शतदा प्रेम करावे - 7

दोन अनोळखी मनांच्या नात्यातली हळुवार गुंफण


शतदा प्रेम करावे भाग - 7


खूप वेळ विचार करून शेवटी त्याने अवनीला मेसेज करायचं ठरवलं. निदान ती तरी बोलेल माझ्याशी, थोडा वेळ का होईना पण बोलेलं तरी.. इग्नोर नाही करणार अवनी कधीच माझ्या मेसेजला. असे म्हणून त्याने पाठवला मेसेज.. 

सागर - "अवनीईईईईईईईईईईईईईईईईईई."

तिकडून पण क्षणाचाही विलंब न करता अवनीने त्याचा मेसेज वाचला आणि त्यांची बोलायला सुरुवात झाली.

अवनी - "काय हे सागर, किती मोठ्याने ओरडतोस."

सागर - "झाले का ग आवरुन तुझे घरातले सगळे?"

अवनी - "हो, केव्हाच झाले आवरुन. तुझीच वाट बघत होते मी."

सागर - "हो का, मग तु करायचास ना मला मेसेज. आज आमचे पण लवकरच आवरले जेवण."

अवनी - "अरे वा, छानच की."

सागर - "हो, बाकी आजचा काय मेन्यू होता तुमच्याकडे?"

अवनी - "आज काही खास नाही. फक्त मुगाची खिचडी केली कारण आज दिपक जरा उशीराने येणार आहे आणि बाहेरूनच खाऊन येणार आहे. त्यामुळे आमच्या तिघींच लवकर आवरले आणि मुली झोपल्या सुद्धा."

सागर - "अरे वा, मग आज तर उशीरापर्यंत बोलायचा चांस आहे तर."

अवनी - "हो, उशीरा पर्यंत तर बोलू शकते. कारण तसेही दिपक आल्याशिवाय मला काही झोप लागायची नाही."

सागर - "ह्म्मम्म.. अस्से आहे तर."

अवनी - "हो रे, हल्ली खुप काम असत दिपकला. त्यामुळे त्याची चिडचिड पण होते बऱ्याचदा."

सागर - "होणारच, साहजिकच आहे ते. ऑफिसच्या कामाचे प्रेशर असते आणि वरतून बॉसच वेगळंच."

अवनी - "हो रे, समजून घेते की मी पण. नेहेमीच तर समजून घेते."

सागर - "कित्ती हुश्शार आहेस ग, गुणाची बाय ती माझी."

अवनी - "हो का, आगाऊ."

सागर - "आता यात काय आगाऊपणा केला मी."

अवनी - "काही नाही.."

सागर - "अवनी, एक बोलू.. तु चिडू नको पण."

अवनी - "बोल की.. चिडायच की नाही ते नंतर बघते."

सागर - "ए अस नाही हं, तु सांग आधी."

अवनी - "बरं बाबा, नाही चिडणार."

सागर - "मला आत्ता बघायच आहे तुला, एक सेल्फी पाठवतेस का प्लिज?"

अवनी - "ए.. काहीही काय सागर. काम करून करून अवतार झालाय माझा आता, छान नाही दिसते मी अजिबात. केस विस्कटलेले आहेत, कपाळावर टिकली नसेल, चेहरा थकलेला दिसतोय माझा आणि आता उठून आवरायला ही कंटाळा आलाय मला."

सागर - "त्याला काय होतेय, तुला तशीही काही आवरायची गरज नाहीये. तु छानच दिसतेस न आवरता सुद्धा."

अवनी - "हो का, आणि हे तुला बर माहितीये रे."

सागर - "हो मग, मी पाहिलेय तुझे फोटो फेसबुक मधे. अगदी सगळेच एकूण एक."

अवनी - "अरे बापरे! म्हणजे तु काही ऐकणार नाही तर."

सागर - "ऐकणाऱ्यातला वाटतो का तुला मी!"

अवनी - "बास बास, थांब जरा पाठवते."

सागर - "लवकर काढ सेल्फी, वाट बघतोय मी."

     पाच मिनिटे झाली तरी अवनीने काही फोटो पाठवला नव्हता, तिकडे सागर अगदी उतावीळ झाला होता अवनीला बघायला.

सागर - "अवनीईईईईईईईईईईईई.. अग ए, मेकअप करायला गेली की काय ही बाई."

अवनी - "गप रे, आहे इथेच मी. सेंड होतोय बघ फोटो."

सागर - "अरे वा, बिना मेकअपची पण भारीच दिसतेस की तु. मला वाटल घाबरेन मी तुला अशा अवतारात बघून."

अवनी - "काय! नालायका. इतकी वाईट दिसते का मी बिना मेकअपची. आणि मेकअप काय रे, फक्त काजळ, पावडर आणि लिपस्टिक लावली तर त्याला मेकअप म्हणतोस का? काहीही असत तुझं."

सागर - "नाही ग, खुप मस्त दिसतेस पण तु. आणि दिसण्यावर मुळीच जायचं नसतं कोणाच्या, देवाने जस घडवलं तस आपण स्वीकार करायचं. पण आपल्या वागण्यावर मात्र सर्व अवलंबून असते बघ."

