शतदा प्रेम करावे - 27

दोन अनोळखी मनांच्या नात्यातली हळुवार गुंफण


शतदा प्रेम करावे भाग - 27


 

अवनीने सागरकडे संध्याचा विषय काढल्याबरोबर सागर बहाणे करू लागला. तिला उगाच काहीतरी कारणं देऊन टाळू लागला. पण अवनीला हे सगळं कळतं होतं.
रात्रीचे अकरा वाजले तरी त्यांचं बोलणं अजुनही चालूच होतं.

अवनी - "सागर, मला कळतंय तू का नको म्हणतोय ते. पण मला सगळं जाणून घ्यायचं आहे तुमच्याबद्दल."

सागर - "का? पण तुला हे सगळं का जाणून घ्यायचं आहे?"

अवनी - "तू हे जे असं वागतोस, त्याच कारण मला जाणून घ्यायचं आहे."

सागर - "का? तू हे सगळं ऐकून काय करणार आहेस?"

अवनी - "एक मित्र म्हणून तुझ्यासाठी जे काही करता येईल ते सगळं मी करेन. अगदी वेळ पडली तर तुझ्याशी भांडेन सुद्धा."

सागर - "अरे वाह, म्हणजे माझ्याकडून सगळं जाणून घेतल्यावर  माझ्याच सोबत तू भांडण करणार. मग कशाला सांगू मी तुला काही."

अवनी - "ए सांग ना रे मला सागर, पण का तू टाळत असतो तिला सारखं."

सागर - "तिला जॉब मिळाला म्हणून खुश आहे ती सध्या."

अवनी - "काय सांगतोस काय?"

सागर - "हो, कालच सांगितल तिने मला हे."

अवनी - "मग छानच आहे की."

सागर - "चांगल तर आहे.. पण फक्त तिच्यासाठी. मला काळजी वाटतेय ती माझ्या मुलांची."

अवनी - "मुलांचं काय, त्यांना कोण बघणार मग."

सागर - "तिला एका शाळेत जॉब लागलाय, अकाउंटिंग डिपार्टमेंट मध्ये."

अवनी - "अरे मग चांगला आहे की जॉब, काळजीचं काही कारण नाही त्यात इतकं."

सागर - "म्हणजे?"

अवनी - "अरे म्हणजे, शाळेच्या सुट्ट्या पण मिळतील तिला आणि सगळ्यात महत्वाचं तुझी मुलं पण त्याच शाळेत घालता येईल. म्हणजे मुलांच्या शाळेच्या वेळात ती घरी येईल."

सागर - "ती खूप पुढची गोष्ट आहे अवनी, माझ्या मुलाला त्या शाळेत जायला आणखी एक वर्ष तरी आहे."

अवनी - "अरे मग तोपर्यंत सवय होईल तिलाही आणि मुलांनाही. तू उगाच किती काळजी करतोस."

सागर - "काळजी नको करू तर काय करू, मला आता रोज ऑफिसला निघतांना थोडा उशीर होईल."

अवनी - "मग काय झालं, कर की थोड ऍडजस्ट तू पण काही दिवस."

सागर - "बरं तू म्हणातोय म्हणून करेन मी सगळं."

अवनी - "ज्जे बात, आता कसं."

सागर - "पण मला नाही पटत हे सगळं, तू कितीही समजावलंस तरी पण."

अवनी - "मग तू सांग, तुला नेमकं काय पाहिजे."

सागर - "तू... तू कायम अशीच बोलत राहशील माझ्याशी."

अवनी - "हो.. पण मध्येच काय हे."

सागर - " काही नाही, जाऊ दे. तू सांग दिपकचा फोन आलेला का?"

अवनी - "हो, आला होता आतच थोडावेळा पूर्वीच. समू जागी होती, ती बोलली फक्त.. सानू तर केव्हाच झोपून गेली होती."

सागर - "म्हणजे तू नाही बोललीस का?"

अवनी - "असं कधी होईल का?"

सागर - "ते ही आहेच म्हणा. कस चाललय त्यांचं काम तिकडे."

अवनी - "चांगल चाललंय, मस्त आहेत ते तिकडे. मित्रांसोबत बाहेर जातात बाहेर जेवायला."

सागर - "मजा आहे मग तिकडे."

अवनी - "कामं पण खूप असतात रे, मजा वाटते आपल्याला इकडे.. पण तिकडे खरचं तसं काही नसतं."

सागर - "माहितीये रे मला."

अवनी - "अरे संध्या राहिली की बाजूला."

सागर - "राहू तिला थोडा वेळ बाजूलाच."

अवनी - "तुमचं लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज."

सागर - "तुला काय वाटतं?"

अवनी - "अरेंज मॅरेज असावं तुमचं."

सागर - "साहजिक आहे ते, लव्ह मॅरेज असते तर मी इथे बसून तुझ्याशी अशा गप्पा मारल्या नसत्या."

अवनी - "हा हा हा.. म्हणजे अरेंज मॅरेज मध्ये प्रेम कमी होत अस म्हणायचं आहे का तुला."

सागर - "आमच्याच बाबतीत अस का झालं काय माहिती."

अवनी - "नेमकं काय झालं तुमच्या बाबतीत, मलाही कळू दे जरा."

