शतदा प्रेम करावे - 28

दोन अनोळखी मनांच्या नात्यातली हळुवार गुंफण


शतदा प्रेम करावे भाग - 28


संध्या बद्दल बोलताना सागर खूप नाराज झाला होता. बायको, पत्नी, अर्धांगिनी.. ही फक्त नावालाच नसते. नवऱ्याचा हात हातात घेऊन अग्नीच्या साक्षीने सात फेरे घेऊन ती तिच घर सोडून येते, ते फक्त आणि फक्त तिच्या नवऱ्यासाठी. सगळं नवीन असतं तिच्यासाठी फक्त नवरा असतो जो तिला ह्यासगळ्यात साथ देणारा असतो. पण कदाचित सागरने तेव्हा तिला समजून घेतलं नसावं.. असं अवनीला वाटतं होतं. पण सागर कडून तर वेगळचं ऐकायला मिळतं होतं तिच्याबद्दल. नेमकं काय आणि कशावरून बिघडलं असेल दोघांचं, हेच तर समजून घ्यायचं होतं अवनीला; म्हणून ती सागरच्या मागे लागली होती.


सागर - "अजून काय सांगू तुला मी अवनी."

अवनी - "पण तरीही मला वाटतंय तू कुठेतरी कमी पडला असावा."

सागर - "काय करायला हवं आता मी, तूच सांग."

अवनी - "तुमच्यात आधीपासून तर असं काहीच नव्हतं ना!"

सागर - "आता आधी म्हणजे कधी?"

अवनी - "तुमचं नवीन लग्न झालं तेव्हा तर सगळं ठीक असेल ना!"

सागर - "हो, म्हणजे संध्याला मीच पसंत केले होते. आमच्या दोघांच्या पसंतीचे हे लग्न झालं होतं."

अवनी - "मग बिनसलं कुठे?"

सागर - "देवजाणे कुठे बिनसलं आमचं?"

अवनी - "काय रे! तुलाच कळतं नाही. मग बिचारी संध्या तरी काय करणार."

सागर - "तुला अजूनही तीच बिचारी वाटतेय? आणि माझं काय मग."

अवनी - "तूच काहीतरी आगाऊपणा केला असणार."

सागर - "काय! आगाऊपणा आणि मी."

अवनी - "मग काय तर, तिलाही केव्हातरी गरज वाटलीच असेल ना तुझी."

सागर - "मान्य आहे मला, तिला जेव्हा गरज असेल त्यावेळी मी नसेन कदाचित तिच्याजवळ. पण नेहमी तर असतोच की तिच्यासोबत."

अवनी - "फक्त सोबत असून काय होणार, बायकोला नवऱ्याची साथ हवी असते. प्रत्येक गोष्ट समजुतीने घ्यायला हवं."

सागर - "प्रत्येक गोष्ट कशी मीच समजून घेऊ, बायकोलाही कधीतरी समजून घ्यायला हवं की नाही."

अवनी - "मान्य आहे मला, पण बायकोला नाही समजलं तर नवऱ्याने तिला समजून घ्यावं अशी अपेक्षा असते प्रत्येक बाईची."

सागर - "हो तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे."

अवनी - "नवरा बायकोचं नातं म्हणजे अगदी समांतर असतं, दोघांनी योग्य समतोल साधला की सगळं नीट व्यवस्थित होतं. दोघांनी एकमेकांचा आदर करायचा, एकमेकांच्या ईच्छा.. अपेक्षा जपल्या पाहिजे."

सागर - "हम्मममममम."

अवनी - " तू काय नुसतं हम्म्म करतोय, बरोबर तर बोलतेय मी."

सागर - "हो अवनी मॅडम, बरोबर बोलताय तुम्ही. प्रवचन द्यायला गेलात तर हजारो लोक जमतील ऐकायला."

अवनी - "ए काय रे सागर तू पण "

सागर - "आज तुला मीच भेटलो का?"

अवनी - "हो मग, दिपक तर बाहेर गेलेत ना! मग आता तूच तर आहेस माझ्या सोबत बोलायला."

सागर - "अरे वाह, म्हणजे मीच सापडलो वाटतं आज तुझ्या तावडीत."

अवनी - "हो मग काय तर, रोज तू मला लेक्चर देत असतोस तेव्हा."

सागर - "लेक्चर.. आणि मी."

अवनी - "हो, कंटाळा आणून सोडतोस कधी कधी तू मला."

सागर - "अरे बापरे, मग सांगायचं की मला तेव्हा."

अवनी - "तू मला बोलू देशील तेव्हा ना!"

सागर - "इतकं बोलतो मी?"

अवनी - "हो तर, आता पण बघ दोन वाजत आलेत रात्रीचे. तरी अजून तुझं बोलणं चालूच आहे."

सागर - "ए आता तू बोलत होतीस, आणि तुलाच तर संध्या बद्दल बोलायचं होत ना! मग मला का बोलतेयस आता."

अवनी - "झालं आता बोलून, पण तरीही मला अजून खूप बोलायचं होतं."

सागर - "मग बोल की, मी ऐकतोय अजून."

अवनी - "तू ऐकशील रे, पण मला आता झोप यायला लागलीये आता."

