मनमोकळी, स्वछंद, सकारात्मक विचार ठेवणारी नेहा नुकतेच विवेकसोबत लग्न करून सासरी आली. सासरी सासू, सासरे, प्रिया तिची नणंद तिचे लग्न झाले होते आणि हे दोघे नवरा बायको असे छोटे कुटुंब होते. तिच्या मनात नवीन घराबद्दल, घरातल्या माणसाबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करत होती. तिचे विचार खूप सकारात्मक होते, नेहमी परिस्थितीशी जुळवून देण्याकडे तिचा कल होता. नेहाचा स्वभाव हट्टी नव्हता ती कधी उलट उत्तर द्यायची नाही पण जर एखादी चुकीची गोष्ट होत असेल तर ती त्यांची चूक लक्षात आणून द्यायची. ती पक्षपात आणि खोटेपणाला विरोध करणारी होती
आता नेहाचा संसार सुरु झाला, तीचा सगळ्यांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न चालू होता. ती जास्त बोलत नव्हती नवीन माणसे, घरातील नवीन पद्धती तिला अवघडल्यासारखे झाले होते पण विवेक एकदम चांगला, समजूतदार होता याचा तिला खूप मोठा आधार वाटत होता. प्रियाचा नवरा कामानिमित्त एक वर्षासाठी परदेशात गेला होता म्हणून ती तिच्या एक वर्षाच्या मुलाला घेऊन माहेरी राहायला आली होती आणि इथूनच ऑफिसला जायची. नेहा सकाळी लवकर उठायची, माहेरी तिला लवकर उठायची अजिबात सवय नव्हती पण इथे सासूबाईंचा आदेश होता कि लवकर उठून कामं आवरायाची, नेहाला तर सासूविषयी आदरयुक्त भीती होती, सगळी कामं संपून दुपारी थोडा तिला निवांत वेळ मिळायचा पण संध्याकाळी चार वाजले कि परत स्वयंपाक, इतर कामं आलीच. सासूबाईंनी तर सगळ्या कामापासून निवृत्तीच घेतली होती आणि प्रिया तर तिच्या मुलाला सांभाळण्यात व्यस्त असायची. नेहाचा संपूर्ण वेळ कामामध्ये व्यस्त जायचा.
नेहाच्या काही गोष्टी लक्षात येऊ लागल्या की सासू तिच्याशी दरवेळी मोकळेपणाने बोलत नाही, नेहाने काही नवीन पदार्थ बनवला तर प्रत्येक गोष्टीत खोट काढायची आणि सगळ्यसमोर मोठ्याने बोलून दाखवायची, कोणीही माहेरकडची पाहुणे मंडळी आली कि त्यांच्यासमोर म्हणायची तुम्ही काहीच शिकवले नाही तुमच्या मुलीला, हे ऐकून नेहाला खूप वाईट वाटायचे पण ती ते सकारात्मकतेने घ्यायची, पण तिचे एक मन सांगायचे की माझ्यात अजून सुधारणा केली पाहिजे तर दुसरे मन म्हणायचे कि माझे कुठे चुकते आहे. तिला कधीच सासूची माया भेटत नव्हती.
दोन महिन्यानंतर नेहाला नोकरी मिळाली, विवेक खूप खुश होता पण तसा उत्साह बाकी कोणामध्येही जाणवत नव्हता, नोकरीच्या आनंदापेक्षा त्यांना घराच्या कामाची काळजी होती, सासूबाई तर नेहाशी थेट सवांद साधण्याऐवजी विवेक कडून निरोप पाठवला आणि विवेक बोलला नोकरीला जायच्या आधी सगळी कामे करून जा तसे नेहाने होकार दिला.
नेहा खूप खुश होती, घरातील सगळे काम करून ती नोकरीला जायची. तिथे तिच्या नवीन मैत्रिणी झाल्या, तिला त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलणे खूप आवडायचे, तिला असे मनसोक्त कधी बोलली होती ते आठवत सुद्धा नव्हते, तिला वाटायचे सासूबाईंनी आणि प्रियाने तिच्याशी मैत्रिणीसारखे बोलावे, त्यांचे नाते निखळ असावे पण नेहा कधी स्वतःहून त्यांच्याशी बोलायला गेली कि त्या हो किंवा नाही इतकच बोलायाच्या, सतत दोघीजणी खोलीमध्ये गप्पा मारत असायच्या. पण नेहा त्यांच्या अशा वागण्याकडे दुर्लक्ष करायची आणि आपल्या कामात व्यस्त व्हायची. नेहाने तर त्यांच्याकडून मदतीची अपेक्षाच सोडून दिली होती, तिला फक्त सगळ्यांनी मिळून मिसळून अगदी छान संवाद साधून आनंदाने जगायचे असे वाटायचे म्हणजे ती माहेरी तशीच वाढली होती, सगळे एकदम छान गप्पा मारायचे, सुख दुःख वाटून घ्यायचे पण तिच्या सासरी तर चित्र याच्या अगदी उलटे होते, काही निर्णय घ्यायचा झाल्यास नेहाला विचारत सुद्धा नसत. नेहाला घराचे वातावरण खूपच खटकत होते आणि खंत पण होती कि ती हे बदलू शकत नाही कारण घरात सासूबाईंची चालती होती, प्रियसुद्धा सासूबाईंच्या मतानुसार वागायची, ती सुद्धा नेहाशी कधी मोकळेपणे बोलायची नाही.
