Jan 29, 2022
नारीवादी

ती

Read Later
ती


समाजात स्थान असून नसणारी ती‌! तीचं व्यक्तिमत्त्व जपणारी ती! ही गोष्ट आहे एका तुमच्या आमच्या आपल्यातल्या ‘ती'ची.
       उषा एक साधी सरळ २० वर्षाची मुलगी . घरची थोडी शेती तरी मोजून मापून जगावं लागणारं घर. आई वडील लहानपणीच गेल्याने भाऊ आणि वहिनी ने सांभाळून घेतलं. सकाळी शेतात काम करून गावातच एका घरी कामाला जायची. सगळं छान चाललं होतं. वहिनी मायेने सांभाळ करत होती आणि व्यवहार पण शिकवत होती. 
      उषा जिथे काम करायची तिथेच प्रवीण काम करायचा. प्रवीण चे लक्ष कायम उषा कडे असायचे. तिचं रूप, काम करायची आवड  ह्या सगळ्यावर तो भाळला होता. तिचा प्रेमात पडला होता. उषा आणि त्याची कायम नजरानजर व्हायची. तिलाही कळलं होतं प्रवीण च्या मनात काय चालू आहे. शेवटी एक दिवस वाट पाहून प्रवीण ने तिला लग्नाबद्दल विचारले. उषा लाजली आणि हो म्हणाली. दोघांच्या घरी हे कळलं. वहिनीला हे लग्न मान्य नव्हतं. तिने आणि भावाने उषाला समजवायचा खूप प्रयत्न केला की तो मुलगा आणि त्याचा घरचे चांगले नाहीत. वहिनीला खूप गोष्टी प्रवीण आणि घरच्यांबद्दल बाहेरून कळल्या होत्या पण उषा प्रवीण च्या प्रेमात इतकी वेडी झाली होती की तिला कोणाचं काही ऐकून घ्यायचं नव्हतं. शेवटी तिच्या हट्टापायी वाहिनी ने माघार घेऊन दोघांचं लग्न लाऊन दिले. उषाने नवीन घराचे माप ओलांडले आणि तिचा संसार सुरू झाला.
       प्रवीणला आई वडील, लहान भाऊ आणि बहीण होते. उषा सगळ्यांचं अगदी मनापासून करायची. पहाटे उठून पाणी भरायचे ते जेवण अगदी सगळं. ती जिथे काम करायला जायची ते काम मात्र तिने सोडलं नव्हतं. दोघंही नवरा बायको एकत्र कामाला जायचे. आता प्रवीण ने कन्स्ट्रक्शन लेबर म्हणून काम करायला सुरुवात केली. खूप कष्टाने त्याने पुढे जात स्वतः छोटी कामे घेण्यास सुरुवात केली. आता दोघांकडे पैसा खेळू लागला होता. त्यांनी शहरात एक खोली घेतली. उषाला ३ वर्षांनी दिवस गेले. त्यामुळे त्यांचा सुखी संसार अधिकच बहरू लागला होता. उषा माहेरी आली तेव्हा ती वहिनीला भरभरून सांगायची पण वहिनीला कायम तिची काळजी वाटायची. तिने एका छान गोंडस मुलाला जन्म दिला. आता सासरी आल्यावर ती परत कामाला लागली. प्रवीण ने तिला खूप दागिने केले गाडी घेतली अगदी सगळी हौस दोघं पुरवत होते. आता उषाने काम बंद करून फक्त घर आणि मुलाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली.  वर्षामागुन वर्ष जात होती अशातच संकट जशी एकत्र येतात त्याप्रमाणे झाले. प्रवीण ला काम मिळेनासे झाले. इतक्या वर्षात त्याने खूप पैसा कमावला त्यामुळे चैन करायची सवय लागली होती. त्याचे मित्रही त्याचा गैरफायदा घेऊन पैसे उकळत होते. उषाला ह्या सगळ्याची महिती ही नव्हती कारण तिचं विश्व आता मुलगा आणि घर हेच झालं होतं. हळू हळू प्रवीण उषाकडे पैसे मागायला लागला. काही कारण न विचारता उषाही त्याला पैसे देत गेली.त्याचे काम सुरू होईल ह्या आशेने तिने अगदी स्वतःचे दागिने सुद्धा गहाण ठेवले. आता त्यांना कुठलीच चैन परवडण्यासारखी नव्हती. प्रवीण मात्र घरापासून लांब रहायला लागला हे उषाच्या लक्षात यायला लागले. तो सतत कुठल्या मित्राकडे किंवा बाहेर वेळ काढत असे. दोन दोन दिवस घरी सुद्धा येतं नसल्याने उषाचे हाल होत होते. अचानक एक दिवशी तिला कळलं की प्रवीण दुसऱ्या कुठल्या मुलीसोबत फिरतो. तिला आता फक्त वेड लागायचं बाकी होतं. प्रवीण घरी आल्यावर तिने ह्या गोष्टीचा जाब त्याला विचारला पण लोक आपल्याबद्दल खोटं बोलतात , तुझा विश्वास नाही का माझ्यावर असं सांगून तिला गुंडाळून टाकलं. तिनेही त्याचा बोलण्यावर विश्वास ठेवला आणि विषय सोडून दिला. काही दिवसांनी प्रवीण घराबाहेर पडला तो आलाच नाही त्यामुळे तिची अवस्था परत एकदा वाईट झाली. शेजारील लोकांनी तिचा वहिनीला बोलावून परिस्थिती सांगितली. वाहिनी तिला आणि तिच्या मुलाला घेऊन घरी आली. पण आता तिच्या माहेरी वहिनीला सून आली होती. तिला काही उषा घरी येऊन राहणे पसंत नव्हते. त्यामुळे थोड्याच दिवसात उषाला जवळच भाड्याने घर घेऊन दिले. उषा ची गेलेली हिंमत आत्मविश्वास वाहिनी परत आणत होती. ती जिथे पाहिले काम करत होती तिथल्या कुटुंबाने सुद्धा तिला कामावर परत ठेऊन घेतले. आता ती परत पहिली उषा होऊ लागली होती. मुलगा ही मोठा होऊन आता १० वी मध्ये गेला होता. आजूबाजूचे लोक तिला येऊन तिचा नवरा कुठे दिसला की सांगत. अशातच तिला बातमी कळते की नवऱ्याने त्याच मुली सोबत लग्न केलं आहे आणि आता त्यांना एक मुलगी आहे. आधीच सगळ्यातून गेलेल्या तिला दुःख झालं पण तिने ते फारसं मनावर घेतलं नाही. त्यांचा मुलालाही त्याचे मित्र चिडवायचे की तुझा बाबांनी दुसरं लग्न केलं. त्यालाही तिने समजावलं. आपल्या रोजच्या जीवनात ती रमून गेली.
              अचानक एक दिवस प्रवीण घरी आला. त्याला पाहताच काय बोलावं तिला सुचत नव्हतं. हक्काच्या घरी आल्या प्रमाणे तो घरात येऊन बसला. गावातली लोक काय बोलतील काय इज्जत राहील ह्या तिच्या विचाराने प्रवीण ला  जेवायला वाढले. तो ही आरामात जेवून झोपून गेला. तिने ठरवले सकाळी बोलून त्याला परत जायला सांगायचे. उषाने ठरवल्या प्रमाणे त्याला जाब विचारला त्यावर त्याने तिची माफी मागितली आणि म्हणाला ' उषा तू खूप केलस माझासाठी आणि माझी ह्या सगळ्यात काही चूक नाही. त्या मुलीने मला धमकावून हे सर्व केले. मी परत तिकडे जाणार नाही.' तिला खूप वाईट वाटते. ती म्हणते ठीक आहे आता तुम्ही रहा इथे आपण पहिल्यासारखे कष्ट करून सगळं परत मिळवू. त्यानंतर काही दिवस चांगले जातात. प्रवीण काही काम करत नसतो पण कुठे जात ही नाही. उषा एक दिवस कामावर जाते आणि घरी परत येते तेव्हा पाहते तर घरी कोणी नसतं . मुलगा कॉलेज मधून आलेला नसतो आणि प्रवीण ही दिसत नाही. ती घरात जाते आणि कपाट उघडते तेव्हा तिचे पैसे तिथे नसतात. तिला अंदाज येतो की नक्की काय झाले. अपेक्षेप्रमाणे प्रवीण घरी येत नाही. ती बिचारी परत स्वतःच्या मूर्खपणाला दोष देत राहते. परत तिची आणि मुलाची समजूत घालून जगायला सुरुवात करते.
        आता उषा खूप कष्ट करत असते. ती तिच्या कामाचा पैशातून आणि जिथे काम करत असते त्यांचा मदतीने ती छोटी खोली विकत घेते. सगळं काही छान चालले असताना अचानक प्रवीण दारात हजर! ह्या वेळेस ती ठरवते की ह्याला घरात घ्यायचे नाही. पण प्रवीण चा एकूण अवतार ती पाहते. गेले कित्येक दिवस पुरेसं अन्न ना मिळालेल्या खंगलेले शरीर सगळे काही सांगत होता. ती मुलगी त्याला सोडून त्याचे पैसे लुबाडून गेलेली असते दूर कुठेतरी. इतक्या वाईट अनुभवातून पण ती त्याला खायला देते आणि झोपायला जागा देते. तो उपाशी असल्याने सगळे अन्न भिकऱ्या प्रमाणे खातो. पुढे खूप दिवस तो बाहेर बसून ती जे काही देईल ते खातो आणि जगतो. उषाला वाईट वाटते आणि त्याला कदाचित त्याची शिक्षा मिळाली म्हणून त्याला घरात घेते. पुढे परत एकदा ' ती '  त्याची सेवा करायला तयार होते. काय माहित प्रवीण परत सोडून जाईल की नाही??

                   तर मैत्रिणींनो ह्या गोष्टी मधे ती ने काय करायला हवे? जसे उषा वागली तसे वागायला हवे? का कठोर व्हायला हवे? ती म्हणजेच स्त्री ही कायम समाजाचा विचार करते आणि गप्प बसते. काही ठिकाणी हे उलटे सुद्धा असू शकते. पण ह्या कथेप्रमाणे ती लाच कायम त्रास झाला. चुकलेल्या माणसाला एक संधी देऊन बघणे ठीक पण हे सतत होत असेल तर?

(तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून कळवा आणि माझा कथेला लाईक करा)
   
(सदर कथेमध्ये पात्रे काल्पनिक आहेत. कथा ही सुद्धा काल्पनिक असली तरी थोडी फार समाजात घडत असते. ह्या कथेमुळे कोणाचा भावना दुखावल्या गेल्या असतील तर माफी असावी)

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Swarali Saurabh Karve

Business

लिखाणाचा प्रयत्न करत राहणे हे आपल्या हातात आहे.