सागर - "झोप आता तू, आपण उद्या बोलू."

अवनी - "हो, तू पण झोप आता. नाहीतर जागत बसशील अजून."

सागर - "मला अजून बराच वेळ आहे झोपायला. तू झोप, तुला सकाळी लवकर उठायचं आहे ना!"

अवनी - "हो, खूप उशीर झालाय. तू पण झोप आता, नाहीतर संध्या येऊन बघेल तू कोणाशी बोलतोय ते "

सागर - "तिला काही पडलेली नाही माझी, ती झोपली असेल केव्हाची."

अवनी - "इतका कडवट पणा बरा नव्हे सागर, कधी ना कधी तुमच्या दोघांमधला हा दुरावा नाहीसा होईलच. तू फक्त वेळ दे तुमच्या नात्याला."

सागर - "मी आहे तयार, पण संध्या तयार नसेल तर त्याला मी काहीच करू शकत नाही."

अवनी - "प्रत्येक बायकोला हेच वाटतं असतं की तिच्या नवऱ्याने तिच्यासाठी थोडातरी वेळ द्यावा. तू तिला तुझा वेळ तरी देऊन बघ, तिला कुठेतरी बाहेर घेऊन जा फिरायला "

सागर - "जाऊ, नक्की जाऊ."

अवनी - "जाऊ काय, ठरवा काहीतरी. नाहीतर असच आयुष्य काढायला लागेल, त्याने आणखी दुरावा निर्माण होईल तुमच्या नात्यात आणि मुलं सुद्धा दुरावतील अशाने "

सागर - "अजिबात नाही, मुलांना अजिबात माझ्यापासून मी दुरावू देणार नाही."

अवनी - "त्यासाठी तुमचं नातं आधी सुरळीत व्हायला हवे."

सागर - "होईल, सगळं होईल "

अवनी - "तू नुसतं होईल असे म्हणून काहीच होणार नाहीये, त्यासाठी तुलाच पुढाकार घ्यावा लागेल."

सागर - "हो, घेईन मी पुढाकार."

"अवनी.. ए अवनी.. "

बराच वेळ झाला समोरून काहीच रिप्लाय आला नाही, म्हणून सागरने अवनीला फोनवर रिंग दिली त्याने ती खडबडून जागी झाली.

अवनी - "काय रे, फोन का केलास? ते ही रात्रीचे दोन वाजून गेल्यावर."

सागर - "अरे तू रिप्लायच देत नव्हतीस म्हणून मग मी फक्त रिंग दिली होती."

अवनी - "अरे झोपली होते मी."

सागर - "अशी कशी झोपलीस मध्येच बोलता बोलता."

अवनी - "मग काय तुझ्यासारखी जागत बसू का रात्रभर."

सागर - "सॉरी सॉरी.. खरचं खुप उशीर झालाय. झोप तू आता."

अवनी - "झोप तू पण, बाय गुड नाईट."

सागर - "गुड नाईट डियर."


"हा सागर पण ना! इतकी छान झोपली लागली होती मला आणि ह्याने मध्येच फोन करून झोप उडवली माझी."
अवनीला बोलता बोलता कधी झोप लागली समजलंच नाही. रात्रीचे तीन वाजून गेले होते.

तिकडे सागरने आख्खी रात्र अवनीच्या बोलण्याचा विचार करत घालवली. खरंतर त्याला तीच सगळं म्हणणं पटलं होतं, पण फक्त त्याच्या एकट्याने काही साध्य होणार नव्हतं.

नवरा बायको एकमेकांना पूरक असतात. दोघांनीही त्या नात्याला समान न्याय दिला पाहिजे. नात्याची ही घट्ट विण एकमेकांच्या विश्वासावर अवलंबून असते. एकमेकांवर जीवापाड प्रेम, त्यांचा आदर, सन्मान करणे तितकेच महत्वाचे असते. एकमेकांवर असलेलं प्रेम व्यक्त करणे, आवडीनिवडी जाणून घेणे हे ही तितकंच महत्वाचं असतं.


एकाचा तोल गेला की दुसऱ्याने त्याला सावरावं, चुकून जर एकमेकांना दुखावलं गेलंच तर माफी मागायला कुठलाच कमीपणा वाटायला नको.
स्वतः चा इगो अहंकार हा बाजूला ठेवून एकमेकांना समजून घ्यायला हवे.

एकमेकांची काळजी घेणे विचारपूस करणे ते ही तितकंच महत्वाचं आहे. त्याने एकमेकांवर असलेलं प्रेम आणखी वाढत सुखाचा संसार होण्यासाठी हा डोलारा दोघांनी सांभाळून घ्यायला हवा. भांडण झाले तरी काही हरकत नाही, उलट भांडणं झाली तरी त्याने प्रेम वाढतं असे म्हणतात.

परिस्थिती कुठलीही एकमेकांचा भक्कम आधार बनून सावरत यायला हवे. नवरा बायकोचं हे पवित्र नात असच शेवटर्यंत टिकून ठेवता आलं पाहिजे. सुखदुःखात एकमेकांची सोबत असली की आयुष्य अजून छान होतं.


🎭 Series Post

View all