संकेतने त्यांना हसत बाय केलं. आपल्या आयुष्यात काही घडलं की त्याचा आपल्या जीवनशैलीवर परिणाम होतो. ते आपल्याला जाणवतं, बरोबर आपल्या जवळच्या माणसांनाही जाणवतं. मग ते त्या मागचं कारण जाणून घ्यायचा प्रयत्न करणारच.! म्हणजे मनोज आणि पल्लवी आपली एवढी विचारपूस करत होते ते आपल्या काळजी पोटी. पण आपण त्यांच्या समोर काय सांगणार होतो..? संकेत विचार करत बराच वेळ तिथेच उभा होता. नंतर तो घरी जायला निघाला.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now