A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/home/irablogging/public_html/system/cache/irablog_session69adc53fe7c6fc1e3dc501bc6e1fa2b58ad0477076d4e0aa1006051ff48a80eb08efe3ab): failed to open stream: No space left on device

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 176

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_start(): Failed to read session data: user (path: /home/irablogging/public_html/system/cache)

Filename: Session/Session.php

Line Number: 143

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

She is alone and she survive
Oct 25, 2020
स्पर्धा

एकटी 'ती', अनं सावरली

Read Later
एकटी 'ती', अनं सावरली

संध्याकाळ झाली होती. घड्याळात ७ वाजून गेले होते. सुरुची रात्रीचं जेवण बनवण्यासाठी किचनमध्ये वावरत होती. एवढ्यात दारावरची बेल वाजली. सुरुचीने बेलचा आवाज ऐकला आणि हात पदराला पुसत हॉलमध्ये आली.
तेवढ्यात सुरुचीच्या सासूबाई ओरडल्या. 

" काम सोडून कशाला इकडे आलीस..? मी बघते कोण आहे दारावर..! तू किचनमध्ये जा..!"

सासूबाईंच्या ह्या दरडावण्याने घाबरून सुरुची खाली मान घालून किचनमध्ये गेली आणि किचनच्या पडद्याआडून दरवाज्याकडे पाहू लागली.तिच्या सासूबाईंनी दरवाजा उघडला. 

" आलास बाळा..! ये..!" सुरुचीच्या सासूबाई संकेतला म्हणाल्या.

संकेत म्हणजे सुरुचीचा नवरा. वय वर्षे ३२. एका नामांकित कंपनीत कामाला. दिसायला सावळाच.

संकेत आत आला. खांद्यावरची बॅगकाडून त्याने टेबलवर ठेवली आणि सोफ्यावर बसला. संकेतला पाहताच सुरूचीचा चेहरा खुलला.संकेत कामासाठी सकाळी ९ ला घरातून निघायचा तो ह्या वेळेस घरी यायचा. हा वेळ सुरुची कसा घालवत होती तीच तिलाच माहीत. तिने लगबगीने पाण्याचा ग्लास घेतला. अर्ध ग्लास साधं पाणी आणि अर्ध ग्लास फ्रीजमधील थंड पाणी मिक्स करून ग्लास भरला आणि तो घेऊन हॉलमध्ये आली. सुरुची ग्लास संकेतच्या पुढे करणार इतक्यात तिच्या सासूबाईं तो ग्लास हिसकावून घेत तिच्यावर खेकसल्या,

" तू काय करतेयस इथे..? तुला बोलली ना जेवणाच बघ..?"

" हो आई पण मी पाणी..." सुरुची पुढे काही बोलणार इतक्यात तिच्या सासूबाईंनी तीच म्हणणं मध्येच थांबवलं.

" पुढे बोलायला हवंच का.? आई बापाने शिकवलं नाही का काही...?"

सुरुचीला मेल्याहून मेल्यासारखं झालं. पण हे बोलणं आता तिला नेहमीच होत. तिच्या अंगवळणी पडलं होतं. सुरुची किचनमध्ये निघून गेली.

" घे बाळ..! पाणी पी..!" सुरुचीने आणलेला ग्लास संकेतला पुढे करत सुरुचीच्या सासूबाई बोलल्या.

तो ग्लास हातात घेऊन संकेत दोन घोट पाणी पियाला. पायातील बूट आणि सॉक्स काढून त्याने पाय मोकळे सोडले.

" दुखतायत का रे पाय...?" 

" नाही ग आई..! "

" नाही कसं..! एवढं काम करतोस. पाय दुखत असतील. रात्री तिच्याकडून चेपून घे..!"

संकेत शांत होता. सुरुची किचनमधून ऐकत होती. थोडावेळ संकेत उठून बेडरूममध्ये गेला. कपडे बदलून फ्रेश होऊन हॉलमध्ये येऊन बसला. सुरूचीच बहुतेक जेवणाचे पदार्थ बनवून झाले होतं. 

" आजचा ऑफिसचा दिवस कसा गेला..?" संकेटच्या आईने संकेतला प्रश्न केला.

" नेहमी सारखा ग आई..! पण आज जर जास्त काम होतं ..!"

" अरे देवा..! आजपण जास्त काम होत..? "

" हो..!" 

त्या दोघांचं काहीवेळ असं बोलणं चालू होतं. सुरुची किचनमधील काम हुरकून हॉलमध्ये आली आणि संकेतला म्हणाली,

" अहो..! जेवण वाढू का..?"