सागर - "काही नाही रे, सुरुवातीला चांगल जमायचं आमचं. एकत्र राहत होतो आम्ही सगळे, आई बाबा आम्ही दोघे."

अवनी - "आणि मग आता कुठे असता ते."

सागर - "ते दुसरीकडे राहतात, संध्याच्या स्वभावामुळेच."

अवनी - "कसं काय रे, ती फटकळ आहे का?"

सागर - "फटकळ तर आहेच ती, पण समजून घेत नाही ती लवकर समोरच्याला."

अवनी - "दोघांनी समजून घेतलं तरच संसार चांगला होतो."

सागर - "हो, मी माझ्या परीने खूप समजून घेण्याचा आणि तिला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला."

अवनी - "मग काय बिघडलं."

सागर - "पण तिने समजूनच घेतलं नाही कधी आणि मग हळूहळू आमच्यात दुरावा निर्माण होत गेला "

अवनी - " हे ठीक नाही झालं पण सागर."

सागर - "मग आता काय करावं मी अशी अपेक्षा आहे तुला."

अवनी - "तू अजून समजावून सांग तिला, तिला वेळ दे. तिच्याही काही अडचणी असतीलच की."

सागर - "कसली अडचण, मी होतो ना सोबत तिच्या."

अवनी - "पण तिला नसेल कळत तेव्हा.. तू बोलायला हवं होत पण तिच्यासोबत."

सागर - "काय बोलणार होतो मी, लग्नाच्या दुसऱ्या वर्षीच तिला माझे आई वडील नको होते. म्हणे आपण वेगळं राहूया. तीच ऐकून माझे आई वडील स्वतः गावी निघून गेले."

अवनी - "अरे, चुकलंच तीच इथे."

सागर - "माझे आई वडील पण इतके चांगले आहेत की मुलाचा संसार चांगला व्हावा म्हणून कधीच काही बोलले नाही ते तिला, तिची चूक असून सुद्धा."

अवनी - "तू सांगायला हवं होत खर तर तेव्हा."

सागर - "अरे काय सांगणार आणि किती सांगणार मी."

अवनी - "आता ठीक आहेत ना आई वडील तुझे."

सागर - "हो, गावी चांगले राहतात ते उलट इथे राहून हिच्या मागे कटकट करण्यापेक्षा. शिवाय शेती पण बघतात आणि धान्य ही पाठवतात इकडे."

अवनी - "मग ठीक आहे. तू जातोस की नाही भेटायला त्यांना तिकडे गावी."

सागर - "हो मग, महिन्यातून एकदा जाऊन येतो मी. संध्याची ईच्छा असेल तर ती पण येते सोबत."

अवनी - " असं म्हणतात की, बाळ झालं की थोडाफार बदल होतो. तुम्हांला पहिला मुलगा झाला त्यावेळी तरी बदलली असेल की ती थोडीफार."

सागर - "कसलं काय, उलट तिने बाळाला कधी माझ्या आईजवळ ठेवले नाही. आईला कधी आंघोळ घालू दिली नाही की मॉलिश करू दिली नाही बाळाची तिने."

अवनी - "हे जरा अति झालं सागर."

सागर - "हेच नाही, अजून तर खूप काही आहे. तुला ऐकून शॉक बसेल इतक्या पुढे गेलं आहे तीच वागणं."

अवनी - "नको रे असं बोलू. असेल तिची पण काही मजबुरी."

सागर - "काही नाही, तिची बहिण यायची त्यावेळी तर तिने माझ्यावर संशय घेतला होता. अशी सटकली होती तेव्हा तर माझी, काय सांगू तुला आता मी."

अवनी - "अरे काय बोलतोय तू हे "

सागर - "बघ तुलाही विचित्र वाटलंच ना! अग तिची बहिण राखी बांधायची मला, मग मी असा विचार तरी करेन का तिच्याबद्दल? मला म्हणे तुमच्यामुळे लग्न मोडले तिचे."

अवनी - "काय बोलू आता मी."

सागर - "काही बोलू नको, ऐक तू फक्त आता. तुलाच जाणून घ्यायचं होत ना तिच्याविषयी."

अवनी - "पण मला इतकी वाईट नाही वाटतं रे ती."

सागर - "मग मी खोटं बोलतोय का?"

अवनी - "नाही रे, तसं नाही."

सागर - "पहिल्या मुलाच्या वेळी पण मी खूप समजावून सांगितलं तिला, त्यानंतर दुसरी मुलगी झाली आम्हांला. म्हटलं आता तरी कळेल तिला, एका मुलीची आई झाल्यावर थोडी फार समज आली तरी बस आहे मला."


संध्या बद्दल इतकं काही काही बोलत होता सागर, की अवनीला ते ऐकून विश्वास बसत नव्हता त्याच्यावर. कोणी इतकं कसं काय हेकेखोर असू शकतं बरं!
बदल हा निसर्गाचा नियम आहे, वेळेनुसार सगळ्यांमध्ये बदल झालेला दिसून येतो. पण ती बदल हा सगळ्यांसाठी चांगलाच ठरेल असेही कधी कधी होत नाही ना!


🎭 Series Post

View all