आज नेहाचा पगार झाला आणि तिच्या मनामध्ये एक आयडिया आली कि घरी सगळ्यांसाठी काहीतरी भेटवस्तू घेऊन जाऊया तर सगळे खुश होतील. तिने विचार केला जेंव्हा माहेरी नोकरी करत असताना पहिल्या पगारामध्ये तिने आईसाठी सोन्याचे कानातले घेतले होते आता सासूबाईसाठी पण तेच घेऊया आणि मग तिने ही आयडिया विवेकला सांगितली, तो पण खुश झाला. दोघांनी सासूबाईसाठी सोन्याचे कानातले आणि साडी घेतली बाकींच्यांसाठी पण काहींना काही भेटवस्तू घेऊन घरी आले आणि सगळ्यांना भेटवस्तू दिल्या. सासूबाईनी ते कानातले पहिले पण त्यांच्या चेहऱ्यावर काही आनंद दिसत नव्हता, ठीक आहे फक्त इतकच त्या बोलल्या, प्रियाची पण कोणतीच प्रतिक्रिया नव्हती. पण नेहा खुश होती कारण ती म्हणायची आपण सकारत्मक राहायचे. पण दुसऱ्यादिवशी विवेक तिला बोलला कि सासूबाईंनी दिलेले सोन्याचे कानातले बदलून दुसरे कानातले आणले आहे, नेहाला वाईट वाटले पण ती पुन्हा नॉर्मल झाली.
त्या आठव्यातच नेहाचा वाढदिवस होता, पण विवेकला सोडून कोणालाही उत्साह नव्हता. संध्याकाळी विवेक केक घेऊन आला, सगळेजण विवेकसाठी नाईलाजाने वाढदिवस करत आहेत असेच सगळ्यांचे चेहरे पाहून वाटायचे आणि नंतर सासूबाईंनी नेहाने पहिल्या पगारामधून दिलेली साडीच नेहाला परत वाढदिवसाची भेट म्हणून दिली. आता मात्र ती आतून तुटली म्हणजे मी जरी घरी थोडा आनंद आणण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा कोणीच स्वीकार करणार नाही असे तिचे मत बनले. आणि यावेळी तिचे सकारत्मक विचार कुठेतरी मागे पडत होते. आता प्रत्येक वेळी तिला भीती वाटायची मी काही बोलले, काही आणले, नवीन पदार्थ बनवला तर कोणाला आवडणार नाही. ती आता अबोल राहू लागली, कधी न रडणारी आता तिला रडू कोसळायचे, तिला माहेरची खूप आठवण येऊ लागली, ती स्वतःचा तिरस्कार करू लागली.
एकदा सुट्टीच्या दिवशी नेहा विचारात हरवलेली होती आणि विवेकने तिला मागून मिठी मारली, ती लगेच विचारातून बाहेर आली. तीने या सासूबाईंच्या गोष्टी आधीच त्याच्या कानावर घातल्या होत्या पण तो म्हणायचं तिचा स्वभावच तसा आहे आपण सोडून द्यायचे पण त्याला नेहाची बाजू पण पटत होती पण तोसुद्धा काहीच करू शकत नव्हता मग तिला अशाप्रकारे खुश ठेवायचा प्रयत्न करायचा. थोडा वेळ गप्पा मारून तिने एक सकारत्मक विचारांचा व्हिडीओ पहिला तेच तिच्या आनंदाने मूळ होते, सकारत्मक विचार.
मग तिने मनाशी एक निश्चय केला कि आपल्या आयुष्यात नकारत्मक विचाराना स्थानच द्यायचे नाही, जर सासूबाईंना माझ्याशी बोलणे आवडत नाही ती त्यांची विचारसरणी आहे, कोणाचा स्वभाव तर आपण बदलू शकत नाही अशा गोष्टींमध्ये आपण अडकलो कि कायम दुःख होत राहणार त्यापेक्षा आपल्याकडे सुद्धा करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत, छंद आहेत ते आपण जोपासले पाहिजे आणि विवेकची सोबत तर आहेच, त्यानंतर नेहाने आपल्यापरीने आपले जीवन जगण्यास सुरुवात केली त्यामध्ये ती सगळे कामं करून, नोकरी करून तिच्या आवडीचे काम करू लागली जसे केक बनवणे, क्राफ्ट करणे, चित्रकला काढणे, टाकाऊ पासून टिकावू वस्तू बनवणे आणि आता खऱ्या अर्थाने ती स्वतःवर प्रेम करू लागली.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा