रणांगण

"A man is great by deeds, not by birth.” ~ Chanakya

महाराष्ट्र! 
आपल्या देशातलं एक वैभवशाली आणि समृद्ध असं राज्य!
या राज्यानं आजपर्यंतच्या इतिहासात अनेक चढउतार पहिले. 
कधी मुघलांचे अनन्वित अत्याचार तर कधी छत्रपतींची कल्याणकारी शिवशाही, कधी महाराष्ट्राची राजधानी असलेली मुंबई हिरावून घेण्यासाठी आपल्याच काही लोकांनी केलेले अत्याचार तर कधी या जगप्रसिद्ध संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी सगळ्या पक्षातले राजकारणी, साहित्यिक, कलाकार, खेळाडू यांनी एकत्रित येऊन दिलेलं निस्वार्थी योगदान! 

देशात रुजलेला प्रत्येक विचार मग तो राजकीय असेल, सामाजिक असेल किंवा आर्थिक असेल त्याचा उगम याच आपल्या महाराष्ट्रात पाहायला मिळतो! महाराष्ट्रानं कायमच देशाला विचार देण्याचं काम केलं, देशाचं प्रबोधन करण्याचं काम केलं, तो विचार रुजवण्याचं काम केलं! 

अनेकाविध प्रकारची विचारसरणी घेऊन, ध्येय घेऊन आलेले लोकं आणि वेगवेगळ्या राजकीय पक्षात काम करत असलेले लोक जेव्हा महाराष्ट्राचा अथवा देशाचा विषय असेल तेव्हा राजकारणापलीकडे, आपल्या विचारापलीकडे जाऊन सर्वप्रथम इथंच, याच महाराष्ट्रात, एकत्र आलेलेही या देशानं पाहिलेत!

देशातल्या इतर राज्यांप्रमाणे, या महाराष्ट्रात आपल्या पक्षात नसलेल्या, आपल्यापेक्षा वेगळी विचारधारा असलेल्या व्यक्तीला अस्पृश्य म्हणून पाहिलं जात नाही. उलट राज्याच्या अनेक महत्वाच्या प्रश्नांवर एकत्र येऊन सामूहिक निर्णय घेतले जातात आणि त्यांची अंमलबजावणीही केली जाते. 

याच महाराष्ट्रातल्या आजच्या राजकारणाची कल्पनाविष्काराच्या रेशमी झालरीत गुंडाळलेली अस्सल कहाणी! 

रणांगण....

🎭 Series Post

View all