अवनी - "ओहो, आज काय फिलॉसॉफी झाडतोय भारी भारी बोलून. तहे दिल से शुक्रिया जनाब."

सागर - "काय बघतेय बाहेर तु, गॅलरीत बसलीये ना."

अवनी - "हो! पण तुला कस माहिती झालं हे."

सागर - "वेडा बाई, तुच आता फोटो पाठवलास ना!"

अवनी - "अरे हो, विसरूनच गेले बघ मी. बाहेर छान गार वारा सुटलाय, मस्त वाटतय एकदम. मला इथेच आवडत जास्त, मस्त झोक्यात झुलत बसायला."

सागर - "अरे वा! छानच आहे."

अवनी - "तु काय करतोय? बेडरूम मधे आहेस का?"

सागर - "बेडरूम नाही ग! मी पण बाहेरच आहे. फेऱ्या मारतोय जरा."

अवनी - "आज जेवण जास्त झालेल दिसतय."

सागर - "तस काही नाही, रोजच मी बाल्कनीत फेऱ्या मारत असतो किंवा मग खाली बागेत जातो."

अवनी - "छान, जेवण जिरले पाहिजे ना!"

सागर - "हो मग काय तर."

अवनी - "बर चला आता माझ्या आवडीचा कार्यक्रम सुरु होणार आहे."

सागर - "अरे हे काय? ह्याला काय अर्थ आहे? तु टिव्ही बघता बघता बोल किंवा मग मधे ॲड लागल्यावर बोलत जा. पण असा कोणता कार्यक्रम बघतेय की माझ्याकडे दुर्लक्ष करतेय तू."

अवनी - "ए दुर्लक्षीत, चला हवा येऊ द्या बघतेय. मला खुप आवडतो तो कार्यक्रम. आणि रडके चिडके सिरियल बघण्यापेक्षा मी हाच कार्यक्रम खुप आवडीने बघते. म्हणजे आम्ही चौघे पण सोबत बसून बघतो."

सागर - "हो का, पण खरचं छान असतो तो कार्यक्रम. एखाद्या रडणाऱ्याला पण हसू येईल ते बघून."

अवनी - "हो ना!"

सागर - "अवनी, तुला एक सांगायच होते.."

अवनी - "हं, बोल ना तु ऐकतेय मी."

सागर - "नको.. आता नको जाऊ दे. तु कार्यक्रम बघ मस्त."

अवनी - "अरे बोल ना, का आता का नको? काय झाले असे मधेच तुला. इतका वेळ बोल बोल म्हणत होतास ना तू."

सागर - "अग तस काही खास नाहीये, असच सहजच म्हटलं होतं मी."

अवनी - "बर.. आता दिपकचा पण मेसेज आलाय, येईलच तो पंधरा मिनिटात घरी."

सागर - "ओके, गुड नाईट डियर."

अवनी - "शुभ रात्री सागर, उद्या बोलू आपण."

    खर तर आज सागरला त्याच्या मनातील भावना अवनीला सांगाव्याश्या वाटत होत्या. पण हे ऐकून अवनी काय विचार करेन माझ्याविषयी . म्हणून आज मुद्दाम टाळले होते. पुन्हा नंतर कधीतरी सांगेन म्हणून.

सागरच्या मनावर अवनीने काही दिवसांतच ताबा मिळवला होत, पण मला जे वाटतय अवनी बद्दल तसेच तिलाही वाटत असेल का? मी जसा तिच्याशी बोलायला रोज इतका उतावीळ असतो, तसेच तिलाही माझ्याबद्दल वाटत असेल का? पण तिला का असे वाटावे? कारण ती तर तिच्या सुखी संसारात खुप खुश आहे, तिच्या बोलण्यावरून तर कायम हेच जाणवते मला,आणि का नसावी! इतका छान नवरा दोन गोंडस मुली असा छोटासा परिवार आहे तिचा. मग त्यात मी कस काय, ती मला फक्त चांगला मित्र मानते, पण माझ्या मनात तिच्या विषयी मैत्रीच्या ही पुढील भावना आहेत.

कारण अवनी होतीच तशी, खुप समंजस प्रेमळ निरागस एक गोड मुलगी. रात्री उशीरा पर्यंत सागर विचार करत होता. असे खुप सारे प्रश्न सागरच्या मनात थैमान घालत होते. आणि त्याने ठरवले की, कधी ना कधी तर अवनीला हे सांगायचेच आहे. मला तिला अंधारात नाही ठेवायचे, जे मनात आहे ते बोलून मोकळे व्हायचे. असे तिच तर सतत सांगत असते मल.

      मनमोकळ्या स्वभावाचा सागर, त्याला मनात एक आणि ओठांवर एक असे कधी बोलताच आले नाही. जे काही असेल ते सर्व सरळ बोलणारा. त्यामुळेच तर बहुतेक अवनीला ही आवडत असावा का तो!


               

🎭 Series Post

View all