हे ऐकताच सासूबाई ओरडल्या,

" वाढूका काय विचारतेस..? ताट वाढ आणि घेऊन ये..!"

सुरुचीने संकेतकडे पाहिलं. त्याच्या तोंडून हूं नाही की चुं नाही. चेहऱ्यावर ही काही हावभाव नाही. तो टी. व्ही. कडे बघत होता. सुरुची किचनमध्ये गेली. जेवणाची दोन ताटं वाढली आणि हॉलमध्ये घेऊन आली. एक ताटं सासूबाईंच्या पुढ्यात आणि एक ताटं संकेतच्या पुढ्यात ठेवलं. 

" घे बाळा.! जेवून घे..!" सासूबाई संकेतला बोलल्या.

संकेतने जेवणाचं ताटं स्वतःजवळ घेतलं आणि जेवू लागला. सासूबाई पण जेवायला लागल्या. सुरुची थोडं लांब उभं राहून कधी संकेतकडे तर कधी टी. व्ही. कडे पाहत होती. मध्येच दोघांना काही हवं नको ते विचारत होती. 

दोघांची जेवणं झाली. जेवणं झाली तशी सुरुचीने लगबगीने त्यांची ताटं उचलून किचनमध्ये घेऊन गेली. आता हॉलमध्ये येऊन पडलेलं खरकटे उचलून व्यवस्थित साफ सफाई केली.  किचनमध्ये येऊन हाथ साफ केले.

इकडे हॉलमध्ये संकेत आणि संकेतची आई गप्पा मारत बसले होते. सुरुचीने किचनमध्ये बसूनच अन्नाचे दोन घास खाल्ले आणि पटापट भांडी घासायला घेतली. भांडी घासून झाल्यावर सुरुची हॉलमध्ये आली आणि सिफ्यावर बसली. तिच्या सासूबाईंनी तिला पाहिलं आणि म्हणाली,

" काय येऊन बसतेस इथे..! काम झाली..?"

" हो आई..!" सुरुची बोलली.

" काय हो..? तेल गरम कर..! संकेतचे पाय दुखतायत..!"

" हो आई..! ठेवते तेल गरम करायला..!" एवढं बोलून सुरुची उठली आणि किचनमध्ये गेली. वाटीत तेल गरम करायला घेतलं. 

इकडे संकेत आणि त्याच्या आईचं बोलणं चालू होतं. काही बोलून झाल्यावर संकेत बेडरूममध्ये गेला. सुरुची गरम केलेल्या तेलाची वाटी घेऊन बेडरूममध्ये गेली. संकेत बेडवर उपडी झोपला होता. सुरुचीने त्याच्या पायाखाली जुनी चादर टाकली आणि त्याच्या पायांना तेल लावून मालिश करू लागली. सुरुची संकेतकडे पाहून म्हणाली,

" आज खूप काम होत का..?"

"हूं ......"  संकेतने हुंकार भरला.

"डोकं चेपून देऊ का..?"

" अजिबात नको...!" संकेत पलटी होत म्हणाला." आणि हे पण बस कर..! एवढे पण पाय नाही दुखत आहेत..!"

" ठीक आहे..!" एवढं बोलून सुरुचीने तेलाची वाटी आणि चादर बेडवरून उचलून बाजूला ठेवली. बाथरूममध्ये जाऊन हात साबणाने स्वच्छ केले आणि बेडवर संकेतच्या बाजूला येऊन झोपली. 

" अहो..!"

"हं..."

" ऐकना...!"

"बोल...!"

" आपण उद्या बाहेर जाऊया का थोडावेळ..! म्हणजे तुम्ही कामावरून आल्यावर..! अर्धा एक तास...! मी आधीच जेवणाची तयारी करून ठेवेणं..!"

" नाही जमणार . मी थकून येतो ग ऑफिसमधून...!"

" फक्त उद्या एक दिवसच..!"

" नाही बोललो ना..! कळतं नाही का तुला..? " संकेतचा आवाज वाढला. हे ऐकून संकेतची आई बेडरूमकडे येऊ लागली. इकडून संकेत बेडरूम बाहेर जाऊ लागला.

" सॉरी सॉरी..! माफ करा..!" सुरुची गयावया करू लागली, " थांबा ना ओ...!" 

संकेत बेडरूममधून बाहेर हॉलमध्ये गेला. संकेतची आई संकेतला विचारू लागली, 

" काय रे..! काय झालं..?"

" काही नाही आई..! तू झोप..! मी पण इथेच झोपतोय..!"

एवढं बोलून संकेत सोफ्यावर झोपला. संकेतच्या आईला समजलं की संकेत आणि सुरुचीमध्ये काही झालं आहे. सुरुची रडवेली होऊन संकेतकडे पाहत होती. 

