शतदा प्रेम करावे - 2

दोन अनोळखी मनांची अलवार गुंफन

शतदा प्रेम करावे भाग - 2 


  

       

         अवनीला सागरचा विचार करत करतच केव्हा झोप लागली हे तिचे तिलाही कळले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा घरातली तीच सकाळची कामं, नाश्ता वैगरे सगळ्यांना देऊन अवनीने फोन हातात घेतला आणि फेसबुक चाळत असताना तिला इनबॉक्स मध्ये मेसेज दिसला. अर्थात तो मेसेज सागरचाच असणार, यात तिला कसलीच शंका नव्हती. घाईघाईने तिने मेसेज बॉक्स मधे पाहिल, फुलांचा गुच्छ आणि त्यासोबत सागरने छान असा सुप्रभातचा मेसेज पाठवला होता. ते बघून अवनी स्वतःशीच गालातल्या गालात हसू लागली.

सागर - "रिश्ते और रास्ते के बीच
            एक अजीब रिश्ता होता है!
            कभी रिश्तों से रास्ते मिल जाते है
            और कभी
            रास्तों में रिश्ते बन जाते हैं!

           गुड मॉर्निंग डियर

      डियर.. त्याने आपल्याला डियर लिहिलेलं बघून अवनीला खूप छान वाटले. कोणीतरी आहे जो आपल्याला डियर म्हणतो, आपल्या मेसेजची वाट बघतो, आपली काळजी घेतो विचारपूस करतो. ही भावनाच मनाला सुखावणारी होती तिच्यासाठी. तिनेही लगेच त्याला मेसेज पाठवला. 

अवनी - "सुप्रभात सागर"

एक मिनिटं सुद्धा वेळ न लावता सागरने तिचा मेसेज पाहिला आणि लगेच तिच्या मेसेजला उत्तर दिलं.

सागर - "अरे वा, मिळाला वेळ आमच्याशी बोलायला."

अवनी - "किती रे चिडतोस तु, काल जरा कामात होते म्हणून बोलता नाही आलं मला. सॉरी, तु खुप वाट बघितलीस का?"

सागर - "नाही नाही छे छे! मी कुठे वाट बघितली तुझी,  मला तर भरपूर कामं होती त्यामुळे मी पण जरा बिझीच होतो."

अवनी - "हो का, मग तुझे दुपारचे मेसेज तर काही वेगळेच सांगत होते."

सागर - "हा ते.. ते.. हो. मी बघत होतो वाट तुझी, पण तु काही आलीच नाही. मग मी काय करणार मी ?"

अवनी - "खरचं रे काल बिलकुलच वेळ मिळाला नाही मला. दोघी मुलींमध्ये दुपारचा कसा वेळ जातो हे तुला काही वेगळ सांगायची गरज नाही."

सागर - "हो.. माहितीये मला, माझा ही सुट्टीचा दिवस कसा संपतो मुलांमध्ये कळत नाही. शनीवार रविवार तर खुप मस्ती असते घरात, नुसता धुमाकूळ."

अवनी - "हो, तु तरी फक्त शनिवार रविवार असतो घरात. मी तर रोजच असते त्यामुळे दिवस पुरत नाही मला."

सागर - "हो ग बाई, खुप कामं करतेस ना तु."

अवनी - "हसायला काय जातय तुला, एक दिवस घरात राहून काम करून बघ मुलांसोबत मग कळेल तुला."

सागर - "माहितीये ग राणी मला, घरी राहून कामं काही होत नाही माझ. मुलांमध्येच खेळण्यात त्यांची भांडण सोडवण्यात दिवस संपतो आणि तिकडे माझा बॉस मला ओरडत असतो."

अवनी - "हो, मग कळलं ना आता मी किती बिजी असते ते. कदाचित तुझ्या पेक्षा ही जास्त."

सागर - "हो.. ग बाई, तुझ्याशी बोलण्यात कोणी जिंकू शकते का?"

अवनी - "ह्म्मम आता कस बरोबर बोललास."

सागर - "बोला, अजुन काय म्हणतेस."

अवनी - "काही नाही, आत्ताच नाश्ता झालाय आमचा. ईडली सांबार केलं होतं, त्यामुळे लवकर भुकही लागणार नाही आणि काम पण सगळी झालीये सकाळची त्यामुळे आज बोलायला निवांत वेळ आहे मला."

सागर - "तरीच म्हटल, राणी साहेब इतक्या कश्या आरामात बोलताय."

अवनी - "हो, मग नको का बोलू."

सागर - "ए थांब ग, बोल की अजुन काही तरी." 

अवनी - "का काय झालं." 

सागर - "तुझ्याशी बोलायला आवडते मला, आणि मोकळेपणाने बोलून होते."

अवनी - "मलाही आवडत बोलायला, पण हल्ली कोणी मिळतच नाही मन मोकळं करायला."

सागर - "म्हणजे मला मित्र तर खुप आहेत पण तु काही वेगळीच आहेस, म्हणजे मी कधी अस इतक मोकळेपणाने कोणत्या स्त्री सोबत कधीही बोललो नव्हतो, जितके मी तुझ्यासोबत बोलू शकतो."

अवनी - "अरे काय सांगतोस! मी सुद्धा कधी अस पर पुरुषा सोबत बोलले नव्हते याआधी, पण तुझ्याशी बोलून मला ही छान वाटते."

सागर - "हो का! पण खरचं तुझ्या रुपात एक खुप छान मैत्रीण भेटली मला."

अवनी - "आणि मला सुध्दा एक चांगला मित्र." 

सागर - "पण मला अस वाटत की, मी जितके मोकळेपणाने तुझ्याशी बोलतोय पण तु नाही बोलत तितक्याच मोकळेपणाने माझ्याशी." 

अवनी - "मला अस एकदम बोलायला खरचं नाही जमत रे, म्हणजे सवय नाही कधी अस इतक बोलायची. होईल सवय हळूहळू मलाही तुझ्या सारखं भरभरून बोलायची."

सागर - "सवय तर होईलच, यात काही वाद नाही. मी आहेच तसा."

अवनी - "हो का! मग बघुच."

सागर - "हो, बघ तु आता. तुला ही माझी बोलायची सवय लागेल आणि माझ्याआधी तुच माझ्या मेसेजची वाट बघशील."

अवनी - "बरं बरं.. इतका विश्वास."

सागर - "हो मग, कॉन्फिडन्स लेव्हल चांगला आहे माझा." 

अवनी - "बर चला आता खुप वेळ झालाय, मला कामं आहेत. बोलूया आपण दुपारी."

सागर - "तुझी दुपार म्हणजे दुसऱ्या दिवशीची सकाळच उगवते."

अवनी - "हो का, पण आज नाही होणार तस काही. मी करते तुला मेसेज माझ आवरल की, ओके."

सागर - "ओके, बघूया."

अवनी - "बाय."

              इतके बोलून सागर आपल्या कामाला लागला, पण त्याला सतत अवनीचाच विचार यायचा डोक्यात. सारख तिच्याशी बोलावस वाटायचे, काय माहिती काय जादू होती तिच्या बोलण्यात.

     सागरचे लग्न ही झाले होते आणि त्याची पत्नी संध्या ही सुध्दा आधी जॉब करायची पण आता ती मुलांसाठी हल्ली घरीच राहत असते. जॉब करणाऱ्या बायकांची घरी असल्यावर खुप चिडचिड होत असते आणि त्यात मुलांना सांभाळून दमायला होत. घरी गेल्यावर संध्याच एकच रडगाण सतत चालू असायच. आणि ते म्हणजे आज मुलांनी खुप त्रास दिला, मी खुप दमलेय त्यामुळे आज जेवणात फक्त डाळ भातच केलाय. मुलांना जेवू घालून संध्या ही कामं आवरून तिचा लॅपटॉप घेऊन जॉब सर्च करत बसायची.


सागरला खुप वाटायचे की संध्यासोबत निवांत गप्पा माराव्यात, प्रेमाच्या गप्पा आणि बरच काही. पण संध्या  दमून लगेच झोपी जायची, त्यामुळे सागर सुध्दा फोन मध्ये काही ना काही बघत बसायचा. बऱ्याचदा त्याने अवनीला मेसेज करायचा विचार केला पण, पुन्हा त्याचे हात  थांबायचे की इतक्या रात्री मेसेज केलेल बर दिसणार नाही म्हणून तो विचार करत करत तसाच झोपून घ्यायचा.
            

        दुसऱ्या दिवशी पुन्हा आवरून सकाळी मुलांना  फिरायला घेऊन जायचा जवळच्याच बागेत आणि तो मॉरनिंग वॉक करायचा तोपर्यंत मुल खेळायची आणि नंतर मग घरी यायची. घरी आल्यावर आवरून नाश्ता करून सागर ऑफिसला निघायचा आणि गेल्या बरोबर एक मेसेज अवनीला हमखास असायचा. म्हणजे त्याला आता इतकी सवय झाली होती की रोज न चुकता त्यांची मेसेज करायची वेळ ठरलेली असायची. दहाच्या आसपास सागरचा मेसेज यायचा आणि इकडे अवनी सुद्धा सकाळची काम आवरून फोन बघत बसायची, म्हणजे ती सुद्धा सागरच्याच मेसेजची वाट बघायची. त्याचा मेसेज आलेला दिसला की तिला वेगळाच आनंद व्हायचा.
          

       रोज तासभर तरी बोलायचे सकाळी दोघ पण आणि नंतर दुपारी लंच ब्रेक मध्ये वेळ मिळाला तर तेव्हा ही बोलायचे. पण रात्री कधीच बोलत नसायचे, कारण अवनीने त्याला सांगून ठेवले होते की, बोलायचे झाल्यास मी सकाळी दहा वाजेपासून ते रात्री आठ पर्यंतच बोलू शकते. कारण त्यानंतरचा माझा वेळ हा फक्त ऑफिसमधून येणाऱ्या माझ्या पतिदेवांसाठी राखून ठेवलेला असतो. कित्ती छान ना! पत्नी आपल्या पतिसाठी त्याला त्याचा हक्काचा वेळ देते. आणि तो दिलाच पाहिजे, नाहीतर नात्यात फक्त औपचारिकताच उरते. जसे की आमच झालय आता सध्या, सकाळी ऑफिसला जा, काम करा.. आणि रात्री घरी आल्यावर जेवून झोपा. एक पोकळी निर्माण झालीये सागर आणि संध्यामध्ये. पण संध्याशी डोक लावणे म्हणजे आ बैल मुझे मार अशी गत होते माझी.
          
         पतीपत्नीच्या नात्यात खरचं मोकळेपणाने बोलने खुप गरजेचे असते. नाहीतर दोघांमध्ये एकप्रकारे गैरसमज होतात आणि नात्यात दुरावा निर्माण व्हायला वेळ लागत नाही.

             पती आणि पत्नीनं एकमेकांना काही निवांत आणि मनमोकळे क्षण नक्कीच द्यायला हवेत. ते मिळाले नाहीत तर नाती कोरडी आणि शुष्क होत जातात, आपल्या नकळत. वेळीच सावरलं तर ठीक, नाहीतर नात्याचं हे झाड वठायला वेळ लागत नाही..!

🎭 Series Post

View all