शतदा प्रेम करावे - 29

दोन अनोळखी मनांच्या नात्यातली हळुवार गुंफण


शतदा प्रेम करावे भाग - 29


"आई.. आई उठ ना! सहा वाजून गेलेत बघ."

समीरा अवनीला गदागदा हलवून उठवत होती. सहा वाजून गेलेत तरी अवनी अजूनही झोपलेलीच होती. आज जाग कशी काय आली नाही तिला, ह्याचाच विचार करत होती समीरा.

"अलार्म वाजला होता का?"
अवनी डोळे चोळत होती आणि समीराला वेळ विचारतं होती.

"आई अग सहा वाजेची बेल वाजून बंद पण झाली केव्हाच."

"अरे मग मला कशी जाग आली नाही?"

"आई, ही सानू कधीच लवकर उठत नाही. पण आज बघ तुझ्या आधी उठून तो अलार्म बंद केला तिने."

"अरे उठवायच ना मला तुम्ही, चला लवकर नाहीतर उशीर होईल शाळेला."

अवनी अंथरुणातून उठल्या बरोबर कामाला लागली. तिला आज काय होतंय हे तिला स्वतःलाच समजत नव्हते. आजर्यंत कधीच उशीर झालेला नव्हता सकाळी उठायला, पण आज झाला होता उशीर; त्यामुळे ती पटापट सगळं मुलींचं आवरून देत होती. त्यांचा शाळेचा ड्रेस काढून ठेवला बेडवर आणि अवनी पळाली किचनमध्ये त्यांचा डबा तयार करायला.

"इतक्या कमी वेळात काय बरं द्यावं डब्यात मुलींना!"
विचार करण्यात पाच मिनिटे घालवली, तिकडून समीराने अवनीला सांगितले.

"आई बटाट्याची भाजी बनवं स्लाईस करून."

समीराने सांगताच अवनीने पटकन दोन बटाटे पातळ स्लाइस करून घेतले आणि जिरे मोहरीची फोडणी घालून भाजी शिजायला ठेवली. बाजूलाच त्यांच्या पुरता फक्त दोन चपात्या बनवल्या.
ते झालं नाही की दुसरं काम वाढवा झालं, दूध तापायला ठेवलं होतं ते उतू गेलं. गॅस पुसायचा तसाच राहू दिला, आधी त्यांना मग मध्ये दूध बोर्नविटा दिले.
बटाट्याची भाजी अजून शिजत होतीच की समीरा आली तीच आवरून.

"आई माझ्या वेण्या घालून दे आधी."
हातात कंगवा आणि रबर घेऊन ती उभी होती किचनमध्ये, अवनीची उडालेली धांदल बघून तिला ही आश्चर्य वाटले.

"आई, आज कशी काय जाग आली नाही ग तुला?"

"हो ना, पण होईल सगळं वेळेवर. तू ये इकडे मी घालून देते वेण्या तुझ्या."

असे म्हणुन अवनीने तिच्या लांबसडक केसांच्या दोन वेण्या घालून दिल्या.


"आई आज होईल ना डबा तयार, नाहीतर आम्हांला पैसे दे. आम्ही दोघी शाळेच्या कँटिंग मधून घेऊन खाऊ काहीतरी."

"नाही नाही, हे काय झालाच आहे डबा तयार."
असे म्हणून अवनी ने गॅस बंद केला आणि त्यांचा डबा भरून त्यांच्या हातात दिला.

"हे घ्या डबा, ठेवून द्या स्कूल बॅगमध्ये आणि बॉटल भरलीये का पाण्याची?"

"हो आई, भरली मी बॉटल."

"जा लवकर, वेळ झाली आहे व्हॅन यायची."
असे म्हणताच हॉर्नचा आवाज ऐकू आला. अवनी खिडकीतून खाली बघू लागली.

"हो थांबा दादा येताय मुली झाली."
खिडकीतूनच अवनीने व्हॅनला हात करून थांबवले.

समीरा आणि स्वानंदीला घेऊन अवनी पळतच गेली खाली. दोघीही व्हॅन मध्ये बसून गेल्या एकदाच्या शाळेत.

"बापरे, उठायला जरा उशीर झाला तर किती गोंधळ आणि धावपळ होते सगळ्यांची."
असे म्हणत अवनी वरती आली, दरवाजा उघडायला गेली तर चावी कुठे होती?
शाळेला उशीर होईल म्हणून घाईगडबडीत तशीच चावी न घेता खाली पळत आली.
"आता काय करावं?"
असे म्हणून डोक्यावर हात मारून घेत अवनी दरवाजा समोर उभी होती.
त्यांची एक चावी खालच्या घरात असते नेहमी ठेवलेली, पण इतक्या सकाळी सकाळी असं कसं जावं त्यांच्याकडे चावी मागायला? म्हणून अवनी विचार करत होती.

"जाऊ दे, त्याला काय होतंय. इतका वेळ असच दरवाजा पुढे उभं राहण्यापेक्षा घेऊन येते चावी."

अवनी खाली गेली आणि त्यांच्या दरवाजाची बेल वाजवली.

"अरे, अवनी इतक्या सकाळी सकाळी? काय झाले? काही हवंय का?"

"हो, मुलींना घेऊन मी खाली तशीच पळत गेले उशीर झाला म्हणून पण चावी घेऊन जायचं विसरले."