" काय ग..! " संकेतची आई सुरुचीला म्हणाली, " तुला माझ्या पोराचं चांगलं बघावतचं नाही ना..?"

" आई..! मी फक्त.."

" पुढे बोलू नकोस.! मला माहित आहे, चूक तुझीच असणार. नेहमी तुचं चुकत असतेस. बघ माझा पोरगा इथे सोफ्यावर झोपला. तू झोप आता महाराणीसारखी बेडवर..!"

हे बोलणं ऐकून सुरुचीला रडू कोसळलं. ती संकेतकडे धावली आणि खाली बसून त्याच्या खांद्याला हलवून बोलली,

" माफ करा ना मला..! मी नाही असं काही मागणार परत.!"

" ए बाई..! का तमाशा करतेयस..! तो इथे झोपतोय. तू जा आत..!"

तरीही सुरुची संकेतकडे विंनंती करत होती,

" असं काय करता.? चला ना आत..!"

आता सासूबाई ओरडल्या,"तुला समजत कसं नाही. त्याला तुझ्याबरोबर यायचं नाही. वांजोटी कुठची..!"

सासूबाईंचे शेवटचे दोन शब्द सुरुचीच्या कानावर पडले आणि सुरुचीच्या काळजात धस झालं. तोंडात पदर कोंबून सुरुची बेडरूमकडे धावली. दार आतून बंद करून घेत ती रडू लागली. पण आपल्या रडण्याने सुद्धा ह्यांना त्रास होईल म्हणून ती खिडकीजवळ जाऊन फुटून फुटून रडत बसली.

सुरुची आणि संकेतच लग्न होऊन ३ वर्षे झाली होती. सुरुचीच्या सासूबाईंना पहिल्याचं वर्षात नातवंडाच तोंड पाहायचं होत. पण सुरुचीकडून काही आनंदाची खबर येईना. सुरुची मानसिक तणावाखाली आली. डॉक्टरच्या फेऱ्या चालू झाल्या. काही उपाय होत न्हवता. डॉक्टर बदलले, सुरुचीने उपास तापास केले, अंगारे धुपारे झाले,पण काही प्रगती नाही. आता मात्र सुरुचीच्या सासूबाई सुरूचीचा द्वेष करू लागल्या. कारण एकच होत. सुरुची आई होत न्हवती. संकेत तिशी पार झाला होता. त्यामुळे त्याच्या आईची होत असलेली चिडचिड सुरुचीला समजत होती. सुरुचीच्या आई पण सुरुची कडे विषय काढला. तेंव्हा सुरुचीने तिच्या आईला सगळं सांगितलं. त्याही चिंतेत पडल्या होत्या.

सासूबाईंचे दररोजचे टोमणे मारण, कुणी घरी आलं की त्यांच्यासमोर घालून पाडून बोलणं हे सगळं सुरुची सहन करत होती. पण आज संकेतच्या समोर सासूबाई तिला असं बोलल्या तरी संकेत काहीच बोलला नाही. इतका वेळ जाऊन ही तो बेडरूममध्ये आपल्याला बघायला आला नाही. म्हणजे त्याच्या मनात आपल्याला सोडायचा विचार तर नसेल ना..?! हा विचार मनात येताच सुरुची अजून रडू लागली. संकेत आपल्याला सोडून देईल किंवा आपल्याला सवतीच तोंड पहावं लागेल. नाही...! अस काही होण्यापेक्षा आपण जीव दिलेला बरा..! सुरुचीच्या मनात विषय तरळला आणि तिचे हात पाय सुन्न पडले. काय करावं हे तिला सुचत नव्हतं. तिने निर्धार केला आणि कपाटातील एक ओढणी घेऊन ती बेडवर चढली. 

खूप प्रयत्न करून तिने ओढणी डोक्यावरच्या फॅनमध्ये अडकवली. त्याला जमेल तश्या गाठी मारल्या आणि फास तयार केला. सगळं केलं पण गळ्यात फास अडकवायला मन धजत न्हवतं. तरी तिने विचार पक्का केला. बेडवर पायाखाली स्टूल घेऊन ती ओढणीचा आधार घेत खुर्चीवर उभी राहिली. फास गळ्यात टाकणार इतक्यात तिचा मोबाईल वाजला आणि सुरुची भानावर आली.मोबाईल उलटा होता. संकेतचा कॉल आला असेल का?? पण तो बाहेरच आहे तरी कॉल का करतोय..? सुरुची खाली उतरली आणि तिने तिचा मोबाईल हातात घेतला. सुरुचीच्या मोठ्या भावाचा कॉल आला होता. सुरुचीच्या मनात आलं, सगळं ठीक आहे ना. हा आता का कॉल करतोय. तिने कॉल उचलला,

" हॅलो..!"

" हॅप्पी बर्थडे टू यु...! हॅप्पी बर्थडे टू यु...! ..." समोरून कॉलवर वाढदिवसाच गाणं वाजत होत. गाणं संपलं आणि समोरून एका लहान मुलीचा आवाज आला,

" हेपी बरतडे आततु...!"

सुरुची रडत रडतच म्हणाली, "थँक्यू बेटा..!"

पण समोरून त्या मुलीचा आवाज आला. ती दुसरं कुणाला तरी बोलत होती,' पप्पा !पप्पा! आतु रडतेय..!' समोरून लगेच एका पुरुषाचा आवाज आला, " हॅलो ! कोमल ?( सुरूचीच माहेरचं नाव)"

इकडून सुरुची रडणं थांबवत म्हणाली, " हॅलो दादा! कसा आहेस..?"

" मी ठीक आहे . पण तू रडतेयस.? काही झालं का..? भावोजी विसरले वाटतं तुझा बिर्थडे..!" सुरूचीचा भाऊ मिश्किल पणे बोलला.

" नाही दादा. मी कुठे रडतेय. "

" बरं..! तू आम्हाला विसरलीस म्हणून आम्हीच आता कॉल केला. म्हटलं आठवण करून द्यावी की तुझी सख्खी माणसं जिवंत आहेत."

" काहीही काय बोलतोयस दादा..! मी नाही विसरली तुम्हाला..!"

" मग आजच्या दिवशी रडतेयस का..? "

" काही नाही दादा..!"

" ठीक आहे. नको सांगूस काही. पण एक लक्षात ठेव. काही गोष्टी मनात ठेवून विषय सुटत नाहीत. त्यासाठी आपल्या माणसांकडे व्यक्त व्हावं. त्यांनी उपाय तर नक्कीच भेटतो किंवा मन हलकं तरी होत." 

सुरुची ऐकत होती. 

" तुला काही सांगायचं असेल तर मला कधीही कॉल कर. हवं तर आपण भेटून बोलू.! ठीक आहे..?"

" हो दादा..! थॅंक्यु..!"

" वेलकम..! गुड नाईट..!" 

" गुड नाईट..!"

कॉल कट झाला आणि सुरुची विचारात पडली. दादा किती सहजपणे बोलून गेला. काही प्रॉब्लेम असेल तर आपल्या माणसांकडे व्यक्त हो.! खरंच..! किती सोपं असतं हे. आपल्यावर काही असे प्रसंग आले की आपण घाबरून जातो, आपला धीर खचतो. मग कशाचाही विचार न करता किंवा दुसरा मार्ग न शोधता सरळ सरळ असे टोकाचे मार्ग निवडतो आणि आपलं आयुष्य संपवतो.

आपलं आयुष्य आपल्या हातांनी संपवताना आपण हा विचार करतच नाही की आपल्याला मिळालेलं हे जीवन किती अनमोल आहे. आपण किती किमती आहोत. काही उपद्रवी माणसांच्या बोलण्याला वैतागून आपण आपल्या माणसांना परकं करून ह्या जगातून निघून जायला बघतो. पण त्याने काय साध्य होणार असत..? शून्य..!

आपण माणसं एकमेकांची एकमेकांबरोबर तुलना करत बसतो. तो किती चांगला , तो किती वाईट,वैगरे वैगरे.पण हे लक्षात घेत नाही की आपण प्रत्येक जण वेगवेगळे आहोत. एकाला ते जमलं म्हणून दुसऱ्याला ही ते जमलंच असं नसत.
आता काहींना मूल होत नाही म्हणून त्रास सहन करावा लागतो तर काहींना मूल नको व्हावं म्हणून काय काय करावं लागतं. 

आयुष्य हे खूप सुंदर आहे. त्यात खूप वाटा आहेत. एक वाट चुकली म्हणजे सगळं संपलं असं होतं नाही. इतर वाटा शोधायच्या आणि आयुष्य आनंदात भरभरून जगायचं. !भूतकाळातील मान अपमान, अपराध, चुका विसरून उरलेलं आयुष्य जगायचं. अपराधी वाटलंच तर कोणासमोर मनमोकळं करून आयुष्याला समोर जायचं! 

नवीन वाटा आहेत आणि त्या आपल्यालाच शोधायच्या आहेत. आपण त्या वाटा शोधल्या की आपण हे आपलं आयुष्य सुखाने जगू शकतो ह्या सकारात्मक विचारात सुरुची  झोपी गेली.