"अरे मग आहे की माझ्याकडे तुझी एक्स्ट्रा चावी, ही काय दाराच्या मागेच टांगून ठेवलेली असते."

"मग दे मला लवकर, पुन्हा द्यायला येते मी तुला लगेच."

"बरं देते, पण आलीच आहेस तर थांब. सोबत चहा घेऊ आपण."

"नाही नको नको, मी तशीच आलीये. घरी गेल्यावर अजून खूप आवरायचं आहे अजून."

"कामं तर होतीलच ग! बस थोडा वेळ. मी ठेवलेलाच होता चहा, थांब आत्ता घेऊन आले आपल्या दोघींसाठी."
असे म्हणून अवनीची मैत्रीण आत किचनमध्ये निघून गेली. पण अवनीला थोड अवघडल्या सारखे वाटतं होते, घाईघाईने आल्यामुळे ती नाईट ड्रेस वरतीच होती. त्यामुळे कधी घरी जातेय अस झालं होतं तिला.

चहा आला आणि सोबत बिस्किटे पण आणली तिने, पण अवनीने गरम गरम चहा एका घोटात पिऊन टाकला आणि पळाली वरती चावी घेऊन.

"काय तू पण अवनी, इतका उशीर कसा काय झाला उठायला तुला. बघ किती धावपळ होते अशाने. डोळे पण किती सुजल्या सारखे दिसताय माझे."

अवनी स्वतःशीच बोलत बोलत आवरत होती. तेव्हा तिला कळाले की रात्री उशिरपर्यंत जागून ती आणि सागर बोलत बसले होते.

"ह्या सागरमुळेच आज मला इतका उशीर झाला. थांब आता त्याला संगतेच मी."

असे म्हणून तिने फोन हातात घेतला आणि बघते तर काय? तिच्या फोनची बॅटरी पूर्णपणे उतरली होती. पहिले फोन चार्जिंगला लावला आणि मग तिने तीच आवरून घेतलं.

सगळं झाल्यावर मस्त स्वतः साठी चहा बनवला, त्यासोबत एक चपाती लाटून तुपावर खरपूस भाजून घेतली. चहा पोळीचा नाश्ता झाल्यावर फोन पुन्हा बघितला. पन्नास टक्के चार्जिंग झालेलं होत, तिने तसाच फोन काढून घेतला आणि पहिले सागरला मेसेज केला.

अवनी - "सागरररररररर."

सागर - "अरे काय झालं इतक्या सकाळी सकाळी माझ्या नावाने ओरडायला."

अवनी - "ओरडू नाही तर काय करू? तूच.. तुझ्यामुळेच आज मला उशीर झाला."

सागर - "मी काय केलं?"

अवनी - "काय केलं? काय केलं काय विचारतोस वरतून."

सागर - "अरे आता सांगितल नाही तर कसं समजणार मला."

अवनी - "उल्लू सारखा स्वतः जागरण करत असतो आणि काल मलाही जागरण करायला लावलंस."

सागर - "काग काय झालं? झोप नाही झाली का तुझी अजून?"

अवनी - "झोपेचं जाऊ दे तिकडेच!"

सागर - "बरं जाऊ दे झोपेचं तिकडेच."

अवनी - "ए तू थांब रे, किती मध्ये मध्ये बोलतोय. माझं अजून झाल नाहीये बोलून."

सागर - "बरं बोला मॅडम, काय म्हणणं आहे तुमचं?"

अवनी - "तुझ्याशी बोलता बोलता रात्री इतका उशीर जागी राहिले आणि तुझ्यामुळे मला सकाळी उठायला उशीर झाला. त्यात मुलींचं आवरायला उशीर झाला, नंतर व्हॅन पण आज लवकर आली. खाली पळत पळत गेले तर घराची चावी घ्यायला विसरले मी."

सागर - "अरे म्हणजे तू अजून बाहेरच उभी आहेस का?"

अवनी - "थांब तू, का बोललास मध्ये. अजून बोलतेय ना मी."

सागर - "बरं चालू ठेवा तुम्ही."

अवनी - "चावी घ्यायला विसरले, पण झाली एक चावी देऊन ठेवली आहे म्हणून तिच्याकडे मला सकाळी सकाळी जावं लागलं. मी तशीच नाईट ड्रेस वर फिरत होते सगळीकडे."

सागर - "मग काय झालं त्यात इतकं."

अवनी - "काय झालं? तुला काहीच वाटतं नाही ना!"

सागर - "आता त्यात वाईट वाटण्यासारखं काय होतं बरं."

अवनी - "अरे रताळ्या, तुझ्यामुळे मला जागरण झालं आणि तुझ्यामुळे उठायला उशीर झाला. तुझ्यामुळे मी खाली तशीच पळत गेले नाईट ड्रेस वर, तुझ्यामुळे मी घाईगडबडीत घराची चावी घ्यायचं विसरले. तुझ्यामुळे मला खाली जाऊन त्या बाईकडे बसून चहा प्यावा लागला, हे इतकं सगळं फक्त आणि फक्त तुझ्यामुळेच झालंय."

सागर - "अरे बापरे, माझ्यामुळे इतकं सगळं झालं आज."

सागरला काय बोलावं काहीच कळत नव्हते, अवनी चांगलीच चिडली होती त्याच्यावर. दिवसाची सकाळ अशी चिडचिड करत झाली तर संपूर्ण दिवस तसाच जातो.

🎭 Series Post

View all